श्रीमानयोगी

By रणजीत देसाई

Share

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

Price:  
₹750
Share

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

Availability

available

Original Title

श्रीमानयोगी

Publish Date

1984-01-01

Published Year

1984

Publisher, Place

ISBN

9788177666403

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी

Book Reviewed by MOHAN BHAUSHAEB PAWAR (Clerk) Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College Shirsondi, Tal. Malegaon श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील...Read More

Chaudhari Jagdish Devram

Chaudhari Jagdish Devram

×
छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी
Share

Book Reviewed by MOHAN BHAUSHAEB PAWAR (Clerk)
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट
कादंबरी आहे. शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे.
यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना
कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची
वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक
ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या
भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक
वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत
आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि
साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इतिहासाचे पुस्तक वाचतो असे
वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला
आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी
आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड उल्लेख केला आहे.

श्रीमान योगी

Mr.Makarand Ashok Purandare, Sinhgad Institute of Management,Pune ‘स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. स्वामीनंतर तब्बल सात वर्षांनी श्रीमानयोगी वाचकांपुढे सादर झाली.. या पुस्तकाच्या नावातूनच...Read More

Mr.Makarand Ashok Purandare

Mr.Makarand Ashok Purandare

×
श्रीमान योगी
Share

Mr.Makarand Ashok Purandare, Sinhgad Institute of Management,Pune
‘स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. स्वामीनंतर तब्बल सात वर्षांनी श्रीमानयोगी वाचकांपुढे सादर झाली.. या पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा भारदस्तपणा वाचकांच्या मनाला स्पर्श करतो.
शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. कारण शिवचरित्राबाबत इतिहासकारांत जेवढे दुमत आहे तेवढे दुमत असलेले दुसरे चरित्र नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे.
इतिहास आणि कल्पना याचा मनोरम संगम घडल्यानेच उच्च कोटीची ऐतिहासिक ललितकृती तयार होते. याचे प्रत्यंतर स्वामी मध्ये होतेच. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या साऱ्यांचा वापर केला आहे.
भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरुवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरुवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजकारणी, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही.
इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्त्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

श्रीमानयोगी” – छत्रपती शिवाजीमहाराजांचे युग पुरुषत्व

Book Review: Wagh Saurabh Deepak, S.Y. M. Pharmacy, MVP’s College of Pharmacy, Nashik [Librarian Shinde Sujata Dadaji] श्रीमानयोगी" – छत्रपती शिवाजीमहाराजांचे युगपुरुषत्व [लेखक: रंजितदेसाई प्रकाशितवर्ष:...Read More

