अग्निपंख: आत्मचरित्र ए. पी. जे. अब्दुल कलाम

By डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Share

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतारली आहे. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.

Share

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतारली आहे. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.

Availability

available

Original Title

अग्निपंख: आत्मचरित्र ए. पी. जे. अब्दुल कलाम

Publish Date

1999-01-01

Published Year

1999

Total Pages

179

ISBN

978-8174349071

ISBN 10

8174341447

ISBN 13

9788174348807

Format

Paperback

Country

India

Language

मराठी

Translator

प्रा. माधुरी शानभाग

Average Ratings

Readers Feedback

अग्निपंख

Vaibhavi Dattatray Botre (T.Y.BCS) CES's Dr. Arvind B. Telang senior College of ACS, Nigdi Pune. अग्निपंथ्व हे भारताचे माजी राष्ट्रपती भाणि शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल...Read More

Dr. Uday Jadhav

Dr. Uday Jadhav

×
अग्निपंख
Share

Vaibhavi Dattatray Botre (T.Y.BCS)
CES’s Dr. Arvind B. Telang senior College of ACS, Nigdi Pune.
अग्निपंथ्व हे भारताचे माजी राष्ट्रपती भाणि शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच आत्मकथन आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या बालपणापासून ते वैज्ञानिक म्हणून देशासाठी केलेल्या कामापर्यंतचा प्रवास मांडला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ कलाम त्यांच्या बालपणाचे आणि लहान गावातील जीवनाचे वर्णन करतात. ते एका साध्या कुटुंबात जन्मले होते. त्यांचा जीवन‌प्रवास अतिशय साधा आणि कष्टपूर्ण होता. डॉ. कलाम शालेय जीवनात आणि कॉलेजमधील शिक्षणात अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व होते. आपल्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकदा कर्ज घेतले. या पुस्तकात त्यांनी इस्त्रो आणि डीआरडीओ सारख्या संस्थांमधील कामाचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ सारखी क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी घेतलेली मेहनत वाचकाला प्रेरना देते. डॉ. कलाम यांनी भारताच्या राष्ट्रपती पदावर २00२ ते २००७ दरम्यान सेवा केली. त्यांच्या अध्यक्षतेत भारताने महत्त्वपूर्ण प्रगती केली. डॉ. कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने आश्विक चाचन्यांचा निर्णय घेतला. जो अत्यंत ऐतिहासिक ठरला. राष्ट्रपती असताना त्यांनी लोकांशी संवाद साधन्या साठी, त्यांनी देशाच्या विविध भागात जाऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्याऱ्या प्रयत्न केला.
डॉ. कलाम यांनी प्रत्येक वाचकाला विशेषतः तरूण पिढीला स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्या स्वप्नांच्या दृष्टीने कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरित केले. आहे. पुस्तकात त्यांनी जीवनाच्या अडचणींवर मार्ग सांगितला आहे. आणि यशाच्या दिशेने चालताना कोणत्याही अपयशाच स्वागत करायला शिकवल.
अग्निपंख हे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. डॉ. कलाम यांच्या जीवनाच्या संघर्षाची , यशाची आणि वैज्ञानिक योगदानाची कथा वाचकांना धैर्य आणि आशा देणारी आहे. हे पुस्तक मुख्यतः तरुण पिढीला स्वप्न पाहण्यासाठी, ध्येय ठरवण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करते.

फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणारे अग्निपंख पुस्तक

श्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) परिचय मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान...Read More

मस्के रामकृष्ण नेमीचंद

मस्के रामकृष्ण नेमीचंद

×
फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणारे अग्निपंख पुस्तक
Share

श्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर)
परिचय
मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि संघर्षमय चित्रकथा रेखाटले आहेत. या पुस्तका
ची सुरुवात त्यांनी मातापित्या स्मरून करून केली. या पुस्तकात अब्दुल कलामांच व्यक्तिमत्व उलगडला आहे.
कथानक
कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामा नाथ पुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्यामुळे कलाम यांना गावात वर्तमानपत्रे विकून तसेच लहान मोठी कामे करून पैसे कमवावे लागले. त्यांचे बालपण खूपच कष्टात गेले. शाळेत असताना एकदा गणिताचे शिक्षक राम कृष्ण अय्यर यांनी छडीने मारले तेव्हा ते मनावर घेऊन पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या कलामांचे अनेक वेळा कौतुक झाले. माझ्या छडीचा मार खाणारे पुढे जाऊन मोठी व्यक्ती बनतात असे ते शिक्षकांनी म्हटले. कलमांना गणिताची मोठी आवड होती. नंतर ते तिरुपतीलापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे बीएससी झाल्यानंतर त्यांनी मद्रासी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रवेश घेतला. प्रवेशासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने घाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेचेत एराणॉटिकलचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. जीवनातल्या अनेक संघर्षाशी दोन हात करत कलाम यांनी आपले ध्येय गाठले.
शैली आणि मांडणी
अतिशय सहजतेने आणि सोप्या भाषेत या पुस्तकाची मनोहर शब्दात मांडणी केली आहे. आयुष्यातील यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे माणूस प्रचंड इच्छाशक्तीने संकटावर मात करी कसा यशस्वी होतो याच उत्तम मांडणी यात करण्यात आली आहे. कलामान्य सहजतेने आपल्या यशाचे रहस्य वाचकांना या पुस्तकात उलगडून दाखवले आहे.
विशेष वैशिष्ट्ये
तरुणांसाठी प्रेरणादायी पुस्तक.
जगात सहजतेने काही मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात हा संदेश.
अभ्यास कष्ट आणि परिश्रम हे वाया जात नाहीत याची प्रचिती म्हणजे हे पुस्तक.
समारोप
डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या सर्व सहकाऱ्यांना प्रोत्साहित करताना दिसतात. अपयशाने कधीच खचून जाऊ नये. त्यांनी त्यांच्या टीमला संदेश दिला आहे, संकटे अडचणी येत असतात पण त्या संकटांना कसे उत्तर देता येते हे आपल्यावर अवलंबून आहे. अडचणी आल्यावर त्यांना न घाबरता त्याच्यावर कशी मात करावी हे अग्निपंख या पुस्तकातून डॉ. कलाम यांनी सांगितले आहे.

