साऊ

By सूर्यवंशी उमेश

Price:  
₹150
Share

Original Title

साऊ

Publish Date

2022-11-27

Published Year

2022

Publisher, Place

Total Pages

118

Format

paperback

Country

India

Language

Marathi

Readers Feedback

साऊ

भारताची पहिली महिला शिक्षिका कोण? असं विचारलं की, आज कोणीही उत्तर देईल की ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’. महिला शिक्षिका! मुलींसाठी शाळा या एवढ्या पुरता आपण त्यांना...Read More

Yogita Wakchaure

Yogita Wakchaure

×
साऊ
Share

भारताची पहिली महिला शिक्षिका कोण? असं विचारलं की, आज कोणीही उत्तर देईल की ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’. महिला शिक्षिका! मुलींसाठी शाळा या एवढ्या पुरता आपण त्यांना मर्यादित केले आहे. याच मर्यादेला तोडत 118 पृष्ठ संख्येत सावित्रीबाईंचा जीवन कार्याचा मागोवा घेत एक छोटेखानी पुस्तक म्हणजे उमेश सूर्यकांत लिखित “साऊ”.
पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. अगदी प्रेमळ आईच्या मायेने एका मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला पुढे घेऊन जाणाऱ्या सावित्रीबाईंचे रेखाटन त्यांच्यातल्या आईचे दर्शन घडवते. मुखपृष्ठावर दिसणारी साऊ वाचतानाही आईप्रमाणेच भासते. जशी आई आपल्या मुलांवर प्रेम करते, त्यांच्यावर संस्कार करते, तसेच ती संकटकाळी दोन हातही करते; तशीच ही बहुजनांची आई. मनुवादी व्यवस्थेत अडकलेल्या आपल्या बहुजनांना बाहेर काढण्यासाठी ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर कसे संस्कार करते हे या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळते. “भारतीय इतिहासातील सर्वाधिक आधुनिक विचारांची व अचारांची स्त्री- सावित्री ज्योतिराव फुले” ह्या मुखपृष्ठावरील वाक्याची फोड करताना लेखकाने दिलेले समर्पक असे संदर्भ ह्या पुस्तकाला आणखीनच उजवे ठरवते. त्यातील एक संदर्भ येथे नोंदवा वाटतो तो असा की, आज या शतकातही मुलींनी लग्नाआधी सासरी जाऊ नये ही परंपरा म्हणून आपण पाळात आलोय परंतु या परंपरेला 19व्या शतकात तिलांजली देत वधु- वरास एकमेकांची नीट ओळख व्हावी म्हणून आपल्या भावी सुनेला साऊ लग्नाआधीच आपल्या घरी आणते. त्यात हा विवाह आंतरजातीय आणि ही गोष्ट आहे दीडशे वर्षांपूर्वीची हे आपल्याला विसरता येत नाही.
लेख मालिकेचे संकलित असलेले हे पुस्तक आपण सहज पुढे पुढे वाचत जातो.दीड-दोन पानी लेखांची लांबी असल्यामुळे वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. सहज आणि सोपी भाषा आणि अलंकारिक्ता व अतिशोयोक्ती अगदी नगण्य असल्यामुळे आपल्याला साऊ समजायला सोपी जाते. चरित्र वजा जीवन कार्याचा, त्यांच्या साहित्याचा तसेच सावित्रीबाईंच्या विचारांची चिकित्सा आपल्याला ह्या पुस्तकात पाहायला मिळते. त्यांच्या कवितेंचा वेध घेताना सावित्रीबाईंच्या वाचनाचा व्यासंग आणि त्यांची चिकित्सकृती आपल्याला जाणवते आणि त्याचबरोबर सावित्रीचे साहित्य वाचावं असं आपल्याला मनापासून वाटतं हे लेखकाच यश आहे अस मला वाटत.

शिष्य गुरुच्या तालमीत तयार होतो! हे जरी खरं असलं तरी, त्या तालमीत स्वतःला झोकून देण्याची त्या परिस्थितीला तोंड देण्याची प्रतिभाही त्या शिष्याकडे असावी लागते ही वृत्ती सावित्रीबाईंमध्ये दिसून येते हे आपल्याला या पुस्तकातून क्षणाक्षणाला जाणवतं. आजच्या काळाला अनुरूप करून हे पुस्तक जरी लिहिलं असलं तरी काळाचा आणि त्या वेळेच्या परिस्थितीचा ताळेबंद लेखकाने अतिशय योग्य रीतीने बांधला आहे.

एका शिक्षिके पासून ‘समाज शिक्षिका’ हा प्रवास म्हणजे साऊ. सावित्रीबाईंना मिळालेल्या उपाधी कशा सार्थ ठरतात हे लेखकाने चिकित्सकवृत्तीने पटवून दिले आहे. ‘साऊ’ पासून सुरु झालेला हा लेखमालेचा प्रवास ‘मृत्युंजय सावित्री’ पर्यंत पोहोचतो आणि ह्या लेखांची उजळणी सुरू होते ‘सावित्रीयाण’ मध्ये. सावित्री कोण होती? सावित्रीचे महानपण कशामध्ये शोधायचे? सावित्रीची आजची प्रस्तुती काय? या तीन प्रश्नांचे उत्तर म्हणजे ‘सावित्रीयान’. हे पुस्तक सावित्रीवर लिहिलेल्या साहित्यामध्ये एक मोलाची भर टाकते. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी यातून आपल्याला समजतात. प्रत्येकाने वाचावे आणि त्याचे पारायणे करावीत असे हे पुस्तक म्हणजे “साऊ”. पारायणे या करिता की, एका आधुनिक स्त्रीला समजून घेता यावं. सर्वांनी नक्की वाचा आणि एक अतिशय धाडसी, निर्णयक्षम, कणखर, करुणाशील मानवतावादी असलेली स्त्री जाणून घ्या. वाचा “साऊ”!

Submit Your Review