मनस्विनी
By अर्चना देव
Prerana Bhausaheb Aher (F.Y.B.ed)
SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY
SATPUR, NASHIK
अर्चना देव यांची श्रीमंत काशीबाई पेशवे यांच्यावर आधारित असलेली
“मनस्विनी” ही कादंबरी वाचली आणि अक्षरश: लेखिकेच्या उगवत्या लेखणीवर आणि काशीबाईंच्या कर्तृत्वावर मी मनस्वी आवाक झाले. खूप अभ्यासपूर्वक आणि ओघवते लिखाण आहे.
ही गोष्ट आहे एका स्वामींनी, पतीव्रता, मनस्विनी, गृहलक्ष्मी, समाधानी कितीही कौतुकीत आभूषणांनी वर्णावी पण कमीच पडेल अशा पेशवीन बाईंची, काशीबाईंची…खरं म्हणावं तर, काही कारणांनी दुर्लक्षिलेल्या गेलेल्या त्या प्रेमिकेची जिने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पतीवर रायांवर मनापासून प्रेम केले. कारण बाजीराव म्हटले की मस्तानी हेच गणित… वाचन, सीरियल यामध्ये हेच दाखवत होते. या कादंबरीत मला काशीबाईंचे अनेक गुण अभ्यासता आले.
या कादंबरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील नायिका काशीबाई यांच्या अवतीभोवती ही कादंबरी पिंगा घालते. काशीबाईंच्या स्वभावाचे कितीतरी धागे लेखिकेने सहज विणले आहे. पण एक धागा असा विणला की वाचकाचे चित्त त्या धाग्यावर स्थिरावते. स्वतः काशीबाई म्हणता या पैठणीचा एक धागा असा आहे आमच्या अबोल दुःखाचा मूक वेदनेचा जो या पैठणीत बेमालूम पणे मिसळला आहे मात्र या अबोल धाग्याने पैठणीची वीण घट्ट धरून ठेवली”.पेशव्यांच्या जीवनात मस्तानी आल्यावर काशीबाई आणि श्रीमंतांचे संबंध संपुष्टात आले असेच वाचनात होते. पण यामध्ये एक करारी बुद्धिमान स्त्री कशी असते हे वाचायला मिळाले.
काशीबाईंच्या स्वभावाचे कांगोरे ठळकपणे समोर आले त्यांनी पतीची पाठ राखण तर केलीच पण मस्तानीला बहिणीसारखी माया लावली. वादळ वटीवरून चालताना अनेक प्रसंग असे आले की पेशवीन पद सांभाळताना तिची दमछाक झाली असेल पण घेतलेली जबाबदारी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळली. नवऱ्याच्या मागे पेशवाईचा कारभार, रयतेच सुख, कर्तव्यदक्ष सून, पोटच्या गोळ्यांचे संगोपन ते अगदी मस्तानीच्या मागे तिच्या बाळाचे संगोपन कुठेच कमी पडली नाही त्या…
अशा रणांगणावर न लढता संसाराचा गाडा ओढणाऱ्या आणि अपराजित योद्धाच्या मागे खंबीरपणे उभ्या ठाकलेल्या रणरागिणीची गोष्ट… सर्वांनी वाचावी अशी कादंबरी “मनस्विनी”.