श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने, यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. श्यामची आई ही एक सत्य कथा
Read More
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने, यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. श्यामची आई ही एक सत्य कथा आहे नाशिक तुरुंगात साने गुरुजींनी ही, कथा लिहिण्यास 9 फेब्रुवारी 1933 रोजी सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 पहाटे लिहून संपवल्या . आईच्या प्रेमामुळे थोर शिकवणी तिचे सरळ साध्या व सुंदर संस्कृतीचे एक कथनात्मक चित्र म्हणजे श्यामची आई असे म्हणता येईल. श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. आईचे वैशिष्ट्ये हे आहे की तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण ती तसेच शारीरिक मानसिक अंश आणि अंश तिच्या बाळासाठीच असतो , बालक तळतळून रडत असते किंवा आनंदात असो त्याला हृदयाशी कवटाळणे सर्वतोपरी रक्षण करणे हा आईचा स्वभाव असतो ती तिला ईश्वराची देणगी आहे. केवळ मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, पशु पक्ष्यावर , झाडा झुडुपांवर प्रेम करण्यास आईनेच शिकवले असे लेखक सांगतात.
Show Less