Availability
upcoming
Original Title
वपुर्झा
Subject & College
Publish Date
1982-01-01
Published Year
1982
Publisher, Place
Total Pages
250
ISBN
9788177664270
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
मुक्त आनंद
Book Reviewed by PAWAR OM BALASAHEB, F. Y. BSC Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College Shirsondi, Tal. Malegaon हे पुस्तक कसं वाचायचं? आपल्या...Read More
Yogita Phapale
मुक्त आनंद
Book Reviewed by PAWAR OM BALASAHEB, F. Y. BSC
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
हे पुस्तक कसं वाचायचं? आपल्या आवडी नुसार कुठलाही पेज उघडा तिथ
आपल्याला हव असणारा आपल्या आवडीचा मजकूर असेल. काही हौशी घरांमध्ये
ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड होईल तसं
अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे
पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या
सुगंधाने भारून जायचं.एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा.
त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक,
संदर्भ काहीही दिलेलं नाही. वपुंच्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे वपुर्झा या
पुस्तकामुळे यामध्ये विविध प्रकारचे लेखन करण्यात आलेले आहे. ज्याला जस वाटल
तस त्याच्या आवडीनुसार पुस्तक वाचत बसायचे.
हे पुस्तक एक उत्कृष्ट नमुना आहे. हे बागेसारखे आहे. आपण कोणत्याही विभागात
टहल जाऊ शकता, आपण भेटू शकतील अशा छटा दाखवून आपण मंत्रमुग्ध व्हाल.
लेखकाचा जीवनाचा दृष्टीकोन दर्शवितो आणि तो इतका सकारात्मक, हृदयस्पर्शी
आणि पृथ्वीवर इतका खाली आहे. तो मैत्रीपासून ते लग्नापासून महत्वाकांक्षा या
प्रत्येक गोष्टीवर आपले विचार सामायिक करतो .. हे जवळजवळ आपल्या अनुभवी
वृद्ध शहाण्या माणसाशी बोलत असताना सारखेच आहे. सर्वांनी हे पुस्तक आवर्जून
वाचावे.
“ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी” – वपुर्झा
Dhanwate Rahul Suresh,Assistant Librarian,(rahul.dhanwate@mmcc.edu.in) Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune शीर्षक - वपुर्झा लेखक- व.पु.काळे प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत -250 व.पु.काळे लिखित...Read More
Dhanwate Rahul Suresh
“ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी” – वपुर्झा
Dhanwate Rahul Suresh,Assistant Librarian,(rahul.dhanwate@mmcc.edu.in)
Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune
शीर्षक – वपुर्झा
लेखक- व.पु.काळे
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत -250
व.पु.काळे लिखित वपुर्झा ही कादंबरी अतिशय उत्कृष्ट आणि अव्वल दर्जाचे लिखित पुस्तक आहे. लाखो वाचकांच्या मनात या कादंबरीने घर करून ठेवले आहे. जसं की लेखक व.पु.काळे म्हणतात की “कोणतंही पान उघडा आणि वाचा” याच उक्ती प्रमाणे या पुस्तकात आपल्याला लेखन पाहायला मिळते कारण जेव्हा जेव्हा हे पुस्तक मी वाचनासाठी घेतले तेव्हा कधीही कंटाळवाणे मला वाटले नाही कारण प्रत्येक पान हे वेगवेगळे अनुभव देत गेले. प्रत्येक पानात वेगवेगळ्या छटा रंगवलेल्या आहेत. या पुस्तकाची भाषा देखील अतिशय सोपी आणि सहज आहे ज्यात वेगवेगळे प्रसंग हे अगदी विनोदी रीत्या दर्शविण्यात आले आहेत तर काही प्रसंग मर्मभेदी आहेत तर काही विवेचनात्मक आहे.
या पुस्तकाच्या पृष्ठभागावरती एक पेला म्हणजेच ग्लास हा रिकामा दाखवला आहे ज्याचा अर्थ व.पु.काळे यांनी असा लावला आहे की हा प्याला म्हणजे आपलं मन आकाशाचा शब्द झेलण्यासाठी हा कायम रीताच असावा. मनातली साठलेली मळमळ, जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या, म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो.
या पुस्तकाच्या मागील पृष्ठभागावर पुस्तक कसे आहे तसेच हे पुस्तक कुणासाठी आहे तसेच हे पुस्तक कसे वाचावे याबाबतीत लेखक व.पु.काळे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
तसे पाहिले गेले तर हे पुस्तक 258 पानांचे आहे परंतु; जेव्हा वाचक वाचन करण्यास सुरुवात करतो तेव्हा तो अगदी हरवून जातो त्याला आपण किती पाने वाचलीत याचे भान राहत नाही आणि आणखी जरा वाचायला हवं अशी मनात हुरहूर लागते.
माझ्या मते, व.पुं.च्या लेखनाची खासियत म्हणजे वाचकाला क्षणभर थबकावून विचार करण्यास भाग पडणे, गोष्टी इतक्या सध्या अन सोप्या शब्दात मांडणे की, वाचतांना असं वाटल्यावाचून राहणार नाही की, “माझ्यासोबातही हेच घडलं होतं अथवा घडत आहे. ही त्यांची कलाच म्हणावी की ते वाचकाला एखाद्या गोष्टीकडे, परिस्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघण्यास प्रवृत्त करतात.त्यांच्या मार्मिक लिखाणातून व.पुं. चं व्यक्तिमत्व किती विस्तृत आणि सकारात्मक होतं हे ध्यानास येतं…
“व्यक्ती तितक्या प्रवृत्ती” ह्या विधानाला दुजोरा देत त्यांनी त्या प्रत्येक “प्रवृत्ती” बद्दलचे बारकावे, त्यातली गुंतागुंत अत्यंत डोळस पद्धतीने मंडली आहे.
पुस्तकातील काही उतारे अत्यंत मानवी स्वभावास एकदम साजेसे आहेत
“आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका.”
या उताऱ्यात व.पु.फक्त उपदेशच देत नसून त्यावर विश्वास कसा ठेवायचा हे देखील दाखवून देतात.
शेवटी जाता जाता व. पु.वपुर्झा मध्ये काही ओळी सांगून जातात
“नुसत्या विचाराने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरत चिरंजीव होतं. करमणूक करून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही. साहित्य हे निव्वळ चून्यासारखा असत. त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही.”