अग्निपंख

अग्निपंख पुस्तक हे सर्वसामान्य माणसाचा प्रवास आहे ज्याने एका गरीब वर्गातील मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला आणि भारताचे राष्ट्रपती बनले आणि आत्मचरित्र त्यांच्या स्वत: च्या काळाचे...Read More

सा.प्रा.डोंबे रेवती नवनाथ

सा.प्रा.डोंबे रेवती नवनाथ

×
अग्निपंख
Share

अग्निपंख पुस्तक हे सर्वसामान्य माणसाचा प्रवास आहे ज्याने एका गरीब वर्गातील मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला आणि भारताचे राष्ट्रपती बनले आणि आत्मचरित्र त्यांच्या स्वत: च्या काळाचे सर्वात प्रेरणादायक मानले जाते.

ही अपवादात्मक प्रतिभा असलेल्या सामान्य व्यक्तीची उत्कृष्ट कथा आहे. तसेच हे पुस्तक एका दूरदृष्टी नेत्याच्या प्रवासाचे वर्णन केले आहे ज्यांची कृती त्याच्या शब्दांपेक्षा खूपच जोरात आहे.

ते अशा देशात राहतो जिथे जातीय दंगली सामान्य आहेत आणि भ्रष्टाचार आणि लोभाने सिस्टम अधू केली आहे . सर्व असूनही, त्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या राष्ट्रासाठी दिले. जरी, ते इतके देशभक्त होते की शिलॉंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या स्टेज येथे श्रोतांचे भाषण झाले त्यावेळी त्यांचे निधन झाले.

हे पुस्तक केवळ चरित्रच नाही तर देशभक्ती दर्शविण्यासाठी लिहिलेली एक प्रेरक कथा आहे

अग्नीपंख

Book Reviewed by भदाने, प्रज्ञा पंडित "अग्निपंख". या पुस्तकाचे लेखक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. "अग्निपंख" हे पुस्तक भाताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ...Read More

