Original Title
यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये
Subject & College
Publish Date
2018-01-01
Published Year
2018
Publisher, Place
Total Pages
436
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये
Book Review : WAD KAVITA BALU, MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik. गेल्या काही वर्षांत, स्वतःच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यातील स्वतःच्या...Read More
WAD KAVITA BALU
यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये
Book Review : WAD KAVITA BALU, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
गेल्या काही वर्षांत, स्वतःच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यातील स्वतःच्या भूमिकेविषयीची जागरूकता विशेषत्वाने वाढली आहे. परिणामी, मानसशास्त्र ही विज्ञानशाखा अधिकाधिक लोकप्रिय होत आहे; कारण मानवी जीवनात तिचे विविध प्रकारचे उपयोजन आहे आणि माणसाला मिळणारे यश व त्याचा आनंद यांमध्ये ती लक्षणीय प्रमाणात वाढ करू शकते. विविध विद्याशाखांतील विद्यार्थी आणि प्रौढांनासुद्धा या विषयाची गोडी वाटत आहे आणि मानसशास्त्राच्या मदतीने स्वतःमधील सुप्त गुर्गाचा पूर्णपणे वापर कसा करायचा ते त्यांना जाणून घ्यावेसे वाटते. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा एक प्रयत्न आहे. पालक आणि गृहिणीसाठीही ते तितकेच उपयोगी आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर, वाचकांना स्वतःचे भावनिक, बोधात्मक, प्रेरणात्मक पैलू, मूल्याभिमुखता, संप्रेषणाच्या शैली आणि इतरांशी जोडले जाणारे भावनिक बंध यांसारख्या बाजू समजून जून घेण्यासाठीची मर्मदृष्टी प्राप्त होऊ शकेल.
हे पुस्तक वाचताना, विचारप्रक्रियेच्या विशिष्ट पद्धतीमुळे मिळणारी सकारात्मक फलिते, जसे निर्भीडपणा आणि सकारात्मक व अंतःस्फूर्त विचारप्रक्रिया यांविषयीचे ज्ञान प्राप्त होऊ शकेल.
हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्राचे सिद्धान्त, संशोधन आणि उपयोजनांचे सुलभ भाषेत मांडलेले एक वेगळे आणि सखोल सादरीकरण आहे. एक व्यक्तिगतरित्या समाधानी आणि सामाजिकदृष्ट्या परिणामकारक आयुष्य जगण्यासाठी व्यक्तीमध्ये जे मानसिक बदल आवश्यक असतात ते समजून घेता यावेत अशा पद्धतीने या पुस्तकातील प्रकरणांची रचना केलेली आहे. हे पुस्तक चार विभागांमध्ये विभागलेले आहे.
यातील पहिला भाग स्वतःविषयीचे आकलन अधिक वाढविण्याविषयी आहे. स्वतःचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून स्वतःचा स्वीकार करणे हा सर्व सकारात्मक बदलांपूर्वीचा आरंभबिंदू आहे. योग्य आणि वास्तवदर्शी आत्मप्रतिष्ठा विकसित करून ती स्वीकारणे हे एक फार मोठे संपादन आहे. स्व-व्यवस्थापन हे शिस्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. वाचकाने या माहितीचा उपयोग स्वतःसाठी करण्याकरिता प्रेरित व्हावे यासाठी प्रकरण १ आणि २ मध्ये या विषयांवर सखोल चर्चा केली आहे. मानवी जीवनात ताणाचा अनुभव ही न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. ताणावरील सैद्धान्तिक चर्चा आणि परिणाम यांवर प्रकरण ३ मध्ये चर्चा केली असून ताणावर मात करण्याची तंत्रेही सांगितलेली आहेत. मूल्ये, नैतिकता, आचारनियम आणि शिष्टाचारांचे महत्त्व आणि मानवी जीवनावरील त्यांचे परिणाम या गोष्टींचा विचार प्रकरण ४ मध्ये केलेला आहे.
भाग पहिला
प्रकरण पहिले ; आत्मभान
स्वतःची ओळख ,आत्मप्रतिष्ठेची संकल्पना ,नकारात्मक आत्मप्रतिष्ठा ,सकारात्म आत्मप्रतिष्ठ, सारांश ,प्रेरणा, अंतर्गत प्रेरणा वाढविणे ,गरजा आणि प्रचोदना कर्तृत्वविषयक प्रेरणा ,सारांश, सर्जनशीलता, सर्जनशीलतेचे स्वरूप आणि व्याख्या या गोष्टीचा माहिती दिली आहे .
भाग दुसरा
प्रकरण दुसरे ; संप्रेषण आणि विचारप्रकिया
प्रेषणाचे स्वरूप, महत्त्व आणि संप्रेषणाची प्राथमिक प्रारूपे, निर्धारक आणि प्रकसंप्रेषण शैली. माणूस हा वेगवेगळ्या उदेस्याने संप्रेषण करतो .स्वरूप आणि प्रकार ,संकल्पना युक्तिवाद विचारप्रक्रियेशी संबंधित सिद्धान्त, आणि घटक ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरुवात केली आहे .
भाग तिसरा
प्रकरण तिसरे ; भावना
प्रेम, सुख ,सारांश, राग, आणि भीती, रागाचा परिचय , रागाचे स्वरूप रागाची कारणे रागाच्या अभिव्यक्तीचे प्रकार रागाची कार्ये ,भीती,चिंता ,सारांश भावनिक नियमनासाठी, आपण आपल्या स्वतःच्या अनुभवांचे आणि भावनांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले पाहिजे. भावनिक शोषणासारख्या गैरप्रकारांमुळे मनावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात.
भाग चौथा
प्रकरण चौथे ; इतरांशी असलेले भावनिक सबंध;
तदनुभूतीचे स्वरूप
तदनुभूतीचे प्रकार, तदनुभूतीचे सहसंबंधी घटकइतर संबंधित संकल्पना ,तदनुभूतीचा विकास तदनुभूतीची उपयोग आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांत होऊ शकतो . सारांश ,मैत्री मैत्रीचे स्वरूप जीवनाच्या विविध टप्प्यांवर मैत्रीच्या प्रवाहात होणारे बदल मैत्रीचे प्रकार मैत्रीचे सहसंबंधी घटक मैत्रीचे लाभ हे भावनिकइतरांशी असलेले भावनिक सबंध.
निष्कर्ष
आरती देशपांडे यांनी प्रकाशीत केलेले यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये यामध्ये प्रेरणा ,भावना,विचार सबंध ,जीवनातील उद्दिष्टे यांचा आढावा घेतला आहे .यांचा सखोल अभ्यास या पाठ्यपुस्तक पुस्तकाच्या माध्यमातून उपयुक्त ठरते.
