आपण जिंकू शकता

Share

पुस्तक परीक्षणासाठी मी जे पुस्तक निवडले आहे ते मार्गदर्शनपर पुस्तक आहे. या पुस्तकाचे शीर्षक ‘आपण जिंकू शकता ‘असे आहे. या पुस्तकाचे लेखक शीवखेडा हे आहेत. या पुस्तकामध्ये प्रथम प्रस्तावना नंतर आभार आणि नंतर अनुक्रमणिका आहे. आपण जिंकू शकता हे पुस्तक ३०४ पानांचे आहे. पुस्तकाचे शीर्षक हे ठळक असून लेखक शिवखेडा यांची ही प्रतिमा आपल्याला मुखपृष्ठावर दिसून येते. या पुस्तकाचे प्रकाशानाची तारीख वर्ष 2014 आहे. पुस्तकावर “विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रमाणे करतात” हे वाक्य म्हणजे प्रारंभिक छाप होय. या प्रारंभिक छापावरून पुस्तक किती अप्रतिम आणि उपयोगी आहे ही समजत म्हणून मी हे पुस्तक निवडले.

Price:  
₹399
₹399
Share

पुस्तक परीक्षणासाठी मी जे पुस्तक निवडले आहे ते मार्गदर्शनपर पुस्तक आहे. या पुस्तकाचे शीर्षक ‘आपण जिंकू शकता ‘असे आहे. या पुस्तकाचे लेखक शीवखेडा हे आहेत. या पुस्तकामध्ये प्रथम प्रस्तावना नंतर आभार आणि नंतर अनुक्रमणिका आहे. आपण जिंकू शकता हे पुस्तक ३०४ पानांचे आहे. पुस्तकाचे शीर्षक हे ठळक असून लेखक शिवखेडा यांची ही प्रतिमा आपल्याला मुखपृष्ठावर दिसून येते. या पुस्तकाचे प्रकाशानाची तारीख वर्ष 2014 आहे. पुस्तकावर “विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रमाणे करतात” हे वाक्य म्हणजे प्रारंभिक छाप होय. या प्रारंभिक छापावरून पुस्तक किती अप्रतिम आणि उपयोगी आहे ही समजत म्हणून मी हे पुस्तक निवडले.

Availability

available

Original Title

आपण जिंकू शकता

Series

Publish Date

2002-01-01

Published Year

2002

Publisher, Place

Total Pages

305

ISBN 13

9789382951858

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

आपण जिंकू शकतो

Book Reviewed by गौरी संजय चव्हाण (१२ वी कला) MVP's KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik एखादी गोष्ट जर यशाने प्राप्त करायची असेल...Read More

Yogita Phapale

Yogita Phapale

×
आपण जिंकू शकतो
Share

Book Reviewed by गौरी संजय चव्हाण (१२ वी कला)
MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik

एखादी गोष्ट जर यशाने प्राप्त करायची असेल तर तिच्यात सर्वप्रथम आपण आपले मन , वेळ, सहभाग नोंदवायला हवा. आणि आपण त्या गोष्टीवर ठाम ही असायला हवा.आणि आपण त्या गोष्टीवर ठाम ही असायला हवे. जर आपल्याला तिच्यात सहभाग नोदवायचा असेल तर आपल्या मध्ये असलेली वृत्ती कोणत्याही परिस्थितीत किंवा प्रसंगांकडे आपल्या बघण्याचा दृष्टीकोन हवा असे शिव खेडाचे मत आहे.

त्यानी असे सांगितले आहे की जर लोकांचा दृष्टकोन चांगला असेल तर आपण केलेली कामगिरी उतकुष्ट असते .

