Original Title
एक होता कार्व्हर
Subject & College
Series
Publish Date
1981-01-01
Published Year
1981
Publisher, Place
Total Pages
184
ISBN
9788174348197
Format
पेपरबॅक
Language
Marathi
Readers Feedback
एक होता कार्व्हर
एक होता कार्व्हर लेखिका :वीणा गवाणकर साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ ,कृषी क्षेत्रात...Read More
Mane Mohini Santosh
एक होता कार्व्हर
एक होता कार्व्हर
लेखिका :वीणा गवाणकर
साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.
अमेरिकन गुलामगिरीच्या काळात १८६० च्या दरम्यान झाला ,आपल्या जन्माची तारीख कार्व्हरयानाही माहित नव्हती.आईवडील दोघेही गुलाम होते,मोजेस कार्व्हर यांनी त्यांना विकत घेतले होते.एका नाट्यमय अपहरणात मेरी- जॉर्ज कार्व्हरची आई कायमची नाहीशी होती. केवळ जॉर्ज वाचतो ज्याला मोजेसबाबा एका घोड्याच्या मोबदल्यात पुन्हा विकत घेतात.जॉर्ज कार्व्हर मोजेस आणि त्यांची पत्नी सुझेन यांच्या घरातलाच छोटासा भाग होतो.काहीही न बोलणारा हा कृष्णवर्णीय मुलगा मुका असेच सगळ्यांना वाटत.परंतु फुलांविषयी,पक्षांविषयी निसर्गाविषयी त्याचे ममत्व सगळ्यांना आश्चर्यचकित करते.एका जादुगाराप्रमाणे हिरमुसलेली झाडं,रोपं तो खुलवीत असे.
कार्व्हर व इतर कृष्णवर्णियांना डायमंड ग्रोव्हला शिक्षणासाठी परवानगी नसते.मोजेसबाबाचे घर सोडून निओशोला पोहचतो.रात्रभर थंडीत कुडकुडत काढणाऱ्या जीवाला मारिया नावची चांगली स्त्री आसरा देते आणि त्यांचे नाव कार्व्हर बाबांचा जॉर्ज ‘जार्ज कार्व्हर’ होते.शिक्षणासाठी कार्व्हरची धडपड ,कष्ट करून पैसे कमवायचे ,प्रवेश घ्यायचा ,शिकायचे आणि पैसे संपले की पुन्हा शाळा सोडायची.नंतर तेच कष्ट,पैसे कमवा,शिका हे चक्र त्याचे चालूच राहत असे.पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हायलंड विद्यापीठाने देऊ केलेला प्रवेश प्रत्यक्षात ते कृष्णवर्णीय आहे समजताच रद्द केला जातो.कार्व्हारंची शिक्षणासाठीची तगमग सिम्पसन कॉलेजमुळे पूर्ण होते परंतु आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या उद्धारासाठी कला आणि संगीतातली आवड आणि संधी सोडून कार्व्हर शेतकी महाविद्यालयात प्रवेश घेतात.तिथेच पुढे ते प्राध्यापक महानुन्ही रुजू होतात.मायकोलॉजी आणि वनस्पती पथोलोजीमध्ये नवनवीन संशोधन करू लागतात.अनेक दुर्मिळ वनस्पती,कीड ,बुरशी यांवर काम करत असतात.
