Price:  
₹130
Share

Original Title

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास (Garudzhep - Ek Dhyey Veda Pravas)

Subject & College

Series

Publish Date

2017-01-01

Published Year

2017

Publisher, Place

Total Pages

112

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Readers Feedback

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास कु. थोरात गायत्री नवनाथ एफ.वाय.बी सी एस. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या खेड्यात गरीब...Read More

कु. थोरात गायत्री नवनाथ एफ.वाय.बी सी एस. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा

कु. थोरात गायत्री नवनाथ एफ.वाय.बी सी एस. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा

×
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
Share

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
कु. थोरात गायत्री नवनाथ
एफ.वाय.बी सी एस.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले 2000 साली स्पर्धा परीक्षा मार्गावर, सुरू केलेला प्रवास परिश्रमांनी यश अपयशांना तोंड देत 2010 साली UPSC परीक्षेतून IRS पदी निवड घेऊन खडतर प्रवास करणारे भरत आंधळे सर यांनी लिहिलेले हे प्रेरणादायी पुस्तक. गरुडझेप हे पुस्तक स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी तसेच शाळकरी विद्यार्थी आणि अगदी वयोवृद्ध लोकांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देत आपल्या इच्छारुपी पंखांना जिद्दीचे बळ देत यशपूर्ती पर्यंतचा प्रवास लेखक भरत आंधळे यांनी या पुस्तकात सांगितलेला आहे. आयुष्यातील अनुभव कथन करत असताना त्यांनी हे पुस्तक ५ प्रकरणांमध्ये लिहिलेले आहे. यामध्ये त्यांनी बालपणापासून सुरुवात करून आजोबांनी त्यांच्या शाळेत शिक्षकांशी भांडून, वाद घालून शाळेचा प्रवास कसा मिळवून दिला हे देखील सांगितलेले आहे. आजीचे त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास हे ही पुस्तकात कथन केलेले आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका हातात काठी व दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन डोंगराळ भागात गुरे चारण्यासाठी गेलेल्या लाल दिव्याची गाडी आणि अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून आहे अशा मुलाचा फोटो हे चित्र पाहायला मिळते आणि ते पाहून लेखक भरत आंधळे यांनी किती जिद्दीने, चिकाटीने अभ्यासाची तयारी केली असावी याचा प्रत्यय येतो आणि पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळते.
दहावी नंतर ITI करण्यासाठी लेखकांनी घेतलेली मेहनत, नंतर नोकरी करत, बाहेरून शिक्षण घेत असताना खाण्यापिण्याची झालेली गैरसोय, कच्ची भाकरी खाऊन काढलेले दिवस सारं काही या पुस्तकात आपणास वाचण्यास मिळते. याच काळात संजय पाटील यांच्याशी भरत आंधळे सरांची घट्ट मैत्री झाली. त्यांच्याशी भेट झाल्यावर लेखक म्हणतात की त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. PSI होण्याची तयारी करू लागले. शेवटी त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले. परंतु अजित जोशी नावाच्या मित्राची IAS पदी निवड झाली होती. त्यांचा सल्ला लेखक घेऊ लागले.
PSI नंतर 2004 साली रेल्वे टीसी, 2005 साली जलसंपदा विभागात नोकरी, 2007 साली LIC विकास अधिकारी तसेच 2008 साली समाज कल्याण खात्यातील नोकरी अशा विविध नोकऱ्या मिळवून ही आपले मुख्य ध्येय न विसरता सर्व सोयीचा त्याग करून ध्येयवेडे होऊन UPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अथक परिश्रम घेत असूनही बऱ्याचदा येणारे अपयश, त्यावर लोकांकडून होणारी टीका हे सर्व त्यांनी सहन करत पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यांनी केलेले प्रयत्न वाचून आपल्यालाही नव्याने प्रेरणा मिळते.
ठाणगावासारख्या खेड्यातील मुलगा ज्याचे वडील दारू आणि जुगाराच्या व्यसनामुळे कष्ट करणारा छोटा, प्रेमळ आजी, पाठिंबा देणारी आई, बहिण, त्यांची होणारी बायको, सखे, मित्र या सर्वांचे लेखकाने या पुस्तकात प्रसंगांरूप वर्णन केलेले आहे.
जीवन प्रवास सांगताना ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ असे सांगून स्वतःला धीर देऊन पुन्हा एकदा नव्या जिद्दीने परीक्षेची तयारी करत असताना अनेकदा अपयश येऊन जणू काही अपयशाचा जिनाच चढून वर आलेलो आहे असा उल्लेख करतात. भरत आंधळे सर म्हणतात ज्या क्षणी मी अपयशी व्हायचो त्याच क्षणी माझ्या मनात दडलेले ते स्वप्न अधिक गहिरे व्हायचे. “अशक्य असे काहीच नाही, बस जिद्द हवी” भविष्य आपल्या हातानं स्वप्नांच्या झुल्यात झुलवता येतं.
मला हे पुस्तक खूपच प्रेरणादायी वाटले. 2010 साली भरत आंधळे यांना कष्टाचे फळ मिळाले. ‘यशाने हुरळून न जाता आपल्यातले माणूसपण कायम टिकवून ठेवायचे’ आपले पाय जमिनीवरच ठेवून आपल्या गरीब व तळागाळातील मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे असे ठरवून त्यांनी समाजकार्य करण्याचे व्रत हाती घेतले. विविध शाळा, महाविद्यालयात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्याने दिली, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य केले.
असे भरत आंधळे सरांच्या जीवनाची कहाणी प्रत्येकाने वाचावी असे माझे मत आहे. पुस्तकातील भाषा समजण्यास सोपी आहे. असा खडतर आणि प्रेरणादायी प्रवास पुस्तकरूपी माझ्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी लेखक भरत आंधळे सर यांचे मनापासून आभार मानते.