आजच्या युगातील महत्त्वाचा शब्द असेल तर तो आहे दृष्टीकोन. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची मनोवृत्ती त्यामुळे आपले विचार बनतात तसेच आपले वर्तन,वागणे,बोलणे यावरही परिणाम होतो त्यांनी असे सांगितले आहे की एखाद्या ऑफिस मध्ये जर आपण आपली मुलाखत द्यायला गेलो तर ते फक्त 15% आपण किती हुशार आहोत हे बघितले जाते उरलेले 85% आपल्याला त्या क्षेत्राबद्दल किती बघितले जाते.

त्यांनी त्यांच्या या पुस्तकात असे सांगितले आहे की आपल्या सभोवताली असलेले वातावरण कौटुंबिक अथवा कामाचे ठिकाण ,समाजातील वातावरण आपले दृषटिकोन घडवत असतो. जर नियम बनवणारेच जर कायद्याचे उल्लंघन करत असतील तर खरच संस्कृतीचा स्थर खाली जात आहे . तसेच आयुष्यात येणारी अनुभव ही आपल्या खूप काही शिकवून जातात. अनुभवामुळे आपण आपला द्रुष्टीकोन बनवु शकतो . तसेच शिक्षण ही आपल्या विचारांना विस्तृत करते . हे आपल्यावर अवलंबून असते की आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपण काय करतो आणि ते देखील आपल्या मूल्यावर अवलंबून असते.

तसेच सुर्वातीत शिवखेडानी आपल्याला जिवंत जगण्याचा एक मार्ग सांगितला आहे. ” विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात.”

शीव खेरा यांनी या पुस्तकात सांगितलेल्या बाबी विषयी आपण नक्कीच विचार करायला हवा . आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपण कसे सामोरे जातो याचे मुल्याकन करायला हवे .

आपण जिंकू शकता

विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स पुस्तकाचे नाव - आपण जिंकू शकता लेखक - शिव खेडा यशस्वी होणं...Read More

सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स

सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स

×
आपण जिंकू शकता
Share

विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती
सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स

पुस्तकाचे नाव – आपण जिंकू शकता
लेखक – शिव खेडा

यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणे असा नसून अंतिम ध्येय घटना असा आहे समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे कवी म्हणतात विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात प्रस्तुत पुस्तकात माणसाने कसे जगावं कोणते गुण अंगी बाळगावी त्याचप्रमाणे महत्त्वाचा दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि सकारात्मक प्रतिमेची निर्मिती सुप्त मन आणि चारित्र्याची जडणघडण परस्पर संबंध परस्परवार कौशल्य आणि विकास प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची निर्मिती प्रेरणा यश ध्येय हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे आता आपण ते गुण कसे आपल्यात आज रामर करावे याकडे लक्षवेध शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य होते खरे शिक्षण बुद्धी आणि भावना या घटकावर आधारित असतात तसेच ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं शहाणपणा म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्यासाठी क्षमता असणं यश म्हणजे नक्की काय उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्ट पुरतीकडे होणारी वाटचाल म्हणजे यशस्वी माणसं अपयशस्वी माणसापेक्षा काही दहापट हुशार नसतात ती इतरांपेक्षा केवळ कणखर सरस असतात जीवनात अडथळे आपल्याला नम्र होण्यास शिकवतात जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशीबवान व्हाल जगातील कोणतेही मौल्यवान रत्नांपेक्षा आपल्या चारित्र्य जपण्याची अधिक गरज असते ज्याचे चारित्र शुद्ध त्वचारित्रिवार जगात माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते प्रामाणिक आई-वडील मिळणे हा सर्वात मोठा वारसा आहे आणि त्याप्रमाणे प्रसन्न आणि आकर्षक
व्यक्तिमत्वामुळे यशस्वी माणसं उठून दिसतात माणसाचा दृष्टिकोन वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मेळावा म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व निष्ठा भाव आणि बांधिलकी असेल तर अतिशय वाईट परिस्थिती ही संबंध टिकून राहतात उपकाराचे स्मरण ठेवले पाहिजे कृतज्ञता ही एक जाणीव आहे जगत असताना माणसाने चांगले व्यक्तिमत्व घडेल असेच काम करावं आणि आपल्यावर कोणी टीका करणार नाही याची जाणीव ठेवून पुढील पावले उचलावी.
माणसाची नीतिमूल्य आणि दूरदृष्टी योग्य करण्यासाठी योग्य काम करणे महात्मा गांधी म्हणतात

