Availability
available
Original Title
इकिगाई
Subject & College
Publisher, Place
Total Pages
208
ISBN 13
978-1786330895
Format
Hardcover
Language
English
Weight
220
Average Ratings
Readers Feedback
How to live Life
By Mrs. Amrita Pundlik, Comp. Dept., R H Sapat College of Engineering Management Studies & Research खूप सुंदर विषय " जगण्याचे उद्दिष्ट काय " जपानी...Read More
Mrs. Amrita Pundlik
How to live Life
By Mrs. Amrita Pundlik, Comp. Dept., R H Sapat College of Engineering Management Studies & Research
खूप सुंदर विषय ” जगण्याचे उद्दिष्ट काय ” जपानी भाषेत ” इकिगाई ” ह्या शब्दाभोवती फिरणारे पुस्तक. ह्या शब्दाला कुठलाही समानार्थी शब्द आपल्या मराठी भाषेत नाही त्यामुळे अजून उत्कंठतेने हे पुस्तक वाचण्याचा मोह झाला. सगळ्यांनी आवर्जून वाचन करावे असे हे पुस्तक आहे . जगण्याला अर्थ देणाऱ्या प्रवासाची सुरूवात करायची असेल, तर हे पुस्तक पहिले पाऊल ठरू शकते.
” फक्त कार्यरत राहिलात तरी शतायुषी व्हाल ” ह्या तत्वावर आधारित हे पुस्तक आहे. जपानी संस्कृतीच्या काही संकल्पना आणि “नेहमी व्यस्त राहण्याचा आनंद” ह्यात दिलेला आहे. लेखकांनी शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आणि जिव्हाळ्याचे संबंध या तिन्ही घटकांचे महत्त्व विशद केले आहे.
ओकिनावामध्ये राहणाऱ्या लोकांची जीवन शैली ह्यात दिलेली आहे ज्यांना आनंदी आणि दीर्घ आयुष्य जगण्याचा मार्ग सापडला आहे. ओकिनावाच्या लोकांना त्यांची इकिगाई सापडली आहे आणि त्यामुळे ते जे काही काम करतात त्यावर ते प्रेम करतात आणि अत्यंत आवडीने ते त्यांचे काम करतात. , त्यांची जीवनशैली सक्रिय आहे आणि या सर्व घटकांमुळे त्यांचे आयुष्य दीर्घकाळ टिकते. पुस्तकाच्या विविध विभागात शरीराला कृतीत ठेवण्यासाठी विविध तंत्र सांगितलेली आहेत जसे ताय-ची, योग, रेडिओ टायसो, किगॉन्ग आणि श्वासोच्छवासाच्या विविध पद्धती. ह्या पुस्तका मध्ये दीर्घायुष्याचे तीन महत्वाचे मूलमंत्र सांगितले आहेत
१) हाराहाची बू म्हणजे “पोट 80% भरले की खाणे थांबवा
२) मॉइ (Moai) म्हणजे एकमेकांच्या मदतीसाठी कायम बांधील राहा .
३) फ्लो म्हणजे मनःस्थिती, जिथे तुम्ही तुमची वेळ आणि ऊर्जा तल्लीनतेने एकाच कामासाठी वापरा.
काही लोक एखाद्या ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांचे जीवन जगत असतात तर काही लोक सतत द्विधा मनस्थिती मध्ये राहतात. प्रत्येकाने आपली इकिगाई जाणून घ्यावी ह्या साठी खालील आकृती ह्या पुस्तकात दिलेली आहे. पुस्तकात दिलेल्या ४ वर्तुळांच्या आकृतीच्या मदतीने, वाचक आपली आवड, कौशल्य, समाजाची गरज, आणि आर्थिक स्थैर्य यांचा समतोल साधत स्वतःचा इकिगाई शोधू शकतो.प्रत्येक वर्तुळाचा अभ्यास करत गेलो तर आपल्याला आपली इकिगाई नक्कीच सापडेल. इकिगाई शोधणे म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या, समाजाला उपयुक्त असलेल्या, तुमच्यातील कौशल्याला उपयोगी, आणि आर्थिकदृष्ट्या फलदायी अशा गोष्टींमध्ये संतुलन साधणे.ह्या पुस्तकात लोगोथेरपी म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितले आहे. लोगोथेरपी व्यक्तीला जीवनाचा उद्देश समजायला मदत करते. त्यामुळे लोकांना जगण्याची नवी उमेद मिळते. नकारात्मकता झटकून नव्या उत्साहाने समस्यांवर कशी मात करावी हे ह्यातून शिकायला मिळत.
अँपल कंपनी चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या जपान भेटी चा तपशील दिला आहे. त्यांनीही जापनीस लोकांचे आनंदी राहण्याचे सूत्र जाणून घेतले
उत्कट आणि आनंदी जीवन जगताना लवचिकता कशी निर्माण करावी. आयुष्य अर्थपूर्ण, निरोगी, आणि आनंदी बनवण्यासाठी संतुलन आवश्यक आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आणि सकारात्मक नातेसंबंध यांचा मिलाफ आयुष्याला सुंदर बनवतो. छोटेसे बदलसुद्धा मोठा फरक करू शकतात . ज्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधायचा आहे किंवा त्यांच्या कारकीर्दीत काही मोठी उंची गाठायची आहे त्यांनी हे वाचले पाहिजे. जो कोणी दीर्घायुष्याचा शोध घेतो त्याच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी आहे. जपानी लोकांच्या साध्या पण प्रभावी जीवनशैलीचे तत्त्वज्ञान वाचकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते.
हे पुस्तक केवळ वाचण्यासारखे नाही, तर त्यातील शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्यासारखी आहे.