“ श्री महद्भागवतमहापुराण “ - प्रथम खंड

श्रीमद्भागवत ही...

Share

पुस्तक परीक्षक – डॉ.शैलेंद्र काळेखडकी एज्युकेशन सोसायटीचे टीकाराम जगन्नाथ कॉलेज, खडकी, पुणे

श्री महद्भागवतमहापुराण “ हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा महान आध्यात्मिक ग्रंथ आहे. भक्तासाठी श्रीकृष्ण परमात्म्याने सगुण सागर रूपात केलेल्या मुलांचे वर्णन आणि त्यातील अध्यात्मिक सूत्र वाचकाला आनंद देते. त्याचबरोबर पुरणग्रंथातील पौराणिक व्यक्तिरेखा प्रल्हाद, नारद, अंबरीष, ध्रुव, गजेंद्र अशा अनेक व्यक्तिरेखा या आठ प्रकरणातील पहिल्या खंडात विशेषत्वाने दिसून येतात. भक्तांना भक्ती पंथावर आणणारी दिव्य चरित्रे यात आलेली आहेत. श्रीमद्भागवत महापुराणाचे खंड एक आणि खंड दोन यांचे श्रवण, चिंतन आणि पठण केल्यानंतर अध्यात्मिक मुक्तीचे म्हणजे मोक्ष प्राप्ती होते अशी परिस्थिती या ग्रंथात दिलेली आहे.

हिंदू धर्मात वेदांचे भाग केलेले आहेत यात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचे मार्गदर्शन महर्षी व्यासांनी महाभारतात केलेले आहे यातूनच श्रीमद्भागवतमहापुराण याची रचना झालेली दिसून येते. मोक्ष म्हणजे मुक्ती त्याच्या प्राप्तीसाठी यात काही जीवन तत्त्वप्रणाली श्रीकृष्ण रूपाने आणि त्याच्या लीलाने वर्णन केलेले आहेत. मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्म ऋषींनी सांगितलेल्या 17 पुराणातील भक्ती आणि परमशांती ज्या पुरानात लाभते ते महापुराण म्हणजे,”श्रीमद्भागवत महापुराण होय.

हिंदू पुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने म्हणजेच सर्वसामान्यांच्या गोपाल कृष्णाने जेव्हा लौकिक दृष्ट्या भूलोकावर येण्याचे ठरविले तेव्हा त्याने सामान्यांच्या पोटी जन्म घेऊन सामान्यांना भक्ती शिकवण्यासाठी स्वतःचे काल महात्म्य दुर्जनांचा खल करण्यासाठी अवतार घेतला आणि सजनांना त्रासातून मुक्त केले याची भागवत कथा या ग्रंथात वाचायला माझ्या भक्तांसाठी माझ्या प्राप्तीचे सुलभ साधन म्हणजे श्रीमद् भागवत महापुराण’असे खुद्द श्रीकृष्णाने या ग्रंथाच्या पहिल्या खंडात सांगितलेले आहे. श्रीमद्भागवत हा एक आध्यात्मिक प्रासादिक भागवत ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या पठण म्हणून चिंतनातून लौकिकोबारलौकिक फळांची प्राप्ती होते असे वर्णन या ग्रंथात जागोजागी आलेले आहे. अनेक तीर्थ श्रद्धांजली मुक्ती मिळवण्याचे साधन म्हणजे हा ग्रंथ होय.

विशेषात्वाने, श्रीकृष्णाच्या जिवंत तत्त्वज्ञानाचा जगात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी श्रीकृष्ण मुखातून आलेल्या भागवत धर्माचे तत्वज्ञान या ग्रंथाच्या मुळाशी आहे. मूळच्या संस्कृत भाषेतील श्रीमद्भागवत पुराण मराठीत अनुवादित केलेली प्रतीचे परीक्षण करताना ही दहावी आवृत्ती सुधारित आहे.