Yogita Phapale

Yogita Phapale

×
अग्नीपंख
Share

Book Reviewed by भदाने, प्रज्ञा पंडित
“अग्निपंख”.
या पुस्तकाचे लेखक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. “अग्निपंख” हे पुस्तक भाताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. हे पुस्तक भारतीय तरुणांना त्यांच्या जीवनाच उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी लिहिले गेले आहे. हे पुस्तक कलाम यांचे विचार, तत्वज्ञान आणि जीवनातील अनुभव यांचे अनुकरण आहे. ज्यामुळे वाचकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा दृष्टीकोन मिळतो. अग्निपंख या पुस्तकात १९८ पानी आहेत. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य ही आहे. या पुस्तकाचे नाव इंग्रजीत wings of fire. या पुस्तकाचे अग्नि, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या विषयांवर लिहिले आहे भारत तंत्रज्ञानाची लढाई याची माहिती दिली आहे. तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजे देशातील भारतरत्न हे सर्वोच्च नागरी सम्मान मिळवणारे डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम आहे.
हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आपले राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारला आहे. या पुस्तकाची सुरुवात त्यांनी मातापित्याला स्मरून केली आहे. अथर्ववेक्षातील ओळी द्वारे सुरुवातीला ते सांगतात, ” ही पृथ्वी देवाची आहे. हे अफाट असीम आकाश त्याचेच आहे. दोन्ही अफाट अमर्याद समुद्र त्याच्यात हृदयात शांत होतात आणि तरीही लहानश्या तळ्यात तो असतो” ते एक महान अद्भुत व्यक्तिमत्व कलाम हे राष्ट्रपती, वैज्ञानिक, आणि इंजिनिअर सुद्धा होते. त्याचे प्रेरणादायक विचार आजही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अत्यंत लोकप्रिय आहे.अब्दुल कलाम हे आपल्या कामप्रती ध्येयनिष्ट होते. त्यांच्यासाठी कोणतीही वेळ ही कामाचीच वेळ आहे. ते आपला अधिकाधिक वेळ कार्यालयातच घालवत असत. त्यांच्या विचारांसोबत त्यांची पुस्तके ही प्रचंड लोकप्रिय आहेत. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथापुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचं छत्र गमावल्याने डॉ कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना एकदा गणितांचे शिक्षक श्री रामकृष्णा अय्यर यांनी छडी मारलेले ते मानवर घेऊन पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या कलाम यांचे प्रार्थनेच्या वेळी सर्वांदेखत कौतुक करतात आणि म्हणतात,” माझ्या छडीचा मार खाणारे पुढे जाऊन मोठी व्यक्ती बनतात, तु देखील फार मोठा होशील”.
त्यानंतर गणिताची त्यांना विशेष आवड लागली नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी एस्सी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने जोहराने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून इरॉनॉटिकसचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘नासा ‘ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पे टेक्नोलोजीचे प्रशिक्षण घेतले .
अतिशय सहजतेने आणि फार सोप्या भाषेत या पुस्तकाची मनोहर्षक शब्दांत मांडणीत आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्यात पहिली म्हणजे माणसाला दुढ इच्छाशक्ती हवी दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा मनात दुढ विश्वास हवा म्हणजे प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो, तरी ही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो.
संकटे आली दुःख भोगावी लागली तरी माणसाने सोडू नये, न घाबरता संकटांना सामोरे जावे, आपल्या दुःखांना समजून घ्यायचा प्रयत्न करावा संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. जागितिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. त्यांच्या वडिलांचे मित्र मंदिरात पूजारी होते. त्यामुळे वेद कुराणावरील चर्चा नेहमीच होत असे त्या वातावरणाचा सकारात्मक परिणाम कलामांचा जीवनावर झाला त्यांचे विचार प्रबल सकस बनले ते म्हणतात, हृदयापासून, आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर तीव्र आणि पवित्र असेल. तिचा मनाला ध्यास लागला असेल ती तर तिच्या मध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. अग्निपंख या पुस्तकाला वहीची चार पेज काय अग्निपंख हे कहानी सांगेल.अग्निपंख हा चार नव्हे तर १९८ पेजचा आहे. १५ ऑक्टोंबर १९३१ ला त्यांचा जन्म झाला व २७ जुलै २०१५ मध्ये मृत्यू झाला. जातीने जरी मुसलमान होते तरी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारतासाठी झटले. जरी मुसलमान होते तरी यांची भगवदगीता पाठ होते, जाता जाता हे दोन शब्द सांगेल. अग्निपंख अस म्हणत,
जर तुम्हाला सूर्यासारख चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळावे लागेल.
जर खरंच आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी अथक निरंतर आणि हुशारीने परिश्रम करावे लागेल. स्वतःला झिजावे लागेल.

अग्नीपंख

ग्रंथ परीक्षण : चांडक प्राची राधेश्याम,वाणिज्य विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक कथासूत्राचे स्वरूप - पुस्तकाचा...Read More

