नाव : नागनाथ दादाराव बोडके,(पीएच.डी संशोधक विधार्थी, मराठी विभाग), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,
Read More
नाव : नागनाथ दादाराव बोडके,(पीएच.डी संशोधक विधार्थी, मराठी विभाग),
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे .
प्रास्ताविक :
निबंध कादंबरी नाटक कविता या वेगवेगळ्या वाक्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर देशात शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, शिक्षणाची दारे सर्व समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्मासाठी खुली झाली. ग्रामीण भागातील शिक्षणाची सोय झाली त्यामुळे मराठी साहित्यामध्ये अनेक नवनवीन वांग्मयप्रवाह उदयास आले. त्याच्यामध्ये ग्रामीण, दलित, जनवादी, स्रीवादी, आदिवासी, विज्ञान, मुस्लिम अशा विविधप्रवाहातून साहित्यनिर्मिती होऊ लागली, त्याचबरोबर समाजातील लोकांना शिक्षण मिळू लागल्याने शिक्षित पिढीने आपल्या सुखदुःखांचे अनेक अंगाने चित्रण साहित्यातून मांडण्यास सुरुवात केली. चरित्र आत्मचरित्र व आत्मकथन असे साहित्यप्रकार उदयास आले. आत्मकथन हा साहित्यप्रकार विशेषतः दलित साहित्याने पुढे आणला व तो लक्षवेधी ठरला. अनेक आत्मकथने प्रकाशित झाली. साहित्यिक व समीक्षक याबद्दल विचार करू लागले, आत्मकथन हा साहित्य प्रकारा आलीकडच्या काळात प्रकशात आला. आत्मकथन या साहित्य प्रकारास दलित लेखकांनी पुढे आणले. “आत्मकचन म्हणजे आपल्या जीवनात आपण भोगलेले दुःख बेदना अपेक्षा यांची कथन करणे होय आत्मकथनाचे स्वरूप स्पष्ट करताना डॉक्टर वासुदेव मुलाठे म्हणतात “आत्मकथनाचे स्वरूप केवळ तृप्त मनाने केलेल्या आयुष्याचे विहंगावालोवकन नाहीतर आतल्या आत ठसठसनाऱ्या जखमांनी विव्हळ झालेल्या अस्वस्थ मनाने केलेले कथन आहे. ती केवळ रंजनासाठी लिहिलेली नसून त्यांनी भोगलेल्या जीवनाची सत्यकहानी आहे” वासुदेव मुलाठे यांचे हे मत डॉ. शरद बाविस्कर यांच्या भुरा’ या आत्मकथनास तंतोतंत लागू पडते त्याच कारण, बाविस्कर यांनी त्यांच्या आत्मकथनात त्यांनी जे जीवन भोगले, जगले यांचे प्रांजळ चित्रण त्यांनी त्यात केलेलं आहे. आत्माविष्कराची मानवी प्रवृत्ती नैसर्गिक व सार्वत्रिक असल्याने आत्मचरित्रपर लेखन सर्वच भाषात आढळून येते. आत्मचरित्र मागे आत्माविष्कारची प्रेरणा आत्मबीवनाचे अर्थपूर्णतची अभिज्ञता, स्वानुभावातील निवडीची दृष्टी आणि लेखन विषयक भान अशा गोष्टी प्रेरक असतात. मराठी वांग्मयकोशानुसार “ऑटोबायोग्रफी या इंग्रजी संज्ञेला पर्यायी संज्ञा म्हणून मराठीत आत्मचरित्र किंवा आत्मकथा ही इंग्रजी संज्ञा वापरली जाते” मूल्य गर्भदृष्टीने घेतलेला आत्मशोध ही आत्मचरित्राची मूलभूत गरज असते. वर्तमानकाळाच्या विशिष्ट टाप्यावरून भूतकाळाचा वेध घेत जीवन कचेची रचना करणे, सो जीवन विषयक विशिष्ट भूमिकेतून पटना प्रसंग इत्यादी घटीकांची निवड करणे, स्वजीवनाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे निगडित असलेल्या व्यक्तींची चित्रण करणे आणि अर्थातच गतजीवनाची निवेदन करणे हे आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या संकेत संकेतव्यव्हामधील महत्त्वाचे घटक आहेत. आत्मकथनात्मक लेखनातून साकार होणान्या लेखक लेखिकेच्या व्यक्तिमत्वाता सामाजिक सांस्कृतिक मानसिक संदर्भात. त्यामुळे या मूल्यांच्या संदर्भात विशिष्ट भूमिकेतून अशा लेखनाची विश्लेषण आणि मूल्यमापन करणे शक्य असते, त्यामुळे एक संदर्भसामग्री किंवा दस्तऐवज महणून आत्मकथनाला महत्त्व प्राप्त होते.
