Availability
available
Original Title
जनाबाईचे निवडक अभंग
Subject & College
Publish Date
2002-01-01
Published Year
2002
Total Pages
156
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
जनाबाईचे निवडक अभंग
Review By Dr. Deepali Chinchwade, Assistant Professor, Baburaoji Gholap College, Pune जनाबाईचे निवडक अभंग या डॉ. सुवासिनी इर्लेकर यांच्या पुस्तकात संत जनाबाईचे निवडक ५० अभंगांचे...Read More
Dr. Deepali Chinchwade
जनाबाईचे निवडक अभंग
Review By Dr. Deepali Chinchwade, Assistant Professor, Baburaoji Gholap College, Pune
जनाबाईचे निवडक अभंग या डॉ. सुवासिनी इर्लेकर यांच्या पुस्तकात संत जनाबाईचे निवडक ५० अभंगांचे विवेचन केलेले आहे. संत जनाबाई ह्या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवयित्री होत्या. त्यांचा जन्म १३ व्या शतकाच्या सातव्या किंवा आठव्या दशकात झाला होता. महाराष्ट्रातील गंगाखेड येथील दमा आणि करुंड यांच्या पोटी जनाबाईंचा जन्म झाला. जातिव्यवस्थेखाली हे जोडपे मातंग समाजाचे होते. आई वारल्यानंतर त्यांचे वडील जनाबाईंना पंढरपूरला घेऊन गेले. लहानपणापासून जनाबाईंनी पंढरपूर येथे राहणाऱ्या संत नामदेव यांचे वडीलदामाशेट यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम केले. सभोवतालच्या धार्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे आणि जन्मजात प्रवृत्तीमुळे जनाबाई नेहमीच विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी अभंग प्रकारातील अनेक उच्च दर्जाचे धार्मिक श्लोक रचले. नामदेवांच्या रचनांसह त्यांच्या काही रचना जतन करण्यात आल्या होत्या. सुमारे ३०० अभंगांचे लेखन परंपरेने जनाबाईंनी केल्याचे सांगितले जाते.संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.‘विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. घरातील कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.खंडेराया तुझ करिते नवसु | मरू दे रे सासू खंडेराया| हे एकमेव भारुड आहे.
संत जनाबाईंचे अभंग हे भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेले आहेत. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ती-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री-विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना घरकामात मदत करीत असे. दैनंदिन व्यवहारातली उदाहरण त्यांच्या अभंगात आहेत. अगदी अडाणी माणसालासुद्धा त्यांचे अभंग समजण्यास सोपे आहेत.