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास

विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय. विद्यानगरी. बारामती. सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स) पुस्तकच नाव - गरुड झेप लेखक - भरत आंधळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील...Read More

सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)

सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)

×
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
Share

विद्या प्रतिष्ठानचे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय. विद्यानगरी. बारामती.
सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)
पुस्तकच नाव – गरुड झेप
लेखक – भरत आंधळे

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण व अर्ध ग्रामीण भागात राहणाऱ्या व देशासाठी समाजासाठी आपापल्या परीने काहीतरी भरीव कामगिरी करण्याची सुप्त तळमळ असलेल्या व त्या दृष्टीने प्रामाणिकपणे धडपडणार्‍या तरुणाई समर्पित हे पुस्तक आहेत सदर पुस्तकात आपण पाहिलं तर जगत असताना माणसाला आर्थिक दृष्ट्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते यातून मार्ग निघतो हे या पुस्तकातून भरत आंधळे सर यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजाला दाखवून दिले आहे ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित न ठेवता आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करणे व चूल आणि मूल हे आपलं आयुष्य नसून व मानसिक दृष्ट्या खचलेल्या तरुण पिढीला चांगल्या मार्गाने पाऊल उचलणे आपल्या जगत पिढीसाठी किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले आहे
मी पाहिले असता या पुस्तकाची सुरुवात मुखपृष्ठापासून एका हातात गुर चारण्यासाठी काठी तर दुसऱ्या हातात अभ्यासाचे पुस्तक व दुसऱ्या हातात अभ्यासाचे पुस्तक व डोळ्यात लाल दिव्याच्या गाडीत फिरण्यासाठी चाललेले प्रबळ इच्छा या सर्वातूनच लेखकाचा दृढनिश्चय स्पष्ट होतो जगत असताना माणसाकडे प्रबळ इच्छाशक्ती ऊर्जा दांडगा आत्मविश्वास उपकारांची परतफेड असे अनेक गुण माणसाकडे असावे याच अश्विनी लिहिलेले हे प्रचंड प्रभावी पुस्तक वाचकापर्यंत पोहोचवले आहेत तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणूनच म्हणताना प्रत्येक यशस्वी कहानी मागे वेदनादायक भूतकाळ असतो आणि प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते
