प्रज्वल पुंडलिक गांगुर्डे पुणे विद्यार्थी गृह, श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान व कला
Read More
प्रज्वल पुंडलिक गांगुर्डे
पुणे विद्यार्थी गृह, श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान व कला महाविद्यालय
विज्ञान : द्वितीय वर्ष
जेफ्री झाल्स्को यांचे “शेवटचे व्याख्यान” हे पुस्तक खरेतर अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक डॉ. पाउश यांच्या प्रख्यात व्याखानावर आधारित आहे. हे व्याखान त्यांनी १८ सप्टे २००७ रोजी कॅनर्जी मेलन विद्यापीठात दिले होते. शेवटचे व्याखान हि एक शैक्षणिक परंपरा होती. जिथे प्राध्यापक आपली आयुष्यातील महत्वाची तत्वे,शिकवण आणि अनुभव शेअर करत. मात्र डॉ. पाउश यांचे व्याखान खऱ्या अर्थाने शेवटचे होते कारण त्यावेळी टर्मिनल कॅन्सर ( प्यानक्रियाटिक कॅन्सर ) झाला होता आणि ते काही महिन्याचे पाहुणे होते. पुस्तकात डॉ. पाउश यांनी त्यांचा व्याखानातील मुद्यांना अधिक तपशील आणि व्यक्तिगत कथांनी सजवले आहे. त्यांनी आयुष्यातील स्वप्न,अडथळे,यश आणि शिकवण या वर भर दिला आहे त्यांचा पत्नी जे पाउश आणि तीन मुलासाठी हे प्रेमळ संदेशपत्र आहे. जे यांनी आयुष्याचे धडे शिकवण्यासाठी तयार केले.
१. स्वप्नाचे महत्व : डॉ. पाउश यांनी लहानपणापासून मोठी स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केली. उदा; ते अंतरवीळ बनण्याचे स्वप्न बघत होते जरी ते प्रत्यक्षात आले नाही , तरी ते डीज्नीचे इमेजीनियारिंग टीम चा भाग बनले. जिथे त्यांनी त्यांचा कल्पना शक्तीला वास्तवात उतरवले.
२. अडथळे म्हणजे शिकण्याची संधी : डॉ. पाउश सांगतात की अडथळे म्हणजे तुमच स्वप्न थांबवण्यासाठी नसतात, तर तुम्हाला ते किती महत्वाचे आहे हे तपासण्यासाठी येतात. त्यांनी स्व:ताच्या आयुष्यात अनेक संघर्षवर मात केली आणि कधीही हार मानली नाही
३. इतरांना प्रोत्साहन देणे : त्यांनी फक्त स्व:तच स्वप्न पूर्ण केल नाही, तर इतरांना त्यांचा स्वप्नासाठी मार्गदर्शन केल. विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक म्हणून त्यांनी आपले योगदान दिले आणि त्यांना प्रेरणा दिली
४. आयुष्याचा दृष्टीकोन सकारत्मक ठेवणे : कर्करोगासारखा जीवघेण्या आजारात असतानाही त्यांनी कधीही नकारत्म्क्ता अंगीकारली नाही त्यांचा दृष्टीकोन नेहमीच सकारत्मक होता, जो वाचकाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पडतो.
५. कुटुंब आणि नाती खरे खजिने : डॉ. पाउश यांनी त्यांचा पत्नी आणि मुलांना दिलेल्या प्रेमाची आणि काळजीची चर्चा केली आहे जरी त्यांनी मरणाची जाणीव होती, तरी त्यांनी वेळ मुलाबरोबर घालवला आणि त्यांचा आठवणी जपण्याचा प्रयत्न केला.
पुस्तकाचे वैशिष्ट
• हे पुस्तक सखोल आहे, पण अत्यंत साध्या आणि हृदयस्पर्शी भाषेत लिहिलेलं आहे.
• त्यातील किस्से आणि जीवनातील अनुभव हे कुठल्याही वाचकाला स्व:तच्या जीवनाचा विचार करण्यास प्रवृत्त करतात.
• ते वाचताना डोळ्यात पाणी येते, पण शेवटी एक सकारत्मक उर्जा देऊन जाते
शिकवण : स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची हिम्मत ठेवा. जीवनात अडचणी येतात पण त्या तुमच व्यक्तिमत्व घडविण्यासाठीच असतात. तुमच्या प्रियजनासोबत वेळ घालवा, कारण जीवन क्षणभंगुर आहे. आयुष्य जगा, पण त्याच बरोबर इतरांना जिंकायला मदत करा
अनुभव : “ अखेरचं व्याख्यान” वाचून प्रत्येकाला हे जाणवत की आयुष्य कसे जगायचे हे आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. डॉ पाउश यांनी त्यांचा शेवटच्या दिवसातही जीवनाच्या सौंदर्याची ओळख करून दिली. ते केवळ एका मरणासन्नचे पुस्तक नसून, एका जीवन्त्त्वाचे पाठककथेतून येणारे प्रेरणादायक कार्य आहे. हे पुस्तक प्रत्येकासाठी आहे. विद्याथ्यार्साठी,पालकांसाठी शिक्षकांसाठी आणि जीवनाचे खरे मूल्य ओळखू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
Show Less