
एक भाकर तीन चुली
एक भाकर तीन चुली “संकटातून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कांदबरीची नायिका आहे.गाव खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिमंत हा कांदबरीचा गाभा आहे. स्वतः च्याच जातीत होणारी कुचंबना वाट्याला आलेली आमच्यासारखे अनेक गरीब कुटंब आजूबाजूला होती.त्यात सगळ्यात जास्त फरफट झाली ती स्त्रि यांचीच.त्यामुळे मी माझ्यापरीन अन्यायाविरुध्द आवाज उठवणारी स्त्री उभी करण्याचा प्रयत्न केला आहे,अशी स्त्री की जिला माहीत आहे आज तिच्या अंगणात काढलेली रांगोळी उद्या पुसली जाणार आहे,तरीही लढाऊ बाणा न सोडता संकटावर कसं तुटून पडावं? कृतिशिल क्रांतीची ज्योत क्षनी होऊन देता यशाची खात्री नसलेल्या अंधारातील वाट दाखवणारी मशाल बनून कसं ढणढणत राहावं,? आपल्याच हातांनी स्वत:च्या मनावर निखारे ठेवून एकट्या स्त्रीनं निर्भयपणे कसं जगावं? मायेचं एकही माणूस जवळ नसतानाही डोळ्यात पाणी न आणता आयुष्याची दीर्घकालीन लढाई न थकता कसं लढत राहावं? घराच्या भितींना पोटरा देणारे मुकाट व संमजस हात कधीकधी आई भवानीचा अवतार घेऊन अन्यायाचा छातीत भाला कसे खुपसू शकतात? खरं तर हे सगळं शब्द|त पकडणं फार अवघड अन् वेदनायी होत.
नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जाती धर्माच्या असंख्य अनामिक स्त्रीयांना ही कांदबरी समर्पित केली आहे.
आणि वैयक्तीक संघर्ष यावर आधारित जीवनातील विविध पैलुंचा आव्हानांचा आणि नातेंबंधांविषयी गूढ संकेत आहे. कांदबरीतील मुख्य पात्र भाकर तयार करणाऱ्या प्रमाणेच त्यांच्या जीवनातील तीन मह्त्वाच्या पैलुंमध्ये अडकलेले आहे.
वैयक्तिक व्यावसायीक आणि सामाजिक या तीन चुलीचे व्यवस्थापन करताना त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. कांदबरीचे लेखन खूप साधे वा गहन आहे. झिंजाड यांची शब्दशैली भलेही साधी असली तरीही त्यातील संवाद प्रभावी आहेत.पत्रांची मानसिकता आणि भावनिकता उलघाल उत्तम प्रकारे दर्शवली आहे, या कादंबरीतील पात्र आणि त्यांचा दाखवला गेलेला चांगुलपणा आणि चुकांपासून एका व्यक्तीचे व्यक्तीमत्व कसे असेल हे लक्षात येते व वाचकाचा वाचनातील रस वाढतो .
“एक भाकर तीन चुली” एक भावनिक अंतर्मुख आणि विचार करायला भाग पाडणारी एक कांदबरी आहे.जी माझ्या दृष्टीने मह्त्वपूर्ण आहे. जीवनाच्या जटिलतेला उजाळा देणारी समाज आणि व्यक्ती यांच्यातील संघर्ष उलगनारी ही कांदबरी प्रत्येक वाचकांसाठी अपेक्षा आणि आपले अस्तित्त्व यांच्यातील ताणतणाव व्यक्तीगत इच्छा शक्ती आणि समाजातील नियम यामधील युद्ध नेहमीच व्यक्त केले आहे.एक उत्तम वाचनाचा अनुभव आहे.