Share

Publish Date

1935-01-01

Published Year

1935

Format

Paperback

Country

India

Language

मराठी

Readers Feedback

शामची आई

Book Reviewed by जान्हवी प्रकाश साळुंखे (११ वी कला) MVP's KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik "शामची आई" हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग...Read More

Yogita Phapale

Yogita Phapale

×
शामची आई
Share

Book Reviewed by जान्हवी प्रकाश साळुंखे (११ वी कला)
MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik
“शामची आई” हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्कारांचे प्रभावी चित्रण करते. साने गुरुजींच्या लेखणीतून आईच्या निस्मीम प्रेमाची लागाची आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहाणी उलगडते ‘कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते श्यामचे बालपण गरीब पण संस्कारक्षम कुटुंबात घडते. श्यामच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार योग्य मिळत नाही या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते ती कष्टाळू संयमी आणि त्यागशील स्वभावाची आहे .

तिने आयुष्यातील सर्व दु:ख आणि त्रास सहन करूनही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक केवळ आईच्या ममतेची गोष्ट नाही तर तिच्या नैतिकता, समाजसेवा, आणि कर्तव्यपालनाचे ही उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्व शिकवते आणि त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्याला सत्य, अहिंसी आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. ती श्यामला नेहमी देवावर श्रद्धा देवून कष्ट आणि त्यागाची शिकवण देते. पुस्तकात अनेक प्रसंगांमध्ये आईच्या कर्तुत्वाचा उल्लेख आहे. श्यामला साडीत आईने त्याला सत्य, अहिंस आणि शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. श्यामच्या आईचे मध्ये ध्येय स्पष्ट असते की आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्ती बनवणे. आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्या विषयी अपार प्रेम निर्माण होते. ती श्यामच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्याला योग्य मार्गदर्शन करते आणि त्याला सदाचरणाचे धडे देत श्यामच्या आईने तिच्या आयुष्यात अनेक संकट सहन केले. पण तिच्या मुलांच्या शिक्षणात आणि विकासात तिने कधीच कमीपणा येऊ दिला नाही पुस्तकाची शेवट अत्यंत भावनिक आहे. श्यामची आई आजारी पडते आणि अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोडी पोकडी निर्माण होते. पण तिच्या शिकवणुकीने तो आपले जीवन संस्कार लावतो. आईच्या आठवणी त्याला नेहमीच प्रेरणा देतात.

“श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे चित्रण करते या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम, आदर, आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हे मराठीतील व भारतातीलच चिरंतन टिकणारे अजरामर पुस्तक आहे.

Suyash Jadhav Department of Bioinformatics Savitribai Phule Pune University मागील काही काळात मी तीन-चार पुस्तके वाचायला घेतली होती, पण ती अर्धवट सोडून दिली. त्यातून मला...Read More

