Original Title
एक होता कार्व्हर
Subject & College
Publish Date
2016-01-01
Published Year
2016
Publisher, Place
ISBN 13
9788174348197
Format
Paperback
Country
India
Language
मराठी
Readers Feedback
जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट
दामिनी मधुकर चौरे (विद्यार्थी ) “जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट” “एक होता कार्व्हर” ही वीणा गवाणकर यांनी लिहिलेली कादंबरी, प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या...Read More
दामिनी मधुकर चौरे
जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट
दामिनी मधुकर चौरे (विद्यार्थी )
“जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट”
“एक होता कार्व्हर” ही वीणा गवाणकर यांनी लिहिलेली कादंबरी, प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावर आधारित आहे. कादंबरीत कार्व्हर यांच्या संघर्षमय जीवनाचे, विज्ञानात केलेल्या अमूल्य योगदानाचे, आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे.
कादंबरीतील जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवनचरित्र
1. मिस्टर आणि मिसेस कार्व्हर (पालकसमान व्यक्तिमत्त्वे)
जॉर्ज आज जगेल की नाही अशी त्यावेळची त्याची परिस्थिती होती दुबळा असल्याकारणाने मिस्टर कार्व्हर यांनी त्याच्याकडून कधीच गुलामाप्रमाणे काम करून घेतले नाही.
जॉर्जच्या जन्मतःच्या मालकांनी गुलामगिरी संपल्यानंतरही त्याला सोडले नाही. जॉर्ज च्या आईला मेरी हिला जेम्स ला आणि जॉर्जला या जोडप्याने कधीच गुलामाप्रमाणे वागवले नाही तर घरातीलच सदस्य प्रमाणे त्यांनी मेरीला व तिच्या दोन्ही मुलांना वागवले.
मिसेस सुसन कार्व्हरने त्याला मुलासारखे जपले. तीच त्याला “जॉर्ज” हे नाव देते.
त्या दोघांनी जॉर्जला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.
जॉर्जच्या आयुष्यात हे दोघे आधारस्तंभ होते.
3. सुसन कार्व्हर (प्रेमळ आईसमान व्यक्ती)
सुसन यांना मूलबाळ नव्हते म्हणूनच त्यांनी जॉर्ज याला आपल्या मुलाप्रमाणे वागवले,
सुसन कार्व्हर जॉर्जची सख्खी आई नसली तरी तिचा जॉर्जवर मातृप्रेमाचा मोठा प्रभाव होता.
तिने जॉर्जला शिस्त, स्वावलंबन, आणि चांगल्या सवयी शिकवल्या. एक वेळ लोकांना वाटत की जॉर्ज लवकरच या संसाराचा निरोप घेईल परंतु अशा कठीण परिस्थितीत आईप्रमाणे जॉर्ज ज्याला श्वास घेता येत नव्हता त्याला जगवण्याचे कार्य सुसन यांनी केले. त्याच्या शिक्षणासाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
9. सहकारी व विद्यार्थी वर्ग
जॉर्जने टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या प्रयोगांसाठी मदत केली, त्याच्यासोबत काम करून ज्ञान मिळवले.
पुस्तकाचा महत्त्वाचा भाग
पुस्तकात जॉर्जच्या संघर्षशील बालपणापासून ते जगप्रसिद्ध वैज्ञानिक बनण्यापर्यंतच्या प्रवासाचे उत्कट वर्णन आहे.वर्णभेद, आर्थिक अडचणी, शिक्षणासाठी झगडणे, आणि समाजासाठी केलेले योगदान यावर विशेष भर आहे.त्याचे जीवन मानवतेसाठी समर्पित होते, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि साधेपणा पुस्तकात ठळकपणे येतो.
1. बालपणाचा संघर्ष तत्कालीन समाजात गुलामगिरी ही प्रथा रूढ होती त्यामुळे अत्यंत हलतेचे जीवन कृष्णवर्णी यांना जगावं लागत होते यामुळे जॉर्ज त्याची आई मेरी व त्याचा भाऊ जेम्स हे गुलाम म्हणून कार्व्हर कुटुंबाकडे होते. गुलामांना अत्यंत हीन प्रकारची वागणूक या काळात दिली जात होती.
पुस्तकामधील प्रमुख पात्र जॉर्ज चा जन्म चा 1864 च्या सुमारास अमेरिकेतील मिसुरी येथे एका गुलामाच्या एका कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. त्यावेळी गुलाम गुलामांना पळवण्यासाठी एक टोळी सक्रिय होती. एका अशाच टोळीने जॉब च्या आईला जॉर्ज आणि जेम्स पासून वेगळे केले. ज्याच्या लहानपणीच तो त्याच्या आईपासून वेगळा झाला, जॉर्जच्या जन्मापूर्वी वडील वारले होते, त्यामुळे जॉर्ज आणि त्याचा भाऊ जेम्स हे अनाथ झाले. त्यांना एक शेतकरी जोडपे (मॉसेस आणि सुसान कार्व्हर) यांनी सांभाळले.
जन्मापासूनच जॉर्ज शारीरिकदृष्ट्या अशक्त होता, जॉर्ज हा अत्यंत दुबळा होता त्यामुळे तो जगेल अथवा नाही, त्याला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे कार्व्हर कुटुंबाने त्याला कोणत्याही जड कामे दिली नाही. शरीराने अत्यंत दुबळा असलेला जॉर्ज. त्यामुळे शेतातील कामांपेक्षा त्याला घरकामे आणि निसर्ग अभ्यासण्यात अधिक रस होता.
2. शिक्षणासाठी जिद्द आणि प्रयत्न आणि वाचन: –
वांशिक भेदभावाच्या काळात कृष्णवर्णीय मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. तरीही जॉर्जने शिक्षणासाठी लांबच्या शाळांमध्ये पायपीट केली. बोलताना अडखळणारा, लाजाळू स्वभावाचा जॉर्ज हा आपले शिक्षण मिळवण्यासाठी त्यावेळी समाजाच्या रोशाला जुगारून शिक्षण घेत होता.