Chandak Prachi Radheshyam

Chandak Prachi Radheshyam

×
अग्नीपंख
Share

ग्रंथ परीक्षण : चांडक प्राची राधेश्याम,वाणिज्य विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक
कथासूत्राचे स्वरूप – पुस्तकाचा प्रारंभ डॉ. कलाम याच्या बालपणाशी संबंधित आहे. ते एक सामान्य कुटुंबातील मुलगे होते आणि त्यांचे शालेय जीवन अत्यंत साधे होते, त्यांच्या कुटंबाच्या संस्कारामुळे त्यांना संघर्षाची आणि शिक्षणाची महत्वाची शिकवण मिळाली. त्यांची बालपणीची एक महत्वाची आठवण म्हणजे ते एक “पाकेट” विकत होते आणि त्यांनी त्यांच्या शिक्षकांकडून प्रेरणा घेतली होती. पुस्तकाच्या पुढील भागात, डॉ कलाम यांची इंजिनिअरिंगची शिक्षण प्रक्रिया, तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (ISRO) आणि संरक्षण तंत्रज्ञान विकास संस्थेतील (DRDO) त्यांच्या कामांची चर्चा केली आहे. तेथे त्यांनी भारतीय मिसाईल प्रणाली विकसित केली, ज़्यामुळे भारताला अणुशक्ती आणि संरक्षण तंत्रज्ञानाची एक मजबुत स्थान मिळवता आले. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकरणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर डॉ. कलाम यांचे तत्वज्ञान आणि विचारधारा प्रगट दिसते. डॉ. कलाम यांच्या दृष्टिकोनानुसार, शिक्षण हीच माणसाची खरी ताकद आहे.
सारांश – “अग्नीपंख” हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र आहे. ज्यात त्यांनी आपल्या बालपणापासून ते भारताचे मिसाईल मॅन, होण्यापर्यंतचा प्रवास अलगडला आहे. पुस्तक त्यांच्या संघर्षमय जीवन, शिक्षण आणि भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेतातील योग्यदानावर प्रकाश टाकते. डॉ. कलाम यांनी तामिळनाडूतील रामेश्वर येथे एका साध्या मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला त्याचे बालपण कठीण परिस्थितीत गेले, पण शिक्षण आणि कष्टामुळे त्यांनी स्वत:साठी एका वेगळे स्थान निमार्ण केले. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण तंत्रज्ञान विकास संस्था (DRDO) मध्ये मिसाईल विकसित केल्या तसे “आग्नी” आणि “पृथ्वी. पुस्तकात त्यांची कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि देशसेवेची भावना आधोरेखित केली आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग शिक्षकाचे मार्गदर्शन, आणि भारतीय तरुणांसाठी दिलेले संदेश यामुळे हे पुस्तक प्रेरणादायी ठरते. “अग्निपंख” हे आत्मचरित्त वाचकांना जीवनातील अडचणीवर मात करण्याची आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा येते. या पुस्तकातून डॉ. कलाम यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवत तरुण पिढीला प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. हे पुस्तक तरुणांनी नक्की वाचायला हवे.
मुख्य विषय –
१) परिश्रम आणि साधेपण –
डॉ. कलाम यांनी आपले जीवन साधेपणी व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कष्टाने निर्माण केले त्यांनी शाळेपासून कठोर परिश्रम आणि तपश्रर्येची म्हत्वाची शिकवण घेतली.
२) शिक्षणाचे म्हत्व –
शिक्षणाच्या महत्वावर डॉ. कलाम यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की “शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नसून ते जीवनाला समृध्द करणारं असावं ”
३) विज्ञान आणि तंत्रज्ञान –
डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक कार्याची महत्वाची बाब भारतीय मिसाईल कार्यक्रम ज्याने भारताला जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र वनवले. त्यांनी “आग्नेय” आणि “आग्न” सारख्या मिसाईलचे उत्पादन केले.
४) पार्श्वभूमी –
पुस्तक भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भमध्ये लिहिले माहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीसह डॉ. कलाम त्यांच्या कार्याचा आदर्श त्यांच्या शालेय जीवणापासून ते विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामाणेरीपर्यंत वाढला. त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेचा त्यांना मोठा आधार मिळाला.
५) ध्येय आणि प्ररेणा –
त्यांच्या जीवनाच्या विविध प्रसंगामधुन आपले ध्येय साधण्यासाठी आणि समाजासाठी काम करण्याची पप्रेरणा मिळवण्याचे महत्त्व सांगितले आहे.
पात्रे – डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम- पुस्त‌काचे मुख्य पात्र ज्यांनी संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आणि त्यांची कष्टाची शिकवण, संकल्प आणि तंत्रज्ञानाविषयी ज्ञान त्यांचे जीवन समृध्द करते.
किशोर काळातील शिक्षक आणि कुटुंबीय – डॉ. कलाम यांच्‌या शिक्षकणाचा प्रारंभ त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेचा त्यांना मोठा आधार मिळाला. :-
विश्लेषण –
लेखनशैली –
