आनंदानं जगण्याची कला

By स्वामी राम

Share

Original Title

आनंदानं जगण्याची कला

Publish Date

2015-01-01

Published Year

2015

Publisher, Place

Total Pages

171

ISBN 13

978-81-8322-543-4

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Translator

हेमलता अंतरकर

Readers Feedback

आनंदानं जगण्याची कला

Book Review : Deshmukh Nilesh Jaywant, MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik. सकारात्मक जीवन आणि सवयींच्या ठेवणीतील बदल आम्ही पौर्वात्य...Read More

Deshmukh Nilesh Jaywant

Deshmukh Nilesh Jaywant

×
आनंदानं जगण्याची कला
Share

Book Review : Deshmukh Nilesh Jaywant, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

सकारात्मक जीवन आणि सवयींच्या ठेवणीतील बदल

आम्ही पौर्वात्य लोक एकमेकांना भेटल्यावर दुसऱ्याला अभिवादन करून त्याच्याबद्दलचा आदरभाव सूचित करण्यासाठी आपले हात जोडतो. जीवात्म्याचं परमात्म्याशी मीलन होत असतं, याचं स्मरण आम्हाला यातून होतं. “तुम्ही (चैतन्य) आहात” या सत्याची स्वीकृती आम्ही या कृतीतून देत असतो. दोन आत्मे जिथे भेटतात त्या स्थळाचं, ही कृती म्हणजे प्रतीक असतं. पण आम्ही हात जोडतो त्याचं आणखी एक कारण आहे आयुष्याचा उद्देश साध्य करण्यासाठी आंतरिक आणि बहिर्गत विश्वाचा समतोल साधता आला पाहिजे, अशी आठवण ही कृती आम्हाला करून देते.

मी जे ज्ञान प्राप्त केलं आहे ते थोर ऋषिमुनींकडून आणि त्यांच्या वचनांमधून. पण मला असं आढळून आलं आहे की, जगभर सर्वत्र पूर्वेमध्ये काय किंवा पश्चिमेमध्ये काय लोकांना आंतरिक विश्वाची जाणीवच नसते, कारण त्यांना अजून स्वतःचं आकलनच झालेलं नसतं. स्वतःला समजून घेण्याऐवजी ते लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला समजून न घेता इतरांचं विश्लेषण आणि मूल्यमापन ते करू लागतात. त्यांना न आवडणारे गुण ते इतरांमध्ये प्रक्षेपित करू लागतात आणि मग म्हणतात की, अमुक माणूस असा आहे. प्रक्षेपणाची किंवा आरोपणाची ही सवय आयुष्यभर तुम्हाला भोवते आणि तुमची वाढ खुंटवते. कारण जोपर्यंत तुम्ही इतरांवर आरोप करत राहता, तोपर्यंत तुम्ही स्वतःला स्पष्टपणे निरखू शकत नाही.

खरं म्हणजे तुमच्या चेहेऱ्यावर सतत स्मितहास्य विलसलं पाहिजे. पण हे साध्य करण्यासाठी आयुष्याच्या अर्थाची स्पष्ट कल्पना तुम्हाला असली पाहिजे.व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनवताना

व्य क्तिमत्वात्ला इंग्रजी प्रतिशब्द आहे ‘पर्सनॅलिटी’. तो व्युत्पन्न झाला आहे ‘पर्सोना’ किंवा मुखवटे या ग्रीक मूळ शब्दापासून. कारण प्राचीन काळी ग्रीकमधले अभिनेते आपण कोणती भूमिका करतो आहोत ते दर्शवण्यासाठी मुखवटे वापरायचे. तुम्हीसुद्धा मुखवटे घालता. तेच तुमचं व्यक्तिमत्त्व असतं. तुमचे सवयबंध मुखवटा निर्माण करतात आणि तोच तुमचं व्यक्तिमत्त्व बनतो. पण तुम्ही खरोखर कोण आहात? हे मुखवटे तुमच्यासाठी तयार केले कोणी? तुम्ही स्वतःला ज्याप्रकारे घडवलं तसेच तुम्ही आहात. परिधान करण्यासाठी तुम्ही स्वतःच स्वतःसाठी काहीतरी उत्पन्न केलं आहे. कधीकधी हा मुखवटा संरक्षणासाठी असतो, कधी बचावासाठी असतो, कधी दुसऱ्यांना चकवण्यासाठी असतो तर कधी सर्जनशील उद्देशासाठी असतो. व्यक्तिमत्त्वाचा असा मुखवटा तुम्ही अनेक कारणांसाठी वापरत असता.

हे मुखवटे तुम्ही निवडता. तुम्ही तुमची स्वतःचीच निर्मिती आहात. जेव्हा तुम्हाला त्रास होतो, तेव्हा तुम्हाला कधीकधी वाटतं की या त्रासाला परमेश्वर कारणीभूत आहे; पण हे तत्त्वज्ञान केविलवाणं आहे. कारण कुणाला त्रास व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नसते. यातना निर्माण करण्यात परमेश्वराला काय स्वारस्य असणार? तुम्ही जसे आहात तसं असावं ही तुमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला निर्माण केलं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी किंवा त्यातल्या संघर्षासाठी तुम्ही इतरांना दोष देता कामा नये,

Submit Your Review