Original Title
यश तुमच्या हातात
Subject & College
Series
Publish Date
2002-01-01
Published Year
2002
Total Pages
304
ISBN 13
9780333938010
Language
MARATHI
Translator
Kinikar Meena
Readers Feedback
यश तुमच्या हातात
साळवे साक्षी रोहिदास , वर्ग - एस वाय बी ए मराठी विभाग रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर जि. आहिल्यानगर यश तुमच्या हातात, लेखक -...Read More
साळवे साक्षी रोहिदास
यश तुमच्या हातात
साळवे साक्षी रोहिदास , वर्ग – एस वाय बी ए मराठी विभाग रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर जि. आहिल्यानगर
यश तुमच्या हातात, लेखक – शिव खेरा
प्रस्तावना:
या पुस्तकाचे स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तके सारखे आहे. यशासाठी वास्तुरचनेप्रमाणे पायाभरणी करण्यापासून ते यशाची कर्तुत्वाची भक्कम इमारत कशी उभी करावी, विजयाची कमान उद्दिष्ट पूर्ती कशी करावी, त्यासाठी कोणती साधने वापरावी इथपासून ते त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करणे उचित आहे. या सर्व बाबींचे समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे. तसं पाहिले तर पाककले ची माहिती देणाऱ्या पुस्तकासारखा आहे, असेही म्हणतात म्हणता येईल. यशासाठी आवश्यक घटक त्या मार्गाची तत्त्व आवश्यक कृती यात दिलेली आहे. त्याचा अवलंब करून तुम्हाला निश्चित यश प्राप्ती करून घेता येईल. मुख्यतः हे एक मार्गदर्शनपर पुस्तक आहे, याशिवाय नुसती स्वप्न बघून चालत नाही. आपलं स्वतःच सुक्त सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्प्यात कसं यश मिळायचं याचा मार्गदर्शक करणार हे पुस्तक होय.
सारांश:
एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे रंगाचे फुगे असायची. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरच्या हेलियम वायूभरून हवेत सोडायचा हवेत जाणारा फुगा बघून फुगा घेण्यासाठी गर्दी मुले करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होईल असे तो दिवसभर करत असे. एकदा फुगेवालाच्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्याजवळ आपलं जाकीट ओढतय त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता, मुलाने त्याला विचारलं, “काळा रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का”? मुलाच्या या जिज्ञासच त्याला कौतुक वाटलं आणि त्यांने उत्तर दिलं, “बाळ फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे, त्यामुळे तो हवेत उंच उंच जातो”. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असतं, त्यामुळे आपण उंचीवर असतो अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती यशाचे मोजमाप होय. तुमचं काम तुम्ही व्यवस्थित केलं आहे आणि ते साध्य करायचं आहे जे उत्तमप्रकारे साध्य केलं आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते खऱ्या आयुष्याचं मोजमाप म्हणता येईल. यश आयुष्यातील आपण प्राप्त केलेल्या पदावरून किंवा स्थानावरून मोजता येत नाही तर ते स्थान किंवा दर्जा मिळवण्यासाठी जे अडथळे पार करावे लागतात, त्यावरून ठरतं. आयुष्यातील यश इतरांच्या तुलनेने आपली परिस्थिती कशी आहे यावरून मोजता येत नाही तर काय करण्याची आपली कुवत किंवा क्षमता आहे आणि त्या संदर्भात प्रत्यक्ष काय आहे. त्याच्या तुलनेत ठरतं यशस्वी माणसाची स्पर्धा स्वतःचीच चालू असते. आपल्या कामगिरीत सतत सुधारणा करत असतात आयुष्यात आपण किती उंची गाठली यावर रेषाचे मोजमाप होत नाही, तर त्याखाली पडल्यावर आपण पुन्हा किती वेळा उसळी घेतो व उसळीवर उभे राहतो यावरून ते मोजता येतं. पडल्यावरही पुन्हा उसळी घेऊन उभे राहण्याची जी क्षमता आहे तिच्यावर यश ठरतं.
विश्लेषण:
या पुस्तकातील, तत्त्व वैश्विक आहेत. ती कोणत्याही परिस्थितीला, संस्थेला किंवा देशाला लागू होतात. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे ‘सत्य हे शाश्वत आहे’. या पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी पुल्लिंगी केले आहे ते केवळ लेखकाच्या सोयीच्या दृष्टीने. पुस्तकातील तत्त्व ही स्त्री-पुरुष दोघांनाही सारखी लागू पडतात. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे यशस्वी होतात असे नाही तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे होतात; या गृहीतकावर ही तत्व आधारलेली आहेत.