जॉर्जला पुस्तकाचे फार आवड बायबल असो वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक असो ते वाचण्यात तो पटाईत होता.
1870 ते 1880 निग्रो मुलांना मोफत पुस्तक मिळत नसेल. पुस्तक विकत घेणे त्यावेळी जो आजीला परवडत नव्हतं
जॉर्जला वाचन करण्यास फार आवडे मग कोणताही पुस्तक असो कसलेही पत्रक असो नवं जुनं वर्तमानपत्रे असो पुस्तिका असो काही भेटलं तरी तरी ते वाचावे अशी त्याची धारणा होती
शिक्षण मिळवताना कृष्णवर्णी असल्यामुळे जॉर्जला त्याचे प्रवेश नाकारण्यात आले होते. तरीही त्या प्रसंगाला न डगमगता जॉर्जने आपले शिक्षण हे चालूच ठेवले. शिक्षण मिळवताना उपाशी राहून गोठ्यात राहून मिळेल ते काम करून जॉर्ज आपले शिक्षण घेत होता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य मिळवण्यासाठी तत्पर होता.
तो पुस्तके आणि निसर्गामधून ज्ञान मिळवायचा. त्याला विज्ञान, विशेषतः वनस्पती विज्ञानात प्रचंड रुची होती.
वयाच्या 30 व्या वर्षी त्याने आयोवा स्टेट अॅग्रिकल्चरल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, जिथे त्याने शेती विज्ञानात प्रावीण्य मिळवले.त्याच्या मेहनतीमुळे तो कॉलेजमधील पहिला कृष्णवर्णीय पदवीधर ठरला. हे त्या काळी घडणे समाजाचा रोष पत्करून जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांनी यश संपादन केले हे सांगता येईल.
3. कृषिक्षेत्रातील क्रांतिकारी योगदान: –
कारवार कुटुंबाकडे असताना जॉर्जने निसर्गाचे झाड असतील , फुले असतील फळे असतील हे चांगलेच जवळून पाहिले होते त्यामुळे जर एखाद्या झाडाला कीड लागली तर त्याची करडी नजर त्यावर पडत असे तसेच बागेचे काम करण्यात जॉर्ज अत्यंत पटाईत होता. त्याला साफसफाई मध्ये अत्यंत रस होता त्यामुळे बाग असतील शेती असेल येथे अत्यंत सफाई पणे तो आपला काम बजावत असेलजॉर्जने आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीत सुधारणा करण्यासाठी घालवले.
शेंगदाण्याचे संशोधन केले गोडबटाट्याचा उपयोगसांगितले मातीची सुपीकता यावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केले
जॉर्ज यांनी लहानपणापासून जे ज्ञान मिळवले होते त्याचा समाजासाठी व समाज हितासाठी वापर करून घेतला.
गरीब शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी तो मदत करत असे. त्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान शिकवले.
4. समाजासाठी समर्पण
जॉर्जने आपले संशोधन मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले.त्याने स्वतःच्या नावावर कोणतेही पेटंट घेतले नाही, कारण त्याला विश्वास होता की विज्ञान हा देवाने मानवतेला दिलेला आशीर्वाद आहे.तो साध्या जीवनशैलीचा पुरस्कार करायचा.
पाक करे बाबतीत जॉर्ज चे यश जॉर्जला चांगल्या प्रकारे सोनपाक येत असे मग त्यात बिस्कीट ब्रेड पुडिंग वेगळ्या प्रकारचं स्वयंपाक असेल हे सर्व जॉर्जला करता येत होते त्याने त्यात यश संपादन केले होते
5. मानवी दृष्टिकोन आणि आदर्श
जॉर्जचे जीवन म्हणजे साधेपणा, विनयशीलता आणि निस्वार्थतेचे उदाहरण होते.त्याने कधीही संपत्ती किंवा वैभवाचा पाठपुरावा केला नाही. त्याच्या संशोधनाचे संपूर्ण श्रेय तो मानवतेला देत असे.
तो नेहमी म्हणायचा, “माझ्या ज्ञानाचा उपयोग केवळ समाजाच्या प्रगतीसाठी व्हायला हवा.”
कादंबरीतील जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण
1. जिद्द
2. मानवतावाद
3. साधेपणा
4. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
“एक होता कार्व्हर” मधून मिळणारे धडे
1. शिक्षण हे सगळ्यांसाठी असावे: समाजातील वांशिक भेदभाव, गरिबी आणि अन्याय असूनही शिक्षणाची ताकद कशी सगळे बदलू शकते, हे जॉर्जच्या जीवनातून शिकायला मिळते.
2. विज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा: विज्ञान हे मानवतेच्या कल्याणासाठी असावे, हे जॉर्जने दाखवून दिले.
3. संघर्षातून यश: कठोर परिस्थितीतही आत्मविश्वास आणि मेहनतीने मोठे ध्येय साध्य करता येते.
4. संपत्तीपेक्षा योगदान महत्त्वाचे: समाजाच्या प्रगतीत दिलेले योगदान हे संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान असते.
जॉर्जच्या जीवनाचा प्रभाव
“एक होता कार्व्हर” वाचताना वाचकाला जॉर्जच्या जीवनातील संघर्ष, त्याचे विज्ञानातील योगदान आणि त्याची समाजसेवा यामुळे प्रेरणा मिळते. ही कादंबरी केवळ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनकथाच सांगत नाही, तर ती वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावते.
