Availability
available
Original Title
प्रकाशाचा विजय
Subject & College
Publish Date
2019-01-01
Published Year
2019
Publisher, Place
ISBN
978-93-87628-30-4
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
प्रकाशाचा विजय
Review By Prof. Rutuja Hanumant Kadam, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune सौ. विजया प्रकाश सुकाळे यांनी 'प्रकाशाचा विजय' या संग्रहातील बारा कथांद्वारे मराठी वाचकांना...Read More
Prof. Rutuja Hanumant Kadam
प्रकाशाचा विजय
Review By Prof. Rutuja Hanumant Kadam, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
सौ. विजया प्रकाश सुकाळे यांनी ‘प्रकाशाचा विजय’ या संग्रहातील बारा कथांद्वारे मराठी वाचकांना एका वेगळ्या कथाविश्वाच्या प्रकाराची ओळख करून दिलेली आहे. या सर्व कथा एक सांस्कृतिक प्रकाश देणाऱ्या आहेत. प्रकाश दाखविणाऱ्या या संस्कारक्षम कथांचे रसिक वाचक निश्चितच स्वागत करतील आणि ‘प्रकाशाचा विजय’ हे नाव सार्थ ठरेल असा मला विश्वास वाटतो.
शिक्षण हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ‘शिक्षण म्हणजे ज्ञानाची कवाडे उघडणारा जादूचा चिराग आहे.’ त्यातून विचारांची प्रगल्भता येते. मनावर संस्कार होतात. शिक्षणाच्या पंखाने माणूस आकाशाला गवसणी घालू शकतो. दगडाची शकले फोडून दगडातून देव निर्माण करण्याची ताकद शिक्षणात असते. मातीच्या गोळ्याला आकार देण्याची कला म्हणजे शिक्षण विद्वत्ता ही अभ्यासाने, वाचनाने, लेखनाने प्रगल्भ होते.प्रस्थापित कथा काळाच्या ओघात लुप्त होऊ नयेत हीच प्रामाणिक इच्छा. समाजामध्ये वावरत असताना अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. कौटुंबिक जीवनाचा कथात्म वेध कथांमध्ये आहे. ‘स्त्री’ हे या कथांचे बलस्थान आहे. स्त्रीमनाची विविध रूपे, कौटुंबिक नातेसंबंधातून घडणाऱ्या घटना, वास्तवदर्शी कथानक धारण करते. या कथासंग्रहातील कथा मनाला हरवून टाकतील.
भाव-भावनांचे खेळ, मी, माझे, मला, आपले, या ‘स्व’, मधून निघून वेगळ्या वाटेवरच्या कथा लिहिण्याचा हा प्रयत्न शहरी जीवन, ग्रामीण जीवन, श्रीमंत, गरीब कोणत्याही परिस्थितीत ‘स्त्री’ यांना स्वतःला सिद्ध करताना संघर्ष करावा लागतो. या कथांमधील घटना स्त्रीसुलभ सहजभावना व्यक्त करतात आणि आपल्या मनाला हरवून टाकतात. सामाजिक, कौटुंबिक चक्रव्युहातून बाहेर पडण्याची नक्कीच दिशा या कथा समाजाला देतील अशी माझी भावना आहे.
