मन में है विश्वास

By विश्वास नांगरे पाटील

Share

Availability

available

Original Title

मन में है विश्वास

Publish Date

2016-01-01

Published Year

2016

ISBN

978-81-7434-962-0

Format

Paperback

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

मन मे है विश्वास . छान पुस्तक आहे

राजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर ते त्यांनी आपल्या शाळा हायस्कूल...Read More

sagar gautam jagtap

sagar gautam jagtap

×
मन मे है विश्वास . छान पुस्तक आहे
Share

राजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर ते त्यांनी आपल्या शाळा हायस्कूल कॉलेज मुंबई विद्यापीठ तसेच एस आय एस सी पूर्व परीक्षा त्यांनी हे सर्व त्यांच्या बोली भाषेत मांडले आहेत तर तसेच त्यांनी या पुस्तकांमध्ये शेवटचा अध्याय मध्ये मुलाखतीची बाजी मारण्यासाठी असं काही वेगळं केलं त्यासाठी त्यांना काय करावे लागले हे सर्व सांगितले आहे थोडक्यात त्यांनी त्यांची पूर्ण जीवन गाथा यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे

विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले

मन मे है, विश्वास हे पुस्तक माझे आवडते लेखक विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेलं आहे. ते माझे आवडते केव्हा पासून आहे हे मलाही आठवत नाही....Read More

Shaikh Jeenat Javeed

Shaikh Jeenat Javeed

×
विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले
Share

मन मे है, विश्वास

हे पुस्तक माझे आवडते लेखक विश्वास नांगरे पाटील
यांनी लिहिलेलं आहे. ते माझे आवडते केव्हा पासून आहे
हे मलाही आठवत नाही. मी त्यांचे भाषण खूप वेळा
ऐकले आहे. जवळ जवळ सर्वच भाषण मी ऐकले आहे.
मी खूप पुस्तक वाचली आहे आणि मला वाटत आपण
जेवढे पुस्तक वाचावी तेव्हढी कमीच असतात. माझ्या
वाचलेल्या पुस्तकांपैकी मला आवडलेली पुस्तक The
secret, कर हर मैदान फतेह, हलकं फुलकं इत्यादी
आहेत. तशी तर मला सर्वच पुस्तक आवडली आणि
पुस्तक हे ज्ञानी लोक लिहितात अस माझं मत आहे.
The secret हे पुस्तक Rhonda Byrne नी लिहिलेल आहे
आणि मराठी मा मराठे यांनी अनुवाद डॉ. रमा केलेल
आहे. कर हर मैदान फतेह हे पुस्तक माझे आवडते लेखक
विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिल आहे तसेच त्यांचे
मन मे है, विश्वास हे पुस्तक देखिल वाचल आहे. हलकं
फुलकं हे पुस्तक बा.ग जोशी आणि कलेक्टर साहिबा हे
पुस्तक कैलाश मांजू बिश्नाई यांनी लिहिलेल आहे.
यात है, विश्वास ही एक आत्मकथा आहे. त्यांचा पूर्ण
जिवनाचा प्रवास सांगितलेला आहे. त्यांचे बालपन,
त्यांचे शिक्षण, त्यांच्या जिवनातील काही हस्यास्पद
घटना, मित्रान सोबत केलेली मस्ती. जिवनात आलेले
काही अश्या घटना ज्यांना न घाबरता तोंड दिले, त्यांनी
केलेले प्रयत्न, जिद्द, शौर्य या सर्व गोष्टींना त्यांनी खूप
चांगल्या प्रकारे या पुस्तकात लिहीले आहे. तरुणांसाठी
त्यांनी लिहीलेले हे पुस्तक प्रेरणा देणारे आहे. जन्माला

