Original Title
साहित्याचा अन्वयार्थ
Subject & College
Publish Date
1996-01-09
Published Year
1996
Publisher, Place
Total Pages
242
ISBN 10
८१-७१६१-५८६-४
Format
Paperback
Language
Marathi
Readers Feedback
साहित्याचा अन्वयार्थ
Book Review : SAHARE SAKSHI RAMESH, MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik. प्रास्ताविक साधारणतः वाड्मयाचा विचार करीत असताना केवळ वाड्मय...Read More
SAHARE SAKSHI RAMESH
साहित्याचा अन्वयार्थ
Book Review : SAHARE SAKSHI RAMESH, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.
प्रास्ताविक
साधारणतः वाड्मयाचा विचार करीत असताना केवळ वाड्मय कृतीचाच तेवढा विचार करावा, असा मराठीतील बहुसंख्य समीक्षांचा आग्रह असतो. (याला अपवाद नाहीत, असे नाही) परंतु साहित्यनिर्मिती ही काही अधांतरी घडणारी गोष्ट असत नाही. साहित्यकृतीचा एक निर्माता असतो. त्या निर्मात्याला एक व्यक्तिमत्त्व असते आणि त्या व्यक्तिमत्त्वाच्या भोवती अफाट जनसमुदाय पसरलेला असतो. त्या जनसमुदायाची एक संस्कृती असते, एक अर्थव्यवस्थाही असते. धर्म आणि इतिहासही असतो. कधी कधी राजकीय चळवळी या जनसमुदायाला आकार देत असतात. एकंदरीत निर्मात्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, ती या साऱ्या घटकांमधून. मग हे व्यक्तिमत्त्व आपले व्यक्तिमत्त्व जपत जपत भोवतीच्या जीवनाचा विचार करीत असते. या विचारातून कधी तरी वाङ्मयकृतीचा संभव होत असतो. त्यामुळे वाड्मयकृतीतून या साऱ्याच गोटी येणे किती अपरिहार्य ठरते, ते पुन्हा वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कलावंताच्या भोवती असणाऱ्या परिघाचा दाब केवढा मोठा असतो, हे आपण साहित्यकृतीचे अंतरंग पाहू लागलो, की उक्षात येते. याचा अर्थ असा, की परियाचा दाब कलाकृतीच्या संभवासाठी कारण तर असतोच, पण परिघातील काही गोष्टींमुळे कलाकृतीचे रूपही बदलून जाते, नव्हे, तिच्यात मूल्यात्मकताही येऊ शकते. हे सूत्र या ग्रंथातील सर्वच लेखांमधून कळत नकळतपणे पसरून राहिले आहे. एका अर्थाने मराठी साहित्याचा घेतलेला हा वेध एका व्यापक परियाच्या संदर्भामुळे रूढ मराठी समीक्षेपेक्षा वेगळा ठरावा, अशी विनम्र अपेक्षा आहे.
साधारणतः गेल्या दहा वर्षात लिहिलेले लेख, वाचलेले निबंध आणि केलेती भाषणे येथे एकत्रित केली आहेत. (काळाचा संदर्भ लक्षात यावा, म्हणून पूर्वप्रसिद्धीचा तपशीलही दिला आहे.) अर्थात काही लेखांचे पुनर्लेखन केले आहे. भाषणे मात्र जशीच्या तशी दिली आहेत. कारण भाषणातील निवेदनाची गती ही वेगळी असते. तिच्यात बदल केल्यास अगर भाषणाचा लेख करण्याचा प्रयल केल्यास मूल्यी तय विपडू शकते. फक्त चळवळीचे साहित्यशास्त्र’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी उद्योधन वर्गात व्याख्याने देत असताना काही भर पडत गेली. त्यामुळे त्या भाषणाचे काही प्रमाणात पुनर्लेखन केले आहे.
भाग पहिला
प्रकरण पहिले :- समाज वास्तवाच्या संदर्भात व संज्ञेच्या वापरातून
कलावंताच्या भावविश्वासाबरोबरच विषय ध्वनीत होत आहे. म्हणूनच सामाजिक जाणीव, समाजाच्या स्थिती गती बद्दल चे विचारविश्वही या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे.
प्रकरण दुसरे :- 19 व्या शतकातील चळवळी, त्या काळातील जीवन आणि मूल्यात्मकता, जीवनाचे स्वरूप त्यातूनच आज मराठी वांग्मय काही वांग्मयीन चळवळीचा उदय झालेला दिसून येतो.
प्रकरण तिसरे :-१) प्राचीन मराठी वांग्मयाभ्यासाची एक दिशा.
२) लोकवाङ्मयसंबंधी. ३) आधुनिक वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी.
या संदर्भातील तीन टप्पे टिपणी माहिती सांगण्यात आली आहे.
प्रकरण चौथे :- ग्रामीण आणि दलित साहित्यांचा विचार प्रवाह, गांधीवादाच्या उदयाची पार्श्वभूमी इतर काही ग्रामीण साहित्य चळवळील संबंधी माहिती देण्यात आली आहे.
भाग दुसरा
प्रकरण पहिले :- 1960 नंतरच्या मराठी कादंबरीतील काही प्रवृत्ती व सामाजिकता यांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
प्रकरण दुसरे :- मराठी ग्रामीण कादंबरीचे पहिले शतक, कथावांग्मय आणि देशीयता यांचा आढावा घेण्यात आला आहे.
प्रकरण तिसरे :- यामध्ये मराठी कथेसंबंधीचे चार मुख्य लेख व त्या संदर्भातील काही आकलने सांगितलेली आहेत.
निष्कर्ष
नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रकाशित केलेल ‘साहित्याचा अन्वयार्थ’ या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून कथा कादंबरी व त्यांची रचना, वाङ्मयाचा उपयोग, ग्रामीण जीवनावरील कृतिशीलता, मराठी कादंबरीचे पहिल्या शतकातील घटक, कथेसंबंधी उपयुक्त असणारे लेख. यांचा सखोल अभ्यास या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून उपयुक्त ठरत आहे.