“स्वतःच्या जीवनाचे दुरुस्तपणाने केलेल्या अवलोकन व त्यासंबंधीची कथन माणजे आत्मचरित्र आत्मचरित्रातून एका व्यक्तीच्या जीवनाचा कर्तुत्वाचा इतिहास जसा व्यक्त होतो तसाच तो व्यक्ती ज्या काळात आणि स्थळात अवगत असते त्या स्थळ काळाचा इतिहासदेखील आत्मचरित्रातून उभा राहतो. आत्मचरित्रकथनात सत्य अथवा वस्तुस्थिती कथन हे अत्यंत महत्वाचे असते. आत्मचरित्र हा स्वकेंद्रकेंद्री साहित्यप्रकार आहे. आत्मचरित्राने आत्मकथन यात सूक्ष्म भेद आहे. आत्मचरित्र इतिहासाचे अंगाने लिहिले जाते तर आत्मकथन कवेच्या अंगाने लिहिले जाते. आत्मचरित्र कालालूक्रमाने लिहिलेले असल्याने त्यात सलगपणा दिसतो. तर आत्यकंचनात घटना प्रसंग सागत असताना कालानुक्रमाचे उल्लघन होते.
संपूर्ण सत्यकथन करणे, स्वतःचा वस्तुनिष्ट दृष्टिकोनातून शोध घेणे ही आत्मकथन करायला सजवणारे एक समस्या असते. मराठीत अलीकडे तराळ अंतराळ शंकरराव खरात, अपुरा लक्ष्मण माने, आठवणीचे पक्षी प्र.ई सोनकांबळे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे माधव कोंडविलकर, काट्यावरची पोट या दलित आत्मचरित्रात्मक लिखाणाच्या रूपाने मराठीतील आत्मचरित्र या साहित्यप्रकाराला एक नवे परिणाम लाभले आहे या नव्या परिणामाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे आत्मशोधाची विशिष्ट गरज महणून लेखकाच्या व्यक्तीमनाबरोबरच त्याच्या जीवनकयेचा अविभाज्य भाग म्हणून व्यक्त होणारे ‘समूहमन’ आणि प्रत्यक्ष संबंधित असणारी सामाजिकता सांस्कृतिकता हे होय. दलित आत्मचरित्रात्मक लेखनाच्या निर्मितीमागील प्रेरणा ही निव्वळ व्यक्तीकेंद्र नाही तर ती व्यक्तीइतकीच समूहकेंद्रित आहे. मराठीतील आत्मचरित्र या साहित्य प्रकाराच्या स्थित्यतरामधे ‘नाच ग घुमा’ ‘आहे मनोहर तरी’ यासारख्या स्त्रियांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाने आत्मचरित्र या साहित्य प्रकाराला नवीं व वेगळी परिणामी लाभलेले आहेत.
