Availability
available
Original Title
श्यामची आई
Series
Publish Date
1957-01-01
Published Year
1957
Publisher, Place
Total Pages
232
ISBN 13
9789386204950
Format
paperback
Country
india
Language
marathi
Dimension
20.3 x 25.4 x 4.7 cm
Average Ratings
Readers Feedback
Bhandari Madhura Mahesh
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी : मदुरा महेश भंडारी वर्ग- टी.वाय.बी.ए. पुस्तकाचे नाव-...Read More
Vishal Jadhav
Bhandari Madhura Mahesh
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी : मदुरा महेश भंडारी
वर्ग- टी.वाय.बी.ए.
पुस्तकाचे नाव- श्यामची आई
लेखकाचे नाव – साने गुरुजी
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
पुस्तकाची ओळख -श्यामची आई हे साने गुरुजींचे आत्मचरित्रात्मक पुस्तक मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती मानले जाते. या कथेच्या माध्यमातून साने गुरुजींनी आईचे निःस्वार्थ प्रेम, त्याग आणि मुलावर होणारे संस्कार यांचे मार्मिक चित्रण केले आहे. ही कथा प्रत्येक वाचकाच्या मनाला हळवी करते आणि आईसाठीची जागवते.
मुख्य कथासूत्र –
या कथेचा मुख्य केंद्रबिंदू श्याम नावाचा एक साधा मुलगा आणि त्याची आई आहे.ग्रामीण महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबात घडवणारी ही कथा जीवनातील संघर्ष व त्यातील मातेचे महत्त्व अधोरेखित करते. आई आपले दुःख, वेदना लपवून मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःचा त्याग करते. कथेतील प्रसंगांमधून श्यामचं आई त्याला सत्य, प्रामाणिकपणा आणि सहनशीलतेचे धडे देते.•
प्रमुख पात्रे
श्याम – एक संवेदनशील आणि प्रेमळ मुलगा,जो आईच्या संस्कारांनी घडतो.
श्यामची आई – त्यागमूर्ती आई, जी मुलासाठी आपले सर्वस्व अर्पण करते.
इतर पात्रे – श्यामचे वडील, मित्र, आणि गावातील लोक, जे कथेची पार्श्वभूमी अधिक समृद्ध करतात.
भाषा आणि शैली- साने गुरुजींच्या लेखनशैलीची खासियत म्हणजे साधेपणा आणि ओघवती भाषा. त्यांच्या शब्दांमधून कथेतील प्रत्येक भावना, प्रसंग जिवंत वाटतो. सांधी भाषा असूनही मनाला स्पर्श करते.
शिकवण- मुलांवर केलेले संस्कार आयुष्य घडवतात.आईच्या त्यागाची जाणीव ठेवून आदर करावा. जीवनातील चांगल्या मूल्यांना आणि साधेपणाला महत्व द्यावे.
ग्रेड : 10/10 सर्व वयोगटासाठी अत्यंत शिफारसीय.
श्यामची आई
सुलताने अंकिता मोहन वर्ग एफ वाय बी ए मराठी श्यामची आई, लेखक - साने गुरुजी वाचनाची आवड तशी प्रत्येक माणसाला असते कारण त्यातून मिळणार ज्ञान...Read More
सुलताने अंकिता मोहन
श्यामची आई
सुलताने अंकिता मोहन वर्ग एफ वाय बी ए मराठी
श्यामची आई, लेखक – साने गुरुजी
वाचनाची आवड तशी प्रत्येक माणसाला असते कारण त्यातून मिळणार ज्ञान जीवनात कठीण काळात मार्ग काढण्यास मदत करते. जसं आपल्याला पुस्तकातून शैक्षणिक ज्ञान मिळते, त्याचप्रमाणे आपल्याला आईकडून जीवनाचे ज्ञान मिळत असते. आई म्हणजे आपल्या जीवनाला मिळालेले एक सुंदर नातं असतं. जन्माआधी आईच्या पोटात शिक्षणाची तयारी सुरू होते. आईच्या संस्कारातून मुलाचे जीवन घडत असतं, कधी शिक्षक होऊन तर कधी आपली सखी होऊन नवनवीन गोष्टीचा बोध आपल्याला ती करून देत असते. वेळ प्रसंगी कठोर देखील होते, याप्रमाणे गोष्टी, आईची विविध रूप, साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात.