निष्कर्ष:-
“एक होता कार्व्हर” मधील जॉर्ज हा संघर्ष, साधेपणा, विज्ञान आणि मानवतेच्या सेवा यांचा आदर्श आहे. वीणा गवाणकर यांनी त्याच्या जीवनाचा प्रवास अतिशय प्रभावीपणे मांडला आहे, जो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
एक होता कार्व्हर
Book Review by Bachhav Nikita Jibhau, SYBA, Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College Shirsondi, Tal. Malegaon एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकर लिखित...Read More
Chaudhari Jagdish Devram
एक होता कार्व्हर
Book Review by Bachhav Nikita Jibhau, SYBA, Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकर लिखित जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवन
चरित्र वाचुन खऱ्या अर्थाने सुंदर सुरुवात झाली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
श्रमलेल्या, काबाड कस्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञांचं उभ्या
हयातभर अखंड अविरत जीवनप्रवास या पुस्तकात सांगण्यात आला आहे. एका
विदेशी व्यक्तीबद्दल विस्तारित आणि त्यांच्या मुळाशी जाऊन सत्य माहितीची
पडताळणी करून ती पुस्तकी स्वरूपात समाजापुढे मांडताना लेखकांना किती कष्ट
घ्यावा लागल असेल हे पुस्तक वाचतांनाच समजतं. यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या
बालपणापासून तर त्यांच्या मृत्यू पर्येंतचा त्यांचा जीवनप्रवास आणि त्या प्रवासात
त्यांचे श्रम, त्यांची विचारसरणी, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तसेच त्यांनी
त्यांच्या वेळेला दिलेलं महत्त्व हे प्रत्येक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरते. आपल्याला
हवी ती गोष्ट करताना, कोणतीही तडजोड न करता जगणं, हे सुध्दा एक धाडस आहे.
कार्व्हरच्या आयुष्यातून हे धाडसच आपल्याला दिसतं आणि आपल्यातील प्रत्येकाला
प्रेरणा देत असते. प्रभावित झालेले अनेकजण कृषीनिगडित क्षेत्राकडे वळलेले
दिसतात. हे पुस्तक वाचून तुमच्या ओळखीमध्ये देखील असे काही जण असतील, जे
या पुस्तकामुळे, डॉ. कार्व्हर यांच्या प्रतिभेमुळे प्रेरित होऊन ‘कृषी’ क्षेत्रातील
अभ्यासक्रमाला गेले असतील.
एक होता कार्व्हर
Dr. Rupali Phule Sinhgad Institute of Technology, Kusgaon (bk), Lonavala असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसे जगता येते याचा त्यांनी आदर्श परिपाठ घालून दिला....Read More
Dr. Rupali Phule
एक होता कार्व्हर
Dr. Rupali Phule
Sinhgad Institute of Technology, Kusgaon (bk), Lonavala
असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसे जगता येते याचा त्यांनी आदर्श परिपाठ घालून दिला. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.
हे पुस्तक इंटरेस्टिंग आहेच त्याचबरोबर ते प्रचंड प्रेरणादायी आहे. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता नेमकं कसं जगावं याच ते उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचल्यानांतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलू शकतो. या पुस्तकाची मराठी पुस्तकविश्वात एक विशेष अशी वेगळी ओळख बनलेली आहे….
पुस्तकाची भाषा एकदम साधीसोपी आहे. वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. पट्टीचा वाचक अगदी १-२ दिवसात हे पुस्तक वाचून काढू शकतो. पुस्तकात ठिकठिकाणी त्या त्या प्रसंगाचे वर्णन करणारी चित्र आहेत. वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसच तस उभं राहत. कार्व्हर यांचा बालपणातील संघर्ष आणि हलाखीचे जीवन याबद्दल वाचत असताना आपण भावनिक होतो आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी तरळतं…
चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन. एकदा वाचून मन न भरणारी ही कादंबरी नक्की वाचा.
एक होता कार्व्हर
मी 'एक होता कार्व्हर' हे वीणा गवाणकर यांचे पुस्तक वाचले. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावरील हे पुस्तक मराठीत आहे. एकोणिसाव्या शतकातील एका महान संशोधकाचे ते...Read More
Dethe Archana Atul
एक होता कार्व्हर
मी ‘एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकर यांचे पुस्तक वाचले. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावरील हे पुस्तक मराठीत आहे. एकोणिसाव्या शतकातील एका महान संशोधकाचे ते चरित्र आहे. जॉर्ज हा निग्रो गुलाम मेरीचा मुलगा होता. मोझेस कार्व्हरच्या कुटुंबासोबत ती राहत होती कारण त्याने तिला विकत घेतले आहे. एके दिवशी मरीया आणि तिच्या मुलाला काही लुटारूंनी गुलामांची पुनर्विक्री करण्यासाठी नेले, जसे की त्या काळातील प्रथा होती. मोझेसने त्यांना परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि घोड्याच्या बदल्यात फक्त मेरीचा मुलगा परत मिळवण्यात तो यशस्वी झाला. मोझेस आणि त्यांची पत्नी सुझानबाई यांनी या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. बागकामात त्यांची आवड निर्माण झाली. तो खूप अशक्त आणि मुका मुलगा होता. त्यांना शालेय शिक्षणासाठी निओज येथे पाठवण्यात आले. ती निग्रो लोकांची शाळा होती. काही विचित्र नोकऱ्या करून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. चित्रकला आणि संगीतातही त्यांची आवड निर्माण झाली. तो शिक्षणात चांगला होता आणि न दचकता बोलू लागला. तो काळा होता म्हणून हायलँड विद्यापीठात त्याच्या उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याला स्टेट आयोवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. जॉर्ज यांनी कृषी आणि बॅक्टेरियल बॉटनीमध्ये एमएस पदवी मिळवली आणि त्याच विषयाचे प्राध्यापक झाले. त्यानंतर त्याला तुस्केगीच्या शाळेत बोलावण्यात आले. निमंत्रण स्वीकारून त्यांनी शाळेत प्रवेश घेतला. येथे त्यांनी आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी डॉ. वॉशिंग्टन बुकर यांच्याशी हातमिळवणी केली. जवळपासच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी तेथे अनेक संशोधने केली. जॉर्ज कार्व्हरने पीनट बटर, पेंट्स आणि कापूस उत्पादनाचा शोध लावला. त्याने कचऱ्यापासून प्रयोगशाळेतील उपकरणे तयार केली. भुईमूग, गोडमूळ, कापूस यांवर त्यांनी संशोधन केले. त्याला काही खाण्याचे पदार्थ सापडले.