Ashwini Chikate

Ashwini Chikate

×
हे मराठीतील व भारतातीलच चिरंतन टिकणारे अजरामर पुस्तक आहे.
Share

Suyash Jadhav
Department of Bioinformatics
Savitribai Phule Pune University

मागील काही काळात मी तीन-चार पुस्तके वाचायला घेतली होती, पण ती अर्धवट सोडून दिली. त्यातून मला समाधान मिळाले नाही आणि वाचनाची भूक असूनही काही वाचले जात नव्हते. तेव्हा मी माझ्या कपाटाकडे पाहिले आणि माझी नजर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर स्थिरावली. काही वर्षांपूर्वी नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी घेतलेले हे पुस्तक वाचायचे ठरवले,आणि मी त्यात पूर्णपणे हरवून गेलो.
‘श्यामची आई’ हि प्रसिद्ध लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थातच साने गुरुजी यांची १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीतील सहभागावरून शिक्षा भोगत असताना अवघ्या पाच दिवसांत लिहलेली, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अद्वितीय ठेवा आहे. ही कथा आहे एका आईची, आपल्या मुलांवर अपार माया करणारी आईची, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी आईची; पण हे संस्कार उपदेशाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्या-छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना कठोर बनणारी ‘श्यामच्या आई’ची.
मुख्य पात्र श्याम हा एक निष्पाप, निरागस आणि कुतूहलाने भरलेला मुलगा आहे. गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाल. त्याचं बालपण साधेपणाने आणि आईच्या संस्कारांनी भरलेलं आहे. श्याम हा जिज्ञासू, समजूतदार आणि आपल्या आईवर अपार प्रेम करणारा आहे. आईच्या शिकवणीमुळे तो जीवनातील नैतिक मुल्ये शिकतो आणि आपल्या चुका सुधारण्याच्या प्रयत्न करतो. त्याच्या निरागसतेतून वाचकाला स्वत:चं बालपण आठवायला लागतं. जीवनात आलेल्या अडीअडचणीतून, परिस्थितीचा चटका सहन करत, माधुकरी मागत श्यामचा मोठा भाऊ शिक्षण घेत असतो आणि खडतर परिस्थितीत श्याम आईवडिलांजवळ राहून विद्यार्जन करीत असतो.
आई मैत्रीण बनून त्याला जीवनमूल्य शिकवत असते. प्रसंगी ती त्याच्यावर हातदेखील उगारते. परंतु तिच्या या दटावण्यातच तिचे प्रेम दडलेले असते. आपल्या मुलाला सर्व यावे, त्याने प्रत्येक गोष्ट शिकावी अशी तिची धडपड असायची. पुस्तकातील प्रत्येक प्रसंगातून श्यामच्या आईच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसून येते. ‘श्याम, मोह सोडणे म्हणजे धर्म!’ अशी ती धर्माची अतिशय सरळ, सुंदर व स्पष्ट व्याख्या श्यामला विश्लेषण करून सांगते.
काळ कठीण असला तरी आपले नैतिक मूल्य विसरायचे नाहीत, हा आईचा धडा पुढे श्यामच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून व्यक्त होतो. लोकांविषयी आदर, वृद्ध, दीनदुबळ्या लोकांविषयीचा कळवळा या पुस्तकातून साने गुरुजींनी फार सुंदर रीतीने लिहलेला आहे. दीनदुबळ्यांच्या मदतीला तत्पर राहणारा श्याम, जातीभेद न मानता ब्राह्मण असूनही दलित म्हातारीला मदत करताना दिसतो, तेव्हा वाचकाला आपल्याच वर्तनाचा विचार करायला लावतो.
आईच्या सहवासात श्यामचा कसा घडाव होत गेला, तसेच आईच्या कोणकोणत्या गुणांचा त्याला अनुभव आला आणि तिची थोरवी त्याला कशी उमगली, हे सांगतानाच लेखक श्यामच्या मर्यादा व कोतेपण हळूहळू सूचित करतो. रामरक्षा स्तोत्र लिहून घेण्याची गोष्ट असो, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग असो, वडिलांवर रुसण्याचा प्रसंग असो किंवा नोट चोरून घेण्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग लेखकाने आपल्या लेखनात टिपून ठेवले आहेत. श्यामला स्वतःच्या दोषांची जशी जाणीव होत जाते, तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक उजळत जाते आणि ते विकास पावते.
श्यामच्या या संपूर्ण प्रवासात त्याचे वडील, आई व बहिण महत्वपूर्ण भूमिका बजावतात. वडिलांचा स्वभाव कठोर, शिस्तप्रिय आणि आदर्शवादी असून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे कठोरपण पाहायला मिळते. पुढे श्यामच्या व्यक्तिमत्वावर वडिलांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा मोठा प्रभाव दिसून येतो. आईप्रमाणेच मृदू स्वभावाची, कुटुंबाची काळजी घेणारी आणि भावंडांबद्दल अतिशय प्रेम करणारी श्यामची बहिण त्याला समजून घेताना आणि आधार देताना दिसते.
‘श्यामची आई’ या कादंबरीत साने गुरुजींनी कोकणी मराठी भाषेचा सुंदर आणि नैसर्गिक वापर केला आहे. कोकणातील त्यांच्या पार्श्वभूमीमुळे ग्रामीण भाषेचे वळण आणि कोकणी बोलीतील शब्द कथेच्या संवादांमध्ये सहजपणे मिसळले आहेत. या शब्दांमुळे कादंबरीत गोडवा आणि स्थानिक रंग अधिक ठळक होतो. “आंबा,” “बाबल्याला,” “हळद-मिरसंग” यांसारखे शब्द कोकणी मराठी भाषेची झलक देतात. संवादातील या शब्दांच्या वापरामुळे पात्रे जिवंत वाटतात, तसेच वाचकांच्या जीवनाशी अधिक जवळची वाटते. निसर्गाचे वर्णन, भावनिक प्रसंग, आणि पात्रांमधील संवादांमध्ये कोकणी बोलीची ओघवती गोडी जाणवते. सुट्टीत नदीवर पोहायला जाणे, मैदानी खेळ, मस्ती, भांडण या मानवी पैलूंना साने गुरुजींनी इतके छान रंगविले आहे की प्रत्येक व्यक्तीला ती कथा स्वतः चीच असल्याचा भास होतो. या भाषाशैलीने कादंबरीला ग्रामीण आणि भावनिक सौंदर्य दिले आहे, ज्यामुळे ती वाचकांच्या हृदयावर अमिट छाप सोडते.
श्यामला आईविषयी वाटणारे प्रेमापेक्षा तिने त्याला दिलेले संस्कार जास्त लक्षात राहतात. श्यामची व्यक्तिरेखा ही साने गुरुजींनी अत्यंत आदर्शवादी पद्धतीने उभी केली आहे. त्याच्या भावनिक आणि नैतिक विकासाचा प्रवास वाचकाला प्रेरणा देतो, परंतु कधी-कधी ती व्यक्तिमत्व अतिरेकी परिपक्व वाटते. तरीही श्याम, हा त्याग, संस्कार, आणि प्रेमाचे प्रतिक बनून कादंबरीच्या हृदयाला धरून ठेवतो आणि त्याच्या विकासातून साने गुरुजींचा सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचतो.
‘श्यामची आई’ हि कादंबरी आजच्या काळातील तुटलेली नाती, नैतिकतेचा अभाव, आणि व्यक्तिस्वार्थी जीवनशैलीच्या समस्यांवर प्रकाश टाकते. ही कादंबरी कालातीत आहे आणि प्रत्येक पिढीला त्याग, ममता आणि संस्कारांचे महत्व अधोरेखित करत शिकवते की नात्यांचा खरा गाभा प्रेम आणि आदरात आहे. आधुनिक काळातील सामाजिक विघटनाला उत्तर देण्यासाठी साने गुरुजींचे हे विचार आजही तेवढेच मौल्यवान आहेत. ही कादंबरी केवळ शब्दसंग्रह नसून, एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दिलेली भावनिक भेट आहे. संस्कारक्षम साहित्य वाचण्याची आवड असलेल्या सर्वांनी ही कादंबरी जरूर वाचावी; कारण मातृत्वाच्या प्रेमाचे प्रतीक ही कालजयी कादंबरी, अखेरपर्यंत वाचकाच्या मनात गुणगुणत राहते एका आईचे शाश्वत प्रेमाचे आर्त सूर…

Submit Your Review