भूरा आत्मकथनाचे वेगळेपण :- भुरा ते जेएनयू चा प्राध्यापक शरद बाविस्कर” धुळ्यापासून ५-७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेर या अगदी लहानशा खेड्यात शालेय शिक्षण घेत असलेला भुरा हा दहावीत इंग्रजी विषयात नापास होतो. नवबीत शाळेत पहिला आलेला भुरा जेव्हा दहावीत नापास होतो तेव्हा गावातील अनेकजण त्याला टोमणे मारायला लागतात अठरा विश्च दारिद्रय अन् त्यात नापास झालेल्या भुराला तथाकथित उच्च असणारे किंवा बन्यापैकी पैसा असणाऱ्या मंडळी कडून होणारी अवहेलना सहन न होणारी होती. भुरा ही गोष्ट जीवाला लावून घेतो त्यामुळे तो स्वतःला इतरांपासून दूर करू लागतो, एकाकी अन् अबोल होतो. तेव्हा त्याची आई आपल्या गावरान अहिराणी भाषेत समजावताना म्हणते की, “मनले नको लाईलिव भाऊ, हसणाऱ्यास्ते हसू दे. लोकेस्नी घाण सञ्चय हार्स. सोतानी गांडले गू बदबद पण कोणा पाय शेणमा पडना तर हासतस खदखद.” थोडक्यात की,’ ओ बाबा। नापास झालास हे लई जीवाला लावून घेऊन नकोस, लोकांचा बी लई विचार करून नकोस, या लोकांना लई घाण सवयी असतात. शेंबूड आपल्या नाकाला पण हासतात दुसऱ्याला’ अशा वृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष कर’ अशी समजुत घालणारी आई ही भविष्यात तत्वज्ञानाचं शिक्षण घेणाऱ्या भुराचा पायाचा नकळतपणे पक्का करत होती. या पुस्तकात भुरा ची आई मला खूप भावली. लौकिक अर्थान पाचवी पर्यंत शिक्षण झालेली भुराची आईन अवतीभवतीची दुनिया अनुभवताना घेतलेलं ज्ञान हे भुराला अधिकाधिक समृद्ध करत. कारण भुरा गाव सोडून धुळ्यात येतो, धुळ्यात पदवी पर्यंत शिक्षण घेऊन महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जातो, तिथून देशाची राजधानी गाठतो, परत पुढील शिक्षणासाठी परदेशात जातो, प पुन्हा दिल्लीत येतो, नोकरी करतो या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळी अडचणी येतात तेव्हा तेव्हा भुरा त्याच्या आईने दिलेला सल्ला आठवतो अन् तो पुढच्या वाटचालीसाठी पहिल्या पेक्षा जोमाने, दुप्पट ताकदीने उभा राहतो. म्हणून हे पुस्तक जसं जसं पुढे वाचत जातो तसं तस मला भुराच्या आई विषयी आणखीनच आत्मियता वाढत जाते. तिकिटाला पैसे नाहीत म्हणून मोडक्या तोकड्या सायकलवर टांगातोड करणारा भुरा, तो विमानात बसून देशोविदेशी जाणाऱ्यांना प्राध्यापक शरद उर्फ भुराला आपल्या आईच्या काबाडकाची, तिच्या वाट्याला आलेल्या खडतर अन् वेदनादायी आयुष्याची चांगलीच जाणीव आहे. एका ठिकाणी भुरा म्हणतो की, ‘अशा मूलभूत मुल्यांची जाणिव ही सगळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या असली पाहिजे. जर अशा मूलभूत मूल्यांसाठी स्वाध्याय बैठका आणि माऊंट अबूवाल्यांच्या गरज पडत असेल तर स्वतःला मनुष्य म्हणवून घेण्यात काय अर्थ आहे! किती मार्मिकपणे लेखकाने आपल्या आईबापाला पडलेल्या कष्टांच्या जाणिवेचे ही जाणिव करून दिली आहे. कुणबी असलेल्या भुराच्या वडीलांना काही तडजोडीसाठी मुळ गाव सोडून रावेरला संसार मांडवा लागला होता. तिथंच एका पैशाने गब्बर असलेल्या नातेवाईकाच्या घरी संसाराचा गाडा ओढण्यासाठी काम करावं लागत होत. पण त्या नातेवाईकाच्या दृष्टीने भुराचे कुटुंब म्हणजे विस्थापित मजूर होते. यामुळे त्यांना मिळणारी वागणूक ही अगदी जनावारासारखी होती. या लोकाच्या दृष्टीने भुरा म्हणजे ढुंगणावर