आल्यानंतर जन्मभूमीचं काहीतरी देणं असतं.
जन्मभूमीचे ऋण आपण फेडू शकत नाही पण कमी मात्र
करू शकतो. तर ते कसे? देशाची, त्या जन्मभूमीची,
तेथिल लोकांची रक्षा.
करून: शिक्षण क्षेत्रात ते एक नावाजलेले व्यक्तिमत्व
आहे. लाखो तरुणांच्या मनावर, हृदयावर राज्य करणारे
विश्वास नांगरे पाटील. नावातच "विश्वास" आहे.
आडी-अडचणी त्यांच्या जीवनात खूप होत्या. त्यांची
आई ही काही जास्त शिकलेली नव्हती पण सर्व चांगल-
वाईट त्यांना कळत होतं. मुली होत्या म्हणून त्यांच्या
आईंनी खूप टोमणे खाल्ले. यावेळेस मुलगी नको
नाहीतर तुला सोडून दुसरं लग्न करू अशा खडतर
परिस्थितीत ग्रामदैवताला साकडं घालून
"विश्वासरावां"नी जन्म घेतला. मला नांदण्याचा
"विश्वास" दे! माझे आई मला "विश्वास" दे! यामुळे
बाळाचं नाव "विश्वास" ठेवण्यात आलं. बालपणापासून
ते नोकरीला लागेपर्यंत खूप खडतर आणि अशा घटना
जर सामान्य व्यक्ती सोबत आल्या असत्या तर खूप
पूर्वीच हार मानली असती. पोलिओ सारख्या
आजाराला मात देणे, बालपणातच सर्वांची इच्छा
नसताना ते सर्व मैदान जिंकणे हे सर्वसामान्य व्यक्ती
करूच शकत नाही. नंतर नोकरी लागल्यावरही
वेगवेगळ्या मोहिमा न घाबरता पार पाडणे. संपूर्ण
जीवनातच संघर्ष आहे.
२६/११ ची मोहीम मला तरी वाटतं हे कोणीच विसरू
शकत नाही. अलिला हल्ला आणि या हल्ल्यात सर्व
सुरक्षा दलांच्या अधिकारी लोकांनी केलेली कामगिरी
ही काही सोपी गोष्ट नव्हती. एक छोट्याश्या चुकीमुळे

खूप काही गमवलं असतं.
पुस्तकावर लिहिल्याप्रमाणेच जर मनात विश्वास असेल
तर सर्व गोष्टी साध्य होतात. मनात विश्वास, जिद्द,
कधीही न हार पचवण्याचं बळ असलं की सर्व साध्य
होऊ शकतं. अशक्य असं काहीच नसतं. फक्त विश्वास
ठेवायचा असतो. यामुळे मला हे पुस्तक आवडलं.
26/11 चा हल्ला अविस्मरणीय आहे. यात खूप लोक
मारले गेले. ज्यांनी ज्यांनी या हल्ल्यात आपले बलिदान
दिले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वर चरणी
प्रार्थना आणि जी हिम्मत दाखवली त्या त्याला सलाम.
विश्वास नांगरे पाटील म्हणतात, "मरण जवळून पाहिलं
की जगण्यातलं भयही निघून जातं". जवळून
मरण्यापेक्षा लढून मरू या निर्णयाने त्यांच्या मनात धैर्य
आलं. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशिक्षण, शौर्य आणि
त्याग भावनेच्या बळावर सहा तास ते लढले. मग
सुदैवाने कमांडर आणि त्यांचे साथीदार मोर्चा संभाळत
तासांशीला आले. अखेर अतिरेक्यांचा संहार झाला.
आजही ती रात्र आठवून अस्वस्थ होऊन जाते असे ते
सांगतात.
पुस्तकात असा एक प्रसंगही आहे ज्यात त्यांना
इंटरव्यूला जायला कोट नव्हता असं त्यांनी सांगितलय.
त्या एका कोटासाठी त्यांना किती त्रास सहन करावा
लागला. एवढा त्रास सहन करून जर कोणी सफल होत
असेल तर देवही त्याला, त्याच्या प्रयत्नांना नक्कीच यश
देतो. मी हे पुस्तक वाचण्याच्या अगोदर त्यांचं भाषण
ऐकलं होतं त्यातून एक कविता होती जी सुरेश भट
यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेतून जी भावना त्यांनी
व्यक्त केली ती प्रेरणादायी आहे. ती कविता आहे –

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही ॥

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी…
अडवू शकेल मला,
अजून अशी भिंत नाही ॥