पुस्तक खूप मनोरंजक आहे. निवेदक त्या काळाचे मानसिक चित्र आपल्यासमोर उभे करतो.
येथे वापरलेली भाषा सोपी आणि कालखंडाला साजेशी आहे. पुस्तक वाचताना आपण त्याचा भाग झालो. या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी तपशील देताना त्यांची खास शैली वापरली आहे. पुस्तक आपल्याला एका महान संशोधकाची ओळख करून देते. हे आपल्याला कठोर परिश्रम, त्याग आणि कृतज्ञता शिकवते.
कार्व्हरकडून आपण काय शिकू शकतो
व्यक्तीची परिस्थिती त्याच्या विकासाचा अडथळा नसून त्यांनी परिस्थिती विरुद्ध केलेली हालचाल थांबवली की तो संपतो..
● प्रत्येक व्यक्ती हा अजन्म विद्यार्थीच असतो..
जगात शिकण्या सारखं आणि शिकून घेण्यासारखं बरच काही आहे..
● व्यक्तीच्या बाह्य अंगावर त्याच परीक्षण करणं हे नेहमीच चुकीचं असतं..
●अंगात कौशल्य असणारा व्यक्ती आयुष्यात उपाशी कधी मरत नाही..
● संधी मिळताच माणसानं प्रत्येक गोस्ट शिकून घ्यावी , त्याचा उर्वरित जीवनात त्याला फायदा होतोच..
● चांगले राहणीमान, स्वज्वळ विचार आणि गोड वाणीत जग जिंकण्याची ताकत असते..
●कोणतीही लालच तुमची प्रगती रोखण्याचा सर्वात मोठा अडथळा आहे.
एक होता कार्व्हर
चौरे दामिनी मधुकर, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी . “जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट” “एक होता कार्व्हर” ही...Read More
चौरे दामिनी मधुकर
एक होता कार्व्हर
चौरे दामिनी मधुकर, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी .
“जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट”
“एक होता कार्व्हर” ही वीणा गवाणकर यांनी लिहिलेली कादंबरी, प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावर आधारित आहे. कादंबरीत कार्व्हर यांच्या संघर्षमय जीवनाचे, विज्ञानात केलेल्या अमूल्य योगदानाचे, आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे.
कादंबरीतील जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवनचरित्र
1. मिस्टर आणि मिसेस कार्व्हर (पालकसमान व्यक्तिमत्त्वे)
जॉर्ज आज जगेल की नाही अशी त्यावेळची त्याची परिस्थिती होती दुबळा असल्याकारणाने मिस्टर कार्व्हर यांनी त्याच्याकडून कधीच गुलामाप्रमाणे काम करून घेतले नाही.
जॉर्जच्या जन्मतःच्या मालकांनी गुलामगिरी संपल्यानंतरही त्याला सोडले नाही. जॉर्ज च्या आईला मेरी हिला जेम्स ला आणि जॉर्जला या जोडप्याने कधीच गुलामाप्रमाणे वागवले नाही तर घरातीलच सदस्य प्रमाणे त्यांनी मेरीला व तिच्या दोन्ही मुलांना वागवले.
मिसेस सुसन कार्व्हरने त्याला मुलासारखे जपले. तीच त्याला “जॉर्ज” हे नाव देते.
त्या दोघांनी जॉर्जला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.
जॉर्जच्या आयुष्यात हे दोघे आधारस्तंभ होते.
3. सुसन कार्व्हर (प्रेमळ आईसमान व्यक्ती)
सुसन यांना मूलबाळ नव्हते म्हणूनच त्यांनी जॉर्ज याला आपल्या मुलाप्रमाणे वागवले,
सुसन कार्व्हर जॉर्जची सख्खी आई नसली तरी तिचा जॉर्जवर मातृप्रेमाचा मोठा प्रभाव होता.
तिने जॉर्जला शिस्त, स्वावलंबन, आणि चांगल्या सवयी शिकवल्या. एक वेळ लोकांना वाटत की जॉर्ज लवकरच या संसाराचा निरोप घेईल परंतु अशा कठीण परिस्थितीत आईप्रमाणे जॉर्ज ज्याला श्वास घेता येत नव्हता त्याला जगवण्याचे कार्य सुसन यांनी केले. त्याच्या शिक्षणासाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
9. सहकारी व विद्यार्थी वर्ग
जॉर्जने टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या प्रयोगांसाठी मदत केली, त्याच्यासोबत काम करून ज्ञान मिळवले.
पुस्तकाचा महत्त्वाचा भाग
पुस्तकात जॉर्जच्या संघर्षशील बालपणापासून ते जगप्रसिद्ध वैज्ञानिक बनण्यापर्यंतच्या प्रवासाचे उत्कट वर्णन आहे.वर्णभेद, आर्थिक अडचणी, शिक्षणासाठी झगडणे, आणि समाजासाठी केलेले योगदान यावर विशेष भर आहे.त्याचे जीवन मानवतेसाठी समर्पित होते, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि साधेपणा पुस्तकात ठळकपणे येतो.
