Gayatri Pramod Dhumal (SY Computer ) Rajgad Dnyanpeeth Technical Campus, Dhangwadi " वेळेचे व्यवस्थापन" हे पुस्तक
Read More
Gayatri Pramod Dhumal (SY Computer ) Rajgad Dnyanpeeth Technical Campus, Dhangwadi ” वेळेचे व्यवस्थापन” हे पुस्तक जयप्रकाश झेंडे यांनी लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी वेळेचा योग्य वापर कसा करावा आणि आपले कार्य अधिक प्रभावी कसे बनवावे यावर मार्गदर्शन केले आहे. लेखकाने वेळेचे महत्व आणि त्याचे व्यवस्थापन यावर विचार मांडला आहे.
पुस्तकात वेळेचा योग्य वापर करण्यासाठी विविध टिप्स दिल्या आहेत. त्यामध्ये खालीलप्रमाणे मुद्दे आहेत.
वेळ म्हणजेच …
वेळ म्हणजेच संपत्ती, वेळ म्हणजेच आरोग्य, वेळ म्हणजेच शक्ती,
वेळ म्हणजेच जीवनाचं सार होय.
*टाइम बैंक :-
टाइम बैंक दुसर काही नसून आपल आयुष्य आहे. ज्यामध्ये आपल्या खात्यावर म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज ८६,४०० सेकंद जमा होतात. आपल्या खात्यात जमा केलेल्या या ८६, ४०० सेकंदांपेक्षा जास्त सेकंदांच्या वापर करता येत नाही. आपण वर्तमानकाळातच, आज जमा झालेल्या ८६,४०० सेकंदांवरच जगायला हवे आणि या सगळ्यांनी गुंतवणूक पूर्णपुणे पुर्णपणे आपल्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि यश मिळवण्यासाठी करायला हवी वेळ – एक संकल्पना :-
वेळ हा एक अमूल्य संसाधन आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात समान असतो. हे एक संकल्पना आहे जी आपल्या सर्व जीवनाचे कार्यकाळ निर्धारित करते. त्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे कारण त्याच्या आभावामुळे आपले उद्दिष्ट गाठणे अवघड होते.
वेळेचे व्यवस्थापन कशासाठी ?
वेळेचे व्यवस्थापन हे आपल्या क्षमतेला वाव देण्यासाठी, जीवनातील ध्येय साधण्यासाठी आवश्यक आहे. योग्य वेळेच्या वापरामुळे आपल्याला कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येतात आणि त्यातून आपले जीवन अधिक संतुलित आणि यशस्वी होऊ शकते.
आपल्याकडे वेळेचा आभाव का असतो ?
वेळेचा आभाव मुख्यत: अव्यवस्थित दिनचर्या, अनेक वेळा आपण गहत्वाच्या गोष्टींसाठी वेळ ठेवत नाही, आामुळे आपल्याला वेळेचा आभाव जाणवतो.
वेळेचे अपव्यय टाळा :
वेळेचे अपव्यय टाळण्यासाठी कार्याना योग्य प्राथमिकता द्या आणि नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, इंटरनेट, सोशल मिडिया आणि इतर अडचणींचा वापर नियंत्रित आणि लक्ष्य केंद्रित राहून आपले काम पूर्ण करा.
वेळेचे व्यवस्थापन – गैरसमज आणि वस्तुस्थिती :-
वेळेचे योग्य नियोजन हा एक कौशल्य आहे, जिथे “वेळ पुरत नाही” हा गैरसमज आणि वेळेच्या नियोजनाची गरज ही वस्तुस्थिती आहे.
वेळेच्या यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रेः
उहिष्ट निश्चित करणे, प्राधान्यक्रम ठरवणे, आणि योग्य नियोजन ही यशस्वी वेळ व्यवस्थापनाची मुख्य सूत्रे आहेत.
वेळेच्या बचतीसाठी :-
कर्माचे वर्गीकरण, गरजेचे आणि गरजेचे नसलेले काम वेगळे करणे, यामुळे वेळेची बचत करता येते.
वेळ वाचविण्याची तंत्र :
अवकाश टाळणे, अधुनिक साधनांचा उपयोग करणे, आणि अडथळे ओळखून त्यावर मात करणे ही तंत्र उपयुक्त ठरतात.
रोजचे वेळापत्रक :
दैनंदिन कामे नियोजनबद्ध करून आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन केल्याने काम वेळेत पूर्ण होतात.
दैनंदिन कामाचे नियोजन :
महत्त्वाच्या कामांसाठी प्राधान्यक्रम तयार करून वेळापत्रक.
दैनंदिन जीवनशैलीतील बदल :
शिस्तबध्द जीवनशैलीसाठी सकारात्मक सवयी आत्मसात करा.
वेळेवर मात करणारी वैचारिक तंत्रे :
सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कामांमध्ये तात्काळ कृती करा.
वेळेचा सदुपयोग :
वाढीव वेळ उपयुक्त उपक्रमांसाठी वापरा.
वेळेची सप्तपदी :
प्रभावी व्यवस्थापनासाठी सात टप्प्यांचा अवलंब करा.
* उत्पादकता वाढविण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन :-
महत्त्वाचा कामांवर लक्ष केंद्रित करून परिणामकारकता वाढवा.
विल्फ्रेडो पैरेटो यांचा नियम :
२०% प्रयलांमधून ओलखा. 80% यश मिळवण्यासाठी महत्त्वाची काम
• मीटिंग्जच्या यशस्वितेसाठी :
एजेंडा तयार करून वेळेचे काटेकोर नियोजन करा.
• वक्तशीरपणातून ध्येयप्राप्ती :
वक्तशीरपणा यशस्वी जीवनासाठी महत्त्वाचा आहे.
वेळेच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचे :
वेळेचा योग्य उपयोग करून जीवनात यश मिळवा.
आपल्याला यशस्वी कायचं असेल, जीवनाला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, जीवनाचे (सार्थक’ करायचे असेल तर वेळेची किंमत जाणणे, वेळेच्या नियोजनावर प्रभूत्व मिळविणे आवश्यक आहे.
वेळेचे व्यवस्थापन ही एक कला आहे. आणि इतर कलांसारखी ही कलादेखील आपण अंगी बाणवू शकतो
Show Less