पुढील सात गोष्टी म्हणजे घोरपातके मानावीत कष्टशिवाय संपत्ती सतत विवेक बुद्धी शिवाय आनंद चारित्र्याशिवाय ज्ञान नीतीमते शिवाय व्यापार मानवते शिवाय विज्ञान त्या गावीना धर्मा आणि तत्वाशिवाय राजकारण पैसा नेहमीच शहाणपणाच्या गोष्टी बोलत नाही आणि पैसा जेव्हा बोलतो तेव्हा सत्य गप्प बसत जीवनातील दुर्दैवाचा भाग कोणता असेल तर लोक पैसा कमावणे ऐवजी मिळवण्याचे योजना आखतात पैसा मिळवणे सोपे पर त्या राखून ठेवून अवघड आहे पैशाने मनोरंजन विकत घेता येते सुख विकत घेता येत नाही पलंग पण झोप येत नाही औषध पण आरोग्य नाही अशा असंख्य गोष्टी पैशाने विकत घेता येतात पण प्रेम दुःख आनंद माया जिव्हाळा आपुलकी पैशाने विकत घेता येत नाही म्हणून माणसाला देवाने विचार करण्याची क्षमता दिलेली आहे त्यामुळे माणसाने त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा जगत असताना दुःख तर सर्वाच्याच नशिबी आहे पण त्यातून मार्ग निघतो आपण कोणतीही गोष्ट सकारात्मदृष्टीने पाहिले तर ती गोष्ट राहत नाही माणसाच्या जीवनात जगत असताना अंगी हे गुण असतील तर माणूस कधीही हरू शकत नाही आत्मविश्वास चिकाटी दृढनिश्चय प्रामाणिकपणा नैतिक मूल्य सकारात्मक दृष्टिकोन चारित्र्य हीन हे गुण असतील तर मनुष्य आपले जीवन रूपी जीवन सुख समाधान पूर्वक जगेन कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा आयुष्यात जो मिळाले त्याचा विचार करा अडचणींचा पाठा वाचू नका तरच तुम्ही यशस्वी हॉल.

लांब लांबचे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे गेले तर हाच प्रवास किती सोपा आहे

आपण जिंकू शकता

आपण जिंकू शकता - शीव खेडा. भोईटे गायत्री सचिन. एस .एस .वाय .बी. एस सी . विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती. प्रस्तावना...Read More

भोईटे गायत्री सचिन. एस .एस .वाय .बी. एस सी .

भोईटे गायत्री सचिन. एस .एस .वाय .बी. एस सी .

×
आपण जिंकू शकता
Share

आपण जिंकू शकता – शीव खेडा.

भोईटे गायत्री सचिन. एस .एस .वाय .बी. एस सी .
विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती.

