पुस्तकाचे नाव: श्यामची आई लेखक: साने गुरुजी नाव : प्रज्ञा वानखेडे वर्ग: S.Y.B.C.S. College: GMD Arts, BW Commerce & Science College,
Read More
पुस्तकाचे नाव: श्यामची आई
लेखक: साने गुरुजी
नाव : प्रज्ञा वानखेडे
वर्ग: S.Y.B.C.S.
College: GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इसवी सन १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी इसवी सन१९३३ रोजी पहाटे त्यास संपवला. आईच्या प्रेमामुळे थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करूण व गोड कथात्मक, चित्रण म्हणजे श्यामची आई असे म्हणता येईल. आई आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी, पण हे संस्कार उपदेशाच्या द्वेषाच्या रूपात मुलांना न पाजता स्वतःच्या वागण्यातून व दैनंदिन छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारे ही ‘आदर्श आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आई-बाबांसाठी प्रेरक ठरेल.
‘श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर आणि सरस, त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणारा प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बाळ बोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरुजी लिखीत ‘श्यामची आई’ हे पुस्तक नसून आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा एक ग्रंथ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण आणि क्षण तसेच शारीरिक- मानसिक अंश मी अंश तिच्या बाळासाठी असतो. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरीत रक्षण करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे किंबहुना येणाऱ्या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/ सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कार पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते.
संस्कार हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रुजवायचे असतात. संस्काराचा अनमोल ठेवा साने गुरुजींनी ‘श्यामची आईच्या’ रूपाने लिहून ठेवला आहे. “श्यामची आई” या पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या. साने गुरुजींनी लिहिलेले हे ‘श्यामची आई’ पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकांनी केले आहे. हे पुस्तक म्हणजे खऱ्या मनाने लिहिलेल्या आईच्या आठवणी आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रद्धांजली, सारा जिव्हाळा यात गुरुजींनी ओतलेला आहे
आईच्या सानिध्यात शाम कसा घडला. आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव झाले. आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामची कोनतेपण, शुद्धत्व सुचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकीकत, काळात तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणि दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या- रुसवण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग आपल्या ठिकाणचे दुर्गुण शामला जसे-जसे जाणवतात तसे-तसे त्याचे व्यक्तीमत्त्व उजळत जाते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनिती यांची माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.
Show Less