साने गुरुजींनी आपल्या आईसोबत अनुभवांच्या गोष्टीच्या रूपाने, सुंदररीतीने सांगितलेल्या आहेत. आई मुलाला त्रास होणाऱ्या गोष्टीपासून लांब ठेवते , त्याचप्रमाणे आपला मुलगा इतर मुलासारखा कशातही मागे राहता कामा नये याकरता हट्टाने रागावून पाण्यात पोहायला त्यांच्या मित्रासोबत पाठविते. तो कुठेही लपून बसला तरी त्याला शोधून ती पाठवते आणि त्यांची भीती घालविते. त्याने शिकावं म्हणून कठोर होऊन रागावते, मायेने जवळ देखील घेते आणि आवडीचा पदार्थ बनवून लाड ही करते. अशा प्रकारच्या ४२ रात्रीचा उल्लेख त्यांनी यात केलेला आहे. आईबद्दल असलेली अपार माया, ममता तिच्याविषयी वाटणारे प्रेम या प्रत्येक गोष्टीतून अतिशय सुरेख वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला देखील आपली आई आपल्या लेकरासाठी किती कष्ट घेते, याची जाणीव झाली. तिचं रागावणं बोलणं ओरडणं हे केवळ आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी असतं हे समजलं. त्यामुळे जेव्हा कधी ती माझ्यावर रागवते तेव्हा मी तिच्यावर न चिडता आपलं कुठे काय चुकलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. जेव्हा हे पुस्तक वाचन झालं, तेव्हा मला ह्या सर्व गोष्टी माझ्या आईमध्ये अनुभवायला मिळाल्या असल्यामुळे, ‘श्यामची आई’ हे पुस्तक आपल्यातलं वाटलं. माझ्या जीवनात आई विषयी मनात एक संवेदना निर्माण झाली आणि मनाशी एक निश्चय केला आयुष्यात कधीही आईचे मन दुखवायच नाही. तिची खूप काळजी घ्यायची आणि तिच्यावर कविता लिहिण्याची प्रेरणा देखील मिळाली. मी माझ्या आईवर भरपूर कविता लिहिल्या आहेत. साने गुरुजी सारखं आपण आपल्या कवितेच्या रूपात पुस्तकात प्रकाशन करू हे स्वप्न उराशी बाळगून आहे. शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही. हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही. निळ्याभोर गगनाला अंत कधी होत नाही. आणि आईच्या मायेचा उल्लेख शब्दात कधी होत नाही. सदर पुस्तक हे प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.
श्यामची आई
पुस्तक परीक्षण : पंकज समाधान शेवाळे, एच. ए. एल. कॉलेज ऑफ सायंन्स अँड कॉमर्स ओझर नाशिक. प्रस्तावना: पुस्तके ही माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहेत....Read More
Shewale Pankaj Samadhan
श्यामची आई
पुस्तक परीक्षण : पंकज समाधान शेवाळे, एच. ए. एल. कॉलेज ऑफ सायंन्स अँड कॉमर्स ओझर नाशिक.
प्रस्तावना:
पुस्तके ही माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहेत. ती केवळ ज्ञानाचे भंडार नसून आपल्या मनाला शांती आणि आनंद देणारी असतात. मी आजपर्यंत खूप पुस्तके वाचली आहेत,परंतु त्यातील एक पुस्तक अत्यंत आवडते आहे. ते पुस्तक म्हणजे “श्यामची आई”. ह्या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी. “श्यामची आई ” हे पुस्तक मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा आहे.
