पुस्तक परीक्षण :- ख़ुशी राजेंद्र बागुल T. Y. B.com, पुणे विद्यार्थी गृह श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य,
Read More
पुस्तक परीक्षण :- ख़ुशी राजेंद्र बागुल T. Y. B.com, पुणे विद्यार्थी गृह श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान व कला महाविद्यालय, नाशिक
शिक्षणाला वयाची अट नसते हे प्रत्यक्षात आणून नाशिकचे रहिवासी C.A., C.S., LLB. आणि अशा अनेक पदव्यांचे मानकरी डॉ. तुकाराम ठोक यांनी आपल्या अनुभवामधून या पुस्तकाचे रचना केली आहे. अगदी साध्या आणि बोली भाषेत त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वयाचा ६८ व्या वर्षी business economics या विषयात पदवी धारण केली. “life is a precious one time gift; so dream, sharp, love, and every moment”. हि त्यांची ओळख खरचं कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. २०१८ मध्ये हे पुस्तक प्रकाशीत झाले आहे. मला हे पुस्तक या साठी आवडले की, त्यांनी अनेक पुस्तकाचा संदर्भातुन आणि अनेक उत्कृष्ट उदाहरणांमधून आपल्याला मार्गदर्शन केले आहे. कोणाचे अनुभव ऐकले कि, आपल्याला सुद्धा एक सकारात्मक उर्जा मिळते. वाचकांचा मनात जिज्ञासा निर्माण करून देणारं पुस्तकाच शीर्षक हेच माझं पुस्तक वाचण्याच मुळ कारण आहे. एखादा मूर्तिकार मूर्ती घडवतो, चित्रकार आपल्या कलेतून चित्र काढतो आणि लेखक आपल्या कल्पनेतून लिखाण करून समाजात त्याच्या विचारांचा प्रसार करतो. मात्र, आपलं जीवन आपण कस घडवायचं हे एकमेव स्वतंत्र आपल्याला मिळालं आहे. आपले शरीर हे देवाने दिलेली एक देणगी आहे. मानवी देह नश्वर आहे. परंतु, माणसाचे कर्तृत्व व त्याने घालून दिलेले आदर्श हेच खऱ्या अर्थाने चिरंतर टिकणारे सत्य आहे. मानवजात हि या जीवसृष्टीतील सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. माणूस हा एकमेव बुद्धिमान आणि अनेक गुणांनी संपन्न असलेला प्राणी आहे.
साधुसंत, यश संपादन केलेल्या विविध स्तरांमधील नामांकित व्यक्ती, तसेच शून्यामधून जीवन फुलवणाऱ्या सामान्य व्यक्तींचा उदाहरणांमधून लेखकाने आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाने जीवनात मोठी स्वप्ने पहावीत आणि ते सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करावे हा लेखकाचा संदेश खरोखरंच महत्वाचा आहे. स्वप्नपूर्तीसाठी वेळेचा सदउपयोग, मन करा रे प्रसन्नI सर्व सिद्धीचे कारण II, देह देवाचे मंदिर, आदर्श आणि बोध, अशा एकूण २१ विषयांचा समावेश लेखक C.A. तुकाराम ठोक यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्यांतील मला सर्वांत जास्त आवडलेला विषय म्हणजे “पुनार्भारारी” आपण त्याला “comeback” म्हणतो. खरं तर हा विषय तरुण पिढीसाठी महत्वाचा आहे. अपयश आले, तरीही हार मानता प्रयत्न करावे. अमिताभ बच्चन यांना १९८२ साली अपघाताकारणास्तव शारीरिक स्वास्थ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सामान्य मनुष्य वयाचा ५७ व्या वर्षी निवृत्तीचा विचार करतो. परंतु, यांनी हिम्मत न हारता आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि आज वयाचा ८० नंतर देखील ते ‘कोन बनेगा करोडपती’ या महामंचावर झळकत आहेत. वि. वा. शिरवाडकरांचा कवितेप्रमाणे, “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा I पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा II अशा काही ओळींचा समावेश करून लेखकाने नवीन आशा तरुण पिढीला दिली आहे. उदाहरणांसह काही वाक्प्रचार व म्हणींचा देखिल समावेश या पुस्तकात आढळून येतो. “ Every cloud has a silver lining” आणि “low aim is a crime” असे काही वाक्य ऐकले की, एक नवीनच प्रेरणा मिळते. लेखकाने वेळ किती महत्वाचा आहे हे, पटवून देण्यासाठी, चायनीज मधील प्रोव्हर्ब चा वापर केला आहे. “An inch of time is an inch of gold, but you cannot buy that inch of time with an inch of gold”. लेखकांनी यात “व. पु. काळे” यांचा “संघर्ष कुठपर्यंत” या पुस्तकाच्या संदर्भातून सांगितले आहे, “आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतःची गती घेतली की, उरलेला प्रवास आपोआप होतो. तसचं माणसाचं आहे. समाजात विशिष्ठ उंची गाठेपर्यंत संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीत पोहोचलात की, आयुष्यातील अनेक समस्या ती उंची सोडवते. कष्ट केल्याने नेहमीच सुख मिळेल असे नाही, पण कष्ट न करता सुख मात्र कधीच मिळणार नाही. “We are not made rich by what is in our pocket, but we are rich by what is in our heart”. हा सुविचार मनाची श्रीमंती सांगण्यास पुरेसा आहे, असे लेखक म्हणतात. आपणच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, हे अगदी सोप्या शब्दांत लेखकाने आपल्याला पटवुन दिले आहे.
Show Less