दोन मोठमोठाली ठिगळ असणारा अन् दलित, भिल्ल बायका सोबत मोलमजुरी करणाऱ्या एका बाईच्या पोराची होती. भुरा हा पोरगा परदेशात जाऊन ‘उच्च शिक्षण घेऊन आला तरी फक्त गावातच ‘उच्च’ असणाऱ्या वतनदारांचा भुराकडे बघण्याचा दृष्टीकोन काही बदलला नव्हता. ह्या भुराने दहावी नापास झाल्यावर पडेल ती कामं केली. कधी दगडाच्या खाणीत तर कधी मित्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून, ऑक्टोबरच्या वारीत दहावी निघाल्यावर ११ वी १२ वी बाहेरून परिक्षा द्यायची ठरवली. कारण, पडेल ते काम करून घरची अन् स्वतःची आर्थिक गणित सोडवायची असा विचार केला. तेव्हा धुळ्यातच क्रेन सर्विसिस च्या एका ऑफिसात नोकरी घरली, यात तो नावाला ‘मॅनेजर’ होता. नाहीतर काम तर एखाद्या शिपायापेक्षा जास्त होती. ऑफिस झाडून काढण्यापासून तेथे आलेल्या लोकांना चहापाणी करण्यापर्यंत सगळी कामं या भुरालाच करावी लागतं. ही सगळी कामं करताना कधी मालकाची ‘बोलणी’ अन् तर कधी क्रेनवर काम करणाऱ्या पोरांची ‘टोचणी’ सतत खावी लागत असतं. अशात त्याने विचार केला की आता १२ वी च्या वर्षात नियमीत कॉलेजवरून परिक्षा द्यायची. पण इंग्रजीची काही अडचण सुटत नव्हती तेव्हा या पट्ट्याने एक डिक्शनरी अख्खीच्या अख्खी तोंडपाठ केली. वेगवेगळ्या लेखकांची इंग्रजी ग्रामरची पुस्तक घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला. इथं भुराच्या आई चे वाक्य आठवतं, ती नेहमी म्हणायची,तुला अवघड जात असलेल्या ‘विषयाला घेरून टाक’
अन् याच काळात गावात होणाऱ्या त्रासमुळे भुराच्या आईनं गावसोडून धुळ्याला राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. १२ वी ला नियोजन पुर्ण अभ्यास करून भुराने बारावीची परीक्षा दिली. ज्या विषयाने दहावीला दगा दिला होता त्या विषयाची चांगली तयारी करून देखील तिथल्या कापीड सेंटर मुळे भुराच्या मनात पास-नापासाची धाकधूक होतीच. १२ वीचा निकाल लागेपर्यंत तो मोठ्या भावाच्या गॅरेजवर कामाला गेला. एके दिवशी भावाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पळून सुध्दा गेला. परंतु आईची आठवणीने काळिव पिळवटून गेल्यावर वापस ही फिरला. वाचणाऱ्याला हा प्रसंग सुन्न करून सोडतो. पण प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या भुराचे काय अवस्था असेल? ही मनाची उलघाल नेमके पणाने मांडली आहे. बारावीचा निकाल लागतो. नियोजनबध्द केलेल्या अभ्यासामुळे भुरा केंद्रात पहिला येतो, तेव्हा त्याचे वडील गावात जाऊन घरोघरी पेढे वाटून येतात, हा प्रसंग भुराला पुढील शिक्षणासाठी बळ देणारा होता. बारावी नंतर भुरा पदवीचं शिक्षणासाठी धुळ्यातील नामांकित अशा जयहिंद कालेजला प्रवेश घेतो. खेड्यातून आलेला भुरा, त्यात अतिशय बिकट परिस्थिती, आणखीन ही इंग्रजीवर म्हणावी तशी पकड नसल्याने, भुरा काही काळ जयहिंदच्या वातावरणात दबून जातो की काय अस वाटतं. परंतु स्वतःच्या मर्यादा ओळखून, नियोजनबध्द अभ्यास करणारा भुरा पढ़वीच्या शेवटच्या वर्षांपर्यंत स्वतः च्या बुध्दीमत्तने एक स्वतंत्र ओळख निर्माण करतो. त्याला शिकवणाऱ्या प्राध्यापकापासून ते प्राचार्य के डी. पाटील यांच्या पर्यंत त्याची जिद्दी व कष्टाळू अशी ओळख निर्माण होते. कालेज अंतर्गत परिक्षेच्या द्वारे तो फंक्यानल इग्लिश कोर्स’ ला निवडला जातो अन् आई चा मंत्र