Abhijit Mahadev Chavan L.L.M, 2nd Year Department of Law Savitribai Pule Pune University ‘ताओ एक जीवनशैली’ “जगावं कसं” शेवट झाल्यानंतर प्रारंभ सुरू
Read More
Abhijit Mahadev Chavan
L.L.M, 2nd Year
Department of Law
Savitribai Pule Pune University
‘ताओ एक जीवनशैली’ “जगावं कसं”
शेवट झाल्यानंतर प्रारंभ सुरू होतो मग ते आयुष्य तारेवरची कसरतच. उणीव जाणून घेतल्याशिवाय आपन कुठं कमी पडतो हे जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं मनुष्य अखेरच्या श्वासापर्यंत एका खोट्या संकल्पनांनी जखडलेला असतो. मृगजळाला सत्य समजून संघर्षाची सुरुवात करून जन्माला येते मन, मनाच्या या अज्ञानाच्या कोठारात आठवणी ह्या पुसट दाट असतात. संवेदन शून्य घटक जेव्हा एकत्र येतात व आयुष्याची सारी गृहितके कोसळून पडतात. वैचारिक चिंतनसुत्रे म्हणजेच एक बंडखोर तत्त्वज्ञान. व्यक्तीने स्वतःला विचारले पाहिजे विकासासाठी मार्ग कोणता आहे. सभोवताली चांगल्या वाईट गोष्टी आहे त्यावर विजय मिळवता नाही आला तर जगायचं कसं ?
जीवन जगायला स्वतःला मुक्त केले पाहिजे तेजस्वी जागतं नेतृत्व समाजाला अपेक्षित आहे. आपन नियंत्रण कक्षेच्या बाहेर डोकावून पाहत नसु तर काही काळाने समीकरणे बदलणार, चिंतनसूत्रे उरणार ! धर्मशास्त्र सांगते निरीक्षणातून मनुष्य हुशार व प्रगल्भ बनतो. विवेकाच्या योगे सर्वांची ओळख होऊन वाटचाल सुखमनोहारी होते. एखाद्या जिवाकडील ज्ञान हे विकासाचा आग्रह करू शकते पण परंपरा भिन्न स्वरूपाच्या असतात. एकटक पाहणारे कशाला ही अंतर्मुख न होता जेव्हा ते हृदय आणि मन हे एकच आहे हे समजल्यावर लौकिक जग म्हणजे त्याचे प्रतिबिंब आहे म्हणजेच प्रतिछाया जीवन कसं जगावं हा चालू असलेला प्रवास सांगतो की, भौतिक जगाची उपेक्षा करून सत्याची साधना करू शकत नाही. स्वतःला जाणून घेण्यासाठीची धडपड असते. मन भावनिक सुखाचा शोध घेणारे अंधाराला का घाबरत असावे ? वस्तुस्थितीची अनेक रूपे असतात म्हणजे अंधाराला प्रकाश आणि प्रवाशाला अंधार म्हटले तर दोघांना एकमेकांचा अभाव जाणवेल, काही नियमांना अपवाद नाही मग सुरुवात कुठून आणि कशी करावी ह्यासाठी वेळ अनुकूल असेल नसेल. निसर्गाची एखादी किमया जीवन जगण्याच्या प्रवाहाला आधुनिक पद्धतीने जीवन तत्त्वाचा वापर करून समाधान पुरेसे नसते. वेदनेचा वापर अमर्याद भ्रामक वृत्तीने न पाहता हित कल्याण व सुसंवाद सहनिर्मिती असेल त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी मुक्काम करतो त्याची फलश्रुती एक सखोल अनुभूतीचा जन्म घेऊन प्रवासाच्या हेतूने चालायला लागते.
