मानवी जीवनातील दुर्दम्य ईच्छाशक्ती, प्रचंड आशावाद व्यक्त करणाऱ्या. जीवनात स्वप्नं पाहणारी,
Read More
मानवी जीवनातील दुर्दम्य ईच्छाशक्ती, प्रचंड आशावाद व्यक्त करणाऱ्या. जीवनात स्वप्नं पाहणारी, त्याच्या परिपूर्ततेसाठी धडपडणारी आणि स्वप्नं साकार साकारत स्वत:ची उन्नती साधताना इतरांचेही आयुष्य उजळवणारी व्यक्ती तशा दुर्मिळ. डॉ. जगन्नाथ पाटील हे व्यक्तीमत्व ही असेच असाधारण. सामान्यातून असामान्यत्वाकडे झेप घेणारे. ‘चंबुखडी ड्रीम्स’ या आत्मकथातून त्यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास उलगडला आहे. मात्र हा सारा प्रवास त्यांच्या एकट्यापुरता सिमीत राहत नाही. तर त्यांची कहाणी ही जिद्दीने पछाडलेल्या, नाविन्याचा ध्यास असलेल्या आणि सतत लोकांच्या भल्यासाठी काही तरी करू पाहणाऱ्या समाजमनाची बनते. उत्तुंग स्वप्नं सत्यात उतरविणाऱ्या नायकाची ही कहाणी ठरते. राधानगरी तालुक्याती तीन साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावात सुरू झालेला प्रवास जगप्रसिद्ध टोकिओपर्यंत उंचावला. शिकागोच्या ऐतिहासिक परिषदेतील भाषण हा आणखी एक टप्पा त्यांच्या कारकिर्दीला झळाळी देणारा ठरला. पाटील यांनी दहा प्रकरणात आतापर्यंतचा सारा प्रवास उलगडला आहे. त्यांचा हा जीवनप्रवास प्रत्येक टप्प्यावर अधिक अनुभवशील, यशदायी, माणूस म्हणून अधिक समृद्ध बनविणारा ठरला. सोबतीला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड लाभल्याने तो एकट्याचा प्रवास उरत नाही. बऱ्याचदा आत्मकथा, चरित्र लेखन म्हणजे सोयीचे लिखाण होते. डॉ. पाटील यांनी मात्र अगदी बालपणापासूनच्या आठवणी जशाच्या तशा उतरविल्या आहेत. देशासाठी वडिलांनी पत्करलेले हौतात्म्य, जन्माअगोदरच हरपलेलं पितृछत्र. अतिशय काबाडकष्टात, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आईने केलेला सांभाळ हे अतिशय तपशीलावर त्यांनी मांडले आहे. आईविषयी त्यांनी प्रचंड आत्मियता, अभिमान आहे. आईच्या कष्टाची जाणीव आहे. आईला ते वीरांगणा संबोधतात. ललितअंगाने लेखन करत चार दशकापूर्वीचा ग्रामीण भाग, मानवी स्वभावाचे कंगोरे हे त्यांनी खुबीने टिपले आहेत. अगदी पहिल्या प्रकरणापासून वाचक, हा लेखकांच्या ‘शोधयात्रा’मध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागतो. हे या पुस्तकाचे मोठं यश म्हणावं
Show Less