1. बालपणाचा संघर्ष तत्कालीन समाजात गुलामगिरी ही प्रथा रूढ होती त्यामुळे अत्यंत हलतेचे जीवन कृष्णवर्णी यांना जगावं लागत होते यामुळे जॉर्ज त्याची आई मेरी व त्याचा भाऊ जेम्स हे गुलाम म्हणून कार्व्हर कुटुंबाकडे होते. गुलामांना अत्यंत हीन प्रकारची वागणूक या काळात दिली जात होती.
पुस्तकामधील प्रमुख पात्र जॉर्ज चा जन्म चा 1864 च्या सुमारास अमेरिकेतील मिसुरी येथे एका गुलामाच्या एका कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. त्यावेळी गुलाम गुलामांना पळवण्यासाठी एक टोळी सक्रिय होती. एका अशाच टोळीने जॉब च्या आईला जॉर्ज आणि जेम्स पासून वेगळे केले. ज्याच्या लहानपणीच तो त्याच्या आईपासून वेगळा झाला, जॉर्जच्या जन्मापूर्वी वडील वारले होते, त्यामुळे जॉर्ज आणि त्याचा भाऊ जेम्स हे अनाथ झाले. त्यांना एक शेतकरी जोडपे (मॉसेस आणि सुसान कार्व्हर) यांनी सांभाळले.
जन्मापासूनच जॉर्ज शारीरिकदृष्ट्या अशक्त होता, जॉर्ज हा अत्यंत दुबळा होता त्यामुळे तो जगेल अथवा नाही, त्याला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे कार्व्हर कुटुंबाने त्याला कोणत्याही जड कामे दिली नाही. शरीराने अत्यंत दुबळा असलेला जॉर्ज. त्यामुळे शेतातील कामांपेक्षा त्याला घरकामे आणि निसर्ग अभ्यासण्यात अधिक रस होता.
2. शिक्षणासाठी जिद्द आणि प्रयत्न आणि वाचन: –
वांशिक भेदभावाच्या काळात कृष्णवर्णीय मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. तरीही जॉर्जने शिक्षणासाठी लांबच्या शाळांमध्ये पायपीट केली. बोलताना अडखळणारा, लाजाळू स्वभावाचा जॉर्ज हा आपले शिक्षण मिळवण्यासाठी त्यावेळी समाजाच्या रोशाला जुगारून शिक्षण घेत होता.
जॉर्जला पुस्तकाचे फार आवड बायबल असो वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक असो ते वाचण्यात तो पटाईत होता.
1870 ते 1880 निग्रो मुलांना मोफत पुस्तक मिळत नसेल. पुस्तक विकत घेणे त्यावेळी जो आजीला परवडत नव्हतं
जॉर्जला वाचन करण्यास फार आवडे मग कोणताही पुस्तक असो कसलेही पत्रक असो नवं जुनं वर्तमानपत्रे असो पुस्तिका असो काही भेटलं तरी तरी ते वाचावे अशी त्याची धारणा होती
शिक्षण मिळवताना कृष्णवर्णी असल्यामुळे जॉर्जला त्याचे प्रवेश नाकारण्यात आले होते. तरीही त्या प्रसंगाला न डगमगता जॉर्जने आपले शिक्षण हे चालूच ठेवले. शिक्षण मिळवताना उपाशी राहून गोठ्यात राहून मिळेल ते काम करून जॉर्ज आपले शिक्षण घेत होता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य मिळवण्यासाठी तत्पर होता.
तो पुस्तके आणि निसर्गामधून ज्ञान मिळवायचा. त्याला विज्ञान, विशेषतः वनस्पती विज्ञानात प्रचंड रुची होती.
वयाच्या 30 व्या वर्षी त्याने आयोवा स्टेट अॅग्रिकल्चरल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, जिथे त्याने शेती विज्ञानात प्रावीण्य मिळवले.त्याच्या मेहनतीमुळे तो कॉलेजमधील पहिला कृष्णवर्णीय पदवीधर ठरला. हे त्या काळी घडणे समाजाचा रोष पत्करून जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांनी यश संपादन केले हे सांगता येईल.
3. कृषिक्षेत्रातील क्रांतिकारी योगदान: –
कारवार कुटुंबाकडे असताना जॉर्जने निसर्गाचे झाड असतील , फुले असतील फळे असतील हे चांगलेच जवळून पाहिले होते त्यामुळे जर एखाद्या झाडाला कीड लागली तर त्याची करडी नजर त्यावर पडत असे तसेच बागेचे काम करण्यात जॉर्ज अत्यंत पटाईत होता. त्याला साफसफाई मध्ये अत्यंत रस होता त्यामुळे बाग असतील शेती असेल येथे अत्यंत सफाई पणे तो आपला काम बजावत असेलजॉर्जने आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीत सुधारणा करण्यासाठी घालवले.
शेंगदाण्याचे संशोधन केले गोडबटाट्याचा उपयोगसांगितले मातीची सुपीकता यावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केले
जॉर्ज यांनी लहानपणापासून जे ज्ञान मिळवले होते त्याचा समाजासाठी व समाज हितासाठी वापर करून घेतला.
गरीब शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी तो मदत करत असे. त्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान शिकवले.
4. समाजासाठी समर्पण
जॉर्जने आपले संशोधन मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले.त्याने स्वतःच्या नावावर कोणतेही पेटंट घेतले नाही, कारण त्याला विश्वास होता की विज्ञान हा देवाने मानवतेला दिलेला आशीर्वाद आहे.तो साध्या जीवनशैलीचा पुरस्कार करायचा.
पाक करे बाबतीत जॉर्ज चे यश जॉर्जला चांगल्या प्रकारे सोनपाक येत असे मग त्यात बिस्कीट ब्रेड पुडिंग वेगळ्या प्रकारचं स्वयंपाक असेल हे सर्व जॉर्जला करता येत होते त्याने त्यात यश संपादन केले होते
5. मानवी दृष्टिकोन आणि आदर्श
जॉर्जचे जीवन म्हणजे साधेपणा, विनयशीलता आणि निस्वार्थतेचे उदाहरण होते.त्याने कधीही संपत्ती किंवा वैभवाचा पाठपुरावा केला नाही. त्याच्या संशोधनाचे संपूर्ण श्रेय तो मानवतेला देत असे.
