Availability
upcoming
Original Title
यशाची गुरुकिल्ली
Subject & College
Publish Date
2000-01-01
Published Year
2000
Publisher, Place
Total Pages
90
Format
Hardcover, Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
Pawar Anuj Dipak
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी - पवार अनुज दिपक वर्ग – एफ .वाय.बी.सी.ए....Read More
Vishal Jadhav
Pawar Anuj Dipak
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – पवार अनुज दिपक
वर्ग – एफ .वाय.बी.सी.ए.
पुस्तकाचे नाव – यशाची गुरुकिल्ली
लेखकाचे नाव – आशा परुळेकर
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
जीवनात यशस्वी होणे म्हणजे आकाशातील चंद्राची अपेक्षा धरणे नव्हे. यश हे अप्राप्य नसते. अनेक व्यक्तिगुणांचे पैलू त्याला चिकटलेले असतात. यश हे माणसाचे भाग्य,.त्याचे सुख-समाधान ठरविण्यास मदत करणारे असते. आपण भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासाची पाने उलटून बघितली, तर त्याची आपल्याला प्रचीती येईल. हेलन केलरने आपल्या अंधपणावर अपार प्रयत्न व कष्ट करून मात मिळविली. डेमोस्टथेनिस हा तोतरा होता. पण महत प्रयत्न करून त्याने आपल्या व्यंगावर केवळ मातच मिळविली. असे नाही, तर तो उत्तम वक्ता बनला. शिवाजी महाराजांनी अपार पराक्रम, धैर्य, चिकाटी, मिष्ठा या माध्यमांतून हिंदवी स्वराज्य प्राप्त केले.
यशाची गुरुकिल्ली : प्रगती करण्यासाठी एकाहून एक सरस मार्ग सांगितले आहे, विजयाचा संकल्प संधीचे सोने, शक्तीचे भांडार ,विनम्रता ,साहस ,भाषण कौशल्य, स्वावलंबन इत्यादी अशा प्रगतीच्या अनेक पर्यायाचा आपण वापर केल्यास आपल्याला निश्चित मदत करतात
Jadhav Gopal Jay, Student, SY BBA , Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College of Arts, Science & Commerce Nigdi-Pune -44 . जीवनात...Read More
Dr. Uday Jadhav
यशाची गुरुकिल्ली : प्रगती करण्यासाठी एकाहून एक सरस मार्ग सांगितले आहे, विजयाचा संकल्प संधीचे सोने, शक्तीचे भांडार ,विनम्रता ,साहस ,भाषण कौशल्य, स्वावलंबन इत्यादी अशा प्रगतीच्या अनेक पर्यायाचा आपण वापर केल्यास आपल्याला निश्चित मदत करतात
Jadhav Gopal Jay, Student, SY BBA ,
Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College of Arts, Science & Commerce Nigdi-Pune -44 .
जीवनात यशस्वी व्हायला कुणाला आवडत नाही, पण त्यासाठी अथक प्रयत्न आणि जिद्दीची आस धरावी लागते, न डगमगता आत्मविश्वासाने जो वाटचाल करतो तो नक्कीच यशस्वी होतो. दृढ संकल्प, अतूट निश्चय हाच एक मुख्य गुण आहे, त्यामुळे अनेक व्यक्ती मोठी कामे करून दाखवतात. अतुट निश्चय, सतत संघर्ष, सराव आणि वेगळे साहस यांच्यावर ते नक्की विजयी होतात.
लेखिका अत्यंत साध्या आणि प्रभावी भाषेत आपले विचार मांडते. तिच्या लिखाणामुळे वाचकांना प्रेरणा मिळते
पुस्तकात आशा पारुळेकर यांनी विविध यशस्वी व्यक्तींच्या कथेचा समावेश केला आहे. त्यांच्यातील संघर्ष, मेहनत, आणि त्यांनी ओलांडलेली अडचणींवर चर्चा केली आहे. त्यांनी समजावून सांगितले आहे की, यश प्राप्त करण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता आणि क्षमता आवश्यक नाही, तर त्याचबरोबर चिकाटी, सकारात्मक दृषटिकोन आणि आत्मविश्वास देखील खूप महत्त्वाचा आहे.