श्रीमद्भागवत ग्रंथाच्या विषय सूचीमध्ये दिल्याप्रमाणे एकूण आठ स्कंद पहिल्या भागात आहेत. यामध्ये अनुक्रमे पुढील प्रमाणे विषय अतिशय सविस्तरपणे संस्कृत आणि मराठी अनुवाद रूपात सुलभ पद्धतीने वाचायला मिळतात ते असे;

पहिल्या खंडात “श्रीमद्भागवतमहात्म्य”सांगताना ग्रंथकाराने देवर्शी नारदाची भगवान श्रीकृष्णाशी झालेली भेट,भक्तीचे दुःख दूर करण्यासाठी नाराजांनी केलेला प्रयत्न, गोकर्ण आख्यान, धुंधकारीचा प्रीती युनीतून जन्म आणि त्यातून त्याचा झालेला उद्धार कथन केलेला आहे हे सांगताना शौनक ऋषींचे प्रश्न विवेचन आलेले आहे. भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य येथे सांगितले आहे. श्रीकृष्णाचे अवतार वर्णन सांगितल्यानंतर महर्षी व्यासांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. भगवंताच्या यश कीर्तीचे महती देवर्षी नारदाने येथे सांगितलेली आहे. यात नारदांच्या पूर्व चरित्राचा उरलेला काही भाग, अशोकामाचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अशोकामाची मानहानी झालेला प्रसंग घेतलेला आहे. परीक्षेचे गर्भात रक्षण कोणती ने केलेले भगवंताची स्तुती आणि उद्दिष्टाचा शोध हे वाचल्यानंतर श्रीकृष्णाचे द्वारकेला जाणे आणि परीक्षिचा जन्म ते परीक्षिचे अनशन व्रत आणि शुकदेवचे आगमन आहे.

दुसऱ्या खंडात भगवंताचे विराट स्वरूप दर्शन पाहावयास मिळते यात, श्रीकृष्णाचे स्थूल आणि सूक्ष्म रूपा सह विराट रूप ग्रंथकाराने अतिशय आध्यात्मिक प्रवृत्तीने गायलेली आहे. शिवाय इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद भक्तीचे महात्म्य निरूपण येथे केले आहे. हे वर्णन करताना सृष्टी वर्णन विराट सुरू भगवंताच्या लीला अवतार राजा परीक्षित असे विविध प्रश्न ब्रह्मदेवाचे भगवद्दाम दर्शन आणि शेवटी भागवताची दहा लक्षणे सांगितलेली आहेत.

तिसऱ्या स्कंधात उद्धव आणि विदुराची भेट आणि भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन अतिशय विलोभनीय आहे. भगवंताच्या या लीला वाचताना साक्षात्कार होतो. सृष्टीचे वर्णन आणि विस्तार,वराहाचा अवतार,दितीची गर्भधारणा, जय विजय यांना मिळालेला शाप, हिरण्यक्षाबरोबर वराह भगवंतांचे युद्ध आणि हिरण्याक्ष वध अतिशय भावस्पर्शी वर्णनातून वाचायला मिळते. कर्जमांची तपश्चर्या कपिल देवाचा जन्म ही प्रकरणे विलोभनीय आहेत. प्रकृती पुरुषाचे विवेचन या स्कंदर वाचायला मिळते. भक्तीचे मर्म आणि कालाची महिमा वाचताना सामान्य जीवाला आनंद होतो आणि साक्षात्कार होतो भगवंताचा.

चौथ्या स्कंधात मनूच्या कन्येचा वंश वर्णन आणि कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून महादेवाची मनधरणी करून ध्रुवंशाचे वर्णन भगवंताने केले आहे यात राजा दुधाचे तपश्चर्य आणि परलोक गमन महत्त्वाचे आहे, कारण पृथ्वीच्या वंशपरंपरेत भगवान रुद्राच्या उपदेशाने पुनर्जन्माचे तात्पर्य अध्यात्मसुत्रात आपल्याला येथे वाचायला मिळते आणि भगवान श्रीकृष्णाचे सामान्यांना वरदान लाभते.