डॉ. कलाम यांची लेखनशैली अत्यंत साध्या भाषेत जीवनातील नेमकी आणि प्रभावी आहे. त्यांचे विचार स्पष्ट आणि प्रेरणादायक आहेत. त्यांनी अत्यंत साध्या भाषेत जीवनातील कठोर संघर्ष आणि ते कसे यशस्वी झाले ते वर्णन केले आहे.
पात्रांचे विकास –
पात्रांची उत्तम रचना केली आहे. डॉ. कलाम यांची जीवनगाथा वाचताना ते वाचकाच्या मनावर आपली छाप सोडतात त्यांच्या संघर्षपूर्ण प्रवासाची कहाणी हृद‌याला मिळते.
कथानक संरचना –
कथानकाची गती उत्तम आहे. पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात एक मळ्या आयामाची सुरुवात होते. ज्यामुळे वाचक आकर्षित होतो आणि त्यांना पुढे काय होईल हे जानून द्यायचे असते.
विषय आणि संदेश –
पुस्तकाचे संदेश अत्यंत प्रभावी आहे, ते जीवनाला संघर्ष आणि ध्येय निश्रित करण्याचे महत्त्व शिकवले. तसेच त्यांनी आपल्या देशासाठी आणि समाजासाठी केलेल्या कार्याची उंची देखील व्यक्त केली आहे
भावनिक परिणाम –
पुस्तक वाचताना डॉ कलाम यांच्या संघर्षामुळे त्यांच्यातील आदर्शता आणि त्यांच्या दृढ निष्चय वाचकावर मोठा भावनिक परिणाम करतो. त्यांच्यातील आदर्शता आणि त्यांचा दृढ संघर्षातून प्रेरणा घेऊन आपल्याला जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते.
ताकद –
पुस्तकातील मुख्य ताकद म्हणजे डॉ. कलाम यांचे जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या यशाची प्रेरणा पुस्तकाची साधी, स्पष्ट आणि प्रेरणादाय‌क शैली वाचकांना सहजपणे आकर्षित करते.
कमकुवत बाजू –
कधी-कधी काही भागात डॉ. कलाम यांचे जीवन अत्यंत आदर्शदृष्या मांडले गेले आहे. ज्यामुळे त्याच्या संघर्षाची काही माणुसकी कमी दिसते.
वैगक्तिक विचार –
जोडणी –
पुस्तक वाचनाना मन्ता खुप प्रेरणा मिळाली डॉ. कलाम यांचे संघर्ष आणि त्यांच्या ध्येयप्रति असलेली निष्ठा मला माझ्या जीवनातही लागू करायची आहे.
सुगंगती –
आजच्या काळात जिथे युवा पिढीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे पुस्तक त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या स्वप्नांना पाठपुरावा करण्यास मदत करू शकते. डॉ. कलाम यांचे जीवन कष्ट जिद्द आणि समर्पण यांचा उत्तम नमुना आहे भारताच्या संरक्षण क्षेत्रावर प्रभाव बघून राष्ट्रीय अभिमान वाहतो.
निष्कर्ष –
शिफारस –
हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, विशेष करून तरुण पिढीला कारण ते जीवनातील संघर्ष आणि ध्येय निश्चिताची महत्त्वाची शिकवण देणे. ज्यांना त्यांच स्वप्न सत्यात उत्तरवायचे आहे. विज्ञान आणि राष्ट्रसेवेमध्ये रुची असलेल्या व्यक्तीसाठी हे पुस्तक खुप महत्त्वाचे आहे आणि पुस्तक विद्यार्थ्यासाठी आणि प्रेरणादायी साहित्य वाचण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे.
रेटिंग –
मी या प्रेरणादायी व जीवनातील यशस्वी पुस्तकाला १० पैकी १० तारे देईन.
प्रारंभिक छाप –
मी हे पुस्तक वाचले कारण डॉ. कलाम यांची जीवनगाथा मला नेहमीच प्रेरणादायी वाटली आहे. त्यांचे शुन्यापासून शिखराकडे प्रवास आणि त्यांचा जीवनातील कठोर परिश्रम मला अत्यंत प्रेरणादायक वाटले. या पुस्तकाने त्यांच्या संघर्षच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील योगयानाचा साक्षात्कार दिला. त्यांनी कष्टातून यश मिळवले, हे जाणून घेणे प्रेरणादायक ठरते. हे पुस्तक निवडण्यामागे माझ्या मनातील मुख्य कारण म्हणजे डॉ कलाम यांच्याविषयी आदर आणि त्यांचे जीवनकार्य आधिक जवळून समजून घेण्याची इच्छा होती.
अंतिम विचार –
“आग्नीपंख” हे केवळ पुस्तक नाही तर जीवनातील यशस्वी होण्याचा मूळमंत्र देणारी शिकवण आहे. डॉ कलाम सांचे जीवन कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मला अग्निपंख ही कादंबरी खुप आवडली. त्यातील विविध पात्रांची व्यक्तिरेखांकन आणि त्यांच्यातील नातेसंबंधाचे चित्रण प्रभावी आहे. कांदबरीतील घटनांनी मला वेधून घेतले आणि मला त्यांच्यात रममाण झाले. कांदबरीतील भाषेचा वापरही मला खूप आवडला. त्यातील शब्दांचा चांगला वापर केला गेला आहे आणि त्यामुळे कादंबरी वाचताना मला खूप आनंद झाला.
मला अग्निपंख ही कादंबरी खूप शिकवणीदायक वाटते. ती आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी कसे प्रयत्न करायचे ते शिकवते तसेच ती आपल्याला आपल्या मित्रांचे महत्त्वही सांगते. आग्नीपंख ही एक उत्कृष्ट कांदबरी आहे आणि मी ती सर्वांनाच वाचण्याची शिफारस करते. या पुस्तकाने मला विचार करायला लावले की, आपणही आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून आपल्या ध्येयांच्या दिशेने प्रयत्न करायला हवे. डॉ. कलाम यांच्या अनुभवांनी दाखवले की परिस्थीती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि ध्येय निश्चय याने यश नक्की मिळते. त्यांनी प्रत्येक तरुणाला स्वप्न बघण्याची प्रेरणा दिली आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास दिला. अग्निपंख हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, कारण ते फक्त यशाची कथा नाही तर एक जीवन मार्गदर्शक आहे.

