Availability
available
Original Title
महामाया निळावंती
Subject & College
Series
Publish Date
2024-07-31
Published Year
2024
Publisher, Place
Total Pages
372
ISBN
978-9394266285
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
निळावंती
निळावंती पुस्तक मी पूर्ण वाचले ते पुस्तक मला खूप आवडले कारण १.निळावंती पुस्तकांचे मला एक वेगेळेच अस्तित्त्व जाणवले. 2.निळावंती पुस्तकातील सर्व किद्रार मला खरे वाटतात.पण...Read More
मेहबूब शेख, टी.वाय.बी.कॉम, तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती
निळावंती
निळावंती पुस्तक मी पूर्ण वाचले ते पुस्तक मला खूप आवडले कारण
१.निळावंती पुस्तकांचे मला एक वेगेळेच अस्तित्त्व जाणवले.
2.निळावंती पुस्तकातील सर्व किद्रार मला खरे वाटतात.पण हे असे असू शकत हि नाही पण मला खरे वाटतात.
३.निळावंती पुस्तकातील सर्व घडलेल्या घटना मला जाणवले दुख, आनंद, प्रेम, सुख, अशा अनेक भावना अनुभवल्या आहेत .
सर्वात विशेष बाब म्हणजे
४. मला हे पुस्तक माझ्या वडिलांनी वाचयला सांगितले त्यानंतर एका आठवड्याने हे पुस्तक टी.सी. कॉलेज च्या ग्रंथालयात मिळाले.
५.निळावंती पुस्तक वाचू नको असे मला खूपजण म्हणाले त्यापेकी माझी आई, माझी मैत्रीण आणि आजी म्हणाले होते.
६. प्राची माझी मैत्रीण म्हणली होती या पुस्तकाने वाईट घडत, पण मी अफवांवर विश्वास ठेवला नाही. आणि मी निळावंती पुस्तक पूर्ण वाचले.
माझा अनुभव या पुस्तकाबदल निळावंती पुस्तक वाचून मला असे वाटते कि माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही टोकाला जावू शकतो.
महामाया निळावंती
ऋतुजा रंधवन दुसरे वर्ष बी.कॉम. एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आळंदी (देवाची) पुणे पुस्तक परीक्षण साल १९९२ बंगलोर मधील एका हॉस्पिटल मधून एक पिता...Read More
ऋतुजा रंधवन
महामाया निळावंती
ऋतुजा रंधवन दुसरे वर्ष बी.कॉम. एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आळंदी (देवाची) पुणे
पुस्तक परीक्षण
साल १९९२ बंगलोर मधील एका हॉस्पिटल मधून एक पिता आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन अचानक गायब होतो आणि तो येतो सह्याद्रीच्या जंगलात कशाला तर निळावंती ग्रंथाचा
शोधात हो हा तोच ग्रंथ आहे याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. निळावंती म्हणजेच पशुपक्ष्यांशी बोलणारी जिच्या नावाने निळावंती ग्रंथ आहे. निसर्गातल्या प्रत्येक जीवाला
त्याच्या मधल्या चेतन्याची जाणीव करून देणारी ही आदिमाया म्हणजेच महामाया निळावंती तिला पशु पक्षांची भाषा समजते आपला दख्खनच्या भागात वेगवेगळ्या रूपात पिढ्यानपिढा सांगितली जाणारी ही कथा हा ग्रंथ जो कोणी वाचतो त्याला एकतर वेड तरी लागतं नाहीतर तो स्वतःचा आयुष्य तरी गमावतो विशिष्ट विधी करून जर हा ग्रंथ वाचला तर वाचणाऱ्याला प्राण्यांच्या भाषेची सिद्धी मिळते. पण या फक्त वर्षा आणि वर्षांपासून ऐकत आलेल्या आजी आणि पणजी आजी यांच्यापासून ऐकत आलेल्या दंतकथाच आहे या किती खऱ्या किती खोट्या याबद्दल माहिती नाही पण लेखक ही निळावंतीची कथा खरी असल्याचे सांगतात. तो याच ग्रंथाच्या शोधात सह्याद्रीत येतो पण त्याला सापडते ते खुद्द निळावंती.एक गोष्ट सांगितले जाते ४०० वर्षांपूर्वी बाजीने निळावंतीला मारून टाकलं तर बाजूने निळावंतीला मारलंय तर विक्रमला सापडते ती कोण? जर ती खरच निळावंती आहे तर ती आत्तासुद्धा सह्याद्रीच्या जंगलात आहे का? आणि मग तिची भाषा कोणती?
फार पूर्वी भिलम राजा निळावंतीसाठी सह्याद्रीत आला त्यानंतर ४०० वर्षांपूर्वी बाजींद आला आणि आता विक्रम ही कथा गोल चक्रविवा सारखी गुंतलेली मिस्टरी, सस्पेन्स, लव, पॅरेलल युनिव्हर्स, इमोशन, डिटॅचमेंट अटॅचमेंट, या सगळ्या गोष्टी यात आहेत. या प्रवासात विक्रमला वेगवेगळ्या लोकांना सामोरे जावे लागते कथा पुढे बरेच वळण घेते का त्याची वळण मध्येच कधीकधी कंटाळवाणी वाटतात पण जिथे सगळ्या गोष्टी एकत्र येतात तो शेवट खूप छान वाटतो.मला तो खूप चांगला वाटला पुस्तक लिहिण्यासाठी घेतलेले लेखकाची मेहनत जाणवते. लेखकाने यात निळावती चंपू यामधील काही भाग पण दिलेला आहे. पृथ्वीच्या उगमापासून सुरू झालेला प्रवास तो असा सुरू राहतो. इतिहास आणि इंडोलॉजीच्या अभ्यासकांना भेटून त्यांनी याबद्दलची माहिती गोळा केली असावी. या पुस्तकाचे वर्णन अनेक जण सायफाय म्हणजे विज्ञान कथा असं करतात तरी यातील विज्ञान कथेचा भाग हा जेमतेमच आहे. अशी पुस्तक मराठीत भरपूर यावेत असं वाटतं. एकदा हातात घेतल्यानंतर ही कादंबरी संपेपर्यंतच वाचत राहावे असे वाटते . पुस्तकाचे मुखपृष्ठ केलंय पियुष मोरे. तुम्हाला निळावंती बद्दल उत्सुकता असेल तर महामाया निळावंती सुमेध यांनी लिहिलेलं हे पुस्तक एकदा नक्की वाचा.