इंग्रजीला घेरून काढ’ म्हणत जिद्दीने पेटून उठतो. इंग्लिशवर आपलं प्रभुत्व निर्माण करतो. भुराचे १२ वी ते पदवीपर्यंत आणि पुढे नोकरी लागेपर्यंत जी अभ्यास करण्याची पध्दत आहे, वेळेचे नियोजन आहे, स्वतः मनावर असलेले नियंत्रण आहे, या गोष्टी साठी खरंच त्याला हजारदा सलाम किमान या गोशींसाठी तरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनाताच भुरा हे आत्मचरित्र वाचलं पाहिजे. कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत अन् कोणत्याही गोष्टी निश्चयाने टाळल्या पाहिजेत याची जाणीव नक्कीच होईल. “तुझं इंग्रजी फार कच्च आहे, तू भाग घेऊ नकोस’, असे सांगणारे भुराचे मित्र मैत्रिणी चेष्टेना का होईना पण अवघड अवघड अशा इंग्रजी शब्दाचा अर्थ विचारू लागले. एवढंच काय पण कोणता शब्द कोणत्या पानावर आहे हे ही विचारू लागले. विचार करना मगा या भुरा ने त्या इंग्रजीच्या डिक्शनरीला नुसतं घेरलं नाही तर कोळून प्यायला अस म्हणता येईल. कॉलेजात कमवा अन् शिक्षा’ योजनेत काम करणारा भुरा, दिवाळी सुट्ट्यांत MIDC त कामाला जात असे. कामातून पैसा अन् पैशातून शिक्षण, अन् भविष्यात बुध्दीमत्तेच्या जोरावर मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या साह्याने भुरा आपलं शिक्षण पुर्ण करत रहातो. भुरा आपल्या वडिलांचे वर्णन ‘सुर्य पाहणारा माणूस’ करतो. अशा माणसाचा अचानकपणे झालेला मृत्यू चटका लावणारा आहे. एकाकी राहाणारा भुरा वडीलांच्या अशा निघून जाण्याने अधिकच एकाकी अन् अबोल झाला. पुढे कॉलेजात अशा या अलिप्त वागण्यामुळे व अंतर्मुख स्वाभावामुळे कॉलेजमधील मित्र फिलोसोफर म्हणून चिडवू लागले. पण त्यांना काय माहित होत की ज्याला आपण आज फिलोसोफर फिलोसोफर म्हणून टर उडवत आहोत, तोच पुढील काही वर्षांत फिलोसोफीचाच संशोधक होणार आहे? जयहिंद कॉलेजमध्ये फंक्शनल इंग्लिश लॅबमध्ये भुराला Central Institute of English and Foreign Language, Hyderabad. (CIEFL) ची ओळख झाली. अन् या ओळखीतूनच या ठिकाणी शिकण्याची ओढ ही निर्माण झाली. पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असताना CIEFL यासाठी प्रवेश परिक्षा दिली अन् भुराचा नंबर हैदराबाद येथे लागला. परंतु तेथे हास्टेल न मिळाल्याने लखनौ येथील संस्थेत प्रवेश घेतला. लखनौ येथील CIEFL च्या भव्य दिव्य अशा इमारतीत दिले जाणार शिक्षण काही अपवाद वगळता भग्ननिरास करणार होतं. म्हणून भुराने इंग्लिश च्या नियमित कोर्स सोबत बाहेरून फ्रेंच भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. परंतु यावर तेथील काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाकडे भुराची तक्रार केली. अशा वेळी भुराने कुठलाही क्लास न करता स्वयंः अध्यायनाच्या जोरावर फ्रेंच शिकून घेतली. नुसती फ्रेंच शिकलीच नाही तर कालेज कॅम्पस ज्या बाहेर एका खाजगी क्लासेस मध्ये फ्रेंच शिकवू लागला. यात त्याला पैसे मिळू लागले. स्वतः चा खर्च भागवून उरलेले पैसे भुरा आईला पाठवत असे. परंतु भुराला प्राध्यापकांनी फ्रेंच भाषा शिकण्यासाठी केलेला अटकाव अन् त्यातून भुराने शिकलेली फ्रेंच भाषा, यामुळे जळफळाट करणाऱ्या त्याच्या काही सहकारी मित्रांनी भुरा त्रास द्यायला सुरुवात केली. एवढंच नाही तर लखनौ येथील स्थानिक गुंडाच्या साह्याने मारहाणीचा ही प्रयत्न केला.
