उपाशी

By शिवाजी पवार

Share

Availability

available

Original Title

उपाशी

Publish Date

2006-01-01

Published Year

2006

Publisher, Place

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

उपाशी

Review By Prof. Allapurkar Renuka Subhash, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune अन्न, वस्त्र, निवारा यामधील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. आपण रोजच्या जीवनात एखादा...Read More

Prof. Allapurkar Renuka Subhash

Prof. Allapurkar Renuka Subhash

×
उपाशी
Share

Review By Prof. Allapurkar Renuka Subhash, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
अन्न, वस्त्र, निवारा यामधील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. आपण रोजच्या जीवनात एखादा दिवस पाच ते सहा तास जरी काही खाल्ले नाही तरी आपण उपाशी आहोत असं म्हणतो, पण आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी माणस आहेत ज्यांना रोजचे एका वेळेचे अन्न देखील पोटभर ते खाऊ शकत नाही.
‘उपाशी’ या पुस्तकाचे लेखक शिवाजी पवार यांचे आत्मकथनपर संघर्षमय जीवन या पुस्तकांमध्ये अनुभवास मिळते. घरी अठरा विश्व दारिद्र्य असून देखील लेखक आपले शिक्षण कसे पूर्ण करतो. या संपूर्ण प्रवासामध्ये त्याच्या कुटुंबाचा कसा मोलाचा वाटा आहे . हे यातून स्पष्ट होते. आपल्या पाठीशी आपलं कुटुंब असेल तर, आपण कोणतीही लढाई लढू शकतो.
या पुस्तकांमध्ये कुटुंब व सत्ताधारी लोकांचा गरीबांवर होणारा अन्याय पाहावयास मिळतो. अशा सत्ताधारी लोकांना गावातीलच अनेक शिक्षित व्यक्ती देखील साथ देतात याची थोडी खंत वाटते. सत्ताधाऱ्यांना नेहमी वाटतं गावातील गरीब व्यक्तींनी आपल्या ताटाखालचे मांजर बनवून राहावे व त्यांनी लादलेले सर्व नियम पाळावे. पण या नियमांना तडा द्यायचं काम लेखकाने केले आहे. त्यांच्या विरोधात ते ठामपणे उभे राहिलेले आहेत. गरिबीतून मुक्त होण्यासाठी आशेचा किरण असतो तो म्हणजे ‘शिक्षण’ व ते शिक्षण घेऊन लेखक आपला संघर्षमय प्रवास चालू ठेवतो. पण शिक्षण घेऊन देखील फक्त पैसा वशिला अभावी त्यांना योग्य ती नोकरी मिळत नाही. तरी देखील पडेल ते काम करण्याचे सामर्थ्य लेखकांमध्ये आहे हे दिसून येते. आपल्यावर असंख्य संकट येऊन देखील कोणत्याही व्यसनाचे आहारी न जाता, अन्न व नोकरी मिळवण्यासाठीची त्यांची तगमग, धडपड दिसून येते. आपल्या गावावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध उचलण्याचे धाडस देखील लेखकामध्ये आहे, पण याचा त्यांच्या पुढील प्रवासामध्ये खूप त्रासदायक असा संघर्ष पाहावयास मिळतो.
सगळ्यात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीचे एकमेकांविषयी प्रेम, खडतर परिस्थितीत साथ देणं, खचलेल्या मनाला आधार देणे, चांगले संस्कार देणे, भावंडाच्या सुखासाठी अतोनात कष्ट करणं ,त्यासाठी आपल्या तब्येतीचा देखील विचार न करणं हे पहावयास मिळते. आपल्या पुढच्या पिढीला दारिद्र्याची झळ लागू नये ,म्हणून घरच्यांनी केलेले कष्ट मन भारावून टाकतात.’ जिथे आधार मिळतो ,तिथेच वेल चढतो’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या कुटुंबाच्या आधारामुळे लेखकाची शिक्षणाची वेल चढते.
आयुष्यात आपण कुटुंबानंतर जास्त विश्वास ठेवतो ते आपल्या मैत्रीवर. असाच विश्वास लेखकाने आपल्या मित्रावर ठेवला, पण मित्राने फासे उलटे टाकून लेखकाला खूप मोठ्या संकटात अडकवले. ज्याचा लेखकाला खूप मानसिक व शारीरिक असा त्रास झाला म्हणून कोणाची मदत करताना ती योग्यच कारणासाठी करतो आहे की नाही, हे तपासून पाहणे गरजेचे आहे, हे यातून शिकायला मिळते.’ ज्या माणसाला यातना, हाल सोसाता येत नाही, तो माणूस नाही तो दगडच आहे’ असे पुस्तक वाचून वाटते . अशा प्रचंड आत्मविश्वासाने व प्रेरणेने भरलेले हे पुस्तक आहे .आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला कसे धुडकावून लावायचं हे देखील आपल्याला यापुस्तकातून शिकण्यास मिळते शिकण्यास मिळते.

Submit Your Review