सारांश:
साने गुरुजी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात एक आईच्या अथक प्रेमाची, त्यागाची आणि कर्तव्याची कथा आहे. श्याम या बालकाच्या जीवनातील आईच्या प्रेमाचे आणि तिच्या संस्कारचे अद्वितीय वर्णन या पुस्तकात केले आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या मनातील आईची ममता आणि तिचा त्याग यांची जाणीव होते. श्यामची आई ही एक धार्मिक स्त्री आहे, तिचे जीवन अतिशय कष्टप्रद आहे, परंतु ते कधीही हार मानत नाही. तिने आपल्या मुलांना संस्कार आणि शिक्षण देण्यासाठी अनेक त्याग केले आहेत. तिचा ममत्वाचा स्पर्श श्यामच्या जीवनात प्रत्तेक दुख विसरवतो. श्यामची आई पुस्तकात श्यामच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटनांचे वर्णन आहे. त्यातील काही प्रमुख घटना म्हणजे श्यामच्या बालपनातील खेळ, त्यांच्या शाळेतील अनुभव, त्याच्या आईच्या त्यागाच्या कथा आणि त्यांच्या कठोर परिश्रमाची गाथा. प्रत्तेक घटनेतून आपल्याला आईच्या ममत्वाची आणि कर्तव्यदक्षतेची जाणीव होते. साने गुरुजींनी या घटनांचे वर्णनं केले आहे, ज्यामुळे वाचकांना त्या काळातील वातावरणाचा अनुभव होतो. श्यामच्या आईच्या ममत्वाने माझे मन भराऊन गेले आहे. तिचे प्रेम आणि त्याग ही प्रत्तेक आईचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तिच्या ममत्वाच्या स्परशमुळे श्यामच्या जीवनातील प्रत्तेक दुख दूर होते. साने गुरुजींनी तिच्या ममत्वाची गाथा अतिशय संवेदनशीलतेने वर्णन केले आहे. तिच्या प्रेमामुळेच श्यामच्या जीवनात आनंद आणि सुख आले आहे. “श्यामची आई” पुस्तक केवळ एक कादंबरी नाही, तर एक सामाजिक संदेश आहे. या पुस्तकातून आपल्याला आईच्या ममत्वाची आणि कर्तव्यदक्षतेची जाणीव होते. साने गुरुजींनी या पुस्तकातून आपल्याला आईच्या प्रेमाचे महत्व शिकवले आहे. या कादंबरीने आपल्याला समाजातील आईच्या महत्वाची जाणीव करून दिलेली आहे. श्यामच्या आईचा त्याग खूप मोठा आहे. तिने आपल्या मुलांच्या सुखासाठी अनेक त्याग केले आहेत. तिचे धैर्याचे उदाहरण अतिशय प्रेरणादायी आहे. तिच्या त्यागामुळेच श्यामच्या जीवनात सुख आणि आनंद आला आहे. “श्यामची आई” पुस्तक वाचताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, श्यामच्या आईच्या त्यागाणे मला प्रेरणा दिली. तिच्या धैर्याचे वर्णन वाचून माझे मन भराउण गेले. हे पुस्तक वाचताना मी स्वताला त्या काळात अनुभवताना पहिले. आईच्या प्रेमाने आणि तिच्या त्यागाणे माझे जीवन अधिक समृद्ध झाले आहे. श्यामची आई हे पुस्तक माझ्या जीवनातील अत्यंत आवडते आहे. साने गुरुजींनी या पुस्तकातून खूप काही सांगितले आहे. या पुस्तकाणे मला आईच्या प्रेमाचे महत्व शिकवले आहे. श्यामची आई हे केवळ पुस्तक नसून ते एक प्रेरणादायी अनुभव आहे. ज्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध झाले आहे. श्यामची आई हे मराठी साहित्यातील एक कालजयी पुस्तक आहे. हे पुस्तक प्रथम (१९३५) साली प्रकाशित झाले, आणि आजही ते वाचकांच्या मनावर अमिट छाप सोडते. “श्यामची आई” ही कथा एका गरीब कुटुंबातील