Availability
available
Original Title
मन मे हे विश्वास
Subject & College
Series
Publish Date
2016-05-01
Published Year
2016
Total Pages
230
ISBN 13
978 81 7434 962 0
Format
hardcover
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
अवघ्या तरुणाचे आयडॉल
तुमच्या वाक्यांचे सुधारित रूप खालीलप्रमाणे आहे: पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे. साधारण शैलीमुळे वाचकांना लेखकाशी जोडले गेल्याची भावना निर्माण होते. विश्वास नांगरे पाटील...Read More
Walunj Sanket Dadabhau
अवघ्या तरुणाचे आयडॉल
तुमच्या वाक्यांचे सुधारित रूप खालीलप्रमाणे आहे:
पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे. साधारण शैलीमुळे वाचकांना लेखकाशी जोडले गेल्याची भावना निर्माण होते.
विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या साध्या पाश्वभूमीपासून ते यशस्वी IPS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला आहे. त्यांच्या जीवनातील अडथळे, संघर्ष, तसेच स्वप्नपूर्ततेची प्रक्रिया वाचकांना प्रचंड प्रेरणा देते.
26/11 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका, त्यांच्या प्रवासातील काही आठवणी, आणि आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांचे वर्णन वाचकांना विचारप्रेरित करते.
हे पुस्तक केवळ स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर जीवनात प्रगती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. आत्मविश्वास, कठोर परिश्रम, आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा संगम साधण्याचे धडे हे पुस्तक देते.
सुधारित वाक्यं तुमच्या विचारांशी अधिक सुसंगत आणि स्पष्ट होईल अशी आशा आहे. काही अधिक मदतीची आवश्यकता आहे का?
विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे.
मन मे है, विश्वास हे पुस्तक माझे आवडते लेखक विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेलं आहे. ते माझे आवडते केव्हा पासून आहे हे मलाही आठवत नाही....Read More
Shaikh Jeenat Javeed
विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे.
मन मे है, विश्वास
हे पुस्तक माझे आवडते लेखक विश्वास नांगरे पाटील
यांनी लिहिलेलं आहे. ते माझे आवडते केव्हा पासून आहे
हे मलाही आठवत नाही. मी त्यांचे भाषण खूप वेळा
ऐकले आहे. जवळ जवळ सर्वच भाषण मी ऐकले आहे.
मी खूप पुस्तक वाचली आहे आणि मला वाटत आपण
जेवढे पुस्तक वाचावी तेव्हढी कमीच असतात. माझ्या
वाचलेल्या पुस्तकांपैकी मला आवडलेली पुस्तक The
secret, कर हर मैदान फतेह, हलकं फुलकं इत्यादी
आहेत. तशी तर मला सर्वच पुस्तक आवडली आणि
पुस्तक हे ज्ञानी लोक लिहितात अस माझं मत आहे.
The secret हे पुस्तक Rhonda Byrne नी लिहिलेल आहे
आणि मराठी मा मराठे यांनी अनुवाद डॉ. रमा केलेल
आहे. कर हर मैदान फतेह हे पुस्तक माझे आवडते लेखक
विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिल आहे तसेच त्यांचे
मन मे है, विश्वास हे पुस्तक देखिल वाचल आहे. हलकं
फुलकं हे पुस्तक बा.ग जोशी आणि कलेक्टर साहिबा हे
पुस्तक कैलाश मांजू बिश्नाई यांनी लिहिलेल आहे.
यात है, विश्वास ही एक आत्मकथा आहे. त्यांचा पूर्ण
जिवनाचा प्रवास सांगितलेला आहे. त्यांचे बालपन,
त्यांचे शिक्षण, त्यांच्या जिवनातील काही हस्यास्पद
घटना, मित्रान सोबत केलेली मस्ती. जिवनात आलेले
काही अश्या घटना ज्यांना न घाबरता तोंड दिले, त्यांनी
केलेले प्रयत्न, जिद्द, शौर्य या सर्व गोष्टींना त्यांनी खूप
चांगल्या प्रकारे या पुस्तकात लिहीले आहे. तरुणांसाठी
त्यांनी लिहीलेले हे पुस्तक प्रेरणा देणारे आहे. जन्माला
आल्यानंतर जन्मभूमीचं काहीतरी देणं असतं.
जन्मभूमीचे ऋण आपण फेडू शकत नाही पण कमी मात्र
करू शकतो. तर ते कसे? देशाची, त्या जन्मभूमीची,
तेथिल लोकांची रक्षा.
करून: शिक्षण क्षेत्रात ते एक नावाजलेले व्यक्तिमत्व
आहे. लाखो तरुणांच्या मनावर, हृदयावर राज्य करणारे
विश्वास नांगरे पाटील. नावातच विश्वास आहे.