पाचवे स्कंधात नाभि राजाच्या चरित्रातून प्रिय वृत्त चरित्र वाचताना ऋषभ देवाचे राज्य शासन आणि ऋषभ देवाच्या पुत्रांचा उपदेश वाचताना सर्वसामान्यांना जीवन चरित्रातून जीवन प्रशासन तसे असावे हे समजून घेता येते.

सहाव्या स्कंधाचा उपाख्याने प्रारंभ होतो. विष्णू दुतांकडून भागवत धर्माचे निरूपण अतिशय विलोभनीय आहे. एम आणि एमथुतांचा संवादातून श्री नारदाने केलेला उपदेश दक्षपुत्रांना जशी विरक्ती येते तशी संसार प्रपंच परमार्थ याचे तत्व सामान्य समजून येते. दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांच्या वंशाचे विवरण आणि ब्रहस्पतीकडून देवांचा त्या ही प्रकरणे विश्वरूपाचे दर्शन घडवते.वृत्रासूराची वीर वाणी आणि त्याचा वध इंद्रावर ब्रह्मा हत्तीचे आक्रमण या सर्व गोष्टीतून जीव जगत आणि जन्म याचे सामान्यांना ज्ञान होते.

सातव्या स्कंधात नारद-युधिष्ठिर यांच्या संवादातून जय विजयाची कथा सामान अतिशय भावते. हिरण्यक्षाच्या वधा नंतर हिरण्य कशी कडून माता व कुटुंबाचे झालेले सात्वन आणि त्यातून तपश्चर्य आणि विरप्राप्ती सामान्यांना पापातून प्रायोजित घेण्याची शिकवण देते. भगवान नरसिंहाचा अवतार आणि हिरण्य कशी पूजा वध देवाने केलेली स्तुती आजही जनसामान्यात श्रीमद् भागवत महापुराणामुळे प्रसिद्ध आहे.

श्रीमद् भागवत महापुराणाच्या पहिल्या खंडातील शेवटच्या आठव्या स्कंधात मन्वंतराचे  वर्णन आलेले आहे. भगवंताचे मोहिनी अवतार आणि अमृताचे वाटप देव सूर यांचे युद्ध देवांचा विजय या सर्व गोष्टी वाचताना भगवानाचा बली कडून तीन पावले जमीन मागणे आणि बरीच वचन घेणे यातून शुक्राचार्याच्या अडचणी याचे वर्णन वाचताना सामान्यतः सामान्य भागवत भक्ताला प्रपंचातील व्यावहारिक परंतु जगण्याचे सुलभतत्व लाभते. भगवान वामनांच्या विराट रूपाचे पृथ्वी आणि स्वर्गातील दर्शन बली कडून भगवंताची स्तुती म्हणजे सामान्य माणसाने भगवंताची केलेली स्तुती या शेवटच्या स्पंदत वाचताना मनाला अध्यात्माचा आनंद प्राप्त होतो.

“ श्रीमद्भागवतमहापुराण” या पुराण ग्रंथाचा पहिला खंड समाप्तीत श्रीमद् भागवताची आरती दिलेल्या आर्थिक “ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण!! गीते वेधि मन पूर्ण! अनन्य होता या शरण! खचित टळे जन्म-मरण!! अशी हिंदू धर्मातील अध्यात्माची सायुज्य समाधीतून येणारी मोक्षमुक्तीचा सुलभ ग्रंथलाभ सांगितला आहे.

Original Title

“ श्री महद्भागवतमहापुराण “ - प्रथम खंड

Publish Date

2022-01-01

Published Year

2022

Publisher, Place

Total Pages

895

Format

Hardcover

Country

India

Language

Sanskrut+ Marathi

Submit Your Review