मला आवडलेले पुस्तक (सारांश) पुस्तकाचे नाव:-रावण -राजा राक्षसांचा लेखकाचे नाव:-शरद तांदळे
Read More
मला आवडलेले पुस्तक
(सारांश)
पुस्तकाचे नाव:-रावण -राजा राक्षसांचा
लेखकाचे नाव:-शरद तांदळे
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव:-कु. अंजली भिमा भांगले.
वर्ग:-TY BSc
शाळेचे नाव:-इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे.
मोबाईल नंबर:-7066359378
ई-मेलआयडी:-anjalibhangale891@gmail.com
रावण- राजा राक्षसांचा
रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी 25 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाशित झाली होती . या पुस्तकाचे लेखक शरद तांदळे आहेत. ही कादंबरी रामायणातील लंकेच्या राजा रावणाच्या मनाची वेध घेणारी आहे. या पुस्तकात रावणाच्या पराक्रमाची,विद्वत्तेची, वेद पंडितीची, आणि कट्टर शिवभक्तीची कथा आहे. आज वरची पुराणं,कथा ,साहित्य ,कला यांमधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृत्तीचा प्रतिक बनवला गेलं. परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र ,सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र,वीणा ,बुद्धिबळ याची निर्मिती रावणाने केली. एवढा विद्वान कित्येक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला ?
सर्व देवांना पराभूत करणारा,सर्वदैत्य, दानव ,असुर आणि कित्येक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी ही कादंबरी आहे.
असुरांच्या दुष्ट महत्त्वकांक्षेतून जन्मलेल्या नर्काची उत्पत्ती व देवांशी युगानुयुगे चालत आलेले शत्रुत्व… एक काळ असा होता जेव्हा या प्रजातीचा वावर मानवीवस्तु पासून खूप दूर अंधाऱ्या गुहात आणि खोल दलदलीत होता. अशा निराशाजन्य ,अतिशय दुर्गम प्रदेशात पसरलेला अंध:कार अजून खतपाणी घालत होता. अशा वातावरणात प्राणी सुद्धा प्रवेश करण्यास घाबरत होते. तेव्हा एका राक्षसाचा शिकार दुसरा राक्षस बनत असे. कारण असूरांचा प्रवास मृत्यूच्या महामार्गावरूनच केला जात असे.
पण या शापित गर्दीत एक होता ,ज्याने असं नीच जीवन जगायला नकार दिला. त्याच्या उच्च महत्वकांक्षेने राक्षसांना दलदलीच्या चिखलातून काढून आकाशापेक्षा उंच स्थानी आणून ठेवले. पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग या तिन्ही लोकांना आपल्या मुठीत कैद करणारा असा राक्षस…. ज्याने आपल्या राक्षसी महत्वकांक्षेसोबत केला एक असा चतुराई आणि बुद्धीचा वापर आणि तो मोठ्यात मोठा प्रतिस्पर्धीकांना हरवण्यात सफल झाला. तो होता रावण राजा राक्षसांचा….
आजपर्यंत आपल्या टी.व्ही. सिरीयल्स मधून, कथा, नाटक, साहित्य यांमधून रावण किती दुर्गुणी होता ,किती वाईट होता, कपटी होता हेच दाखवले गेले. पण तो किती विद्वान होता, किती गुणवान होता, केवढा मोठा महापंडित होता त्याने रावणसंहिता ,कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, वीणा, शिवतांडव स्तोत्र ,बुद्धिबळ याची निर्मिती केली. ज्याने घोर तपस्या करून ब्रह्माला आणि शिवाला प्रसन्न केलं. मग एवढा विद्वान रावण खलनायक कसा बनला ? तो खरोखर खलनायक होता का ? ज्याने सर्व देवतांचा पराभव केला .ज्याने सोन्याची लंका बनवली अशा महान राक्षसाच्या मनाची वेद घेणारी कादंबरी म्हणजे रावण- राजा राक्षसांचा….
ही कादंबरी का वाचावी ? तर रावणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच संपूर्ण जीवन प्रवास, त्याच्यावर झालेल्या अत्याचार ,संकटे आणि त्याने त्याला कसे तोंड दिले, कसे देवतांना पराभूत करून त्याने राक्षस संस्कृती उभी केली आणि तो कसा दानव बनला हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचावी.तसेच या कादंबरीची एक विशेष गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे….. कथा तर रावणाची आहे, पण जसं जसं कथा पुढे जाते तस तसं लेखकाने मध्ये अशा काही लाईन्स लिहिल्या आहेत, ज्या आहेत तर रावणाच्या बाबतीत पण आपल्याला वाटतं ही तर आपल्या जीवनाशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या आजच्या आधुनिक जीवनातील समस्येचे निवारण त्या ओळींमध्ये आहे. ही गोष्ट मला कादंबरी वाचताना खूप आवडली.
पुस्तकाचे नाव:-रावण -राजा राक्षसांचा
लेखकाचे नाव:-शरद तांदळे
प्रकाशक:-न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
प्रकाशन वर्ष:-2022
Show Less