शेकडो वर्ष गुलामगिरीतच जगलेल्या असंख्य कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य तर मिळते पण त्याचा उपयोग त्यांना मुळी येत नव्हता.अशांसाठी वाशिंग्तोन यांनी दक्षिण अमेरिका मध्ये टस्कीगी संस्थेची स्थापना केली.भांबावलेल्या कृष्णवर्णियांना स्वत:च्या पायावर उभे करायचे हा त्यांचा निर्धार होता.त्यानुसार अनेक लघुउद्योग ते शिकवतात.लक्षात येते की गुलामगिरीत शेतीत गुरांप्रमाणे राबणाऱ्या या बांधवांना शेतीचे खरे ज्ञान मिळाले पाहिजे हे वाशिंग्तोन ओळखतात.यासाठी एकच नाव त्यांच्या समोर येते जॉर्ज कार्व्हर.ते कार्व्हर्नाना निवडीचे पत्र धाडून टास्कीगीत येण्याचे आमंत्रण देतात.आणि कार्व्हरही “येत आहे “या वाक्याने काही दिवसात जुन्या प्रयोगशाळेत सर्व नीट व्यवस्था करून तिथे पोहचतात.तिथे आपल्या बांधवांची डळमळीत अवस्था पाहून कार्व्हर बदलाचे एक मोठे शिवधनुष्य उचलतात.
टस्कीगीतच पुढचे सारे आयुष्य ते व्यतित करतात.पहाटे चारला फिरून आल्यावर ते प्रयोगशाळेत पूर्ण व्यग्र होऊन जात.रोटेशन क्रॉप,कापसाऐवजी सोयाबीन ,भुईमुग असे जमिनीचे पोत वाढविणारे पिकांचा पर्याय ते देतात.भुईमुगाचा एक हंगाम अतिपिकामुळे आणि मागणी कमी असल्याने वाया जाणार तेव्हा कार्व्हर स्वत:ला प्रयोगशाळेत कोंडून घेतात आणि जवळपास शेकडो बाय प्रोडक्ट तयार करूनच श्वास घेतात.तीच गोष्ट रताळी पिकाची,सोयाबीन ,कापसाची!कृत्रिम रंग महाग म्हणून मातीपासून रंग बनविणे,शाकाहारी मांसाहार असे अनेक प्रयोग वाचतांना कमालीची मौज वाटते.
त्यांच्या अफाट संशोधनाने हळूहळू जगालाही भुरळ पडणार नाही तर नवलच.पण तरीही फंडची गरज म्हणून कार्व्हर पियानोचे प्रयोग करून तो मिळवतात.अनेक त्यांना मोठमोठ्या संशोधन केंद्राचे त्यांना नोकरीसाठी निमंत्रण येते पण ते सर्व नाकारतात.अगदी तुटपुंज्या पगारात काम करतात,तोही ते शेवटी फंड म्हणूनच देतात. आयुष्यभर मित्रांनी दिलेला एकच कोट वापरला.कधीही सुट्टी घेतली नाही.
एव्हढे असूनही या सेवाव्रतीची कृष्णवर्णीय म्हणून हेटाळणी थांबत नाही.अनेक अपमान पचवून आपल्या कार्यापासून ते तसूभरही मागे हटले नाही.तुम्ही याचा प्रतिकार का करत नाही यावर ते उत्तर देत संघर्ष करण्याऐवजी तो वेळ मी संशोधनासाठी देईल’ खर म्हणजे तुमच कामच तुमची खरी ओळख व्हायला हवी तुमचा वर्ण ,धर्म ,जात ई. गोष्टी नाही हे पुन्हा महान लोकांचे लक्षण अधोरेखित होते.
आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या हा सेवाव्रती आपला कधी हयातीत इतर शास्त्रज्ञाशी मिसळला नाही एकलकोंडा राहिला,पण कार्याच्या बाबतीत एकाग्र राहिला.जास्त सहवास लाभालाही नाही तरीही आईला ते कधीच विसरले नाही ,मातृभक्त राहिले.आपल्या कार्याचे बीज योग्य हाती देऊन कार्व्हर १९४३ ला कर्मभूमीतच अनंतात विलीन झाला.
वीणा गवाणकर लिखित हे पुस्तक मराठीतले एक अमुल्य साहित्य आहे.पुस्तक लिहितांना सरळ सोपी तरीही तरल भाषा हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.पुस्तकातली चित्रे,पुस्तकातील उत्कृष्ट दर्जाची पाने हे पुस्तकाची जमेची बाजू आहे
प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचे स्थान खूप मोठे आहे.
