जंगलनामा

By Dr Arvind Redkar

Share

जंगलनामा:बस्तरच्या जंगलात
Review by Shri Ramdas Chinchwade

Share

जंगलनामा:बस्तरच्या जंगलात
Review by Shri Ramdas Chinchwade

Availability

available

Original Title

जंगलनामा

Publish Date

2009-01-01

Published Year

2009

Total Pages

184

ISBN

9789380166070

Format

Paperback

Language

Marathi

Translator

Dr Arvind Redkar

Average Ratings

Readers Feedback

जंगलनामा – बस्तरच्या जंगलात

श्री रामदास चिंचवडे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७ या पुस्तकामध्ये एकूण चार प्रकरणे दिलेली आहेत. संपूर्ण पुस्तक हे सत्यकथेवर आधारित आहे. छत्तीसगढ राज्यामध्ये बस्तर नावाचे...Read More

Shri Ramdas Chinchwade

Shri Ramdas Chinchwade

×
जंगलनामा – बस्तरच्या जंगलात
Share

श्री रामदास चिंचवडे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७
या पुस्तकामध्ये एकूण चार प्रकरणे दिलेली आहेत. संपूर्ण पुस्तक हे सत्यकथेवर आधारित आहे. छत्तीसगढ राज्यामध्ये बस्तर नावाचे जंगल आहे तेथील ही कथा आहे. याला पौराणिक संदर्भ आहे प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासात होते ते ज्या ठिकाणी वास्तव्यास राहिले ते दडकारण्य म्हणजेच छत्तीसगढ. जंगलपर्यंतचा प्रवास या पहिल्या प्रकरणात लेखक जंगलात प्रवास करतो याचे वर्णन आलेले आहे. लेखकाचा जंगलामध्ये जाण्याचा तो पहिलाच अनुभव असतो. यामध्ये बराचसा प्रवास हा रात्रीचा असतो. या प्रवासामध्ये सुरूवातीला लेखक आणि अजून एकजण असतो. जंगल प्रवासात त्यांना मुक्कामपर्यंत पोहचण्याआधी अजून एकजण सोबत करतो. यामध्ये लेखक जंगलातील गरीला कॅम्पपर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रवासवर्णन आहे. गरीला कॅम्प म्हणजे शासनाच्या धोरणांविरुध्य व आदिवासींच्या हक्कांसाठी असलेले लोकांचा तळ आहे. कॅम्पमध्ये समावेश असणार्‍या लोकांना गरीला सैनिक म्हंटले जाते. आदिवासी समाज कोणतीही गोष्ट फुकट घालावीत नाहीत याचा प्रसंग यामध्ये आलेला आहे. शेवचे पॅकेट रिकामे झाल्यानंतर ते इतर कामासाठी सांभाळून ठेवले जाते. जंगलामध्ये कोठेही घाण करीत नाहीत. जंगलातील नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. आदिवासी समाज अतिशय कमी गरजा ठेवतात. ते नदीची पुजा ही करीत नाहीत व नदी घाणही करीत नाहीत . नदी पर्यटनाचा भाग नसून ती त्यांच्या जीवनाची अविभाज्य गरज आहे. सुरूवातीला दोघांनी सुरू झालेला प्रवास प्रकरणाच्या शेवटी चार लोकांपर्यंत आला. व लेखक गरीला कॅम्पच्या मुक्कामी पोहोचला.
दुसर्‍या प्रकरणामध्ये लेखकाने गरीला कॅम्पमध्ये दिनचर्या कशी असते याचे वर्णन आलेले आहे. जगात विविध देशात सुरू असलेली शीतयुध्ये व त्याबाबत इतर देशांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत. कॅम्पमध्ये बीबीसी रेडिओ हे एकच मनोरंजनाचे साधन आहे. आदिवासी माणसांचे जेवण हे जंगलात मिळणारी कंदमुळे , मासे ,भात,बांबूचे कोम, प्राणी हे राहते. लालमुंग्यांची चटणी हे त्यांचे आवडते खाद्य आहे. गौंड आदिवासी लोकांचे वर्णन यात आले आहे. कॅम्पमध्ये स्रिया,पुरुष, मुले, मुली यांचा समावेश होता. काही विज्ञानाचे विद्यार्थी होते तर काही थोड्या दिवसांसाठी मदतीला येणारे डॉक्टर होते. कॅम्पमध्ये बंदूक मात्र प्रत्येकाजवळ होती. जंगलात राहणार्‍या लोकांचे प्रश्न हे इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना शिक्षण , रोजगार , आरोग्य ह्या सुविधा मिळत नाहीत. तसेच भांडवलदार, व्यापारी, ठेकेदार हे आदिवासी लोकांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक करतात. याबद्दल आदिवासी लोक न्यायही मागू शकत नाहीत.
तिसर्‍या प्रकरणामध्ये भ्रमण मध्ये लेखक गरीला कॅम्पमधून बाहेर निघत असतो. या प्रवासात कॅम्पमध्ये मुक्कामी थांबलेल्या दिवसांमध्ये घडलेल्या घटनांचे अवलोकन करित असतो. तेथील राहणीमान. दिनचर्या, समस्या याबाबतीत विचार करीत जंगलामधून प्रवास करीत असतो. गरीला कॅम्पमध्ये राहणार्‍या लोकांना सैन्याची शिस्त असते. सैन्याप्रमाणे ते वागत असतात. गरीला टीममध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कलाकार असतात. ते आदिवासी गावांमध्ये जाऊन तिथे मनोरंजनाचे कार्यक्रम करतात. यामध्ये आदिवासींचे हक्क,त्यांच्यावर होणारा अन्याय,याबाबतीत जनजागृती करतात. गरीला कॅम्पमध्ये राहणार्‍या लोकांना त्यांच्या आयुष्याबद्दल शाश्वती नसते. कधी सरकार त्यांना खोट्या चकमकीमध्ये ठार मारील हे सांगता येत नाही. लेखक जंगलातले जीवन व शहरातील जीवन याची तुलना करतो. छत्तीसगडच्या जंगलात सोने, हीरे,लोखंड मिळते. पण आदिवासींना याची कल्पना नाही. आदिवासी लोक नवीन गोष्टी व बाहेरील लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. गरीला सदस्य गावातील आदिवासी लोकांना चांगले राहणीमाण ठेवण्यासाठी मदत करतात. अन्न तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतात. पाणी अडवण्यासाठी त्यांना ठीकठिकाणी बांध घालून व नैसर्गिकरित्या पाईपलाइन तयार करून त्यावर भाजीपाल्याची शेती करतात. आदिवासी समाजात बिजा पांडुम नावाचा सण पिकाची कापणी करत्यावेळी साजरा केला जातो. या सणाला गावात सगळे दारू पितात. गरीला सदस्य एकमेकांना लाल सलाम करतात. आदिवासी समाजात जातीव्यवस्था नाही.
निरोपाच्या प्रकरणात लेखक आगगाडीत बसून शहराकडे निघतो.

Submit Your Review