‘प्रकाश वाटा’ हे पुस्तक डॉ. प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र असून पुस्तकाचे शब्दांकन सीमा भानू यांनी
Read More
‘प्रकाश वाटा’ हे पुस्तक डॉ. प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र असून पुस्तकाचे शब्दांकन सीमा भानू यांनी केले आहे. मुखपृष्ठ नावाप्रमाणेच साजेशे आहे. डॉ. प्रकाश यांनी धरलेल्या कंदीलामुळे आदिवासींच्या आयुष्याच्या अंधारलेल्या वाटा उजळून निघाल्या आहेत. हे प्रथमदर्शनीत समजते. डॉ. प्रकाश आमटे यांची दीपस्तंभ म्हणजेच त्यांचे वडील बाबा आमटे आई साधना आमटे, स्वतः डॉ. प्रकाश आमटे, पत्नी मंदा आमटे यांच्या परिवाराचा फोटो मलपुष्ठावर आहे.
160 पानांचे हे पुस्तक असून त्याची किंमत 200 रुपये आहे. सुरुवातीची छायाचित्रे ही अतिशय बोलकी आहे. त्यानंतर वलयांकित केलेले प्रकाश वाटा हे नाव त्याची खोली दर्शवितो. डॉ. प्रकाश आमटे यांनी अल्पशा भाष्यातून त्यांची प्रेरणा असणाऱ्या साऱ्यां प्रती आदर व्यक्त केला आहे. पंधरा भागात त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र रेखाटलं आहे.
‘मॅगसेसे’ चा आनंद या भागात हे मलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पासाठी मिळालेले आहे. शियाच नोबेल समजल्या जाणाऱ्या पारितोषिकाची गाथा कथन केली आहे. 1973 साली प्रकल्प सुरू झाला तेव्हा देखील माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विख्यात सापडले होते. जगापासून पूर्ण झुकलेल्या या समाजाला अंधाराकडून उजेडाकडे आणणाऱ्या प्रवासाची गाथा वाचताना माणूसपण म्हणजे नेमके काय याचा अर्थ कळते.
आनंद वनातले दिवस या भागात बाबा आमटे यांच्या आनंदवनातल्या वाटचालीचे साधना आमटे यांच्या एक पत्नी आई ताई अशा सर्व रूपांचे सार्थ दर्शन घडते. डॉ. प्रकाश व त्यांचा भाऊ विकास यांचे बालपण या दोघांचे रोल मॉडेल म्हणजे त्यांचे बाबा. या सर्वांच्या जीवनातील आव्हानात्मक प्रसंग कसोटीचे प्रसंग थरारून टाकतात.
‘मुक्काम हेमलकसा’ या भागात बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रकाश व डॉ. मंदा यांचा लोकबिरादरी प्रकल्पाचा प्रारंभ करताना बिकट परिस्थितीतून ध्येय साध्य करण्यासाठी असणारी जिद्द दिसून येते.
समारोप या भागांत बाबांनी पाहिलेलं व जोपासलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवताना साऱ्यांनी घेतलेली मेहनत आजही डॉ. प्रकाश यांना आदिवासी पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे असे वाटत नाही. त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय स्वयंपूर्ण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शेवटी डॉ.र प्रकाश यांनी सर्वांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
बाबा आमटे यांनी समाजाच्या दुर्लक्षित घटकाला आपलेसे करण्याचे व्रत हाती घेतले. त्यांची पत्नी साधना आमटे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. डॉ. प्रकाश व विकास यांनी बाबांना रोल मॉडेल म्हणून या कार्यात स्वतःला झोकून दिले. डॉ. मंदांची अनमोल सोबत डॉ. प्रकाश यांना मिळाली. त्यांच्या सेवेचे व्रत त्यांच्या मुलांनीही हाती घेतले. हा सर्व प्रवास थक्क करणारा ठरतो.
कल्पने पलीकडचे आयुष्य त्यांनी अशा लोकांसाठी व्यतीत केले हे वाचताना अंगावर काटाच उभा राहतो.
खाच खळग्यांच्या वाटेवर चालताना मदतीच्या अनेक हातांमुळे त्यांच्या कार्यात त्यांना मोलाची मदत झाली. प्रत्येक भागांती माणूसपणाचे दर्शन जवळून घडत जाते. भाषा इतकी सोपी व भोगवती आहे की वाचताना अख्खा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रत्येक भागात बोलकी छायाचित्रे आहेत.
काडीची ही अपेक्षा न करता दुर्लक्षित घटकांसाठी झटलेल्या प्रत्येक जीवाची पर्वा करणाऱ्या या कुटुंबाची निस्वार्थ सेवा माणुसकीचे दर्शन घडवते. आपल्या क्षुल्लक जगण्याची जाणीव आपल्याला होते. त्या साऱ्यांचा हा प्रवास अतिशय संस्मरणीय ठरतो.
समाजाप्रती माणूसपणाची भावना सर्वांठाई निर्माण झाली तर मंदिरा ऐवजी अशा ठिकाणी दानपेठ्या नक्की भरतील.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
Show Less