जेफ केलर यांचे मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही हे तुमच्या आयुष्यात यश तुमच्या विचारांनी कसे येते
Read More
जेफ केलर यांचे मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही हे तुमच्या आयुष्यात यश तुमच्या विचारांनी कसे येते याचे एकमेव उदाहरण आहे. जेफ केलर यांनी बरेच वर्ष वकील म्हणून काम केले. त्यांनी वकील पेशातून लेखक पेशात जाताना कसा सकारात्मक विचारांचा ,कृतीचा प्रभाव आपल्या आयुष्यात पडतो हे दाखवून दिलय. आयुष्यात सकारात्मक विचारांनी तुम्ही खूप काही जिंकू शकता हे जेफ केलंर यांनी विविध उदाहरणांनी आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. आयुष्यात खरंच सकारात्मक विचारांनी फरक पडतो का याचा अनुभव घेण्यासाठी मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही हे नॉन फिक्षन पुस्तक वाचायचे ठरवलं.
हे पुस्तक अतिशय प्रेरणादायक व तुमचा दृष्टिकोन बदलून टाकत.
मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही हे पुस्तक सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत तीन भागातून पोहोचवते.
पहिल्या भागात “यशाची सुरुवात होते तुमच्या मनात” यात तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा तुमच्या आयुष्यात एक संधी आणतो हे समजतं. तुमच्या ध्येयाचे काल्पनिक चित्र रेखाटून जी जादू तुमच्या आयुष्यात घडते आणि तुमच आयुष्य बदलतं हे प्रत्यक्ष पाहायला मिळतं.
दुसऱ्या भागात “शब्द काळजीपूर्वक वापरा” यात तुमचे शब्द कसे तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकतात यावर भर दिला आहे. सकारात्मक शब्द आयुष्यातले अडथळेत कसे दूर करतात व इतरांवर प्रभाव टाकतात हे केलंर यांनी दाखवून दिलय. जसा विचार तुम्ही करता तसे तुम्ही घडत जाता.
तिसऱ्या भागात “कृती करणाऱ्यांना देव मदत करतो” हे काही खोटे नाही. केलं म्हणतात हे अगदी खरं आहे की सकारात्मक व्यक्ती विचार करून त्याप्रमाणे पुढे पाऊल टाकतात. कष्ट करतात आणि कष्ट करणाऱ्या देव नेहमीच मदत करतो. सकारात्मक ऊर्जा सतत अंगी बाळगल्याने अपयश आले तरी ती व्यक्ती खचून जात नाही पुन्हा नव्याने उभी राहते हे आपल्याला पटवून देतात.
केलर यांनी आपल्यापर्यंत योग्य तो संदेश अगदी सोप्या भाषेत पोहोचवला आहे. भाषा ही साधी , सरळ व सोपी असून लेखकांनी स्व- अनुभव सांगून ती अधिकाधिक सोपी केली आहे. सकारात्मक भाषाच वापरून केलर यांनी त्यांचा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवलाय. त्यांची ही कला लोकांना सकारात्मक विचार करायला, आयुष्यात प्रयत्न करायला प्रवृत्त करते. हे प्रेरणादायक व सकारात्मक दृष्टिकोनाला महत्त्व देणारे पुस्तक खूप काही सांगून जाते.
मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही यातून मला देखील खूप काही शिकायला मिळाले. केलर यांनी “प्रयत्नांती परमेश्वर” यावर जास्त भर दिलाय आणि ते अगदीच योग्य केलंय. आयुष्यात काही करण्याचे ठरवले की त्यासोबतच धैर्य, सातत्य आणि सकारात्मक विचारांची जोडी ही हवीच. केलर यांनी आपल्या वकिली पेशातून लेखक पेशाकडे सकारात्मकतेने बदल केला. त्यातून त्यांची जिद्द व काम करण्याची वृत्ती दिसून येते. प्रत्येक धड्यांमध्ये सुविचार घेऊन अधिकाधिक सुंदर असे रूप त्यांनी या पुस्तकाला दिलय. जेफ केलंर यांनी डॉक्टर विक्टर फ्रांकील यांचे उदाहरण देऊन कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग दाखवून दिलाय.
थोडक्यात हे पुस्तक इतकच सांगून जातं की विचार, जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की आयुष्य किती सोपं होतं ते नक्की बघा. आयुष्यात ज्या व्यक्तींना नकारात्मक भावना , विचार नको आहेत त्यांनी या पुस्तक नक्की वाचावं. आयुष्याला एक आकार देण्याचे काम या पुस्तकांनी केल आहे.इतकंच म्हणेन.
Show Less