गोष्टी माणसांच्या

By Murty Sudha

Sudha Murthy, a professor, a social worker and best of all an author with the most innovative and skillful mind. Her...

Price:  
₹179
Share

Book Reviewed by
Ashwini Rajendra Deshmukh, (Alumni), TYBA,
MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik

“गोष्टी माणसांच्या” हे पुस्तक सुधा मूर्ती यांनी आपल्या जीवनाचा घडलेला अनुभव या पुस्तकाद्वारे आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली  कर्नाटक राज्यातला शिग्गावी येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयातील ई टेक ही पदवी प्राप्त केली. त्यांनी कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या त्या प्रणेत्या आहेत.
कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून एक अशा साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी एक आणि  कर्नाटक विद्यापीठाकडून एक अशा दोन डॉक्टरेट्स यांना बहाल करण्यात आल्या. तामिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्रप्रदेशातील श्री पद्मावती विश्व विद्यालयाने त्यांना डॉक्टरेट्स  देऊन सन्मानीत केल.
सुधा मूर्ती यांनी आपल्या सर्वांजवळ या गोष्टी माणसांच्या या पुस्तकाद्वारे असे सांगितले की भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारताच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांनी सांगितले आहे. यामध्ये असे सांगितले की “वयाची अट नाही” वाचनासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची अट  नसते. आपण कोणत्याही वयामध्ये पुस्तकांना आपले मित्र बनवून त्यांच्यासमवेत मैत्री करून आपलस करू शकतो. त्या यामार्फत आपल्याला असे सांगता की त्या काळात करमणूकीचे साधन म्हणजे टी.व्ही. किंवा इतर दुसरा कोणताही माध्यम नव्हता. त्यांचा काळात करमणुकीसाठी पुस्तके, आपले आजी- आजोबा यांच्या मुळे दिवसभर करमणूक होत असे. आजी-आजोबा दररोज फावल्या वेळेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी, गाणी, विविध अनुभव यांचे धडे द्यायचे. त्यामुळे जीवनातला प्रत्येक वेळ हा सत्कर्मी लावायचा. विविध अनुभवांमुळे  सर्व जग आपलेसे वाटायचे. या वयामध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा सहवास लाभल्यामुळे लेखनाला सुरुवात करायला त्यांनी सुरुवात केली. सुधा ताई असे सांगता की मी नशिबवान होते की मला आजोबा आजी यांच्या अनुभवांचे दर्शन घडले. त्यामुळे आपल्याला उद्या मिळणाऱ्या प्रेरणा आजच मिळत गेल्या.
त्यानंतर त्यांनी असे या पुस्तकात रशियातील लग्नसोहळा याबद्दल सांगितले. त्या एके दिवशी असाच विरंगुळा म्हणून रशियाच्या एक मोठा भव्य असलेला टॉवर त्या जवळ जावून उभ्या राहून त्याच निरीक्षण करत होत्या. अचानक त्यांच लक्ष बाजूला असणाऱ्या एका जोडप्याकडे गेले. ते जोडपे कदाचित नवीन लग्न झालेले असावे, अस त्यांना वाटले. दोन मुली त्या नव वधूच्या ड्रेसचा मागचा घेर हातात धरून उभ्या होत्या. व नववराने लष्कराचा ड्रेस परिधान करून त्या टॉवर समोर उभे होते. त्यांना त्यावेळी असा विचार आला की यांचे नवीन लग्न झाले असावे. मग ते कदाचित एखाद्या सुंदर हॉटेल किंवा बगीच्या मध्ये असायला हवे होते, मग ते येथे काय करत असतील असा प्रश्न त्यांना पडला. तेच बगता त्यांनी असा विचार केला की लगेच त्यांना जावून  विचारावे की काय पण अस त्यांना करता येत नव्हतं. त्यानंतर त्या नव्या जोडप्याने पुष्पगुच्छ तेथे अर्पण करून दर्शन घेवून तेथून निघून गेले.
“अब्दुल कलाम” सुधा मूर्ती यांनी आपल्या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या व्यक्तीबद्दल सांगितले ती व्यक्ती म्हणजे डॉ.अब्दुल कलाम. सुधा ताई ह्या “आय टी डिस्ट्रिब्युटर्स” या विषयाच्या अध्यापिका असल्याने त्यांनी आपल्या विषयाबाबत लेख लिहिण्याचे ठरवले तसे बगायला गेले तर माहिती संप्रेशन तंत्रज्ञान म्हणजे संगणकातील सर्वात अवघड विषय होता. त्या विषयातील लेख अगदी सुंदर व सोप्या भाषेत त्यांनी एकदा वृत्तपत्रामध्ये लिहिण्याचे ठरविले. त्यांनी तो लेख लिहिला, तो लेख अब्दुल कलाम यांनी वाचला आणि त्यांनी सुधा ताईंना फोन केला. त्यांना असे वाटले कलाम हे एक अशी व्यक्ती आहे की ते आपल्याला फोन तरी करतील असे, त्यांनी त्यांचा फोन घेतला व त्या कलामांसमवेत बोलल्या की कदाचित तुम्हाला मी नाही तर माझ्या पतींसमवेत बोलायचे आहे का? तेव्हा कलाम बोलले मला तुमच्या लेखाबद्दल बोलावेसे वाटले म्हणून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला फोन केला ते बोलले एवढ्या अवघड विषयाबद्दल तुम्ही इतक्या सहज रीतीने कसे लेखन केले. ते वाचतांना मला खूप हसू येत होते, असे डॉ.कलाम त्यांना बोलले. त्या सुधा ताईंना अतिशय आनंद झाला. त्या बोलल्या माझ्या लेखाबद्दल स्तुती करणारे पहिले व्यक्ती तुम्ही आहात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना असे झाले. त्यांनतर सुधा ताईंनी दुसऱ्या विषयावर बोलतांना अजून एक अनुभव सांगितला तो म्हणजे माणसामध्ये असलेला खरा दागिना.