Wagh Saurabh Deepak

Wagh Saurabh Deepak

×
श्रीमानयोगी” – छत्रपती शिवाजीमहाराजांचे युग पुरुषत्व
Share

Book Review: Wagh Saurabh Deepak, S.Y. M. Pharmacy, MVP’s College of Pharmacy, Nashik [Librarian Shinde Sujata Dadaji]
श्रीमानयोगी” – छत्रपती शिवाजीमहाराजांचे युगपुरुषत्व [लेखक: रंजितदेसाई प्रकाशितवर्ष: १९८० प्रकार: ऐतिहासिक कादंबरी]
रंजित देसाई लिखित श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरी मराठी साहित्याच्या सुवर्ण युगातील एक अनमोल ठेवा आहे. ही कादंबरी शिवाजीमहाराजांच्या केवळ राजकीय जीवनाचे नव्हे, तर त्यांच्या मानवी पैलूंचे, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे आणि त्यांच्या आदर्श नेतृत्वाचे ही दर्शन घडवते.
पुस्तकाचा गाभा आणि मांडणी:
1. बालपण आणि जिजाबाईंचा प्रभाव: शिवाजीमहाराजांच्या बालपणावर पुस्तकाने खूपच ठामपणे भर दिला आहे. जिजाबाईंच्या शिकवणीने आणि संस्कारांनी शिवाजींच्या व्यक्तिमत्त्वाला कसा आकार दिला गेला, हे अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. धार्मिकग्रंथांच्या कथा, त्यांच्या मातृभूमीवरील निष्ठा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा यांचा त्यांच्या मनावर झालेला प्रभाव पुस्तकात स्पष्ट दिसतो.
2. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष: शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागे असलेली तळमळ आणि त्यासाठी त्यांनी झेललेले अडथळे कादंबरीत थक्क करणारे आहेत. त्यांनी कशाप्रकारे आदिलशाही, निजामशाही, मुघलसाम्राज्य, आणि स्थानिक सुभेदारांविरोधात स्वराज्याचे स्वप्न साकारले, याचे रोमांचक वर्णन पुस्तकात आहे.
3. युद्धनीती आणि धोरणात्मक दूरदृष्टी: शिवाजीमहाराजांची गुरिल्लायुद्धतंत्रे, किल्ल्यांचीबांधणी, आणि त्यांच्या युद्धनायकांची योजनेत सहभागी करून घेण्याची कला कादंबरीत बारकाईने विशद केली आहे. अफझलखानवध, प्रतापगडाचाविजय, आणि सिंहगडवरील तानाजी मालुसरे यांचा पराक्रम हे प्रसंग वाचताना वाचक थक्क होतो.
4. शिवाजीमहाराजांचे मानवीरूप: महाराजांची मानवीबाजू, त्यांचा कौटुंबिक जीवनातील संघर्ष, पत्नींसोबतचे संबंध, आईविषयी असलेली श्रद्धा, आणि आपल्या मावळ्यांवरील निष्ठा यागोष्टी लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने मांडल्या आहेत.
5. धार्मिक सहिष्णुता आणि प्रजाहित दक्षता: शिवाजी महाराजांनी हिंदूधर्माचे रक्षण केले, परंतु त्याचवेळी इतर धर्मांना ही समान वागणूक दिली. त्यांनी स्वराज्यातील लोकांची रक्षा, न्याय, आणि सुरक्षितता यांसाठी ठामपणे काम केले.
लेखनशैली आणि प्रभाव:
1. भावनिक ओलावा: रंजित देसाई यांची लेखनशैली अतिशय ओघवती आहे. प्रत्येक प्रसंग वाचकाच्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. शिवाजीमहाराजांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील संघर्ष वाचताना वाचक भावनांनी भारावून जातो.
2. संवाद आणि प्रसंगचित्रण: कादंबरीतील संवाद धारदार आणि यथार्थ आहेत. लढाईंच्या प्रसंगांचे चित्रण वाचताना वाचकाला थरारक अनुभव मिळतो.
3. इतिहास आणि कल्पनारम्यता: कादंबरी ऐतिहासिक घटनांवर आधारित असली, तरी लेखकाने काही ठिकाणी साहित्यिक स्वातंत्र्य घेतले आहे. यामुळे कथेला नाट्यमयता आणि आकर्षकता येते.
महत्त्वाचेमुद्दे:
1. नेतृत्व गुणांचे दर्शन
2. प्रेरणादायी विचारधारा
3. सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू
काहीमर्यादा: – काही ठिकाणी साहित्यिक स्वातंत्र्यामुळे ऐतिहासिक घटकांमध्ये फेरफार वाटू शकतो. – काही प्रसंगांचे वर्णन लांबवलेले वाटू शकते.
निष्कर्ष: श्रीमानयोगीही केवळ ऐतिहासिक कादंबरी नाही; ती छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कार्याचा गौरव करणारी प्रेरणादायी साहित्यकृती आहे. हे पुस्तक वाचताना वाचकाला महाराजांची दूरदृष्टी, नेतृत्वगुण, आणि मानवीमूल्ये यांचा आदर वाटतो.
श्रीमानयोगी ही कादंबरी प्रत्येक मराठी वाचकाने एकदातरी वाचायला हवी. हे पुस्तक शिवाजीमहाराजांचे जीवन समजून घेण्यासाठीच नाही, तर त्यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेण्यासाठी ही उपयुक्त आहे.

श्रीमानयोगी

  श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवन चरित्रं वरील एक ऐतिहासिक कादंबरी आहे .रणजीत देसाई हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत . श्रीमानयोगी हे नाव जेवढं शांत...Read More

Atharv Mohan Kadam

Atharv Mohan Kadam

×
श्रीमानयोगी
Share

  श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवन चरित्रं वरील एक ऐतिहासिक कादंबरी आहे .रणजीत देसाई हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत . श्रीमानयोगी हे नाव जेवढं शांत वाटतंय त्या पेक्षा जास्त वादळी हे आपल्या शिवरायांच आयुष्य होत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत . ही कादंबरी महराजांचा जन्मापासून सुरू होते आणि पुढे ती कधीच थांबत नाही . ह्याच कारण खूप सोप्पं आहे , ज्या माणसाने आपल्याला जागायला शिकवलं त्याची कादंबरी कशी थांबू शकते. आपल्या महाराजांचा जीवन ह्या कादंबरी मुळे आपल्याला समजत . राजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी रक्ताच पाणी केलं . शून्यातून सुरू केलेल्या राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महराजांनी स्वराज्य मध्ये केली . घोड्यांचा टापाखाली गुलामगिरी उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजान माझं मानाचा मुजरा .
मला ह्या कादंबरी मधील खूप काही गोष्टी आवडल्या आहेत . राजांच आपल्या मावळयांबरोबर असलेलं नातं रणजीत देसाई ह्या कादंबरी मध्ये पुरे पुर मांडतात .

Submit Your Review