अग्निपंख प्रेरणादायक उड्डाणाचा एक अद्वितीय प्रवास

अग्निपंख प्रेरणादायक उड्डाणाचा एक अद्वितीय प्रवास book review by Ms. Deepali Anil Marne MSIHMCT Pune पुस्तकाची रचनाबद्धता: पुस्तकाची रचना तीन मुख्य भागांमध्ये विभागली आहे: भाग...Read More

Ms. Deepali Anil Marne

Ms. Deepali Anil Marne

×
अग्निपंख प्रेरणादायक उड्डाणाचा एक अद्वितीय प्रवास
Share

अग्निपंख प्रेरणादायक उड्डाणाचा एक अद्वितीय प्रवास book review by Ms. Deepali Anil Marne MSIHMCT Pune

पुस्तकाची रचनाबद्धता:
पुस्तकाची रचना तीन मुख्य भागांमध्ये विभागली आहे:

भाग 1 – “आधुनिक भारताच्या स्थापनेसाठी”: या भागात डॉ. कलाम यांच्या बालपणाचा आणि शिक्षणाचा उल्लेख आहे. ते आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि शालेय जीवनाचे अनमोल आठवणी सांगतात.

भाग 2 – “विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग”: येथे डॉ. कलाम यांनी भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील कार्याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी ‘पाकिस्तानी परमाणू कार्यक्रम’, ‘अग्नि’ आणि ‘ध्रुव’ अशा प्रकल्पांचे महत्त्व सांगितले.

भाग 3 – “राष्ट्रपती पदाचा अनुभव”: या भागात, डॉ. कलाम यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून घेतलेल्या निर्णयांची आणि अनुभवांची माहिती दिली आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:

प्रेरणादायक जीवनकथा: डॉ. कलाम यांचे जीवन हे कठोर परिश्रम, प्रेरणा, आणि स्वप्नांच्या मागे लागण्याचे उदाहरण आहे. त्यांचा साधा जीवनप्रवास, अत्यंत संघर्षपूर्ण परंतु विजय प्राप्त करणारा आहे. हे पुस्तक आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन आपल्या आयुष्याचा उद्देश शोधण्याची प्रेरणा देते.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा महत्त्व: या पुस्तकात डॉ. कलाम यांनी भारतीय अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यांची माहिती दिली आहे. ‘अग्नि’ आणि ‘ध्रुव’ सारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी त्यांनी घेतलेले मार्गदर्शन आणि योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

वाचनाची महत्त्वता: ‘ अग्निपंख ‘  या पुस्तकात डॉ. कलाम यांनी वाचनाची महत्त्वता नेहमीच सांगितली आहे. वाचनामुळे आपली बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि जीवनाचा दृष्टिकोन बदलू शकतो. वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमात याचा विशेष संदर्भ घेतला जातो.

लेखनशैली: डॉ. कलाम यांची लेखनशैली अत्यंत साधी आणि प्रेरणादायक आहे. ते आपल्या अनुभवांना मोकळेपणाने आणि सुस्पष्टपणे वाचकांसमोर मांडतात. प्रत्येक पानावर वाचकाला एक नवीन शिकवण मिळते.

निष्कर्ष:

‘अग्निपंख’ हे पुस्तक वाचनाच्या महत्त्वावर आणि जीवनातील यश प्राप्त करण्यावर एक चांगला संदेश देते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून, हे पुस्तक वाचकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रेरणा देते. प्रत्येक वाचकाला त्यांच्या जीवनातील उच्च ध्येय साध्य करण्यासाठी ‘ अग्निपंख ‘ हे पुस्तक एक प्रेरणादायी  ठरू शकते.

डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या विचारांना समजून त्यांचे अनुकरण करणे, हीच खरी प्रेरणा आहे. अग्निपंख ‘ हे पुस्तक त्याच्या प्रत्येक वाचनानुसार आपल्याला एक उंच शिखर गाठण्याची आणि त्या शिखरावर पोहोचण्याची दिशा दाखवते.

अग्निपंख

Book Review : Magar Pooja Changdeo, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts, Science and Commerce College, Panchvati, Nashik. अग्निपंख आत्मचरित्र हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती आणि...Read More

Magar Pooja Changdeo

Magar Pooja Changdeo

×
अग्निपंख
Share

Book Review : Magar Pooja Changdeo, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts, Science and Commerce College, Panchvati, Nashik.
अग्निपंख आत्मचरित्र हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी आत्मचरित्र आहे. या पुस्तकात डॉ. कलाम यांनी आपल्या लहानपणीपासून ते भारताच्या प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या प्रवासाचा तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांनी आपल्या संघर्ष, शिक्षण, शास्त्रज्ञाच्या कार्यात येणारे अडथळे आणि या साऱ्यांमध्ये त्यांनी घेतलेली शिस्त आणि आस्था यांचा खुलासा केला आहे.

पुस्तकात ते त्यांच्या कुटुंबीयांचे, शिक्षकोंचे, सहकार्यांचे आणि देशातील विविध घटकांचे योगदान यांचे मान्यता देतात. विशेषत: अग्निपंख या शब्दाने त्यांच्या शास्त्रीय कार्यातील महत्त्वपूर्ण वळणांचा, स्वप्नांचा, आणि ते कसे भारतीय शास्त्रज्ञतेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम झाले, यांचा मागोवा घेतला आहे.

आत्मचरित्राच्या या प्रवासाद्वारे, डॉ. कलाम वाचकांना प्रेरणा देतात की कोणत्याही परिस्थितीत, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि देशप्रेम यांचा संगम केल्यास मोठ्या यशापर्यंत पोहोचता येते. हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी एक प्रेरणा आणि मार्गदर्शक आहे.

