Name Of the Student:More Atish Prakash Name Of the College: Nowrosjee Wadia College डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जणू काही दलितांचेच नेते आहेत; त्यांच
Read More
Name Of the Student:More Atish Prakash
Name Of the College: Nowrosjee Wadia College
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जणू काही दलितांचेच नेते आहेत; त्यांच कार्य हे फक्त दलितांपुरते मर्यादीत आहे. आसा आपला काहीतरी समज आहे आणि त्यानंतर फार तर बाबासाहेबांनी देशाची घटना लिहली आहे किंवा घटनेच काम केलं आहे त्यामूळे – घटनेचे शिल्पकार
बाबासाहेबांनी दलितांसाठी काम केलेली गोष्ट सुर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे. आणि भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार आहेत हे तर घटना समिती मध्येच उल्लेख आहे. या पलीकडे आपण जात नाही.
सर्व भारतीयांना समान दर्जा देणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते आसणार नाहीत नाहीत. ते सर्व समाजाचे, सर्व देशाचे नेते असले पाहिजेत. त्या दृष्टीने दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आनंत पैलूंचा सामाजिक योद्धा या पुस्तकामध्ये डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनि मांडणी केली आहे.
संविधान सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब अंबेडकर म्हणतात की ‘मी हे जाणतो, की, आज आपण राजकीय आर्थिक सामाजिक दृष्टया विभाजित अहित. आपण युद्धस्त प्रतिस्पर्धी गटात
विभाजित अहोत आणि मि कदाचित असे ही म्हणेन की, मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे. हे सर्व आसूनही जर परिस्थिती अनुकूल साली तर या जगातील कोणतीच शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही. ”
ही भूमीका घेणारे बाबासाहेब केवळ दलितांचे नेते कसे आसु शकतात. दलितांच्या आत्म सन्मानासाठी सम्यक परिवर्तनाचे युद्ध लढणाऱ्या दलितांनी आपले प्रेरणास्थान स्कृर्थीस्थानापेक्षाही सर्वकाही बाबासाहेब मानणे रास्त आहे. मात्र शेतकरी, इतर मागास, आदिवासी, कामगार, शेतमजूर, श्रमिक यांनिही बाबासहिबांना दलितांचे नेते मानणे म्हणजे स्वतांची फसवणूक आहे.
देशातील शेती व शेतकरी यांच्यासाठी बाबासाहेबांचं कार्य पाहता, बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकयांसाठी खुप मोठी व यशस्वी चळवळ उभी केल्याचे दीसून येते.
सरकार आणि सावकार यांच्यामुळे शेतक-यांची पिळवणूक होते. सतत शेतसारा वाढवणे, सावकाराने व्याज वाढवणे त्यात शेतकऱ्यांची पिळवणूक पाहता बाबासाहेबांनी त्यांच्या साठी लढा उभारला. शेतकयांकडून क्षेत्रफळानुसार शेतसारा वसूल करणे चूकेचे आसून उत्पन्नानुसार कर लावायाची पद्धत आसताना चुकिच्या पद्धतीने कर आकारणे बेकायदेशीर आहे. असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. खोत पद्धती / सावकार पद्धती रद्द करण्यासाठी 1937 अला बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडले. त्यावेळी झालेल्या शेतकऱ्यांच्या संपाला बाबासाहेब स्वतः शामील झाले 20ते25 हजार शेतकऱ्यांसमोर भाषणं दीली बाबासाहेब म्हणाले होते कि “मला तुमच्या मधला Prime minister झालेलं पयहायचा आहे.” आसा व्यापक विचार करणारे बाबासाहेब केवळ दलितांचे कसे आसु शकतात? असा प्रश्न लेखकाला पडतो
जलविकास आणि उर्जा विकास यासाठी बाबासाहेबांचे कार्य पाहता 1942-1946 बाबासाहेब मजूर मंत्री असतानाच बांधकाम, पाटबंधारे, उर्जा ही खातीही बाबासाहेब पहायचे. नद्यांना येणाऱ्या पुराने त्रस्त होणारी जनता पाण्याला संकट मानत असे. दामोदर नदीला बिहारचे दुःख / संकट म्हंटले जात असे. या नदीला पूर आला की जमिनीची झीज, पिकाची हानी आणि गावाला धोका ठरलेला आसायचा, बाबासाहेबांच्या सक्षम नेतृत्वामुळे दामोदर खोरे प्रकल्प फक्त चार वर्षात पुर्णत्वास आला. राज्यातील प्रकल्प 50-50 वर्षे प्रकल्प रखडतात मात्र दामोदर खोरे प्रकत्य वेगाने उभारला गेला. शेती आणि उद्योगाच्या विकासासाठी शून्यातून सिंचन धोरणाची उभारणी करणाऱ्या या महामानवाला फक्त दलितांपुरते मर्यादीत ठेवणे कितपत योग्य आहे.
उर्जामंत्री आसताना गोरगरीब व मध्यमवर्गीय यांना मापक दरात विज मिळाले पाहीजे अन्यथा ते विज वापरण्या ऐवजी दीवा पेटवतील त्या धूरामूळे त्यांना त्रास होईल आसा व्यापक विचार बाबासाहेब करायचे. शेती, शेतीसाठी पाणी, पाण्यातून वीज, शेतीसाठी विज
यासंबंधी संपूर्ण नियोजन आणि त्याची आंमलबजावणी करण्यात बाबासाहेबांनी केलेली कामगिरी आतुलनिय आहे.
बाबासाहेबांनी कामगारांची चळवळ चालवली कामगारांच उद्योगाच्या मालकाकडून आणि मालकाने नेमलेल्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडून होणार शोषण यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच नेतृत्व करत चळवळ चालवली. बाबासाहब आंबेडकर यांच्या चळवळीतून कामगारांचे कामाचे तास निश्चित झाले, कामावरील स्त्रि-पुरुष असा भेद न करता समान वेतन धोरण स्विकारले गेले. कामाचे दिवस ठरवण्यात आले कामाची वेळ निश्चित करण्यात आली. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार चळवळीतील सहभागाची यशोगाथाच आहे.या सर्व कार्य-कर्तृत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांचे नेते होतेच. कामगारांमध्ये जसे दलित होते तसेच दलितेतरही होते. यासाठी कामगारांनी हे समजून घेतले पाहीजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ. बी. सींच्या आरक्षणाचा आग्रह धरलेला होता, सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक मागासलेपणा जाऊन संपन्नता, समृद्धी लाभावी असे बाबासाहेब आंबेडकर यांना वाटायचे याच ओ.बी.सी आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा राजिनामा दिला. इतर मागास लोकांना याची कल्पनाही नसेल का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उद्धारासाठी उत्थापनासाठी एवढे मोठे महान नेते आहेत. हे समजून घेतले पाहीजे.
आदिवासी, स्त्रिया, जातिय व्यवस्था, भाषावार प्रांतरचना यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच खुप मोठ योगदान आहे.
एवढे सगळे आसताना बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे नेते म्हणणे म्हणजे फक्त जातीय अस्मिता जपणे होय असे लेखक सांगतात. दलित साहित्यातील हे पुस्तक वाचकाच्या मनामध्ये प्रेरणा नवविचार व अमुलाग्र ज्ञानामध्ये भर टाकते. यामुळे प्रत्येकाला बाबासाहेब आपले नेते आहेत हे निश्चितपणे समजेल…!
Show Less