मजबुती का नाम महात्मा गांधी

By चंद्रकांत झटाले

Price:  
₹250
Share

Availability

available

Publish Date

2023-06-01

Published Year

2023

Publisher, Place

Total Pages

224

ISBN 13

9788193446843

Format

Paperback

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

महात्मा गांधींजींएवढा शक्तिशाली माणूस जगात क्वचितच पाहायला मिळेल.

Reviewed by: Dr. Dattatray Sankpal, Librarian (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028) युवाल नोआ हारारी (सेपियन्स) जसे म्हणतात की, जो माणूस एकाच वेळी अनेक...Read More

Dr. Dattatray Sankpal

Dr. Dattatray Sankpal

×
महात्मा गांधींजींएवढा शक्तिशाली माणूस जगात क्वचितच पाहायला मिळेल.
Share

Reviewed by: Dr. Dattatray Sankpal, Librarian (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028)

युवाल नोआ हारारी (सेपियन्स) जसे म्हणतात की, जो माणूस एकाच वेळी अनेक लोकांना आपल्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. एकाच ध्येयासाठी, सामूहिक कल्याणाची खात्री वाटल्याने लाखो करोडो लोकांना जो माणूस एकत्र करू शकतो. त्या ध्येयाच्या दिशेने सहकार्य करायला भाग पाडतो, तो पृथ्वीवर पुढच्या काळामध्ये शक्तिशाली माणूस गणला जाऊ लागला. या निकषानुसार महात्मा गांधी तंतोतंत जगातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक होते, याची खात्री हे पुस्तक वाचून पटते. त्यांचा अनेक विचारधारांशी संघर्ष झाला. ते तेव्हाच्या काळात मानल्या गेलेल्या अस्पृश्यांसाठी भूमिका घेताना दिसतात. ती भूमिका घेतलेली ज्यांना रुचली नाही, अशांशी संघर्ष करतात. जातीयतेमुळे त्यांचे नेतृत्व मान्य  नसल्याने आलेल्या समस्यांना तोंड देतात.

हे लेखकाचे पहिलेच पुस्तक आहे. त्यासाठी त्यांनी सखोल असे संशोधन केलेले पदोपदी जाणवते. या पुस्तकाला तुषार गांधी यांची प्रस्तावना आहे.
‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ हा धादांत खोटा असा पसरवलेला प्रचार लेखकाने साधार खोडून काढला आहे. त्याच वेळी अनेक दाखले दिलेले आहेत. गांधीजींचे पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, बॅ. जिना यांच्याशी असलेले नाते आणि मतभेद यामध्ये विशद केलेले आहे. लोकमान्य टिळकांच्या नंतर स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आलेले होते. गांधीजींचे काम हे सर्वसमावेशक, सर्व समाजाला सोबत घेऊन होते, हे या पुस्तकातून जाणून घेता येते. अनेक यशस्वी आंदोलने हा त्याचा पुरावा आहे. महात्मा गांधीजींनी अस्पृश्यता निवारणासाठी सवर्णांच्या डोक्यातील अस्पृश्यता घालवण्याचे मोठे योगदान दिलेले दिसते. जागोजागी पुरावे देत हे पुस्तक सर्व बाबी पटवून देत राहते. या नेत्यांचे एकमेकांशी मतभेद असतानाही ते संवाद कायम ठेवून होते. मतभेद हा दोन व्यक्तींमध्ये असणारा अपरिहार्य भाग असतो. अहिंसा, भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या फाशीच्या शिक्षेबद्दलचे गैरसमज, 55 कोटी, पाकिस्तान, काश्मीर प्रश्न या सगळ्यांबद्दल अनेक गैरसमज पसरवलेले दिसतात. म. गांधी यांच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी अनेक अतार्किक आरोप त्यांच्यावर लावले जातात. महात्मा गांधीजींच्या हत्येमागील खरी कारणे आणि त्यांच्यावर लावलेले अनेक दोषारोप त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय उत्तम दस्तावेज आहे.

Submit Your Review