अग्नि की उड़ान

सपनों की ऊचांईयों को खुद तय करना सीखाती है “अग्नि की उड़ान”। “अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो तो पहले सूरज की तरह...Read More

Ramkrushna Trambak Jadhav

Ramkrushna Trambak Jadhav

×
अग्नि की उड़ान
Share

सपनों की ऊचांईयों को खुद तय करना सीखाती है “अग्नि की उड़ान”।
“अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो तो पहले सूरज की तरह जलो।”
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामकी आत्मकथा का नाम “अग्नि की उड़ान” बिल्कुल सटीक ही रखा गया है। अखबार बेचने से लेकर साइंसटिस्ट बनने तक का सफ़र आसान नहीं था। अब्दुल कलाम से मिसाइल मैन बनना सचमुच “अग्नि की उड़ान” ही रही। हमें कभी भी जीवन में परेशानियों से घबराना नहीं चाहिए और ना ही घबराकर अपने कदम पीछे हटाने चाहिए। हमें हर हालात का डटकर सामना करना चाहिए, अपने तय किए लक्ष्य की ओर बिना रूके बिना थके आगे बढ़ते रहना चाहिए। ‘अग्नि की उड़ान’ हमे सपने देखने के लिए प्रेरित करती है,साथ ही उन सपनों को पूरा करने का जज्बा भी अपने अंदर भरती है।
“सपने वो नहीं जो नींद में आए, सपने वो जो नींद न आने दे।”
देश के मिसाइल मैन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ने करोड़ों हिंदुस्तानियों को सपनों का असल मतलब समझाया और उनके जीवन पर लिखी गई किताब“अग्नि की उड़ान” सपनों को जीना और उसे सच करना सिखाती है।अग्नि की उड़ान यह (Wings of Fire) इस किताब का हिंदी अनुवाद है।
जिसके लेखक अरूण तिवारी है। किताब में अब्दुल कलाम के संघर्षों से लेकर मिसाइल की दुनिया में भारत की तरक्की तक सबकुछ बयां किया गया है।
“अग्नि की उड़ान” ए.पी.जे. अब्दुल कलाम की जिंदगी के तमाम पहलुओं पर रोशनी डालती है साथ ही इस किताब में अब्दुल कलाम के जीवन के वैज्ञानिक और अंतरिक्ष संबंधी चुनौतियां के बारे में भी विस्तार से जानकारी दी गई है। ये किताब सभी युवाओं को अपने सपनों को पूरा करने लिए लड़ने का जज्बा सिखाती है, साथ ही जीवन में आए सभी बाधाओं को पार करने की प्रेरणा भी देती है। इस किताब को पढ़कर आप समझ पाएंगे कि तमिलनाडू के एक गरीब परिवार के जन्मा अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम, भारत रत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम कैसे बनें। यह किताब अपने सपने को साकार करने के साथ-साथ एक बेहतर इंसान बनने के लिए भी प्रेरित करती है।
लेखक ने किताब में सबसे पहले अब्दुल कलाम के बचपन और पारिवारिक स्थिति के बारे में बताया है। अबुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम का जन्म 15 अक्टूबर 1931 को तमिलनाडु के रामेश्वरम में हुआ था। डॉ. अब्दुल कलाम ने लगभग 4 दशकों तक वैज्ञानिक के रूप में काम किया। ISRO और DRDO में योगदान देने के लिए 1981 में भारत सरकार द्वारा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम को पद्म भूषण से सम्मानित किया गया। 1990 में डॉ. कलाम को पदम विभूषण से नवाजा गया। साल 1997 में कलाम साहब को देश का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न प्रदान किया गया।
अब्दुल कलाम ने भारत को मिसाइल संपन्न देश के रूप में आंतरराष्ट्रीय स्तर पर विशेष पहचान दिलाई है। यही वजह है कि वो साल 2002 से 2007 तक भारत के सर्वोच्च पद पर बतौर प्रथम नागरिक भारत के राष्ट्रपति रहे। बेहद दिलचस्प और गौरतलब बात है कि आजाद भारत के इतिहास में कलाम साहब देश के ऐसे पहले राष्ट्रपति बनें, जो राजनीतिक पृष्ठभूमि से नहीं आते।
कलाम के पिता का नाम जैनुलाब्दीन था और माँ का नाम आशियम्मा था।
अब्दुल कलाम के पिता अक्सर एक बात कहते थे….“जब आफ़त आए तो आफ़त की वजह समझने की कोशिश करो। मुश्किल हमेशा खुद को परखने का मौका देती है।”
डॉ. कलाम को बचपन में ही अपने हालात से लड़ने का सबक मिल चुका था। उन्होंने कभी हार नहीं मानी, बल्कि हर मुश्किल हालात कर डटकर सामना किया और उससे सबक लेकर आगे बढ़ते रहें।
“इंसानों को कठिनाइयों की आवश्यकता होती है, क्यों कि सफलता का आंनद उठाने के लिए ये ज़रूरी हैं।”
लेखक बताते है की कलाम ने बचपन में ही मेहनत करके कमाना शुरू कर दिया था। 1939 में महज 8 साल की उम्र से ही कलाम अखबार बेचने लगे थे। उनके चचेरे भाई शमसुद्दीन उनकी पहली आमदनी का कारण बनें। सन 1950 में डॉ. अब्दुल कलाम ने इंटरमीडिएट पढ़ने के लिए त्रिचीके सेंट जोसेफ कॉलेज में दाखिला लिया। वहासे उन्होंने बीएससी पास की।
उसके बाद बहुत ही मुश्किलों से मद्रास इंजीनियरिंग और टेक्नोलॉजी में अपना दाखिला करवाया। लेकिन यहां की फीस बहुत महंगी थी, जिस वजह से कलाम की मां को अपने सोने के कड़े और चेन बेचने पड़े।
कलाम कहते हैं… “उन्हें ऐसा कोई गुमान नहीं कि मेरी जिंदगी सबके लिए एक मिसाल बने। मगर यह हो सकता है कि कोई मायूस बच्चा हो तो इस किताब से हौसला जरूर मिले… जब वह मायूस बच्चा मेरे इस किताब को पढ़े… तो उसकी उम्मीद को रोशनी मिले। जिसे वह मजबूरी समझता हो, वह मजबूरी ना लगे। उन्हें यकीन रहे कि वो जहां भी है खुदा उनके साथ है। काश हर हिंदुस्तानी के दिल में जलती हुई लौ काम पर लग जाए और उस लौ की परवाज से सारा आसमां रोशन हो जाएं”……
डॉ. अब्दुल कलाम जीवन में अपने सपनों को साकार करने के लिए चार बुनियादी पहलुओं को जरुरी मानते हैं। लक्ष्य निर्धारण करना, हमेशा सकारात्मक सोच रखना, मन में स्पष्ट कल्पना करना और उसपर विश्वास करना। जीवन में आप इन चार मूलमंत्र को अपनाकर हर विपरीत परिस्थितियों से बाहर निकल सकते है और अपने लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं। “अग्नि की उड़ान” पुस्तक इन्हीं मूलमंत्रों को अपने जीवन में उतारना सीखाती है क्यों कि कलाम साहब ने कहा था…
“इंतजार करने वाले को उतना ही मिलता हैं, जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं।”
अंत मैं कलाम जी की 2002 मैं लिखी हुई अंग्रेजी कविता का हिंदी अनुवाद……