माणसाला जगत असताना चांगले संस्कार असणे प्रामाणिकपणा चांगले लोकांची संगत व त्याप्रमाणे आपण काय करतो कसं वागतो कोणासोबत राहतो यातून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरतो त्याप्रमाणे माणसाला आपल्या जीवनरुपी जीवनात जगत असताना खूप समस्यांना तोंड द्यावे लागतील तरी माणसाने न डगमगता त्याचा सामना करायला हवा असंच एक व्यक्तिमत्व असलेले भरत आंधळे सर यांच्या पुस्तकातून त्यांनी दाखवून दिले आहेत त्यांचा हा जीवन प्रवास वाचत असताना अक्षरश रडू येईल एवढा खडतर प्रवास व सामाजिक परिस्थितीची जाणीव यातून मार्ग निघतो हे दाखवून दिले आहे म्हणूनच म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी असते म्हणूनच माणसाने आपल्या जीव रुपी जीवनात दृष्ट लोभी लंपट माणसाची संगत कधीही धरू नये आपल्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करावा
फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे पोहोचलेत तर सहन करायला शिकावे कारण का त्यांना फक्त बोट न माहीत असतं वेदना कळत नसतात म्हणून तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे सुद्धा तुम्हाला सांगतील आइऐ वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना सीखो

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास

भरत आंधळे यांचे गरुड झेप एक ध्येयवेडा प्रवास हे पुस्तक ग्रामीण भागातल्या मुलांना दिशा व प्रेरणा देणारे आहे. गरीब परिस्थितीमुळे अपयशाने मानसिक दृष्ट्या खचलेल्या जीवनात...Read More

खांडकर पूजा दादाभाऊ

खांडकर पूजा दादाभाऊ

×
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
Share

भरत आंधळे यांचे गरुड झेप एक ध्येयवेडा प्रवास हे पुस्तक ग्रामीण भागातल्या मुलांना दिशा व प्रेरणा देणारे आहे. गरीब परिस्थितीमुळे अपयशाने मानसिक दृष्ट्या खचलेल्या जीवनात निराशा आलेल्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. तरुणाईला तसेच संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. पुस्तकातील लेखकाचा संघर्ष आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाण्याचे बळ देणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत लेखकाने यू.पी.एस.सी.च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली हे शिकण्यासारखे आहे. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता प्रयत्न व अथांग परिश्रमाने आपण आपले ध्येय गाठू शकतो हे, या पुस्तकात लेखकाने सत्यात उतरवून दाखवले आहे. आंधळे सरांच्या बाबतीत ‘विद्या विनयेन शोभते’ हे ब्रीदवाक्य तंतोतंत लागू पडते त्यांच्याकडून पुस्तकात अनुभवल्याप्रमाणे खूप ऊर्जा, प्रचंड इच्छाशक्ती,दांडगा आत्मविश्वास आदी गुण घेण्यासारखे आहेत. आयुष्यात कितीही अपयश आले तरी त्या अपयशाला न जुमानता नवीन आशेने पाहण्याची शक्ती हे पुस्तक वाचल्याने निर्माण होते. जीवनात उत्तुंग ध्येय ठेवण्याची प्रेरणा मिळते. व त्या उत्तुंग ध्येयाकडे वाटचाल करताना जीवनातील सर्व भौतिक सुखांना तिलांजली द्यावी लागते, याची परिपूर्ण जाणीव होते. पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर माझ्या मनात एकच शब्द आला तो म्हणजे ‘अप्रतिम’ कारण हाच एक शब्द योग्य आहे असे मला वाटते. सर्वांसाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी पुस्तक ठरेल.