या पुस्तकांमध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. प्रेरणा, आत्मप्रतिष्ठा, परस्परसंबंध – परस्परसंवाद कौशल्य आणि विकास, सुप्त मन आणि सवयी, आपले ध्येय ठरविणे व साह्य करणे , नीतिमूल्य आणि दूरदृष्टी अशा विविध गोष्टी ज्या दैनंदिन आयुष्यामध्ये मनाला प्रेरणा व ऊर्जा देणारे व सकारात्मक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक आहे. यश कसे प्राप्त करावे व यशा संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या काव्यरूपात दिलेले आहेत. “यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं, असा नसून अंतिम ध्येय गाठणे असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे”. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे
ताकत आणि कमकुवत बाजू :
आयुष्यात अक्षरक्षा: भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात. नशिबाने जे घडले ते व घडेल ते सर्व स्वीकारत राहतात. त्यातील काही चुकूनमाकून, अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेकजण वैपल्याने ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश आणि असमाधानी लोकांसाठी नाही. यश प्राप्तीसाठी लागणारा निर्धार तर त्याच्याजवळ नसतोच, पण यश मिळण्यासाठी आवश्यक असणारी वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याची त्याची तयारी नसते. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात ही वस्तुस्थिती तुम्हाला आताच्या आयुष्यापेक्षा अधिक समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे हे दर्शविते. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य व सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे
वैयक्तिक विचार वैयक्तिक विचार :
जेव्हा मी हे पुस्तक हातामध्ये घेतलं तेव्हाच मला ते प्रचंड आवडलं कारण पुस्तकाचे मुखपृष्ठ हेच आकर्षक व ‘विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात’. हे वाक्य प्रेरणादायी वाटलं. पुस्तक वाचत असताना प्रत्येक ओळीमधून एक नवीन ऊर्जा भेटते. मानवाच्या आयुष्यातील असमाधान दूर करून नवीन आयुष्य कसे जगायचे याच्यातून शिकतात. अपयश आले तरी खचून न जाता परत कसे उभे राहायचे याची प्रेरणा या पुस्तकात आहे. हे पुस्तक सकारात्मक दृष्टिकोन, प्रेरणा, यशाची ध्येय परस्परसंबंध- परस्परसंवाद आणि विकास हे सर्व या पुस्तकात दिलेले आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन व यशाचे रहस्य या पुस्तकात दडलेला आहे. कारण पुस्तकाचे शीर्षक आहे , ‘यश तुमच्या हातात’ तुमच्या सकारात्मकदृष्टीने प्रयत्न करत रहा, हे पुस्तक विस्कटलेले आयुष्य सुंदर बनवते.
निष्कर्ष :
हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचले पाहिजे कारण हे पुस्तक सकारात्मक दृष्टिकोन, प्रेरणा व यश प्राप्त करण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे. हे सर्व या पुस्तकात नमूद केलेले आहे. हे पुस्तक ध्येय प्राप्त करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात व इतर गोष्टीत अपयशी असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे, कारण यश हे तुमच्या हातात आहे. या शीर्षकाप्रमाणे हे पुस्तक प्रेरणादायी आहे. पुस्तक वाचून मी पेरीत झाले आहे, प्रत्येकाने यश प्राप्तीसाठी एकदा तरी हे पुस्तक अवश्य वाचा. जीवनात यश कसे मिळवायचं याच रहस्य यशस्वी माणसं तुम्हाला सांगू शकतील. जगाकडून एखाद्याने काय घेतलं म्हणून त्याचा सन्मान होत नसतो, तर त्याने जगाला जे दिलं त्याबद्दल त्याचा सन्मान होत असतो.
यश तुमच्या हातात-Winners don’t do different things. They do things differently
येस यू कॅन विन" - शिव खेरा "येस यू कॅन विन" हे शिव खेरा लिखित प्रेरणादायी पुस्तक आहे जे व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचारसरणी, आणि यशस्वी...Read More
Jayshri Jadhav
यश तुमच्या हातात-Winners don’t do different things. They do things differently
येस यू कॅन विन” – शिव खेरा
“येस यू कॅन विन” हे शिव खेरा लिखित प्रेरणादायी पुस्तक आहे जे व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचारसरणी, आणि यशस्वी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करते. हे पुस्तक 1998 साली प्रकाशित झाले आणि त्याने लाखो लोकांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यास प्रेरित केले. हे पुस्तक इंग्रजीत लिहिलेले असले तरी त्याचे मराठीसह विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत, ज्यामुळे हे व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचले आहे.