माझी झोपडी जळण्याचे
केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही.
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर
डोळ्यात जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही….
येतील वादळे, खेटेल तुफान
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अड‌खळणे,
पावलांना पसंत नाही……
– सूरेश भट

या पुस्तकांतून खूप काही चांगले विचार, चांगल्या गोष्टी
मिळाल्या. अश्या मुलांच्या, तरुणांच्या आणि

वि‌द्यार्थ्यांच्या मनावर राज्या करणारे आय. पि. एस
'विश्वास नांगरे पाटील' यांचे पुस्तक वाचण्याचे आनंद
मिळाले. मी स्वतःला जगातील सवति भाग्यशाली
व्यक्ती समजेल .

मन मे है विश्वास

श्री.विश्वास नांगरे पाटील हे एक तरूण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबई वरच्या २६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या...Read More

SAYYED NADIMAHMED SHAUKAT

SAYYED NADIMAHMED SHAUKAT

×
मन मे है विश्वास
Share

श्री.विश्वास नांगरे पाटील हे एक तरूण,
तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून
महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबई वरच्या
२६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या धैर्यशाली
नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष पोलीस कारवाईतील सहभागासाठी
त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आहे. समाजाला बरोबर
घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्‌धतीमुळे त्यांच्या
लोकप्रियतेत सदैव भर पडत आहे. आपल्या या कर्तृत्वाने ते
तरुणांना आदर्श बनले नसते तरच नवल. आणि म्हणूनच
विश्वासजी आपल्या या आत्मकथनातून तरुणांशी संवाद
साधतायत. तरुणांना विशेषतः यूपीएससी एमपीएससी
सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण तरुणांना
स्वानुभावातून मार्गदर्शन करायच्या तळमळी पोटी त्यांनी हे
पुस्तक लिहिले आहे .२०० पानी पुस्तकाच्या सुरुवातीच्या
प्रकरणात त्यांनी आपलं बालपण, शाळा, कॉलेजच्या वयातल्या
आठवणी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती
लहानपणी खूप हुशार, सज्जन, एकपाठी, सर्वगुणसंपन्न असणार
असाच आपला समज असतो. पण ते लहानपणीचा खोडकर
मस्ती करणारा, चुका करणारा विश्वास आपल्यासमोर ठेवतात,
तरुणपणा तला टरबाज दुकाऱ्या करत फिरणारा, काही वेळा
चुकिच्या मार्गाने जाऊ लागलेल्या तरुणही आपल्या दिसतो

आणि हिच बाब आपल्याला अधिक भावते. शेकडा ९०% मुल
अशीच असतात. पण म्हणून ती सगळी वाया गेलेली नसतात,
ज्याप्रमाणे विश्वासजींना सावरणार, रागवणारे, ओरडणार,
कुणीतरी घरचे असतील, शिक्षक असतील किंवा कधी मित्र,
भेटत गेलंतसं जर त्यांनाही भेटलं तर तेही सावरू शकतील.
आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतील हा विचार
आपल्या मनात रुजतो.
. पुढची जवळपास दीडशे पानं त्यांच्या स्पर्धापरीक्षेच्या
अनुभवा ब‌द्दल आहेत. आत्ताचे यशस्वी पोलीस अधिकारी
आहेत म्हणजे त्यानी परीक्षा अगदी सहज डाव्या हातचा मळ
असल्यासारखी पास केली असेल. असा आपला ग्रह होऊ
शकतो. पण त्यांनाही यश- अपयश बघावं लागले, अशा
निराशेच्या झोकांड्या खाव्या लागल्या होत्या. पुन्हा पुन्हा
स्वतःला प्रोत्साहित करावं लागलं. वाईट सवयीमुळे संगती
पासून, प्रलोभनापासून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला काढाव
लागलं. गावाकडन आलेला मुलगा, इंग्रजी कच्च असणारा,
इंग्रजी संभाषण सफाईदारपणे न जमणारा मुलगा हा न्यूनगंड
त्यांना ही वाटला.
विश्वासरावांनी मराठी साहित्य, इतिहास ते विषय घेऊन
हुच्च शिक्षण घेतल्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण एका
पोलिसाने लिहिलेलं पुस्तक वाचतोय असं न' वाटता एखाद्या
सराईत लेखकाने लिहिलेलं आहे असचं वाटत राहत. मनगटात,
स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची,
लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष
करण्याची तयारी ठेवावी लागते. अशी माहिती सांगणारा
प्रेरणा दायिक पुस्तक आहे.

