Availability
available
Original Title
बारोमास
Subject & College
Publish Date
2020-01-01
Published Year
2020
Publisher, Place
Total Pages
362
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
एक उपेक्षित लोकनायक (बारोमास)
Book Review: Ambhore Shamal Bhagwan, S.Y.M. PHARMACY, MVP’s College of Pharmacy, Nashik [पुस्तक - बारोमास, लेखक - प्रा. सदानंद देशमुख] प्राध्यापक सदानंद देशमुख लिखित साहित्य...Read More
सदानंद देशमुख
एक उपेक्षित लोकनायक (बारोमास)
Book Review: Ambhore Shamal Bhagwan, S.Y.M. PHARMACY, MVP’s College of Pharmacy, Nashik [पुस्तक – बारोमास, लेखक – प्रा. सदानंद देशमुख]
प्राध्यापक सदानंद देशमुख लिखित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बारोमास ही कादंबरी मी वाचली. उच्चशिक्षण घेतलेला एकनाथ तनपुरे आणि त्याची पत्नी अलका यांचीही कथा आहे. ज्या कादंबरीमध्ये भारतातील ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. बारोमास’ मधील शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्याने एकनाथची व त्याच्या कुटुंबाची होणारी घुसमट, कुठेच मार्ग दिसत नसल्यामुळे अंधश्रद्धकडे होणारी वाटचाल, आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळे भावाभावात बिघडलेले संबंध व विस्कटलेली वैवाहिक नाती, नोकरीसाठीच्या असहायतेचा फायदा घेउन पैसे घेणारे व फसवणारे नोकरीचे दलाल, या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणारे नेते आणि या सगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध देशमुखांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडला आहे. ही संपुर्ण कथा बारा महिन्याच्या कालावधीत घडते. यात लहरी निसर्ग, सावकार, बॅंका, भ्रष्ट सरकार आणि त्यांचे राजकारण, रोजंदारी वरील गडी असे सगळेच घटक आपापली भुमिका अगदी चोख बजावतात. ग्रामीण भागात राहताना एका गरीब शेतकऱ्याला अनेक वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते मात्र, तरीही या अडचणींना न घाबरता त्याला ताठ मानेने तोंड देणारा शेतकरी कशा प्रकारे आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरा जातो, कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ तर कधी ऐन हातातोंडाशी आलेला घास जेव्हा निसर्ग किंवा सावकार हिरावून घेतो तेव्हा शेतकऱ्याच्या कुटुंबावर किती दुःख कोसळते मात्र तरीही हा बळीराजा डगमगत नाही किंवा लाचारी पत्करत नाही.
शेतकऱ्याचे दुःख त्यांच्या समस्या आणि त्यांच्या सरकारकडुन नेमक्या काय अपेक्षा आहेत या सर्व गोष्टी लेखकानी अत्यंत अभ्यासपुर्वक मांडल्या आहेत. शेतीमधील बारीक बारीक गोष्टीसुद्धा लेखकानी खुप चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. शेतकऱ्याचे मित्र असणारे त्याचे सोबती बैल,गाय,म्हशी,कुत्रा,मांजर या सर्वांचे शेतकऱ्याच्या जीवनातील त्यांचं स्थान आणि चंद्री मांजरीच्या ऐंड्री पिऊन झालेला मृत्यू मनाला चटका लाऊन जातो.
आपल्या आयुष्यात अनेकदा छोटी मोठी संकटे येत असतात, मात्र आपण खूप लवकर हार मानतो. त्यामुळे हार न मानता एकनाथ सारखं परिस्थितीला सामोर जायचं,लढायचं, भिडायचं आणि आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचाही एक महत्त्वाची शिकवणया कादंबरीतून मला मिळाली. नक्कीच कशी परिस्थिती असली तरी डगमगायच नाही तर धैर्याने तिला आता सामोरे जायचं असंही कादंबरी वाचून मी मनाशी ठरवलेलं आहे. या कादंबरी विषयी बोलावं तितकं कमी आहे. आणि लेखक सदानंद देशमुख यांनी कादंबरी ज्या अंती जाऊन थांबवली आहे तिथुन समजत की शेतकऱ्याच्या जीवनाचे भोग हे न संपणारे आहेत. कादंबरी वाचताना वेळ कधी संपून जातो कळतही नाही, नकळत कधी डोळ्यातुन अश्रु गळून पानावर पडले हेसमजत सुद्धा नाही.
या कादंबरीमुळे माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळालेली आहे कारण ही कादंबरी वास्तववादी परिस्थितीवर आहे. म्हणून नक्कीच मलाही कादंबरी वाचून खूप छान वाटले, आणि अशीही अत्यंत वाचनीय कादंबरी प्रत्येक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजे असं मला वाटतं.
