या पुस्तकातील हेलन केलर हि महिला अंध अपंग आणि मूक बधीर होती. वयाच्या १९ महिन्यापर्यंत ती अत्यंत
Read More
या पुस्तकातील हेलन केलर हि महिला अंध अपंग आणि मूक बधीर होती. वयाच्या १९ महिन्यापर्यंत ती अत्यंत आनंदी व निरोगी होती परंतु दुर्दैवाने ती एका भयंकर रोगाच्या विळख्यात सापडली आणि त्यामुळे अंध आणि मुकबधीर झाली. हेलनच्या आईने २० वर्षीय अन सलिव्हन ची भेट घेवून तिला हेलनची प्रशिक्षक म्हणून निवडले. अन सलिव्हन मुळे हेलनला जीवन जगण्याचे धडे मिळू लागले. अन सलिव्हन हेलनला शिस्त व वळण लावत निश्चयी व कठोर प्रशिक्षण देत होती. हेलन हि माता पिता पेक्षा अन सलिव्हन वर जास्त अवलंबून राहत होती. हेलन साठी अन सलिव्हन ने ज्ञानच आकाश मोकळे केले होते.
१९०४ मध्ये वयाच्या २४व्या वर्षी हेलन रॅडक्लिफ कॉलेज मधून कला शाखेची पदवीधर झाली. हेलन ई लेखन करू लागली व तिचे लेख प्रकाशित होवू लागले. त्यातून हेलन ला पैसे देखील मिळू लागले. हेलन हि जनतेसाठी संघर्ष करत होती. बालमजूर प्रथा बंद करावी या साठी तिने प्रयत्न केले. मानवतेच्या दृष्टीकोनतुन विविध चळवळी ना तिने पाठींबा दिला. अशा या थोर मानवतेच्या पुजारी असलेल्या हेलन केलर ला कोटी कोटी प्रणाम.
Wagh Nilam Ganpat (M.V.P. Samaj Adv. Vitthalrao Ganpatrao Hande College of Education, Nashik.)
Show Less