
राधेय
By Ranjit Desai
राधेय म्हणजे कर्ण मराठी माणसाच्या मनात यांचे स्थान अगदी जवळचे आहे. राधेय लिहिताना रणजीत देसाई यांनी म्हटले आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरजच नाही प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला आहे यावरूनच त्यांनी या पुस्तकात कर्णाचे काय रूप दाखवले असेल याची आपण कल्पना करू शकतो.कर्णाचे वेगळेपण सामर्थ्य आणि हुशारी या पुस्तकात वाचायला मिळते. लेखकाने कर्णाचे राधा मातीशी कुंतीशी वृषालीशी असणारे नाते हे आपल्या मनात एक आदरभाव निर्माण करून जाते, तसेच कृष्ण आणि दुर्योधन यांच्याशी कर्णाची असणारी मैत्री एक हक्काचे घर करते दुर्योधन खरंच इतका वाईट होता का? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात मिळते तसेच अनेक नाते अनेक लोक अनेक घटना आपल्याला या पुस्तकात घडताना दिसतात. कृष्ण कर्णाची भेट झाल्यानंतर दुर्योधन कर्णाला विचारतात कृष्ण का भेटला तुला? या प्रश्नाचे दिलेले स्पष्टीकरण ऐकून दुर्योधन कर्णाला म्हणतात कोणतीही गोष्ट सहज घडत नसते त्यामागे असणारे प्रयोजन त्या मागील संदर्भ आपल्याला माहीत नसतो म्हणून ती आपल्याला सहज वाटते लेखकाने शेवटच्या पानावर लिहिलेल्या वाक्य अतिशय सुंदर आहे
“मी योद्धा आहे.
जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही.
जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध
अखेरच्या क्षणांपर्यंत मला चालवलं पाहिजे.
त्यातच माझ्या जीवनाचं
यश सामावलं आहे.”