2)तुला अवघड जात असलेल्या ‘विषयाला पेरून टाक’

CIEFL, लखनौची एम. ए. चे शिक्षण पूर्ण होत असतानाच भुरा ला आता वेध लागले होते ते दिल्लीचे अन् तेथे असलेल्या बवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत शिकायला जायचे, लखनौमध्ये शिकत असताना शिक्षणासोबतच फ्रेंच भाषेच्या क्लास मधून बऱ्यापैकी पैसा मिळत होता. परंतु दिल्लीला गेल्यावर शिक्षणासाठी लागणारा पैसा कसा मिळवायचा? हा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. तेव्हा भुराला काही मित्रांनी मदत केली. या मित्रांविषयी भुरा अतिशय कृतज्ञतेने व विनम्रपणे भरभरून व्यक्त होतो. लखनी येथून भुरा मित्रांच्या मदतीने दिल्लीत येतो. कधी याच्या तर कधी त्याच्या रूमवर राहून जेएनयू’ च्या प्रवेश परीक्षेची तयारीला लागतो. या दरम्यान फ्रेंच सांस्कृतिक कला केंद्रात एक तात्पुरता स्वरूपाची नोकरी करून थोडीफार आर्थिक गणित सोडविण्यासाठी धडपडतो. हे सगळे करत असताना भुरा आपला अभ्यास मात्र अतिशय नियोजनचद्ध करतच रहातो. याचच फळ म्हणून भरा जेएनवू च्या प्रवेश परीक्षेत पहिला येतो अन् दिल्लीत त्याला एक हक्काचं राहण्याचं ठिकाण मिळत. ते म्हणजे, बेएनयू चे हा स्टेल, लखनौमध्ये अनौपचारिक पद्धतीने शिकलेल्या फ्रेंच भाषेला आता जेएनयू मधून औपचारिकता लाभणार होती. इथं ही शिकत असताना भुरा फ्रेंच सांस्कृतिक केंद्राच्या लायब्ररी मध्ये पार्ट टाईम काम करतो. २००५ साली जेएनयू च्या कैम्पस मध्ये भुराचा एक भयंकर अपघात होतो. यातून त्याचा जीव मात्र वाचतो. परंतु या अपघातानंता सुरु झालेली पाठदुखी भविष्यात कधीकधी जीवघेणी ठरते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी बाबत आता माध्यमातून जी उलटसुलट चर्चा केली जाते. जेथे देशद्रोही कारवाया चालतात असे रंगवलं जातं. अशा त्या खोट्या प्रचाराचा जेएनयू मध्ये शिकणारा भुरा अतिशय व्यवस्थितपणे समाचार घेतो जेएनयू चे वास्तववादी चित्रण या पुस्तकातून वाचकांना करून देतो. जेएनयू च्या विद्यार्थी संघाच्या निवडणूकी बाबत भुरा म्हणतो की, ‘या निवडणुका म्हणजे विवेकी आणि विज्ञानवादी संस्कृतीचे प्रदर्शन आणि तीन आठवडे चालणारा लोकशाही प्रक्रियेचा उत्सव’ (या जेएनयू ची माहिती ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेतली असते विशेषतः what’s app University च्या माध्यमातून अशांनी हे पुस्तक जरूर वाचावे.) जेएनयू मध्ये शिकत शिकत फ्रेंच सांस्कृतिक केंद्रात पार्टटाईम काम करणाऱ्या भुराला एक वर्षासाठी एज्युकेशन कोऑर्डिनेटर नोकरी मिळते आणि या नोकरीचा भाग म्हणून त्याला फ्रेंच एम्बसी मार्फत पॅरिसला प्रशिक्षणाला जाण्याची संधी मिळते. लहानपणी शाळेच्या सहलीसाठी जाण्यासाठी पैसे नसायचे किंवा सहलीला जायचे म्हणून सुट्टीत मोलमजुरी करून पैसे जमा करणारा भुरा आता स्वतःच्या मेंदूच्या ताकदीवर परदेशी निघाला होता. २००६ मध्ये फ्रान्समधून भारतात शिकायला आलेल्या ‘नाईक’ या मुलीशी जुळलेले भावबंधाविषयी तो अतिशय तरलपणे व्यक्त होताना दिसतो. हिच ‘नाईके’ पुढे फ्रांस गेल्यानंतर भुराच्या शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्यांमध्ये मदत करताना ही दिसून येते. जेएनयू मधील फ्रेंच साहित्यातील एम. ए. ची पदवी संपताच २७ लाख रुपये आणि तीन युरोपियन विद्यापिठात पाश्चात्य तत्वज्ञान, कल्चरल स्टडीज् व