तो नेहमी म्हणायचा, “माझ्या ज्ञानाचा उपयोग केवळ समाजाच्या प्रगतीसाठी व्हायला हवा.”
कादंबरीतील जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण
1. जिद्द
2. मानवतावाद
3. साधेपणा
4. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
“एक होता कार्व्हर” मधून मिळणारे धडे
1. शिक्षण हे सगळ्यांसाठी असावे: समाजातील वांशिक भेदभाव, गरिबी आणि अन्याय असूनही शिक्षणाची ताकद कशी सगळे बदलू शकते, हे जॉर्जच्या जीवनातून शिकायला मिळते.
2. विज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा: विज्ञान हे मानवतेच्या कल्याणासाठी असावे, हे जॉर्जने दाखवून दिले.
3. संघर्षातून यश: कठोर परिस्थितीतही आत्मविश्वास आणि मेहनतीने मोठे ध्येय साध्य करता येते.
4. संपत्तीपेक्षा योगदान महत्त्वाचे: समाजाच्या प्रगतीत दिलेले योगदान हे संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान असते.
जॉर्जच्या जीवनाचा प्रभाव
“एक होता कार्व्हर” वाचताना वाचकाला जॉर्जच्या जीवनातील संघर्ष, त्याचे विज्ञानातील योगदान आणि त्याची समाजसेवा यामुळे प्रेरणा मिळते. ही कादंबरी केवळ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनकथाच सांगत नाही, तर ती वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावते.
निष्कर्ष:-
“एक होता कार्व्हर” मधील जॉर्ज हा संघर्ष, साधेपणा, विज्ञान आणि मानवतेच्या सेवा यांचा आदर्श आहे. वीणा गवाणकर यांनी त्याच्या जीवनाचा प्रवास अतिशय प्रभावीपणे मांडला आहे, जो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
‘एक होता कार्व्हर’
Anil M Dalvi, Librarian, JSPM Narhe Technical Campus, Narhe, Pune कार्व्हरची कहाणी धैर्य आणि चिकाटीची आहे. ती तुम्हाला दयाळूपणा. संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही...Read More
Anil M Dalvi
‘एक होता कार्व्हर’
Anil M Dalvi, Librarian, JSPM Narhe Technical Campus, Narhe, Pune
कार्व्हरची कहाणी धैर्य आणि चिकाटीची आहे. ती तुम्हाला दयाळूपणा. संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही हार न मानण्याबद्दल शिकवते. हे पुस्तक तरुण प्रेक्षकांसाठी आहे. जे नुकतेच त्यांचे शैक्षणिक जीवन सुरू करत आहेत आणि एक नवीन दृष्टीकोन शिकत आहेत.
एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा. धैर्य आणि चिकाटीची कहाणी – वीणा गवाणकर यांचे कालातीत चरित्र डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जन्मापासून ते अमेरिकन आयकॉनच्या देवस्थानाचे गुलाम म्हणून जन्मापासून ते अविश्वसनीय प्रवासाचे वर्णन करते.एक सामान्य जिज्ञासू मूल त्याच्या सर्व संघर्षांसह वैज्ञानिक बनतो, परंतु वैज्ञानिक हा खूप कमी वेळात येतो, तो फक्त एकच बनू शकतो, लोकांसाठी कठोर परिश्रम करणारा एक स्वावलंबी व्यक्ती. वैज्ञानिक, कलाकार, शेतकरी. तो संगीतकार, चित्रकार इत्यादी बनू शकला असता परंतु लोकांना गरज असल्याने शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात खूप कठोर परिश्रम केले तरीही त्यांना भेदभाव आणि अपमानाचा सामना करावा लागला.भारतीय कृषी परिस्थितीच्या सध्याच्या संदर्भात खूप प्रासंगिक. एका पत्रामुळे आपल्या वैयक्तिक विकासाचा मार्ग एका क्षणात सोडून देत, ‘माझ्या बांधवांना माझी गरज आहे’, म्हणत एका ओसाड माळरानावर नाविन्याची निर्मित करण्यासाठी जातो आणि बघता बघता त्यात यशस्वी होत, जर कोणत्याही पिकासाठी बाजारपेठ नसेल, तर शेतकऱ्यांना एकाच पिकापासून शंभर उत्पादने तयार करण्यास कोण मदत करू शकेल? आपल्याला जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर सारख्या लोकांची गरज आहे, कारण ते हे करू शकतात. चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन. डॉ. कार्व्हर यांनी प्रवास केलेल्या रस्त्याचे अनेक चढ-उतार होते आणि पुस्तकात ते अशा प्रकारे चित्रित केले आहे की तरुण प्रेक्षकांनाही त्याचे गांभीर्य कळते.