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास

ABDAGIRE SWAMINI JAGDISH B.Sc(CS), COLLEGE OF COMPUTER SCIENCES, Wakad Pune. गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास लेखक : भरत आंधळे गरुडझेप हे पुस्तक भरत आंधळे त्यांच...Read More

ABDAGIRE SWAMINI JAGDISH

ABDAGIRE SWAMINI JAGDISH

×
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
Share

ABDAGIRE SWAMINI JAGDISH B.Sc(CS),
COLLEGE OF COMPUTER SCIENCES, Wakad Pune.
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
लेखक : भरत आंधळे
गरुडझेप हे पुस्तक भरत आंधळे त्यांच आत्मचरित्र सांगून जाते. त्यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. त्यांच्या आपार कष्टांची कहाणी त्या पुस्तकात लिहिलेली आहे. त्यांचा बालपणाच्या प्रवासापासून ते आय. आर एस चा प्रवास त्या पुस्तकातून आधोरेखित होतो. त्यांचे बालपण खूप खडतर होते. परंतु त्यांच्या कष्टांनी त्यांच्या जीवनाची वाट कशी बद‌लली हे त्यांची जीवनशैली सांगते.

त्यांच्या शिक्षणाचा खर्च पण त्यांच्या आईच्या कष्टाने उभा राहिला. त्यांच्या आईने त्यांना शिक्षणासाठी खूप पाठिंबा दिला, त्यांची घरची परिस्थिती खूप बेताची होती. त्यांना दोन वेळेचे जे जेवण व पुस्तके देखील खूप मुश्किलीने मिळाली. जेव्हा ते आय. आर एस चा अभ्यास करत होते तेव्हा दहावी अगदीच कमी टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन देखील त्यांनी निश्चय करून घाम गाळला. त्यांनी २००० साली सुरु केलेला प्रवास २०१० येऊन थांबला खूप अपयशांना सामोरे जाऊन त्यांनी हे यश प्राप्त केले. त्यांनी यश न येऊन सुद्‌धा यशाची पाठ काही सोडली नाही. त्यांची यशासाठीची जिद्द चिकाटी व सर्वात महत्त्वाचा संय्यम आपल्याला ते प्रयत्न, पुस्तकातून दाखवून देतात हाच त्यांचा एक ध्येयवेडा प्रवास आपल्याला त्या पुस्तकातून कळून येतो. मला हे पुस्तक खरंच खूप प्रोत्साहन दिऊन गेले. माझ्या स्वप्नांबद्दल मला खूप चिकाटी व धैर्य भेटले मला माझ्या जगण्याचा उद्‌देश भेटला. हे पुस्तक मी का ? कश्यासाठी? वाचले त्यापेक्षा ते वाचून मला जो मार्ग आणि समाधान भेटले ते अविस्मरणीय होते.

परिस्थितीतून कसा मार्ग काढावा हे त्या पुस्तकातून कळून येते त्यावर मात करून पुढे जायचं ते मला गरुडझेप पुस्तक वाचून कळाले. आपला आपल्या ध्येयावर पूर्ण विश्वास असेल तर यश मिळण्यापासून आपल्याला कुणी दूर नाही ठेवू शकत. आत्मविश्वास आणि स्वप्नांबद्‌दलची जिद्द शिखरावर नेहून ठेवते. गरुडझेप हे पुस्तक भरत आंधळे यांचे कुटुंब निरक्षर असून सुद्धा त्यांच्या उत्कृष्ट साक्षरतेचा पुरावा आहे. एका शेतकाऱ्याला किती खडतर भयंकर वेदनेतून जावं लागतं आणि कर्जाचा व घराचा भार सांभाळून शिक्षण पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नसते. काहीही सुख- सोयी उपलब्ध नसताना देखील शिक्षण पूर्ण करणे खूप अवघड आहे. एका खेडेगावातील हि एका मुलासाठी खूप अवघड गोष्ट होती परंतु अशक्य ही शक्य करून दाखवले ने भरत आंधळे यांनी त्यांचे आपल्याला शब्द खूप काही सांगून जातात कारण जर स्पर्धेत उतरायचे असेल तर एक तर मनाची तयारी खूप भक्कम लागते. कारण स्पर्धा तकतर यश नाहीतर अनुभव देऊन जाते. त्यांची विनोदीशैली हसवून जाते त्यांचे आपार कष्ट जाते परंतु शेवटी डोळे पाणवतात.