भाषाशास्त्र या तीन क्षेत्रांत मास्टर्स करण्यासाठी युरोपियन कमिशनची इरास्मुस मुन्डूस नावाची शिष्यवृत्ती भुराला मिळते. दहावीत इंग्रजीत नापास होणारा भुरा, पडेल ते काम करणारा भुरा, तथाकथित वतनदार असलेल्या आपल्याच समाजातील लोकांकडून अपमानास्पद वागणूक सहन करणारा भुरा, वडिलांच्या मृत्यूनंतर एकाकी व अबोल होणारा भुरा, गावातील शाळेतून जिल्ह्यातील कालेजात आल्यानंतर गोंधळून जाणारा व स्वतःच स्वतःला सावरणारा भुरा, एखादा विषय अवघड असला तर त्याला घेरून आपल्या कह्यात घेणारा भुरा, असा हा छोट्या छोट्या प्रसंगातून शिकत जाणारा अन् संकटातून तावून सुलाखून निघणारा भुरा… स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर परदेशात उच्च्च शिक्षणासाठी निघाला जातो. या शिष्यवृत्ती अंतर्गत पहिल्यांदा फ्रांस येथिल १५ व्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या पेरपिन्या विद्यापीठात शिक्षण पूर्ण करतो. येथिल थंडी व १०-१२ तास अभ्यासाची बैठक यामुळे पुर्वीची पाठदुखीचा त्रास उफाळून आली असतानाही, आपल्या संशोधनाच्या पेपर्स काम चालूच ठेवतो. तसेच नाईक या मैत्रिणीच्या माध्यमातून उपचार ही सुरू ठेवतो. फ्रांस येथिल संशोधनचा टप्पा पार पडल्यानंतर भुरा पुढील संशोधनासाठी इटली येथील बेर्गामो विद्यापीठ गाठतो. इटलीतील मास्टर्स पुर्ण करुन परत भुरा काही दिवसांसाठी फ्रान्सच्या पेरपिन्या विद्यापीठात येऊन उर्वरित काम पूर्ण करतो. तेथून संशोधनचा शेवटचा टप्पा इंग्लंड येथील शेफिल्ड विद्यापिठात पुर्ण होतो.
भुरा जी शिष्यवृत्ती मिळवून फ्रांस, इटली व इंग्लंड या देशात संशोधन करणाऱ्या गेला, त्याठिकाणी त्याने आपले संशोधनाचे काम तर चोखपणे बजावले परंतु त्याचबरोबर त्याने तो देश, त्या देशाची संस्कृती, तिथले लोक, तिथली शिक्षणपद्धती याचेही निरिक्षण अतिशय उत्तम केले आहे. इरास्मुस शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिक्षण पुर्ण करून भुरा वापस दिल्लीला जेएनयू मध्ये येतो. चौची पर्यंत कधीमधी शाळेत जाणारा, दहावी नापास होणाऱ्या भुराने २०१० पर्यंत पाच मास्टर्स पदव्या मिळवल्या होत्या. परंतु आणखीन ही आर्थिक अडचणी मात्र दूर झाल्या नव्हत्या म्हणून काही काळ तो अॅमिटी या खाजगी युनिव्हर्सिटीत शिकवायला जातो. या बुनिव्हर्सिटीचा मालक मनाला वाटेल तसा कर्मचाऱ्यांना पगार देत असे. तेव्हा भुराने आपल्या शिक्षणाच्या ताकदीवर स्वतःला हवा असलेला पगार त्याच्या पदरात पाडून घेतो. अॅमिटी हे खाजगी विद्यापीठ अन् तेथील डोंगीपणाचा खरपूस सथाचार या आत्मचरित्रात लेखकाने घेतला आहे. खाजगी विद्यापीठ काय अन् खाजगी शाळा काय सगळी कडे याच प्रकारचा कोडगेपणा सुरू आहे. (काही सन्माननीय अपवाद वगळता) तिशीत प्रवेश केलेल्या भुरा अँमिटीत शिकवण्याचे काम करत असताना जेएनयू मध्ये पीएचडी साठी निवड होते. यादरम्यान अँमिटीत शिकवण्यासाठी आण्याची दगदग अन् पीएचडीचे काम यामुळे परत एकदा पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. महणून अँमिटीतील जॉब सोडून देतो. तोपर्यंत जेएनयू च्या फ्रेंच डिपार्टमेंटमध्ये फ्रेंच साहित्य व थिअरी कोर्सेस’ शिकवण्याच्या बदल्यात जेआरएफची पंचवीस हजार शिष्यवृत्ती ही मंजूर होते. पीएचडी सुरू असतानाच जेएनयू मध्ये फ्रेंच डिपार्टमेंट मध्ये दोन जागे साठी मुलाखती होतात. या मुलाखतीसाठी भुरा ने केलेली तयारी अन् त्याने दिलेली मुलाखत सगळे काही अफलातून आहे. कुटुंब कुणीही फारसं शिकलेले नाही. स्वतःच प्राथमिक माध्यमिक शिक्षण ही ठळकपणे दिसून येईल असं नाही. काम करावं तेव्हा पोटा पास मिळणार अशी आर्थिक परिस्थिती. कुठलाही वशिला नाही. अशा परिस्थितीही रावेरचा भुरा देशातील प्रतिष्ठित अशा विद्यापिठाचा प्राध्यापक होतो. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. ‘भुरा’ ते जेएनयू चा प्राध्यापक शरद बाविस्कर हा प्रवास अतिशय अफलातून आहे. लेखकाने, जे पटलं त्या विषयी भरभरून लिहिलं अन् जे खटकलं त्यावर सडेतोड भाष्य ही केलं आहे. या प्रवासात वारंवार जाणवते ती भुराच्या शिक्षणासाठी, भुराला मानसिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी धडपडणारी भुरा ची आई. प्रतिकूल परिस्थितीच्या आवर उभारून नियोजित पध्दतीने अभ्यास कसा केला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भुरा हे आत्मकथन होय.
समकालीन सामाजिक, सांस्कृतिक जीवनवास्तवाचे चित्रण करणारे आत्मकथन :- भुरा हे आत्मकथन तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे अस्सल असे आत्मकथन आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्यातील रावेर या गावच्या रुडी, परंपरा सामाजिक संकेत, व्यवस्था, आणि त्यांचे समाजातील असणारे वर्चस्व, तत्कालीन महारष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्था या सर्व सांस्कृतिक संचीतांचे वास्तव चित्रण आपणाला भुरा हे आत्मकथन करून देते.
शैक्षणिक संघर्षाचे प्रांजळ चित्रण करणारे आत्मकथन :- प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे भुरा हे आत्मकथन सबंध ग्रामीण समाजातल्या असंख्य भूरांच्या जीवनाच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारे आत्मकथन आहे. शिक्षण घेत असताना क्रेन सर्विसमध्ये काम करण्यापासून ते जयहिंद कॉलेजमध्ये कमवा व शिका योजनेत काम करून आपल्या आर्थिक परिस्थितीला तोंड देत त्यातून मार्ग काढत शैक्षणिक प्रवासाचे चित्रण आपणाला हे आत्मकथन करून देते.
वास्तव जीवनाचे तात्विक भाष्य:-
भुरा हे आत्मकथन वाचताना आपणाला जागोजागी जीवन जगण्याचे तत्वज्ञान वा आत्मकथनातून प्रत्ययास मिळते.
लेखक म्हणतो,
१). “जास्तीजास्त सुरक्षा आपणाला कधी कधी मर्यादित सुद्धा करू शकते””
२). “शिक्षणासाठी योग्य भौतिक सुविधा उपलब्द करून दिल्या तर व्यक्तीनिष्ठ घटकांनासुद्धा हमखास प्रेरणा मिळते
3)”जगण्यातील कृतिमता मला लवकर थकवा आणत असे
४) कुठलीही अर्थपूर्ण आणि महत्वाचीगोष्ट निर्माण करण्यासाठीची पूर्वअट म्हणजे एकांत ज्याच्यात आपत्ता अनुभव आणि वाचन चिकित्सकपणे करून स्वतःविषयी एक संतुलित आकलन होत असत.”
५) झीजीन मरवा पण भीजीन नही मरवा”
६ ) भूरांनी जगलेल्या जीवनातून घेतलेल्या अनुभवातून स्वतत्वज्ञान तयार केले याचा प्रत्यय भुरा या आत्मकथनाच्या पानोपानी येतो.
निष्कर्ष :
१). तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीचे अस्सल चित्रण भुरा ह्या आत्मकथनातून चित्रित होते.
२). मराठी आत्मकथनाच्या इतिहासात अव्वल दर्जाचे आत्मकथन म्हणून भुराचे स्थान निश्चित होते.
3). समकालीन सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक जीवनाचे दस्तऐवज म्हणून भूराचे महत्व अधोरेकीत होते.
Show Less