थांबून घ्याव हे निसर्गाला मान्य नसावे म्हणजे घडयाळ बंद जरी पडले तरी कालचक्र सुरू राहते पण कायम गतिशील राहिल्याने माणुस परावर्तित होतो. झाडाच्या फांदीला बांधलेला एखादा झोका तीव्र गती मिळाल्यानंतर त्याच वेगाने पुनः माघारी स्तब्ध होतो. जीवनाला आरंभ आहे तर अंत असणारच ! आठवणीचे बंध तोडणे इतके सोप्पे नसते. माणसे, क्षण, स्वप्ने ही हृदयात रक्तासारखी वाहत असतात. थांबणे म्हणजे संपणे व न बदलणे म्हणजे मृत्यु. माणसाचे तत्वज्ञान, संस्कृती, धर्म, विज्ञान हे विश्वाचे रहस्य आहे. किर्तीच्या लाभापोटी जे जीवन साधना करतात ते सुद्धा विफल होतात. जर दुर वर गेलो तरी परताव लागतं, आनंदमयी आणि समाधानी जगण्यासाठी कुठल्याही श्रीमंतीची गरज नसते. कठोर श्रमाने आनंदी जीवन जगता येते. पैसा हे फक्त विनिमयाचे साधन आहे. एकेरी मनुष्य हा वसंवाद झाल्यानंतर तो स्वतःमध्ये हरवून जातो आणि देवाचा शोध घेऊन चुकीचा विचार करून दुखी होतो. माणसाच्या अमर्याद शक्ति आशांततेने जगाला जिंकण्यापेक्षा ज्ञान विवेक व संयमाने जिंकणे उत्तम ठरते. संकल्प विफल ठरले की विकल्प मिळत नाही. हे सुंदर जग आपण निर्माण केल्याने त्याला जबाबदार आपणच आहोत, सकाळ झाली म्हणून कधी सूर्य उगवत नसतो, सूर्य उगवला म्हणून सकाळ होते. स्वामित्व भावना आली की सत्ता येते आणि सोबत दुर्गुणही येतात. जिथे स्वामित्वाची भावना नाही तिथे नेतृत्व विश्व वंदनीय असते कारण ते नेतृत्व स्वयंभू आणि स्वयंपूर्ण असते.
अपेक्षा त्रासाचे उगमस्थान आहे, जिवंतपणी मनमुराद आयुष्य जगू न देणारे लोक सुद्धा आपल्या अंतयात्रेत सामील होतात. नि:स्वार्थी मनुष्य हा कसलीही अपेक्षा न करता तो आनंद देतो. त्याच्यात प्रामाणिकतेचा शृंगार असतो, त्याच्या मनात द्वेष नसतो. जग बदलायचे असेल तर मानवी अस्तित्वाचा सन्मान करा आपोआप विकासाचे मार्ग सापडतील. सामर्थ्य सुद्धा पराजित होतं, जर त्याचा आधार अधर्म असे ! आयुष्यात स्वतः विरुद्ध लढले पाहिजे. कुठलेही ध्येय नसेल तर समाजात वागणे उथळ होऊन जाते. जगाव कस हा मंत्र आयुष्य आमर्यादित करून देतो. पोकळ आनंदाचे प्रदर्शन करून महोत्सव मानून घेणे हा याचा अर्थ नव्हे, जीवनात आनंदाची निर्मिती ही गांभिर्यातुन होते. माझ्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही म्हणून तक्रार करत बसू नका, की एकट्याने प्रवास करतोय, कारण ह्याच वेळी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ असते. ध्येयाचे गांभीर्य नसेल तर आयुष्याचा पाया कमकुवत राहतो. दिशाहीन सामर्थ्य म्हणजे नकारात्मक ऊर्जा. ज्ञान एकटे येत नाही ते त्याच्या असण्याचा अहंकार सुद्धा जन्माला घेऊन येते, जोवर हा त्याग साधत नाही तोवर त्या ज्ञानाचा प्रारंभच होत नाही. ज्ञानी असाल तर शब्द व अनुभवी असाल तर ‘अर्थ’ समजतात. उलट प्रवास आपण करु शकत नाही. लाभलेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे. वृद्धत्वाकडून तारुण्याकडे मग बालपण अस न होता, जीवनाकडून मृत्युकडे प्रवास होतो याची जाणीव होते तो खरा ज्ञानी.
अती महत्वकांक्षा अध:पतनाचे कारण व सन्मान प्राप्त करून घेणे ही माणसाची मूळ आकांक्षा. इमानदारीची जाणीव असेल तर विकास होतो. आंधळ्या आकांक्षा जन्मत नाही. ज्यात फक्त प्रेम जिव्हाळा, आपुलकी, स्वर, आर्तता, वेदना इ. समावेश असतो. तसेही प्रेमात अपरिमित दु:ख भोगल्याशिवाय जीवनाचा व मरणाचा अर्थ कळू शकत नाही. प्रेम माणसाला अस्तित्वाच्या मुळाशी नेते व सगळं विस्कळीत करून सोडते, धरणीकंप झाल्यासरख. प्रेमाच्या जीवघेण्या अनुभवापुढे जीवन शून्य व मरणाचा काळोख घनगर्द होऊन युद्ध सुरू राहते. प्रेम जाणणारे जीवन जाणतात व प्रेमावर विजय मिळवणारे मृत्यूवर विजय मिळवतात. प्रेम करणारे बंडखोर आत्मे कधी विध्वंसक तर कधी विधायक होतात. त्यातून विश्वात्मक करुनेचा जन्म बंधनपलीकडचे जे जखमी हृदय संपूर्ण जगाला भरभरून प्रेम देतात ते क्रांतिकारी होतात किंवा संत महात्मे.
Show Less