🔰पुस्तकाचा मुख्य उद्देश:✍️
या पुस्तकाचा प्रमुख उद्देश…वाचकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे, स्वप्नं पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यास प्रेरित करणे. शिव खेरा यांनी पुस्तकात नमूद केले आहे की यश म्हणजे केवळ श्रीमंती किंवा प्रसिद्धी नाही, तर आयुष्यातील समाधान आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे.
📕ह्या पुस्तकातील प्रमुख विषय आणि संकल्पना:
1. सकारात्मक विचारसरणीची शक्ती:
पुस्तकात सकारात्मक विचारसरणीचा प्रभावीपणे उल्लेख केला आहे. एखाद्या व्यक्तीच्या यशात त्याच्या दृष्टिकोनाचा मोठा वाटा असतो. सकारात्मक विचार व्यक्तीला समस्यांकडे संधी म्हणून पाहायला शिकवतात.
2. ध्येय निश्चिती आणि योजना:
यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. शिव खेरा यांनी स्पष्ट केले आहे की अस्पष्ट ध्येय व्यक्तीला दिशाहीन करते. ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट योजना आखणे आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
3. आत्मविश्वास आणि आत्मप्रेरणा:
आत्मविश्वास हे यशाचे मुख्य शस्त्र आहे. पुस्तकात उदाहरणांसह हे समजावले आहे की आत्मविश्वासाने प्रेरित व्यक्ती कोणतीही अडचण पार करू शकते. आत्मप्रेरणा म्हणजे बाहेरून नव्हे तर आतून प्रेरणा घेणे.
4. चरित्र आणि प्रामाणिकपणा:
यश मिळवण्यासाठी फक्त कौशल्य पुरेसे नाही, तर चांगले चरित्र आणि प्रामाणिकपणाही महत्त्वाचा आहे. पुस्तकात म्हटले आहे की चांगले मूल्य आणि नैतिकता टिकवणे दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे.
5. सकारात्मक सवयी:
दैनंदिन जीवनात सकारात्मक सवयी जोपासणे आवश्यक आहे. नियमितपणे चांगल्या सवयी अंगीकारल्यास यशस्वी होणे सोपे होते. पुस्तकात वेळेचे व्यवस्थापन, वाचनाची सवय आणि सातत्याने शिकण्याचे महत्त्व सांगितले आहे.
6. अपयशाची भूमिका:
यशाच्या प्रवासात अपयश अपरिहार्य असते. शिव खेरा यांनी अपयशाला शत्रू नसून शिक्षक मानण्याचा सल्ला दिला आहे. अपयशातून शिकून पुढे जाणे हे यश मिळवण्याचा मार्ग आहे.
7. दृष्टीकोन बदलाचा प्रभाव:
एकाच परिस्थितीकडे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीकोनातून पाहता येते. योग्य दृष्टीकोन स्वीकारल्यास कोणतीही समस्या सोडवता येते. पुस्तकात उदाहरणांसह दृष्टीकोनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
8. प्रभावी संवाद कौशल्य:
यशस्वी होण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य आवश्यक आहे. आपले विचार स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने मांडणे, इतरांचे ऐकणे आणि समजून घेणे हे महत्त्वाचे आहे.
9. टीमवर्क आणि नेतृत्व:
एकटे यशस्वी होणे कठीण असते. शिव खेरा यांनी कार्यसंघातील सहकार्याचे महत्त्व आणि नेतृत्वगुणांची गरज अधोरेखित केली आहे. चांगला नेता हा प्रेरक असतो आणि तो आपल्या टीमला यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतो.
10. सतत सुधारणा आणि शिक्षण:
यशाच्या मार्गावर सतत शिकणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. पुस्तकात नवीन कौशल्ये शिकण्याचे आणि अनुभवातून शिकण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
📕ह्या पुस्तकाची भाषा आणि शैली:
पुस्तकाची भाषा सोपी, सरळ आणि प्रभावी आहे. लेखकाने अनेक प्रेरणादायी किस्से, उदाहरणे आणि सुविचार वापरले आहेत जे वाचकाला सहज समजतात आणि प्रेरित करतात. व्यावहारिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे पुस्तक वाचकाला कृती करण्यास उद्युक्त करते.