“खरा दागिना” म्हणजे काय तर माणसाच्या अंगी असलेल्या गुणांबद्दल  त्यांच्या वागणुकीबद्दल, इतरांसमवेत असलेले आपले वर्तन, सर्वधर्म समान माणून प्रत्येक माणसाला आपलेसे करून त्यांच्या समवेत वर्तन करून त्या व्यक्तीबद्दल आदर करणे. त्यांनी त्याबद्दल एक उदाहरण सांगितले की, त्या एके दिवशी प्रवास करत होत्या. पावसामुळे पूल बंद झाल्यामुळे त्यांना जवळच असणाऱ्या एका घराचा सहारा घेणे आवश्यक होते. त्या दक्षिण कोरियात असणाऱ्या एक गृहस्थाच्या घरी गेल्या. दुसऱ्याच्या घरी राहणे म्हणजे मनामध्ये शंका कुशंका आपल्या समवेत त्या व्यक्तीचे वर्तन कसे असेल. याबद्दल त्या विचार करत होत्या. घरात जाताच त्यांचे अतिशय आदराने स्वागत केले. त्यांना त्यावेळी अतिशय हलकेसे वाटले. कारण आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो तेव्हा आपल्या समवेत समोरचा व्यक्ती कसा राहतो यावरून समजते की पाहुण्यांबद्दल या घरात किती आपलकी आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये “अतिथी देवो भव:” अशी म्हण पडली आहे. कारण अतिथी आपल्या घरी येणे म्हणजे देवानेच आपल्या घरी पदार्पण करणे असे होय. घरी आल्यानंतर त्या हातपाय धुण्यासाठी गेल्या तेव्हा समोरून हातात टॉवेल घेवून एक स्त्री आली. ती अतिशय हसरी होती. मी तिच्याकडे बघताच तीने गोड हास्य दिले. तेव्हा त्या वेळी त्यांना त्या घरात आपुलकी वाटली. मनामध्ये शंका होत्या त्या दूर झाल्या. व आंनदाने एक रात्र आपली जाणार असे त्यांना वाटले.
त्या नंतर त्यांनी जेवण करायला सुरुवात केली. त्या घरामध्ये एकूण चार व्यक्ती होत्या. त्या म्हणजे मी स्वतः नवरा, बायको व त्यांची म्हातारी आजी. जेवण झाल्यानंतर त्यांना त्या आजींसमवेत गप्पा करू वाटल्या. त्या आजींना बघितल्यावर सुधा ताईंना आपल्या आजीची आठवण झाली. त्या आजी बोलल्या रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी तु माझ्या खोलीत झोपली तर आपण खूप गप्पा करू शकतो. त्या वेळी सुधा ताई बोलल्या मी एकटी झोपण्यापेक्षा आजींच्या खोलीत झोपले तर बर होईल. अशा प्रकारे खरा दागिना म्हणजे काय हे त्यांनी आपल्याला या उदाहरणातून पटवून दिले.
सुधा ताईंनी “ओ फॉर ऑनेस्टी म्हणजे नेमकी काय याबद्दल देखील आपल्याला सांगितले. ऑनेस्टी म्हणजे नेमकी काय तर माणसाने नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक पणाला महत्त्वाचे स्थान हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे रशिया सारख्या देशात भारतीय व्यक्तींचे पुतळे बघायला मिळता त्या व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, व इंदिरा गांधी या व्यक्तींमुळे आपल्या भारतीय संस्कृतीचे नाव मोठे होवून गेले. “ए ऑनेस्टी” या तत्वांबद्दल त्या बोलता की प्रामाणिक पणा असेल तर सर्व गोष्टी मिळणे आवश्यक होतात. प्रामाणिक पणाने खऱ्या गोष्टींचा आधार घेवून असणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावून समस्याचे निवारण करणे गरजेचे आहे.
प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात पुस्तकांना विशेष असे महत्त्व देणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक पुस्तक हे आपल्याला अनुभव देण्याचे काम करते. प्रेरणा मिळते, व आपण कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही याबद्दल समज निर्माण होवून प्रगती होते. त्यामुळे प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वाचनाचा साठा वाढवून आपला विकास करवून स्वतःचा व इतरांचा चांगल्या प्रकारे मदत केली पाहिजे. असे सुधा मूर्ती आपल्या या छोट्याशा गोष्टी माणसांच्या या पुस्तकाद्वारे मांडतात. त्यांचे अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे “आयुष्याचे धडे गिरवताना” याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले.

Availability

available

Original Title

गोष्टी माणसांच्या

Series

Publish Date

2004-01-01

Published Year

2004

Publisher, Place

Total Pages

176

ISBN 13

978-8177665000

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Submit Your Review