कितीही यश मिळाले तरी मागे वळून पहा.” हे सिंदूताईंची वाक्य भरत आंधळेच्या सामान्यतेची आणि सुज्जननेची साक्ष देऊन जातात. एवढे मोठे यश मिळून देखील त्यांचे पाय जमिनीवरच आहेत हे त्यांच्या साधेपणावरून आपल्याला कळते. द‌हावीनंतर काम करून स्वत: च्या पैश्यावर जगून शिक्षण करणे व बाबा गेल्यानंतर घराची जबाबदारी अगदी सरस – रित्या पार पाडणे खूप विलक्षण गोष्ट आहे. त्यानंतर काम करून पदवीदर होणे अस्वयंभूत गोष्ट होय. आपण कुठल्याही पदावर नसताना व काहीही नसताना लग्नासारखी मोठी जबाबदारी स्विकारून जिद्दीने ती निभावणे खूप अवघड गोष्ट आहे. जबाबदाऱ्या घेऊन झटकने सोपे असते पण निभावणे ते फक्त भरत आंधळे त्यांनाच ठाऊक.
अनेक कामाच्या संधी मिळून् सुद्‌धा निवडलेल्या ध्येयावर ठाम राहणे व बोललेल्या गोष्टी करून दाखवणे आणि दिलेल्या शब्दांना जागणे हे भरत आंधळे सारखा चांगला माणूसच करू शकतो. चांगली संगत माणसाला कुठे पोहचवू शकते त्याची परिचीती या पुस्तकातून कळते वेडे लो‌कंच इतिहास घडवतात आणि भरत आंधळे त्यांचे हे वेड त्यांना आयुष्यभरासाठी शहाणपण देऊन गेले त्याचे मला फार कुतूहल वाटते. हे पुस्तक स्पध स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी खूप मोलाचे ठरेल हे काही वावगे नाही. हया पुस्तकानी मला उडण्यासाठी पंख दिले ते पंख मला निश्चितच माझ्या प्रयत्नाना यश देतील ते काही चूक नाही. भरत आंधळे ह्यांनी स्वत : सोबतची स्पर्धा करून ह्या स्पर्धापरिक्षेवर विजय मिळवला. मला असे वाटते की प्रत्येक ध्येयासाठी धडपडणाऱ्या माणसांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. मी भरत आंधळे ह्यांना खऱ्या आयुष्यात भेटण्याची इच्छा व्यक्त करते. जीवनातून नवीन उभारी घेनाऱ्या माणसाची तहान भागवणारे पाणी म्हणजे हे पुस्तक आणि गरुडासारख्या तीव्र क्षमतेने उडू पाहणाऱ्या व झेप घेणाऱ्या पंखाना बळ देणारे पुस्तक म्हणजेच “गरुडझेप”..

