छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटनांचा , राजकारण, शौर्य, त्यानी शत्रूंला केलेला प्रतिकार प्रभावीपणे सादर केला आहे.
Lipare Asha Sagar, Assistant Professor (BBA Dept) Camp Education Society's Dr. Arvind B. Telang Senior College Of Arts, Science & Commerce, Nigdi Pune-44. संभाजी ही कादंबरी प्रेरणा, Read More
Share
Lipare Asha Sagar, Assistant Professor (BBA Dept)
Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College Of Arts, Science & Commerce, Nigdi Pune-44.
संभाजी ही कादंबरी प्रेरणा, कुटुंबाकडून आलेला वारसा, नीती ,तत्त्व ,त्याग ,सहनशीलता आणि विश्वास या विविध पैलूं वरती प्रकाश टाकते. कादंबरीत संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याच्या विविध पैलूंसोबतच त्यांची धोरणे, त्यांचा संघर्ष, त्यांची लढाऊ वृत्ती आणि त्यांचे राजकीय दृषटिकोनही समजून सांगितले आहेत. कादंबरीत संभाजी महाराजांचे एक शूर आणि निर्भीड, संवेदनशील, रयत प्रिय राजा म्हणून वास्तव दर्शी चित्रण आहे. संभाजी कादंबरीचा संवाद, भाषाशैली, आणि ऐतिहासिक तपशिल यामुळे वाचकाला एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या संघर्षाची आणि पराक्रमाच्या वाचनाची गोडी लागते. कादंबरी आपल्याला वैयक्तीक जीवनामध्येही कठीण प्रसंगाना कसे सामोरे जावे याची प्रेरणा देते. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लढाऊ संभाजी दडलेला असतो याची जानिव ही कादंबरी करुन देते.