मुलाची आणि त्याच्या त्यागमय आईची आहे. पुस्तकातील श्याम हा लेखकाचा स्वतचा जीवन प्रवास आहे. आईने आपल्या मुलावर लावलेल्या प्रेमाचा, शिस्तीचा आणि संस्कारांचा प्रभाव पुस्तकातून स्पष्ट दिसतो. श्यामची आईची कथा समाजातील प्रत्तेक आईचे प्रतिबिंब दाखवते. आईच्या त्यागामुळे श्याम चांगला माणूस बनतो. स्वार्थत्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव, निगवर्णीपना असा सदगुणांचा बोध आपल्या अंत करणावर बिंबवते. खरा मोठेपणा कशात असतो ते सांगते. श्याम म्हणतो, मोठेपणाचा अर्थ ‘जगातील काही व्यक्तीच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे’ अस मी करीत नाही. हिमालयाच्या दर्या-खोऱ्यात असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांचे नावे माहीत नाहीत. हे पुस्तक म्हणजे ज्यातून स्वताला साठवावे, आठवावे आणि वाटवेही अशी साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे. ती त्यांच्या सर्वच लेखनाला लागू पडते.
विश्लेषण:
* लेखनशैली :- श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ. स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखानास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत.
* पात्रांचे विकास :- श्यामची आई ही कथा एक गरीब कुटुंबातील मुलाची आणि त्याच्या त्यागमय आईची आहे. पुस्तकातील श्याम हा लेखकाचा स्वताचा जीवनप्रवास आहे.
* कथानक संरचना :- आईने आपल्या मुलावर लावलेल्या प्रेमाचा, शिस्तीचा आणि संस्कारांचा प्रभाव पुस्तकातून स्पष्ट दिसतो.
* विषय आणि संदेश :- आईच्या त्यागामुळे श्याम चांगला माणूस बनतो. श्यामची आईची कथा समाजातील प्रत्तेक आईचे प्रतिबिंब दाखवते.
* भावनिक परिणाम :- श्यामच्या आईच्या त्यागाने मला प्रेरणा दिली. तिच्या धैर्याचे वर्णन वाचून माझे मन भारावून गेले.
ताकद आणि कमकुवत बाजू:
* ताकद :- स्वार्थत्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव, निगवर्णीपना असा सदगुणांचा बोध आपल्या अंत करणावर बिंबवते.
* कमकुवत बाजू :- पात्रांचे स्पष्टीकरण खोलवर दिलेले नाही.
वयक्तिक विचार:
* जोडणी :- हे पुस्तक म्हणजे ज्यातून स्वताला साठवावे, आठवावे आणि वाटावेही अशी साने गुरुजींनी चांगली व्याख्या केली आहे.
* सुसंगती :- श्यामच्या बालपणतील खेळ, त्याच्या शाळेतील अनुभव, त्याच्या आईच्या त्यागाची कथा. आजच्या जगात कुठेच बघायला भेटत नाही.
निष्कर्ष:
* शिफारस :- हे पुस्तक १० ते २० वयोगटाच्या मुलांनी वाचलेच पाहिजे. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
* रेटिंग :- मी या पुस्तकाला ५ पैकी (**** ४.५ ) तारे रेटिंग देणार.
* अंतिम विचार :- मला तर हे पुस्तक खूप आवडले. या पुस्तकात आईच्या प्रेमाबद्दल खूप काही सांगितले आहे. तुम्हीही हे पुस्तक वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्या नंतर तुम्हाला आई बद्दलच प्रेम खूप वाढेल. हे पुस्तक वाचताना आपल्या मनातील आईची ममता आणि तिचा त्याग याची जाणीव होते. तिने आपल्या मुलांना संस्कार आणि शिक्षण देण्यासाठी खूप त्याग केले आहेत.