आडी-अडचणी त्यांच्या जीवनात खूप होत्या. त्यांची
आई ही काही जास्त शिकलेली नव्हती पण सर्व चांगल-
वाईट त्यांना कळत होतं. मुली होत्या म्हणून त्यांच्या
आईंनी खूप टोमणे खाल्ले. यावेळेस मुलगी नको
नाहीतर तुला सोडून दुसरं लग्न करू अशा खडतर
परिस्थितीत ग्रामदैवताला साकडं घालून
विश्वासरावा नी जन्म घेतला. मला नांदण्याचा
विश्वा दे! माझे आई मला विश्वास दे! यामुळे
बाळाचं नाव विश्वास ठेवण्यात आलं. बालपणापासून
ते नोकरीला लागेपर्यंत खूप खडतर आणि अशा घटना
जर सामान्य व्यक्ती सोबत आल्या असत्या तर खूप
पूर्वीच हार मानली असती. पोलिओ सारख्या
आजाराला मात देणे, बालपणातच सर्वांची इच्छा
नसताना ते सर्व मैदान जिंकणे हे सर्वसामान्य व्यक्ती
करूच शकत नाही. नंतर नोकरी लागल्यावरही
वेगवेगळ्या मोहिमा न घाबरता पार पाडणे. संपूर्ण
जीवनातच संघर्ष आहे.
२६/११ ची मोहीम मला तरी वाटतं हे कोणीच विसरू
शकत नाही. अलिला हल्ला आणि या हल्ल्यात सर्व
सुरक्षा दलांच्या अधिकारी लोकांनी केलेली कामगिरी
ही काही सोपी गोष्ट नव्हती. एक छोट्याश्या चुकीमुळे
खूप काही गमवलं असतं.
पुस्तकावर लिहिल्याप्रमाणेच जर मनात विश्वास असेल
तर सर्व गोष्टी साध्य होतात. मनात विश्वास, जिद्द,
कधीही न हार पचवण्याचं बळ असलं की सर्व साध्य
होऊ शकतं. अशक्य असं काहीच नसतं. फक्त विश्वास
ठेवायचा असतो. यामुळे मला हे पुस्तक आवडलं.
26/11 चा हल्ला अविस्मरणीय आहे. यात खूप लोक
मारले गेले. ज्यांनी ज्यांनी या हल्ल्यात आपले बलिदान
दिले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वर चरणी
प्रार्थना आणि जी हिम्मत दाखवली त्या त्याला सलाम.
विश्वास नांगरे पाटील म्हणतात,मरण जवळून पाहिलं
की जगण्यातलं भयही निघून जातं. जवळून
मरण्यापेक्षा लढून मरू या निर्णयाने त्यांच्या मनात धैर्य
आलं. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशिक्षण, शौर्य आणि
त्याग भावनेच्या बळावर सहा तास ते लढले. मग
सुदैवाने कमांडर आणि त्यांचे साथीदार मोर्चा संभाळत
तासांशीला आले. अखेर अतिरेक्यांचा संहार झाला.
आजही ती रात्र आठवून अस्वस्थ होऊन जाते असे ते
सांगतात.
पुस्तकात असा एक प्रसंगही आहे ज्यात त्यांना
इंटरव्यूला जायला कोट नव्हता असं त्यांनी सांगितलय.
त्या एका कोटासाठी त्यांना किती त्रास सहन करावा
लागला. एवढा त्रास सहन करून जर कोणी सफल होत
असेल तर देवही त्याला, त्याच्या प्रयत्नांना नक्कीच यश
देतो. मी हे पुस्तक वाचण्याच्या अगोदर त्यांचं भाषण
ऐकलं होतं त्यातून एक कविता होती जी सुरेश भट
यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेतून जी भावना त्यांनी
व्यक्त केली ती प्रेरणादायी आहे. ती कविता आहे –
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही ॥
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी…
अडवू शकेल मला,
अजून अशी भिंत नाही ॥
माझी झोपडी जळण्याचे
केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही.
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर
डोळ्यात जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही….
येतील वादळे, खेटेल तुफान
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही……
– सूरेश भट
या पुस्तकांतून खूप काही चांगले विचार, चांगल्या गोष्टी
मिळाल्या. अश्या मुलांच्या, तरुणांच्या आणि
विद्यार्थ्यांच्या मनावर राज्या करणारे आय. पि. एस
विश्वास नांगरे पाटील यांचे पुस्तक वाचण्याचे आनंद
मिळाले. मी स्वतःला जगातील सवति भाग्यशाली
व्यक्ती समजेल .