एक होता कार्व्हर
Pradnya Gautam Ovhal, Student Sinhgad Law College, Pune "एक होता कार्व्हर" हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्यकृती आहे. हे पुस्तक लेखिका वीणा...Read More
Pradnya Gautam Ovhal
एक होता कार्व्हर
Pradnya Gautam Ovhal, Student Sinhgad Law College, Pune
“एक होता कार्व्हर” हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्यकृती आहे. हे पुस्तक लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहिले असून, ते जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या महान शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित आहे. हे पुस्तक एक चरित्र असून, ते जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनातील संघर्ष, यश आणि मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या कार्यांचा आढावा घेतं.ते वाचकांना जिद्द, कष्ट, आणि स्वप्नांच्या मागे धावण्याची शिकवण देते.कार्व्हर यांच्या आयुष्यातील संकटांना आणि यशस्वी प्रवासाला लेखकाने भावनिक दृष्टिकोनातून मांडलं आहे, ज्यामुळे वाचकाला त्यांच्याशी जोडले जाते.अमेरिकेतील गुलामगिरीचा काळ, वर्णभेद, आणि त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे वर्णन आहे.कार्व्हर यांनी प्रतिकूल परिस्थितीत राहून शिक्षण घेतले आणि स्वतःला घडवले. त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला पुस्तकात विशेष स्थान दिले आहे.माणुसकी, परोपकार, आणि निसर्गप्रेम यांचा कार्व्हर यांच्या जीवनात असलेला ठसा पुस्तकात ठळकपणे अधोरेखित केला आहे.पुस्तक वाचताना जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या कठीण बालपणापासून ते जागतिक स्तरावर पोहोचण्याच्या प्रवासाची जिद्दी कथा वाचकांवर गहिरा प्रभाव टाकते. सामाजिक भेदभावावर मात करण्याची प्रेरणा मिळते. त्याचबरोबर हे पुस्तक माणसाच्या अंतर्गत क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा संदेश देते.कार्व्हर यांचे दुःख, संघर्ष, आणि यश वाचताना वाचक त्यांच्याशी भावनिक पातळीवर जोडला जातो.जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवन म्हणजे जिद्द, धैर्य, आणि अडथळ्यांवर मात करण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांची कथा केवळ विज्ञान आणि संशोधनासाठी नाही, तर मानवी जीवनासाठीही प्रेरणादायी आहे.वर्णभेद, गरिबी, आणि संघर्षांवर मात करून एका व्यक्तीने समाजासाठी दिलेले योगदान अधोरेखित करते. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म अमेरिकेत एका गुलाम कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचा लवकर मृत्यू झाला आणि आई गुलामगिरीच्या व्यवस्थेमध्ये हरवली.बालपणी त्यांनी वर्णभेद, दारिद्र्य, आणि सामाजिक भेदभाव सहन केला.कार्व्हर यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा संघर्षाने भरलेला होता, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. वर्णभेद, दारिद्र्य, आणि शिक्षणाच्या अभावातही त्यांनी जिद्दीने आपले ध्येय गाठले. हे वाचताना माझ्या मनातही आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित झाली. वाटले की, कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत.कार्व्हर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण मिळवले आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यांचे शिक्षणासाठीचे समर्पण मला आपले शिक्षण अधिक गांभीर्याने घेण्याची जाणीव करून देते. त्यांचा प्रवास वाचून माझ्या मनात असं वाटलं की, आपण जे काही सोयी–सुविधा मिळवल्या आहेत, त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे.कार्व्हर यांची साधी जीवनशैली आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती खूप भावली. त्यांनी प्रसिद्धी आणि संपत्तीची लालसा न बाळगता आपले आयुष्य समाजासाठी समर्पित केले. यामुळे मला स्वतःच्या जीवनशैलीकडे पुन्हा पाहण्याची प्रेरणा मिळाली आणि साधेपणानेही मोठे काम करता येते, याची जाणीव झाली.त्यांनी मातीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठीचे प्रयत्न, आणि निसर्गाशी असलेले नाते पुस्तकातून प्रभावीपणे जाणवले. यामुळे माझ्या मनात निसर्गाविषयी अधिक आदर निर्माण झाला आणि पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करण्याची भावना जागी झाली.कार्व्हर यांचे जीवन म्हणजे कष्ट आणि समर्पणाची शिकवण. त्यांचा प्रवास वाचताना वाटलं की, यश मिळवण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, ते समर्पणाने केल्यास त्याला अर्थ प्राप्त होतो.त्यांच्या बालपणातील दुःख, समाजाचा विरोध, आणि अडचणींवर मात करत उभं राहण्याची जिद्द वाचताना माझ्या डोळ्यांत अश्रू आले. तरीही त्यांचे कधीही हार न मानणे मला खूप भावले.”एक होता कार्व्हर” हे पुस्तक वाचून माझ्या विचारसरणीत काही महत्त्वाचे बदल घडले:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या संघर्षमय आणि यशस्वी जीवनावर आधारित ही कथा आहे, जी वाचकांना जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा देते.शिक्षण, विज्ञान, आणि मानवतेसाठी असलेल्या त्याच्या समर्पणाची कहाणी वाचकांवर दीर्घकालीन छाप सोडते.वीणा गवाणकर यांनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत कार्व्हर यांचे जीवन उलगडले आहे.त्यांच्या लेखनशैलीमुळे वाचक सहजपणे पुस्तकाशी जोडला जातो आणि त्याला कथा आपल्या समोर उभी असल्यासारखी वाटते.पुस्तकातील कथा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनाच्या कालक्रमानुसार सुसंगतपणे मांडलेली आहे.बालपण, शिक्षणासाठीची धडपड, शास्त्रज्ञ म्हणून प्रगती, आणि समाजसेवेचा प्रवास यामध्ये नैसर्गिक जोडणी आहे, जी वाचकाला एका प्रवासाचा अनुभव देते.कार्व्हर यांच्या संघर्षमय आयुष्यातील प्रत्येक टप्पा पुढील टप्प्यासाठी महत्त्वपूर्ण वाटतो.त्यांचे बालपणातील अनुभव शिक्षणासाठी प्रेरणा देतात; शिक्षण त्यांना शास्त्रीय संशोधनासाठी तयार करते; आणि त्यांचे संशोधन शेवटी समाजसेवेसाठी उपयोगी पडते.पुस्तक केवळ त्यांच्या जीवनातील घटनांवर आधारित नाही, तर त्यामागील भावनिक आणि तात्त्विक दृष्टीही प्रभावीपणे सादर करते.उदाहरणार्थ, कार्व्हर यांची निसर्गावरची श्रद्धा आणि साधेपणावर आधारित जीवनशैली ही त्यांच्या कामाची प्रेरणा म्हणून सुसंगतपणे मांडलेली आहे.
