By Rindhe Nitin
Availability
available
Original Title
लिळा पुस्तकांच्या
Subject & College
Publish Date
2019-03-01
Published Year
2019
Publisher, Place
Total Pages
198
ISBN 13
9789382789994
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
लिळा पुस्तकांच्या
"लिळा पुस्तकांच्या" हे आजवर वाचलेल्या बहुतांशी पुस्तकांपेक्षा वेगळे पुस्तक वाचनास सुचविले ते माझ्या एका इंग्रजीच्या प्राध्यापक मित्राने. हे पुस्तक म्हणजे पुस्तकांविषयी चे पुस्तक आहेत. या...Read More
Nilesh Nagare
लिळा पुस्तकांच्या
“लिळा पुस्तकांच्या” हे आजवर वाचलेल्या बहुतांशी पुस्तकांपेक्षा वेगळे पुस्तक वाचनास सुचविले ते माझ्या एका इंग्रजीच्या प्राध्यापक मित्राने. हे पुस्तक म्हणजे पुस्तकांविषयी चे पुस्तक आहेत. या पुस्तकात इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तकांमध्ये वाचनाविषयी, पुस्तकांविषयी, पुस्तक प्रेमी, पुस्तकं वेडे आणि पुस्तकांविषयी वेगवेगळ्या अनुभवांचा भरगच्च असा संग्रह लेखकाने आपल्या समोर ठेवला आहे.
पुस्तक जमविण्यापासून गमविण्यापर्यंतच्या आठवणी, पुस्तकं केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली चरित्रे – आत्मचरित्रे, पुस्तकांविषयी आशय गुफलेल्या कादंबऱ्या, वेगवेगळ्या अंगानी लिहिलेले पुस्तकांचे इतिहास, पुस्तकांचं मुद्रण, बांधणी, मांडणी, संग्रह, वितरण इत्यादी. अनेक विषयांबद्दलचे अनुभव, असंख्य पुस्तकांचे संदर्भ असं कितीतरी या “पुस्तकांविषयीच्या पुस्तकां” मध्ये वाचायला मिळतं. या बहुरंगी पुस्तक संस्कृतीची सफर घडवणारं हे पुस्तक म्हणजेच “लिळा पुस्तकांच्या”
जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे, तोवर पुस्तकांना आणि ग्रंथालयांना मरण नाही.म्हणूनच ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रांत ” माझ्या पुस्तकांना कोणाला हात लावू देऊ नको” अशी तंबी न विसरता देणारे, पुस्तकांसाठी स्वतंत्र घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर डोळे अधू झाल्यावर”” आता मला वाचता येत नसेल तर जगून काय उपयोग,माझ्या पुस्तकांचं काय होणार” म्हणून शोक व्यक्त करणारे कृष्णराव अर्जुनराव केळुस्कर अशा अनेक ज्ञानवंत आणि अभ्यासकांच्या अनुभवांचा मागोवा घेणारे हे “लिळा पुस्तकांच्या”.