Man Mein Hai Vishwas

Very well written (poorly edited), inspiring and motivational book  A beautiful epic about his life journey, challenges and great feat for his nationquot  A much...Read More

Mhase Rohini Madhukar

Mhase Rohini Madhukar

×
Man Mein Hai Vishwas
Share

Very well written (poorly edited), inspiring and motivational
book  A beautiful epic about his life journey, challenges and great
feat for his nationquot  A much needed guidance and inspiration for the aspiring youth

मन में है विश्वास

Review By Prof. Suroshe Shailesh Waghaji, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेल्या "मन में है विश्वास " या पुस्तकामध्ये त्यांनी...Read More

Suroshe Shailesh Waghaji

Suroshe Shailesh Waghaji

×
मन में है विश्वास
Share

Review By Prof. Suroshe Shailesh Waghaji, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेल्या “मन में है विश्वास ” या पुस्तकामध्ये त्यांनी वाईट परिस्थितीमध्ये आपल्यावर आलेलं संकट कस दूर करायचं ,त्याला कस समोर जाऊन त्या संकटावर मात करायची आणि त्यावर विजय मिळवायचा याच आगळ वेगळ उदाहरण त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवना मधून दिलेलं आहे. खर तर माणूस गरिबीमध्ये जन्माला येणं ही त्याची चूक नाहीये ,पण गरिबीमध्ये मरण हे त्याची चूक असू शकते. लेखकांनी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतल ती परिस्थिती खूप हलाखीची होती परंतु त्यांचे स्वप्न आणि त्यांचे ध्येय एवढे मोठे होते की त्यांच्या ध्येयापुढे आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांपुढे त्यांना झोप लागत नव्हती. खरंच मला तर अस वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये असताना “मन में है विश्वास ” हे पुस्तक वाचावं हे पुस्तक एक उत्तम वाचन अनुभव देणारं आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने जीवनातील विश्वास आणि संघर्ष यांचा सखोल अभ्यास केला आहे. लेखक विश्वास नांगरे पाटील, हे एक प्रभावी व्यक्तिमत्व असलेले आणि विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये योगदान देणारे आहेत. त्यांच्या पुस्तकात, त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव, शिकवणी आणि मूल्ये यांचा संगम केला आहे, त्यांच्या लेखन अनुभवाने शालेय विद्यार्थी प्रेरित होतात. पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाने त्यांचे व्यक्तिगत अनुभव, परिवार आणि समाजातील संघर्ष यांच्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. हे अनुभव विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा ,एक नवीन दृष्टिकोन देतात आणि जीवनातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन करतात. त्यांची लेखन शैली सुस्पष्ट आहे आणि त्यात एक प्रकारचा संवादात्मक अनुभव आहे.
“मन में है विश्वास” हे पुस्तक केवळ आत्मविश्वास वाढविण्यासाठी नसून ते समाजातील विविध समस्यांवर विचार करण्यासाठी देखील प्रभावी आहे. लेखकाच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी आणि त्यात त्यांनी केलेली प्रगती वाचकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. त्यांनी विश्वास ठेवण्याचे महत्त्व सांगितले असून हा विश्वास त्यांच्यासाठी फक्त आत्मविश्वासापर्यंत मर्यादित नाही तर समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे.
संपूर्ण पुस्तक वाचताना, वाचकांना एक अशी प्रेरणा मिळते की, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचा संगम आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकतो. या पुस्तकाने एक अत्यंत महत्त्वाचे संदेश दिला आहे की, कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास गमवू नका. “मन में है विश्वास” हे पुस्तक प्रेरणादायक, विचारप्रवर्तक आणि जीवनात प्रगती करण्याचे महत्त्व सांगणारे आहे. वाचकांना ते आपल्या जीवनात लागू करण्याची प्रेरणा देते.

Submit Your Review