दोहरा अभिशाप

By कौसल्या बैसंत्री

Price:  
₹220
Share

Original Title

दोहरा अभिशाप

Publish Date

2015-01-01

Published Year

2015

Total Pages

124

ISBN

9788188121984

ISBN 13

9788188121984

Format

Hardbound

Country

भारत

Language

हिंदी

Average Ratings

Readers Feedback

दोहरा अभिशाप

नाव : प्रसाद गणेश डवले जयकर ज्ञानस्रोत केंद्र, (ग्रंथालय प्रशिक्षणार्थी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. “प्रसिद्ध नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियर यांनी म्हटलं होत "नाम मे...Read More

Parsad Ganesh Dawale

Parsad Ganesh Dawale

×
दोहरा अभिशाप
Share

नाव : प्रसाद गणेश डवले
जयकर ज्ञानस्रोत केंद्र, (ग्रंथालय प्रशिक्षणार्थी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
“प्रसिद्ध नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियर यांनी म्हटलं होत “नाम मे क्या रखा है”?. अर्थात शेक्सपियर यांनी इथे विशेष अर्थाने म्हटले होते. पण इथे शब्दशः अर्थ घेत माझ्या बाबतीत थोड उलट म्हणता येईल. कारण दोहरा अभिशाप हे पुस्तकाचे शीर्षक वाचून मला त्याचे वाचन आणि शीर्षकाचे असे नाव याचा उलगडा किंवा जाणण्याची इच्छा निर्माण झाली. आणि ती वाचल्यानंतर अस का आहे ते समजूनही आली. त्यामुळेच तुम्ही ही हे आत्मकथन वाचून आपल्या समाजातील परिस्थिती ची व वस्तुस्थिती ची जाणीव करून घ्यावी ही विनंती.                                                                   कौसल्या बैसंत्री यांचा जन्म 1926 मध्ये झाला. त्या काळात अंधश्रध्देने समाजाला वेगळ्याच अंधाकारमय जीवनात ढकलले होते. कौसल्या यांचा ज्या अस्पृश्य कुटुंबात जन्म झाला होता त्यांची ही या पासून काही सुटका न्हवती याच मला पुढील प्रसंगावरून निदर्शनास आले. कौसल्या यांच्या जन्मा अगोदर त्यांच्या भावंडाच बाल्यावस्थेत मृत्यू झाला होता, यावर तोडगा म्हणुन त्यांनी अंधश्रध्देचा अवलंब केला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नसतानाही देवाला मंदिरा बाहेरून प्रार्थना केली जात होती. बळी देण्याची प्रथा तेंव्हाही आणि आजच्या विज्ञानयुगात काही ठिकाणी रूढ आहेच. नजर लागु नये किंवा दीर्घआयुष्य मिळावा या कल्पनेने लेखिकेच नाव ‘कचरी’ ठेवले होते, म्हणजेच न उपयोगि कचर्‍याच्या समान घराबाहेर फेकण्याचा सामान, आणि बहिणीच नाव ‘उरकूडी’ अर्थात कचर्‍याचा ढीग. अशा प्रकारे अंधश्रद्धेला वेगवेगळ्या प्रकारे बळी पडत होते. हे आत्मकथनातील काही इतर प्रसंगा द्वारे ही स्पष्ट होते. तुम्हाला ही ते आत्मकथन वाचताना समजून येईलच.                                             ” दोहरा अभिशाप ही कौशल्या बैसंत्री यांची हिंदी उपन्यासात्मक आत्मकथा आहे”. पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि वाचल्यानंतर असे आकलन झाले की आजच्या समानतेच्या काळातही आपण अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच जपतो आहोत. आणि जातीयता ही तर आपल्या समजाला पोखरून टाकणारी वाळवी आहे. कौसल्या बैसंत्री या ही या दोन्ही व्यवस्थेच्या बंधनात अडकून होत्या. त्यांच्या स्त्री अस्तित्वाचा लढा व आपले स्वतंत्र्य अस्तित्व सिद्ध करण्यास पुढाकार तेही जातीयतेला झुगारून. हे संघर्षमय जिवन, अनुभव, परिवार, प्रेम, मातृत्व या आत्मकथेत त्यांनी सामावून घेतल आहे.                                                                               