
Your thoughts are meaningful and timely. Aselfie isn’t just about...
Reviewer :Phopse Puja Ashok (T. Y. B. Pharm)
Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Pharmacy
अरविंद जगताप लिखित सकाळ प्रकाश यांच्याकडून प्रकाशित झालेले बहुचर्चित सेल्फी हे पुस्तक वाचून पूर्ण झालं त्या पुस्तकातलं प्रत्येक वाक्य मनाला स्पर्श करून जात .भाजलेल्या मनावर हळुवार फुंकर घालून जात .वाचता वाचता वाचक काही काळ थांबतो आणि पुस्तकातील वाक्यावर थोडावेळ का होईना विचार करतो.लेखकाने पुस्तकात वाक्यांची खूप चॅन रचना केली आहे पुस्तकातील माझ्या मनाला भावलेली वाक्य –
- स्वतःमध्ये डोकावत राहील पाहिजे माणूस एकटा पडत नाही
अरविंद जगताप लिहितात – सेल्फी नेहमी बर दिसण्या साठी केलेला प्रयंत्न असतो ,पण त्या निमित्ताने आपले दोषच खूप दिसतात , उगीच हसण्याचे, दिसायचे फोकस नसावे हे आपले दोष बघता बघता चार माणसात बर दिसण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा असतो.
बर दिसणे हे नेहमी कॅमेरावर अवलंबून आहे असाच आपला समज असतो .मग आपण मोबाईल बदलत राहतो पण आपण बर दिसण्यासाठी बदल हा आधी आपल्या स्वतः मध्ये गरजेचं असतो .
बर दिसणं म्हणजे चेहरा आणि रंग नाही बरकाया सगळ्या सेल्फी एकत्र केल्या तर समाज म्हणून आपण बरे दिसतो का हा विचार महत्वाचा आहे . त्यासाठी आपण आपल्या डोकावून बघणे गरजेचे आहे .
मला वाटत सेल्फी या पुस्तकात अरविंद जगताप यांनी जे काही लिहिलं ना ते स्वतः ला बघण्यासारखं हे खूप प्रामाणिकपणे फिल्टर न वापरता आपण सेल्फी घेतली तेर आपला पाहतो बराचसा आधार कार्ड सारखा दिसतो ना एकदम अस्सल तीच कायदेशीर ओळख आणि तेच खर चित्र या सेल्फीतून आपल्या डोळ्यापुढे येत आपल्या सामाज्याच खरं चित्र ज्या सेल्फीतून आपल्या डोळ्यापुढे येत ती मोबाईल ची सेल्फी नाही तर ती अरविंद जगताप यांच्या शबदांची आहे .
काय म्हणतात अरविंद जगताप ते पाहिलांदा विकासाच्या गोष्टींवर बोलतात ते म्हणतात १७६५ मध्ये नारायण सिंग माणसाची खंत होती कि आम्हाला आता काही मान राहिला नाही इंग्रज लोकांचे हुकूम आम्हाला ऐकावे लागतात .हेच नारायण सिंग असते तर आपल्या देशातील लोक पाणी वापरायचे सोडून टिशू पेपर वापरायला लागले हे बघून त्यांना काय वाटलं असत.
आपल्याला गावात टँकर आला तरी आनंद होतो ,पण खरं तर नळाला पाणी यावं हे अपेक्षित असत पण आपल्यावर एवढी वाईट वेळ आणली जाते कि आपण टँकर आला तरी आपण आनंदी होतो ,रस्त्यात खड्डे नसले तरी आपण आनंदी होतो ,किव यावी एवढे सहनशील झालोय आपण .
अप्रितम लिहितात अरविंद जगताप ,माणसाच्या मनातल्या भावनांना शब्द देण्याची अप्रतिम देणगी त्यांना लाभलेली आहे आणि त्याच हे पुस्तक ‘सेल्फी ‘.
ते म्हणतात ज्या झाडावर माकडे जास्त असतात त्या झाडावर हरणांचा कळप जमतो कारण हरणांना माहित असत माकड खातात कमी आणि नासधूस जास्त करतात ,माकडांची मस्ती होते ,हरणांची भूक भागते .माणसांच्या बाबतीतही असं व्हायला पाहिजे ना -वाढदिवशी तोंडावर चोपडलेला केक कोणाला खायच्या कामी येत नाही .नारळाचं पाणी देवालाही मिळत नाही आणि मातीलाही ,ते फरशीवर सांडपाणी होऊन जात .एखाद्या ग्लासात साठवून ते एखाद्या माणसाला पाजता येत नाही का?
निसर्ग देत राहतो पुन्हा पुन्हा ते आपल्याला थोडं तरी शिकलं पाहिजे .आपल्याकडे खूप काही असत ,बऱ्याचदा आपल्याला ते माहित नसत .बाकी सोडा काही आवडलं तर आपण दाद देऊ शकतो ,जर सचिन -सचिन ओरडणारे लोक नसते ,तर सचिन तेंडुलकर असण्यात काय अर्थ ? लोक कर्तृत्वाने मोयहे होतात पण कौतुकाने त्यांना बळ मिळत ,त्याने प्रवास पूर्ण होतो .प्रत्येकाने पैसाच द्यायला हवा असं काही नाहीं ,आपण आपलं श्रम देऊ शकतो ,आपला वेळ देऊ शकतो ,एखाद्याला मन मोकळं करायला कान देऊ शकतो .
बोललं पाहिजे ,व्यक्त झालं पाहिजे कारण या बोलण्यातून आपल्या बऱ्याच चिंतांचे निराकरण होत .खरं तर आपण कोणाचीच चिंता करून त्याच भलं करू शकत नाही .माणूस कितीही मोठा झाला तरी तो कोणाला सावली देऊ शकत नाही .
स्वतः माणूस सोबत देऊ शकतों ,खांदा देऊ शकतो ,हात देऊ शकतो ,कष्टाची साथ देऊ शकतो पण कितीही उंची गाठली तरी सावली देऊ शकत नाही .
कोणी काही देऊ शकत कि नाही माहित नाही पण हे पुस्तक मात्र आधाराचा हात देत ,थोडीशी साथ देत ,आशा देत ,माया देत, प्रेम देत ,
सेल्फी मध्ये एक लेख आहे ,”त्या नदीच्या पार तेथे “या लेखामध्ये गावाकडील ग्रामीण जीवनाचे ,स्त्रियांच्या कष्टाचे खूप छान वर्णन करण्यात आले आहे ,जे पार्ट पार्ट वाचण्यास उद्युत करते ,मनाला सुखद आठवण देते ,जी आठवण कायम हृदयात साठवून ठेवावी वाटते .
माणसाचे विचार जसे असतात तसाच माणूस असतो त्यामुळे आपल्या मनावर संस्कार करण्यासाठीच सेल्फी एकदा वाचलंच पाहिजे आणि वाचून खरंच एकदा आपल्या मनात डोकावलं पाहिजे .
Thank you
Phopse Puja Ashok
(T. Y. B. Pharm)