प्रस्तावना :
पुस्तक परीक्षणासाठी मी जे पुस्तक निवडले आहे ते मार्गदर्शनपर पुस्तक आहे. या पुस्तकाचे शीर्षक ‘आपण जिंकू शकता ‘असे आहे. या पुस्तकाचे लेखक शीवखेडा हे आहेत. या पुस्तकामध्ये प्रथम प्रस्तावना नंतर आभार आणि नंतर अनुक्रमणिका आहे. आपण जिंकू शकता हे पुस्तक ३०४ पानांचे आहे. पुस्तकाचे शीर्षक हे ठळक असून लेखक शिवखेडा यांची ही प्रतिमा आपल्याला मुखपृष्ठावर दिसून येते. या पुस्तकाचे प्रकाशानाची तारीख वर्ष 2014 आहे. पुस्तकावर “विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रमाणे करतात” हे वाक्य म्हणजे प्रारंभिक छाप होय. या प्रारंभिक छापावरून पुस्तक किती अप्रतिम आणि उपयोगी आहे ही समजत म्हणून मी हे पुस्तक निवडले.
सारांश :
कथा सूत्राचे स्वरूप लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. हे एक गोष्टी प्रमाणे आहे. या पुस्तकात प्रमुख विषय जसे महत्व दृष्टिकोनाचे ,यश ,प्रेरणा ,आत्मप्रतिष्ठा ,परस्पर संबंध आणि परस्पर संवाद कौशल्य आणि विकास सुप्त मन आणि सवयी, ध्येय ठरवणे आणि नीती मूल्ये आणि दूरदृष्टी आहेत. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अंगी बांधून नकारात्मक दृष्टिकोनावर लाथ मारणे आवश्यक आहे. उचित ध्येय म्हणजे नेमकं काय? आणि त्यासाठी आपण काय मार्ग निवडावा ही आहे कथेची पार्श्वभूमी. या पुस्तकामध्ये कोणतेही पात्र दिलेले नाही फक्त लेखक आणि वाचक हेच महत्त्वाचे पात्र आहेत. लेखकाची भूमिका श्रीकृष्णासारखे आहे आणि वाचकाचे अर्जुनासारखे असली पाहिजे असाच हे तो फक्त या पुस्तकामध्ये आहे.
विश्लेषण :
लेखकाची लेखन शैलीची भाषा एकदम सरळ ,सोपी आहे. काहीच अवघड नाही. सुस्पष्ट उदाहरणे देऊन ,गोष्टी सांगून लेखकाने मत मांडले आहे. आणि विशेष म्हणजे सर्व विषय मुद्दे सुद्धा आहेत त्यामुळे वाचताना सोपे जाते. कथानकाची संरचना सुद्धा लेखकाने एकदम ओळीने मांडली आहे. जसे हे पुस्तक कशा प्रकारच आहे ,कोणासाठी आहे ,कसं वाचाव, व कृती कशी करावी ,त्याची सवय कशी लावावी हे सगळं. लेखकाने त्याचे विषय किंवा संदेश मांडण्यासाठी गोष्टींचा विचार केला, महात्म्यांचे विचार मांडले त्यामुळे लेखकाला काय म्हणायचे आहे ते त्या पहिल्या दिलेल्या विचारात समजत होते आणि लगेच आकलन होते.
पुस्तक वाचताना वेळ किती झाला किंवा आपल्याला भूक लागली आहे हे समजतच नव्हते .झोपेची वेळ झालेली असताना ,झोप लागली असतांना झोपू वाटत नव्हते कारण असं वाटायचं की पुढे कोणीतरी आपणास शिकवत आहे आणि आपण झोपायचं कसं? याप्रमाणे भावनिक परिणाम मला पुस्तक वाचताना जाणवला आहे.
ताकद आणि कमकुवतपणा :
इतरांच्या चुकांमधून शिकणे, आत्म प्रतिष्ठा ,सकारात्मक दृष्टिकोन ,जबाबदारी, स्वयंशिस्त,संवाद कौशल्य, इत्यादी गोष्टी ही ताकद पुस्तकाची आहे. लेखकाने संवादाची साथ थोडी दिली असती तर ते विचार मनावर लवकरात लवकर बिंबले असते किंवा त्यात छायाचित्रे दाखवले असती तर अजून लवकर त्या विषयाचे आकलन झाले असते की त्याची कमकुवत बाजू आहे.
वैयक्तिक विचार:
मनाला सुप्त खाद्य कसं पुरवावं ,आत्मप्रतिष्ठा कशी वाढवावी ,बोलणं कसं असावं, ऐकावं कसं ? हे सगळं शिकून मी ते माझ्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करते आणि या पुस्तकांनी मला जगताना खूप मदत केली आहे.
धन्यवाद..

Submit Your Review