Book Reviewed by धनश्री दिलीप माळी (११ वी वाणिज्य) शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे 'जय शिवराय' हे पुस्तक
Read More
Book Reviewed by धनश्री दिलीप माळी (११ वी वाणिज्य)
शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे ‘जय शिवराय’ हे पुस्तक केवळ शिवचरित्र नसून छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील विविध घडामोडीमधुन आपण काय शिकायच याबद्दल मार्गदर्शन करत शिवचरित्राचा वर्तमानाशी साधा जोडणाऱ्या या पुस्तकाला ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेतच यांनी हे पुस्तक कसं वाचायच आणि या पुस्तकाकडे कोणत्या दृष्टीने पाहायच हे त्यांनी स्पष्ट केले आहे. लेखक प्रशांत देशमुख यांनी विविध उदाहरण देऊन सांगितले आहे. जे पण हे पुस्तक वाचतील त्यांना सहज समजावं सरळ व सोप्या भाषेत असं लिहिलेलं आहे. शिवचरित्राचा बरीच वर्ष अभ्यास करून मग शिवरायांचा आयुष्यातील विविध प्रसंगाची त्यांनी निवड केली.आणि त्यातून नव्या पिढीने काय शिकायला हवं ते सांगितल. हे पुस्तक लिहिण्याच एकच कारण की पुढच्या पिढीने काय केल पाहिजे यासाठी हे पुस्तक लिहिल या पुस्तकात व्यंकोजीरावांना शिवाजी महाराजांनी कशी मदत केली हे लिहिलेल आहे. आजकालच्या पिढीने शिवाजी महाराजन सारख व्हावं नाहीतर मावळे बनावे. आणि प्रत्येकावर शिवाजी महाराजांना सारखे संस्कार झालेच पाहिजे. आणि प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी जिजामाता बनलीच पाहिजे. या पुस्तकातून नवीन पिढीला खूप शिकण्यासारखा आहे. मला या पुस्तकातून खूप काही शिकायला मिळालं. आणि आपल्या देशासाठी एक मावळा म्हणूनच लढेल.
Show Less