ज्ञान का दीप जलाए रखूंगा……

‘ हे भारतीय युवक
ज्ञानी- विज्ञानी
मानवता के प्रेमी
संकीर्ण तुच्छ लक्ष्य
की लालसा पाप है।
मेरे सपने बड़े
मैं मेहनत करूँगा
मेरा देश महान् हो
धनवान् हो ,गुणवान् हो
यह प्रेरणा का भाव अमूल्य है,
कहीं भी धरती पर,
उससे ऊपर या नीचे
दीप जलाए रखूँगा
जिससे मेरा देश महान् हो ।

अग्निपंख

Book Review : Deore Karina Gokul ,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts, Science and Commerce College, Panchvati. This book contains the life of a simple yet...Read More

Deore karina gokul

Deore karina gokul

×
अग्निपंख
Share

Book Review : Deore Karina Gokul ,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts, Science and Commerce College, Panchvati.
This book contains the life of a simple yet determined person. There is so much knowledge and good things that everybody can extract from this book. Reading this book is a very heartwarming and beautiful experience.

This book contains a very detailed description of how great things can be achieved through simple thoughts. This book conveys the message of the authors that always keep your dream high, your goal clear, plan perfectly and do hard work.

The story is all about a warm and intensely personal, deeply passionate, common boat – owner’s son who has become India’s most distinguished living technocrat. The pure faith in God and deep kindness, dealing life with positivity, science, and technological advancements, Love toward one country and many more things are mentioned in this book.

The book is full of insights, personal moments, and life experiences of Dr. APJ Kalam. It gives us an understanding of his journey of success.

This is a story of a boy who was born in a normal and middle-class family. He had a curiosity about aeronautical engineering. He faced so many failures during launching the satellite called SLV [Satellite Launching Vehicle] but he proved that anything can be achieved by keep trying because when you become a failure then you go one step closer to success.

The author, by narrating his life journey evokes the reader to identify with one’s inner fire and potential, for he was of the firm belief that each one of us was born with the strength and potential to make a tangible change in the world. How he inspired himself to achieve his dream and how he went about accomplished so much is what the book captures nicely.

The book recollects many anecdotes and stories from childhood, his time at school and college, He wrote the time spent at the Langley Research Center, NASA and Wallops Flight Facility gets a lot of attention.

Personal tragedies have not left been left out. The time when he lost his father and how he felt when conferred with many awards like the Padma Bhushan have been written in much detail.

The second half of the book deals with the author, the scientist who made a significant contribution in developing the country’s guided missile program, a pioneering effort for the security of the nation. It’s not with reason that he was nicknamed the ‘ Missile Man of India’.

Submit Your Review