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास (Garudzhep – Ek Dhyey Veda Pravas)

Bhoye Ramila Shantaram Final Year B. Pharm. GES’s Sir Dr M S Gosavi College of Pharmaceutical Education and Research, Nashik-5- Library 'अनंत आमुची ध्येयशक्ती अन्...Read More

Shyam Bachute

Shyam Bachute

×
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास (Garudzhep – Ek Dhyey Veda Pravas)
Share

Bhoye Ramila Shantaram
Final Year B. Pharm.
GES’s Sir Dr M S Gosavi College of Pharmaceutical Education and Research,
Nashik-5- Library

‘अनंत आमुची ध्येयशक्ती अन् अनंत
आशा किनारा तुला पामराला’
आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरक विचारांची गरज असते, आपल्याला प्रेरणा आवश्यक असते ती प्रेरणा देणारे पुस्तक म्हणजे ‘गरुडझेप’ या पुस्तकाचे लेखक आहेत. भरत आंधळे (IRS) जे स्वतः एक IRS अधिकारी आहेत. त्यांचा संघर्ष या पुस्तकात मांडलेला आहे. माणूस महत्वकांक्षी असला पाहिजे तरच त्याच्या अंगी संघर्ष करण्याची ताकद येते. मोठी स्वप्न बघण्यासाठी मोठ्या घरातून व्यक्ती पाहिजे असे प्रत्येकाला वाटते परंतू तसे अजिबात नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा इतक्या उंच गरुड झेप घेऊ शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलेले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव हे त्यांचे गाव या छोट्याशा खेड्यातून आलेला एक मुलगा UPSC परीक्षा पास होऊन अधिकारी कसा बनतो. त्यांची एक संघर्षगाथा या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेली आहे.
देशातील अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उज्वल यश मिळवून ते आज या पदाला पोहचले आहेत, मात्र त्यांचा हा मार्ग अत्यंत बिकट, संयम व चिकाटीची कसोटी पाहणारा स्वाभिमान व आत्मविश्वास यांची सत्वपरीक्षा पाहणारे होते. 2000 साली स्पर्धापरीक्षांच्या मार्गावर सुरू झालेले, भरत आंधळे यांचा प्रवास यशापयशाच्या हिंदोळ्यावरून होत. 2010 साली (IRS) मध्ये निवड होईपर्यंत चालत राहिले. मात्र या प्रवासातील आपले अनुभव जास्तीत जास्त मुला- पर्यंत पोहोचवण्याचा भरत आंधळे यांनी निर्धार केलेला यासाठी खेडेगावात, अर्धग्रामीण तसेच शहरी भागांतही त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली व अजूनही देतात.
त्यांच्यासारखे जर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात तर आपल्यापैकी प्रत्येक जण हे करू शकतो, हे त्यांचे वाक्य प्रत्येकाला विलक्षण प्रभावित करत आणि आत्मविश्वास देते. त्यांच्या अनेक भाषणांतुन ते मांडत आलेले त्यांचे जिवानुभव आता गरुड झेप एक ध्येयवेडा प्रवास या पुस्तकातून वाचकापर्यंत आले आहेत. एकूण पाच प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात त्यांनी बालपणाच्या अनुभवांपासून सुरुवात केली आहे. आजोबांनी शिक्षकांशी वाद घालून मिळवून दिलेला त्यांचा शाळाप्रवास मजेशिर वळणे घेत गेला वर्गात न येणारे शिक्षक, पोरांची चालणारी मस्ती, एकही अक्षर लिहीता वाचता न येऊनही पुढच्या इयत्तांमध्ये झालेला प्रवास त्यांनी विनोदी शैलित मांडला ओह.
