Original Title
सहज बोलणे हितउपदेश
Subject & College
Series
Publish Date
2010-01-01
Published Year
2010
Publisher, Place
Total Pages
202
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अतिशय मार्मिक, उदबोधक, साधकांना उपयुक्त अशा संवादाचे संकलन!
सहज बोलणे हितउपदेश हे पुस्तक महाराष्ट्रातील थोर संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या बद्दल आहे. याचे लेखक गो.सी. गोखले हे असून यांनी हे पुस्तक लिहिलेले...Read More
Mr. Prasad Shriram Kulkarni
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अतिशय मार्मिक, उदबोधक, साधकांना उपयुक्त अशा संवादाचे संकलन!
सहज बोलणे हितउपदेश हे पुस्तक महाराष्ट्रातील थोर संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या बद्दल आहे. याचे लेखक गो.सी. गोखले हे असून यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये महाराजांकडे येणाऱ्या लोकांना प्रपंच करत असताना परमार्थ करताना विविध शंका येत असत त्याबद्दल प्रत्यक्ष महाराजांच्या वाणीतून त्या शंकांचे निरसन गोंदवलेकर महाराजांनी अगदी सहजरीत्या सोप्या भाषेत लोकांना पटवून दिले व उत्तर दिले. ३७५ गोष्टींद्वारे गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या शंकेचे समाधान केलेले आहे. याद्वारे प्रापंचिक लोकांना परमार्थ कसा करावा व तो करत असताना येणाऱ्या शंका अडचणी हे पुस्तक वाचले तर आपोआपच दूर होण्यास मदत होते व परमार्थ चांगला होतो. हे पुस्तक लिहिताना गोखले यांना गोंदवले संस्थान यांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या स्मरणिका तसेच प्राध्यापक के. वी. बेलसरे यांनी लिहिलेले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबद्दल चे चरित्र तसेच तात्यासाहेब केतकर यांनी लिहिलेले आत्मवृत्त तसेच डॉक्टर अंतरकर यांची वाणी रूप श्री महाराज इत्यादी. अनेक पुस्तकांमधून ३७५ गोष्टींची निवड करून त्याचे संकलन या पुस्तकात केले आहे. अनेक वाचकांनी या गोष्टीपूर्वी वाचलेही असतील परंतु गोखले यांनी भरपूर गोष्टींमधून ३७५ गोष्टीची निवड केली व वाचकांसाठी प्रपंच करताना परमार्थ कसा करावा याविषयी येणाऱ्या शंकांचे समाधान महाराजांनी कसे केले हे या पुस्तकातून वाचकांना वाचायला मिळते व प्रपंच करताना परमार्थात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी हे समजते.. या पुस्तकाद्वारे वाचकांना नामस्मरणाबद्दल महाराजांनी खूप काही सांगून ठेवले आहे.
नामस्मरणाची ताकद किती आहे हे महाराजांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे वाचकांना नामाबद्दल गोडी निर्माण होते. तसेच आपल्या घरातील मुलांवर कसे संस्कार करावे लोकांशी कसे वागावे बोलावे या सर्व शंकांची उत्तरे महाराजांनी दिल्यामुळे समाजात वावरताना याचा खूप उपयोग होतो. तसेच महाराजांना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला महाराज आपल्या जीवनाचे रहस्य काय? त्यावर श्री गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिले मी जन्मापासून नामा शिवाय कशाचीही आठवण ठेवली नाही ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापली कडे सत्य सांगतो, महाराज म्हणाले मला कशाचीही अपेक्षा नाही. ।। श्रीराम ।।
।। श्रीमहाराजांच्या शिकवणुकीचे सार ।।
भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो आणि तो कमी झाला की, साधकाला श्रीमहाराजांचे अस्तित्व प्रकट होऊ लागते. साधक नामामध्ये रंगू लागला म्हणजे त्याचे कर्तेपण कमी होऊ लागते. नंतर तो जे-जे कर्म करतो त्याचे फल श्रीमहाराजांच्या इच्छेवर तो सोपवतो. हे साधले की त्याला एक प्रकारची शांती मिळून यशापयशाचे सुख-दुःख होत नाही. ‘श्रीमहाराजांच्या इच्छेने सर्व गोष्टी घडतात’ असे म्हटल्यावर, म्हणजे कर्तेपणा त्यांच्याकडे दिल्यावर आपली स्वतःची इच्छा अशी उरतच नाही तेथे यशापयशाचे महत्त्वच उरत नाही. अशा रीतीने भगवंताच्या नामात प्रपंचाचे कर्तव्य करीत असता
श्रीमहाराजांच्याकडे कर्तेपण देऊन सुखदुःखामध्ये समाधानात राहणे ही त्यांच्या अस्तित्वाची खरी खूण होय हे श्री महाराजांच्या वाणीतून समजते. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश, हा प्रपंचाचा धर्मच आहे, हे ओळखून आपल्या जीवनात घडून येणाऱ्या सर्व घटना श्रीमहाराजांच्या इच्छेने व सत्तेनेच घडून येतात अशी खरी जाणीव ज्यांच्या अंतरंगात उमटली, त्याला त्याचे खरे अस्तित्व समजले व त्यालाच त्याचे रहस्य उमगले. श्रीमहाराजांच्या अस्तित्वाची खूण बघत असताना, ते प्रापंचिक अडचणी किती दूर करतात हे न पाहता, सर्व प्रसंगांत आपले नाम समाधान किती टिकते हे प्रत्येकाने पहावे.
सहज बोलणे हितउपदेश हे पुस्तक गो. सी. गोखले यांनी लिहिल्यामुळे वाचकांना श्री गोंदवलेकर महाराज यांच्या सुंदर विचाराची ओळख अगदी सहजरित्या होते. प्रत्यक्ष महाराजांनी केलेला उपदेश काय होता हे वाचकांना कळण्यास खूप मदत होते. प्रपंच करताना परमार्थ कसा करावा हे अगदी सहज उमगते.
