पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे आहेत. साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. साने गुरुजी पालगड
Read More
पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे आहेत. साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर
१८९९ रोजी झाला. साने गुरुजी पालगड येथील निवास स्थानी राहत होते.
गुरुजींची आई ह्या यशोदा या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. “श्यामची आई” हे
पुस्तक त्यांच्या मित्राच्या हट्टासमुळे लिहिले गेलेले आहे. एकदा त्यांचे मित्र त्यांना
विचारतात. तुझ्या जीवनात ही माधुर्य, सरलता, कोमलता, प्रेम हे गोड हसणे ,ही
सेवावृत्ती निरहता कोणतेही काम करण्याची लाज न बाळगणारी वृत्ती कुठून येते. ही
जादू तुला कुठून मिळते .आम्हाला पण सांगा ना, तेव्हा साने गुरुजींना राहवेना. आणि
त्यांचे डोळे भरून आले. मी किती भाग्यवान आहे ,असे साने गुरुजींना वाटू लागले.
माझी आई म्हणजे “माझे दैवत माझा गुरु कल्पतरू” नुसती ती जन्मदात्री नव्हती तर
गुरुजींचा प्राण आणि त्यांचा श्वास होती. या अखंड मातृभक्तीतूनच “श्यामची आई”
या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला. साने गुरुजी १९३१ साली नाशिकच्या
तुरुंगात होते, तेव्हा ९ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहिण्यास सुरुवात केली. पाच
दिवसात त्यांनी लेखन पूर्ण केले. पहिली रात्र सावित्री व्रत ते ४२ वी रात्र स्मुती श्राद्ध
अशा रात्री त्यांनी लिहिल्या आणि अशा रात्री तुरुंगातील मुलांना खूप आवडल्या
सावित्रीचे व्रत या रात्र मध्ये गुरुजींच्या वडिलांवर झालेला हल्ला पण ते लोक खरे
खुनी नव्हते.तर त्यांच्या गरिबीमुळे त्यांना असे क्रूर कर्म करायला लागते. पण त्यांच्या
मुळाशी मात्र प्रेम स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी त्यांना असं वागावं लागले.
जगात स्पर्धा हेच सत्य आहे .
आक्कांच्या लग्नाची गोष्ट सांगताना आई आणि आत्या संदर्भात आठवण
सांगितली आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्यावं दुसऱ्याच अश्रू पुसावं. अशी शिकवण
श्यामची आईंनी दिली आहे.फुलं म्हणजे परमेश्वराची रसमयी सादरियम मूर्ती. मुकी
फुले झाडावर फुलली पाहिजेत. असं समज आईने खूप छान सांगितली आहे. देवाचे
काम करताना लाजू नये, पाप करण्याची लाज धर अशा शब्दाच्या शिकवणीतून
गुरुजींवर सखोल परिणाम झाला. आईच्या शब्दांना किती महत्त्व आहे .श्रम-प्रतिष्ठा,
नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन,ही व्यक्तिगत मूल्य. सर्व धर्म
समभाव, संवेदनशीलता, स्त्री पुरुष समानता, ही सामाजिक मूल्य आहेत. आणि
राष्ट्रीय एकात्मता, हे राष्ट्रीय मूल्य आहेत. या सर्व मूल्यांचं सुंदर दर्शन “श्यामची
आई” पुस्तकात आपणाला घडते. मानवी मूल्यांबद्दल कितीतरी बदल, कितीतरी
रंग आणि गंध श्यामची आई मध्ये वाचायला मिळतात. काही गोष्टीत त्यांनी त्यांचं
इतिहास सांगितला आहे. त्यावरून त्यांचे जीवन दर्शन होते. पण प्रासंगिक जीवनदर्श
हेच श्यामची आईची वैशिष्ट्ये आहेत. असे म्हणता येईल. या जगात वावरताना नुसते
प्रेम पुरेसे नाही, तर जीवन सुंदर करण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत. प्रेम, ज्ञान,
आणि शक्ती या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल.
प्रेम प्रेमहीन व्यर्थ आहे, ज्ञानहीन ज्ञान व्यर्थ आहे, शक्तीहीन प्रेम व ज्ञान हे ही व्यर्थच
याचे सुंदर चित्र सहजरीत्या आणि सोप्या शब्दात सांगितले आहे.
एकमेकांचे प्रेमळ बंध निर्माण झाले तर वातड वाद संपतील आणि
परस्परसंबंधांना एक भावचिंब रूप येईल. गुरुजींना वाटतं आईचे प्रेम , माया थोर
शिकवण्याची सरळ साध्या सुंदर संस्कृतीचे एक गोड कथात्मक चित्रण म्हणजे
श्यामची आई म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी त्यांना
सुसंस्कारी बनावे यासाठी झगडणारी, छोट्या-छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर
संस्कार बिंबवणारी, शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी, ही आदर्श आई आजच्या
पिढीतील उगवत्या पिढीसाठीच निवेदन त्यांच्या आईवर बाबांसाठी प्रेरक ठरेल हे
निश्चित. श्यामची आई हे नुसते पुस्तक नाही, तर आई मुलांमधील अफाट प्रेम
कृतज्ञता करणारा एक ग्रंथ आहे असे म्हणता येईल. आई म्हणजे मुलांचं पूर्णत्व आहे. हे
या पुस्तकातून समजते साने गुरुजी सांगतात माझी आई ईश्वरी
देणगी आहे. आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्काराचे प्रभावी चित्रण गुरुजींच्या
लेखणीतून आईच्या असिम प्रेमाची, त्यागाची, कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी
उलगडते.
नातेसंबंधीचा जिव्हाळा जाणून घेण्यासाठी आई मुलांमधील प्रेम म्हणजे संस्कार
नीटनेटकेपणा असल्या गोष्टी आजी कडून आणि समाजातून ऐकल्या होत्या त्या
प्रेरणेतून “श्यामची आई” हे पुस्तक निवडले.
श्यामच्या आई सारखी आई प्रत्येक मुलांना भेटो तेव्हाच भविष्यात साने गुरुजी
सारखी मुले निर्माण होतील, जेणेकरून भविष्यात सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.
Show Less