बिकट आर्थिक परिस्थिती, जुगाराचे व्यसन असलेले वडील अशा पाश्वभुमीवर भरतच्या शिक्षणांसाठी व नंतरच्या प्रवासातही त्यांच्या मागे पहाडासारखी उभी राहीलेली त्यांची आजी व तिचे नातवावरचे प्रेम व विश्वास मनाला स्पर्शून जातात. शाळेत अभ्यास येत नाही म्हणून शिक्ष- कांनी भेटायला बोलवल्यावर घरातील पहिलाच शिकणारा मुलगा आहे. सांभाळून घ्या. अशी विनवणी करणारी व नंतरही तीन वर्ष स्वतःसाठी नवी चोळी न शिवता नातेवाईकांनी दिलेले पैसे स्वतःसाठी न वापरता त्यांना अभ्यासाठी पाठवणारी आजी निरक्षर अजूनही मोठी शिकवण देऊन जाते.
भरत आंधळे आजी विषयी कायम कृतज्ञता व्यक्त करतात. ‘माझा नातू लई मोठा साहेब होणार आहे’. असा आजीचा त्यांच्यावर अदम्य विश्वास होता.
गावात दहावी उत्तीर्ण होऊन आय. टी. आय. झालेला चकाचक कपड्यातला तरुण पाहिल्यावर आपणही दहावीनंतर आय. टी. आय. करायचे त्यांनी ठरवले. दहावी उत्तीर्ण होण्यासाठी अवघड वाटणाऱ्या गणित, इंग्रजी या विषयांसाठी अपार परिश्रम केले. दिवसभर रोजावर काम करायचं किंवा शेळ्यांना चरायला न्यायचं हा शाळेनंतरचा दिनक्रम असे शेजाऱ्यांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर निभावायचे 54% मिळवून दहावी उत्तीर्ण झाल्यावर नाशिकला (ITI) मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण नाशिकलाही अत्यंत आयुष्य कष्टमय होते. दोन-अडीच तास पायपीट करून कॉलेजला जायचे खाण्याची आबाळ तर ठरलेलीच. काही काळ एका कंपनीत काम केले. बरोबरीने बाहेरून (दूरस्थ शिक्षणक्रमाद्वारे) पदवीचे शिक्षण पूर्ण करून ते कुटुंबातील पहिले पदवीधर बनले.
याच काळात एका मित्रामुळे पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. व त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली कंपनी व मिळणारी नियमित वेतन सोडून पोलीस उप-निरीक्षक परीक्षेची तयारी सुरु करण्याचा विलक्षण धाडसी निर्णय त्यांनी घेतला. घरची आर्थीक परिस्थिती बिकट, शिक्षणातही फारशी चमक नाही. असे असूनही ध्येयाने प्रेरित झाल्यावर कोणताही त्याग करण्याची तयारी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर दाखवली.शहरी सुखवस्तू कुटूंबातील मुलांनाही जो निर्णय कठीण वाटावा, तो त्यांनी झटक्यात घेतला. ध्येय नक्की केल्यावर त्यादृष्टीने वाटचाल सुरु झाली. पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वातावरण आहे, हे कळल्यावर नाशिकहून ते पुण्यात दाखल झाले. कोणाशीही ओळख नसल्याने राहायची, खायची, कसलीच सोय असणे शक्य नव्हते.
दोन वर्ष पूर्व परीक्षेत अपयश आल्यानंतर 2006 साली प्रथमच ते पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. दरम्यान LIC मध्ये विकास अधिकाऱ्याची परीक्षा देऊन तिथे निवड झाली. पण आपल्या ध्येयावरची नजर त्यांनी कधीही ढळू दिली नाही.
त्यांच्या या दहा वर्षाच्या प्रवासा विषयी जाणून घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवे. काल सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागणारे MPSC UPSC यशस्वी झाल्यावर कसे यशाने बेभान होतात इतरांना तुच्छ समजू लागतात याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. त्याच वेळी त्यांनी निर्धार केला की आपले असे होऊ दयायचे नाही.या प्रवासात त्यांनी स्वतः शी निर्धार केला की आयुष्यात कधी माज करायचा नाही.
“अशक्य काहीच नाही, बस फक्त जिगर हवी, जिद्द हवी, स्वप्नांशी तडजोड नको, कष्टाची पर्वा नको, भविष्य आपल्या हातानं, स्वप्नांच्या झुल्यावर सजवता येतं, कृतार्थानं झुलता येतं”

-भोये रमिला शांताराम

Submit Your Review