🔰”येस यू कॅन विन” पुस्तकाचे वैशिष्ट्य:✍️
-पुस्तकात वेगवेगळ्या यशस्वी व्यक्तींच्या अनुभवांचे उदाहरण देऊन मुद्दे समजावले आहेत.
-बोधकथा,सुविचार आणि कोट्सचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
-प्रश्नोत्तरे, स्वमूल्यांकन आणि व्यावहारिक सल्ले दिले आहेत.
📕पुस्तकातील काही प्रेरणादायक विचार…✍️
1. “जिंकण्यासाठी जन्म घेण्याची गरज नाही, जिंकण्यासाठी विचारांची गरज असते.”
(You don’t need to be born a winner, you need to become one.)
2. “यशस्वी लोक संधी शोधतात, अपयशी लोक कारणं शोधतात.”
(Winners look for solutions, losers look for excuses.)
3. “सकारात्मक विचार म्हणजे यशाची पहिली पायरी आहे.”
(Positive thinking is the first step towards success.)
4. “तुमचे भविष्य घडवायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करा.”
(If you want to shape your future, start today.)
5. “अपयश ही यशाची पहिली पायरी असते.”
(Failure is the first step towards success.)
6. “तुम्ही जे पेरता तेच उगवतं, म्हणून चांगले विचार पेरा.”
(What you sow is what you reap, so sow good thoughts.)
7. “यश हे काही योगायोगाने मिळत नाही, ते मेहनतीने मिळते.”
(Success is not by chance, it is by choice.)
8. “तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.”
(Believe in yourself, and the world will believe in you.)
9. “सपने बघणे थांबवू नका, कारण स्वप्नच तुमचं भविष्य घडवतात.”
(Don’t stop dreaming because dreams shape your future.)
10. “संधी ही स्वतः निर्माण करावी लागते, ती कधीच आपोआप येत नाही.”
(Opportunities are not given, they are created.)
हे विचार आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रेरणा देतात.
📕ह्या पुस्तकाचे सकारात्मक पैलू:✍️
-प्रेरणादायी आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारे.
-सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेले.
-व्यावहारिक उदाहरणे आणि सल्ले.
🔰काही मर्यादा:
-काही भागात विचारांची पुनरावृत्ती जाणवते.
-आधीपासून स्व-सहाय्य पुस्तक वाचणाऱ्यांना यातील काही संकल्पना सामान्य वाटू शकतात.
परंतु….. मित्रांनो… ✍️
“येस यू कॅन विन” हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे. यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, कठोर परिश्रम, आणि योग्य मूल्यांची गरज हे पुस्तक प्रभावीपणे पटवून देते. हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे.
शिव खेरा यांचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि आयुष्यातील अडथळ्यांवर मात करून यशाच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रेरित करते. “येस यू कॅन विन” म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून, कठोर परिश्रम करून, सकारात्मक दृष्टिकोनाने यश मिळवण्याचा मंत्र..!
यश तुमच्या हातात
Asst. Prof. Bhosle Ajinkya Mohan Department of Mechanical, Rajgad Dnyanpeeth Technical Campus Dhangwadi विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात...! हे...Read More
Asst. Prof. Bhosle Ajinkya
यश तुमच्या हातात
Asst. Prof. Bhosle Ajinkya Mohan Department of Mechanical, Rajgad Dnyanpeeth Technical Campus Dhangwadi
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात…!
हे पुस्तक सेल्फ मोटिवेशन पुस्तक आहे. सकारात्मक दृष्टिकोनाची महत्त्व व अयशस्वी होण्याची कारणे व यशस्वी बनण्यासाठी लागणारे नियम या पुस्तकात सांगितलेले आहेत. ते वाचून व आपल्या जीवनात उतरून आपण आपले जीवन सफल बनवू शकतो.
हे पुस्तक आपल्याला शेवटपर्यंत वाचायला कंटाळा येणार नाही कारण या पुस्तकात लहान लहान गोष्टी व उदाहरण सांगून हे पुस्तक आपल्याला वाचायला जोडून ठेवते.
या पुस्तकात आपल्याला वेळोवेळी सुविचार,कविता ,प्रेरणादायी वाक्य वाचायला मिळतील.
हे पुस्तक वाचताना त्याच्यासोबतच आपल्याला जे जीवनात प्राप्त करायचे आहे. त्याची योजना व आराखडा सुद्धा या पुस्तकांमध्ये दिलेला आहे.