“एक होता कार्व्हर” हे पुस्तक केवळ एक प्रेरणादायी चरित्र नसून, जीवनाच्या विविध पैलूंवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे. “एक होता कार्व्हर” हे सर्व वयोगटांसाठी आणि व्यावसायिक स्तरांवर उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. जीवनातील अडथळ्यांवर मात करून यशस्वी होण्याची प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासणाऱ्या कोणालाही हे पुस्तक वाचावे, असे निश्चितपणे सुचवले जाऊ शकते.”एक होता कार्व्हर” हे पुस्तक जीवनात कष्ट, शिक्षण, आणि जिद्दीचे महत्त्व पटवून देते. कार्व्हर यांचे साधेपणा, ज्ञानप्रेम, आणि समाजसेवा हे सर्वांना आदर्श वाटावे असे आहे. हे पुस्तक केवळ एक चरित्र नाही, तर संघर्षांवर मात करून उभं राहण्यासाठी वाचकांना प्रेरणा देणारा प्रकाशदीप आहे.हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, कारण ते आपल्या जीवनाला नवी दिशा आणि सकारात्मकता देण्याची ताकद राखते. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवन आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नं साकार करण्याची ताकद आपल्या आत असते.
एक होता कार्व्हर
कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण हे मानवी जीवनाच्या समृद्धीचे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर...Read More
Gatkal Yuvraj Shrihari
एक होता कार्व्हर
कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण हे मानवी जीवनाच्या समृद्धीचे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा, लहानपणापासूनच निसर्गाच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान प्राप्त झाले असलेल्या कार्व्हर यांची जीवनगाथा किंवा जीवनचरित्र लेखिका वीणा गवाणकर यांनी एक होता कार्व्हर मध्ये लिहिले आहे. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
कार्व्हर यांचे जीवनचरित्र जगण्याची प्रेरणा देते, एक होता कार्व्हर वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसच तस उभं राहत. कार्व्हर यांचा बालपणातील संघर्ष आणि आयुष्यातील धडपड ,सातत्य ,प्रयत्न, शिकण्याची ओढ आणि यशस्वी होणे हे सर्व साध्या सोप्या भाषेत वीणा गवाणकर यांनी घटना ,गोष्टी यांच्या माध्यमातून तर उदाहरणातून ईतके सुंदर पध्दतीने मांडले आहे. पुन्हा पुन्हा वाचतच रहावे असी कादंबरी आणि जिवनचरित्रा पैकी एक होता कार्व्हर हे माझ्या वाचनात वरच्या स्थानी आहे. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता नेमकं कसं जगावं याच ते उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचल्यानांतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलू शकतो. या पुस्तकात ठिकठिकाणी त्या त्या प्रसंगाचे वर्णन करणारी चित्र आहेत. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. ज्या माणसाच्या आयुष्यात बालपणापासून संघर्ष आहे तो माणूस न हारता सतत प्रयत्नशील आणि कार्यरत राहतो ,ज्याला विद्यापीठात प्रवेश नाकारला जातो तो पुढे प्राध्यापक आणि विभागप्रमुख बनतो. कृष्णवर्णीयांच्या उत्थानासाठी शेतीविषयक अभ्यास, संशोधन करून अनेक प्रयोग करतो,नवे। शोध लावतो ,नवे वान तयार करतो पुढे त्यांची ओळख कृषी शास्रज्ञ म्हणून निर्माण होते. कार्व्हर यांनी समाजबांधवांसाठी अनेक संस्था ची स्थापना केली. या सगळ्या प्रवासात त्याला पावलोपावली संकटं येत असतात पण तो जिद्द सोडत नाही. तो चिकाटीने मेहनत करून सगळ्या परस्तिथीसोबत लढत असतो. गुलाम चोरणारया टोळीने ज्याची आईम्हणजे मेरी पळवून नेहली त्या मेरीचे हे। कुपोषित बालक म्हणजेच जॉर्ज कार्व्हर. ज्या ठिकाणी मोजेस कार्व्हर यांचेकडे मेरी आणि जॉर्ज गुलाम म्हणून होते त्या। मोजेसबाबनी कार्व्हर हे नाव त्या बालकाला दिले, त्याचा संभाळ केला आणि गुलामगिरीतून मुक्त केले. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याचा सांभाळ करतात.
खूपच अशक्त आणि हाडकुळा असणाऱ्या जॉर्जला लहानपणी खूपच कमी शब्द बोलता यायचे, जवळपास तो मुकाच होता. या लहानग्या जॉर्जचा मित्रपरिवार मुलखावेगळा होता. रानावनातील झाडझुडुपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. त्याला लहानपणी अनेक प्रश्न पडत असत जसे की झाडांना हिरवा रंग कसा येतो? सकाळची कोवळी किरणं दुपारी कुठे जातात? …एकदा त्याने पालापाचोला, गवत, दोरा आणि सूत याचा वापर करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं कि सुझनबाईंना लोकांना शपथ घेऊन सांगावं लागायचं की हे आमच्या मुक्या पोरानेच बनवल आहे. जॉर्जची निर्सगाशी इतकी घट्ट मैत्री जमली होती की बागेतील फुले मुरझली किंवा झाडांची वाढ खुंटली की ते जॉर्ज ला लगेच समजायचं. मग जॉर्ज त्या झाडांची जागा बदलणे, त्यांना सूर्यप्रकाश देणे, खतपाणी घालणे असं करून तो कोणाचीही बाग फुलवून द्यायचा. डायमंड ग्रोव्ह मधला तो छोटा पण अतिशय कुशल माळी होता.