वाचनास सुरवात केल्यानंतर त्यांच्या आईच बोललेलं वाक्य आजही तसच लागु होत हे मला जाणवलें. ते बोल असे होते, “देवा मैने कोणसा पाप किया था की मेरे नसीब मे लडकीयां ही लिखि हे’’. त्यांना पाच मुली होत्या, आणि हेच वास्तव आहे की मुलाच जन्म व्हावा या अपेक्षेने एका पाठोपाठ एक जन्म दिले जातात आणि मुलगा झाला तर आनंदच साजरा केला जातो, नाहीतर  मुलगी असेल तर झालेल्या मुलींच एकतर लगेचच अस्तित्व संपवलं जात किंवा त्यांचा अस्तित्व व स्वतंत्र कस हिरावून घेतला जाईल यावर भर दिला जातो. अर्थात यात अपवादही आहेत जस कौसल्या बैसंत्री यांचे आई -वडील होते. त्यांच्या पालकांना याची प्रेरणा त्यांनी ऐकलेल्या भाषणाने झाली होती, हे वैचारीक भाषण होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. “अपनी प्रगती करणी हे तो शिक्षा प्राप्त करणा बहुत जरुरी हे, लडका हो या लडकी दोनो को पढाना चाहिये’’. बाबासाहेबांच्या या विचारांचा सकारात्मक प्रभावामुळे त्यांनी म्हणजेच कौसल्या बैसंत्री यांच्या पालकांनी सर्व अंधविश्वास व जातीय व्यवस्थेला आणि जन्मजात बांधलेल्या गरिबीला न जुमानता सर्व मुलांना शिक्षित केले याची प्रेरणा या आत्मकथेतुन मिळते.                                                         कौसल्या बैसंत्री यांनी इथे त्यांची आजी, आई, व त्यांची अशा तीन पिढींची स्त्रियांची समकालीन परिस्तिथी दाखवली आहे. ज्या द्वारे समाजात स्त्रियांना असणारे स्थान व त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. अनेक मार्गाने तिच्यावर होणारे शोषण मग ते मानसिक असो अथवा शारीरिक. आज स्त्री शिक्षित होऊन आत्मनिर्भर तर बनली आहे, फक्त पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर त्या पेक्षाही अधिक काम ती करू शकते हे तिने सिद्ध केले आहे, तरीही समाजात ती किती असुरक्षित आहे हे आपण सर्व बघतच आहोत. कौसल्या बैसंत्री यांनी यावर मात करत त्यांचे शिक्षण, नोकरी, परिवार व समाजकार्यात सक्रिय सहभाग या द्वारे स्त्री अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा दिला आहे. त्यांच्या आत्मकथेत त्यांनी लग्ना अगोदरचे आणि लग्ना नंतरचे स्त्री चे आयुष्य यावर ही प्रकाश टाकला आहे. 40 वर्षाच्या संसारात त्यांनी त्यांच्या पतीला खंबीरपणे साथ दिली पण तरीही त्यांना वयाच्या 62 व्या वर्षी त्यांचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी घटस्फोट घ्यावा लागला. नवरा शिक्षित असूनही कौटुंबिक छळ त्यांना सहन करावा लागलाच.  पतिव्रता धर्म या संकल्पनेने स्त्री ला किती सहन करावा लागतो हे मला यातून जाणवलं. आणि विशेषतः म्हणजे त्यांनी ही आत्मकथा वयाच्या 78 व्या वर्षी लिहिली, त्यांनी ती त्याच्यावर झालेल्या अन्यायाची व लढ्याची व्यथा ऐकवण्यासाठी नाही लिहिली तर त्यांचा हाच उद्देश होता की, स्त्रियांनी स्वतःला कोणत्याही कारणास्तव बंदिस्त करून म्हणजेच समाजाच्या बेडीत बांधुन न घेता आत्मसन्मानाने जगले पाहिजे. आपले अस्तित्व सिद्ध केले पाहिजे. त्यांनी त्यांच्या आत्मकथनातुन अस सांगितल आहे की, पुरुष प्रधान संस्कृतीत आपला परिवार, किंवा समाज आपल्या बद्दल काय विचार करेल, नाराज होईल याचा विचार न करता स्वतःची बाजू मांडणे , आपले विचार प्रकट करणे व समाजबंधनातुन व जातीयतेतून अलिप्त राहून किंवा त्याला न जुमानता आपल्या अस्तित्वाचा लढा कायम सुरू ठेवावा. त्यामुळे वाचक म्हणून मी तुम्हा सर्व वाचकांना ही कौसल्या बैसंत्री यांची आत्मकथा “दोहरा अभिशाप’’ नक्कीच वाचा असे सांगेन, कारण यामधे त्यांनी त्यांनी स्त्रीचे संघर्षमय जिवन आणि सुखदायक व दुःखदायक अनुभव व्यक्त केले आहे. आणि विशेषतः वाचताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच राग, घृणा, भय, निर्माण न होता स्त्री अस्मितेची व समाजव्यवस्थेची जाणीव नक्कीच निर्माण होईल.

शेवटी मी स्त्री च्या अनेक रूपांचे म्हणजेच आई, बहीण, व सखी यांच्या त्यागाला सलाम(नमन) करून चार ओळी लिहू इच्छितो –
“अबला नहि तू तुझसेही बल हे |
आज भी तू और तुझसेही कल हे |
तुझ मे जिवन की निव छुपी हे |
सकल जगत की तू जननी हे ||
धन्यवाद.

Submit Your Review